कुळथाचे(हुलग्याचे)पिठले

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
28 Jul 2008 - 1:10 pm

शेखरच्या मागणीवरून ही पाकृ लिहिते आहे.
कुळीथ पीठ १/२ वाटी,३ ते ४ हिरव्या मिरच्या,६ते ७ लसूण पाकळ्या,एखादे आमसुल,ओले/सुके खोबरे,कोथिंबिर,तेल,फोडणीचे साहित्य
कुळथाच्या पीठात ३ ते ४ वाट्या पाणी घालून कालवून घ्यावे,त्यात मीठ घालावे.
तेलाची खमंग फोडणी करावी.त्यात लसूण पाकळ्या,मिरच्या,आमसूल घालावे.व हे कुळथाचे पीठ घालावे.खोबरे व कोथिंबिर घालावे.खळखळून उकळू द्यावे,चांगले शिजू द्यावे.
हे पिठले पातळच करावे व गरम गरम पिठले वाफाळत्या भाताबरोबर खावे.सोबत पोह्याचा पापड नाहीतर मिरगुंडे आणि सांडगी मिरची असावी,बाहेर पाऊस कोसळत असावा...
(काही जण फोडणीत पाणी घालून उकळतात व त्यात पीठ घालतात,पण गुठळ्या टाळण्यासाठी आधी पीठ पाण्यात कालवून मग फोडणीत घालणे चांगले.म्हणजे मी तरी तसे करते.)

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

28 Jul 2008 - 1:19 pm | मृगनयनी

स्वाती जी..खरच रसरशीत डीश आहे.( आणि बर्‍यापैकी सोपी ही)
माझी आई म्हणते..मला काहीच येत नाही.
आता ही डीश बनवून तिला आश्चर्याचा धक्का देते.

मी आपली भयानक आभारी आहे.

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 1:21 pm | विसोबा खेचर

मी आपली भयानक आभारी आहे.

हा हा हा! हे वाक्य भयानक आवडले! :)

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 1:20 pm | विसोबा खेचर

हे पिठले पातळच करावे व गरम गरम पिठले वाफाळत्या भाताबरोबर खावे.सोबत पोह्याचा पापड नाहीतर मिरगुंडे आणि सांडगी मिरची असावी,बाहेर पाऊस कोसळत असावा...

स्वाती, अगं का असा अत्याचार करतेस? आत्ता ठाण्यात बाहेर अक्षरश: धुवाधार पाऊस पडतोय, वातावरण कुंद झालं आहे आणि अश्या वातावरणात ही कुपिची पाकृ नुसती वाचायची म्हण्जे साक्षात जुलुम आहे! :)

अवांतर - या वेळेसही तुझ्या ठाणा ट्रिपेत तुला भेटायचं राहिलंच. तुझा फोन नंबर मोबाईल मधून निघून गेला आणि तुला कॉन्टॅक्टच करता आलं नाही. पण च्यामारी, तूही पक्की कोकणस्थ! पुन्हा एखादा फोन केला असतास तर काही बिघडलं असतं का! :)

असो, आता म्होरल्या टायमाला नक्की! :)

(कुळीथपिठलंप्रेमी शाळूसोबती) तात्या.

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2008 - 1:25 pm | स्वाती दिनेश

अवांतर - या वेळेसही तुझ्या ठाणा ट्रिपेत तुला भेटायचं राहिलंच. तुझा फोन नंबर मोबाईल मधून निघून गेला आणि तुला कॉन्टॅक्टच करता आलं नाही. पण च्यामारी, तूही पक्की कोकणस्थ! पुन्हा एखादा फोन केला असतास तर काही बिघडलं असतं का!
आम्ही काय ठाण्यात आलो की एकदम रिकामटेकडे! तुम्ही कामाची माणसं बाबा .. त्यामुळे 'बिज्जी' असशील असं वाटलं..आणि मग शाळेच्या गेट टू गेदरात बाकी बरंच काही राहून गेलं,त्यात आपलं भेटणंही..
असो, आता म्होरल्या टायमाला नक्की!
होहो प्रॉमिस.. नक्की... अगदी मिसळीसकट नक्की...
स्वाती

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jul 2008 - 2:50 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी पाऊस, गरमागरम 'कुळथाचे पिठले', मस्त मऊ मोकळा भात आहाहा.. किती पाणी सुटले तोंडाला. :)

पुण्याचे पेशवे

शेखर's picture

28 Jul 2008 - 1:44 pm | शेखर

स्वाती ताई ,

लगेचच पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद....
आज करायला सांगतो....

शेखर

प्राजु's picture

29 Jul 2008 - 2:39 am | प्राजु

स्वाती,
अगं... मला हे पिठलं इतकं आवडतं ना.. की मी माझ्या कोकणातल्या मावशीकडून ताजं दळलेलं कुळथाचं पीठ घेऊन आले आहे इकडे. मी ही असच करते हे पिठलं.. आजच करते आता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/