डोक्यातल्या मेंदुच्या तंतुमय जगात
संशय नावाची एक अस्सल जमात
त्या जमातीचा म्होरक्या मी स्वतः
आणि माझेच विचार त्याची माता
उगा कायपण ऐकून फ़िरते हे डोके
सापडल ती दिशा घेउन सटकत रहाते
आपणच ओतायला तेल काढते
वर ओतून पुन्हा स्वतःच पेटते
महायुध्दं भडकतात डोक्यात माझ्या
सद् असद् विचारांना मी देतो रजा
खऱ्या खोट्याची शहानीशा?
पर्वा नाय कारण चढलाय नशा
नाहि म्हणायला कोणितरी समजाउ पाहते
जाउदे म्हणत विसरयला सांगते
एक एक तंतु जळून खाक होत असतो
पण मनातील सल मात्र तशीच राहते
प्रतिक्रिया
10 Apr 2014 - 8:26 pm | एकुलता एक डॉन
अत्त्युत्तम
13 Apr 2014 - 10:31 am | जातवेद
धन्यवाद :)