नाशिक सप्तशृंगी गड ट्रीप : एक अनुभव

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in भटकंती
6 Apr 2014 - 5:45 pm

नुकतेच नाशिक सप्तशृंगी गडाची ट्रीप केली
पुण्याहून राज्य सरकारी परिवहन मंडळाच्या बस( २* २ एशियाड ) ने नाशिक ला गेलो
नाशिकहून साध्या बसने ( S T चा लाल डबा!) आधी नांदुरी मग तिथून सप्तशृंगी गडावर गेलो

गडावर सोयी सुविधांचा अभावच आहे
भक्तनिवास आहे पण त्यांची निट देखभाल होत नाही हे लगेच कळून येत होते खोल्या स्वछ नव्हत्या तसेच त्याच्या आवारातच (passage मध्ये)लोक आपापल्या पथाऱ्या पसरून झोपत होते
प्रसादाच्या जेवणाची सोय त्यामानाने बरी होती

सर्वत्र अस्वच्छता,धुळीचे साम्राज्य आणि पचापचा थुंकणारे लोक यांचा अक्षरश: वैताग येत होता
तिथले stalls पाहून 'देऊळ ' picture ची आठवण झाली

शक्य असेल तर गडावर मुक्काम न करता नाशिकला मुक्काम करून तिथून देवी दर्शनापुरती गडाची ट्रीप करणे जास्त सोयीस्कर आहे

गड चढताना होणाऱ्या भोवतालच्या निसर्ग दर्शनामुळे आणि मग देवीच्या दर्शनामुळे ह्या गोष्टींचा तात्पुरता का होईना विसर पडला आदिशक्तीचे दर्शन घेऊन मन तृप्त झाले

गडावरून उतरून साध्या बसने नाशिक मग तिथून त्र्यंबकेश्वरला गेलो
ह्या दोन्ही प्रवासात खिडकीतून बाहेर थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे ह्या थाटात वावरणारे भारतीय लोक ! त्यात बसचे वाहक चालक पण! (मी पुढच्या seat वर बसलेले असल्यामुळे मला हे फारच प्रकर्षाने दिसत होते)
का आपण ह्या देशात जन्माला आलो असे वाटत होते

त्र्यंबकेश्वर ला पोचल्यावर तिथे शेगाव संस्थानच्या भक्तनिवासात राहिलो ते मात्र खूपच छान आहे
तिथे त्यांचे सुरेख मंदिर पण आहे. ( मंदिरापासून १ km अन्तर)
त्र्यम्बकेश्वारला जास्त चांगले वाटले (सुट्ट्या सुरु व्हायच्या आहेत अजून म्हणून थोडी बजबजपुरी कमी होती)

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परत पुण्यात अशी छोटेखानी सहल पार पडली.

पुण्यात येताना खाजगी बसने आलो त्यामुळे थोडी गैरसोय झाली
राज्य सरकारी परिवहन मंडळाच्या बसची सोय त्यापेक्षा चांगली आहे ( तिकीटाची किंमत पण जास्त आहे ना खाजगीपेक्षा !)

आपण जरा routine मधून change आणि ताजेतवाने होण्यासाठी म्हणून प्रवासाला जातो त्यात पण देवाच्या ठिकाणी जाताना मनात श्रद्धा आणि भक्तीभाव ठेवून जातो पण तिथेच अशा गोष्टी पाहून मन खट्टू होते
आणि श्रद्धा आणि भक्तिभावाची जागा वैताग आणि चिडचीडीने घेतली जाते आपोआपच.

अध्यात्म हे असेच कष्टसाध्य आहे हि आपली लाडकी भारतीय मानसिकता त्यामागे आहे असे वाटत राहिले .

हि मानसिकता लवकर बदलो आणि सर्व देवस्थान च्या ठिकाणी किमान स्वच्छता आणि पावित्र्य जपले जावो हीच त्या देवाला प्रार्थना.

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Apr 2014 - 6:10 pm | पैसा

बरेच ठिकाणी असा अनुभव येतो. मथुरेला गेलो होतो तिथे देवळाचे दरवाजे दुपारी बंद असतात. पण तिथल्या बकाल गल्ली बोळातून असलेली मानवी घाण, माश्या आणि असंख्य डुकरे पाहून दोन्ही मुलांनी इथून जाऊया म्हणून जो धोशा लावला तो तिथून बाहेर पडल्यावरच थांबला.

पंढरपूर आणि इतर तीर्थक्षेत्री गर्दीचे व्यवस्थापन कठीण होत असावे. ज्याला ते चालू शकेल त्यनेच तिथे जावे. मी तर कोणत्याही तीर्थक्षेत्रांना जायचे टाळते.

बाकी सहलीचा वृत्तांत चांगला आहे. फोटो दिले असते तर अजून छान झाले असते.

आत्मशून्य's picture

6 Apr 2014 - 6:17 pm | आत्मशून्य

विशेषतः पावसाळ्यात.

जातवेद's picture

6 Apr 2014 - 8:57 pm | जातवेद

मला शेगावची व्यवस्था फार आवडते. शिवाय पंढरपूरला सुद्धा गजानन महाराज भक्त निवास मधे फार चांगली सोय होते. अर्थात, पंढरपूरला वारीच्या दिवसात जाणे कधीही टाळावे.

सामान्यनागरिक's picture

11 Oct 2014 - 5:34 pm | सामान्यनागरिक

गंमत म्हणजे तेथेल॑ पूजारी लोक ज्यांना आपण पवित्र समजतो आणि पाया पडतो तेही पान-तंबाखुआ खाऊन देवळाच्याच आवारात थुंकर असतात ! कमीतकमी त्यांना तरी चाबाकाच्या फटक्यांची व्हायला हवी ! ( शिक्षा तर सगळ्यांनाचा व्हायला हवी पण त्यांच्यापासून सुरुवात करायला हवी !

हल्ली बर्याच मंदिरांअत एक नवीने प्रकार दिसु लागला आहे. मंदिराच्या बाहेर गायी उभ्या करायच्या आणि येणार्या लोकांना ' गोमातेला अन्नदान करा' घेऊम्च्दहा रुं चे छटाकभर गवत घेऊन गायीला घालण्यास भरीस पाडणे. त्यात मंदिराच्या दारातच शेणाचा सडा पडलेला असतो गवताने घाण होते. आणि आपणही धन्य झाल्याचे पूण्य पदरी घेतो.

आणी हे हल्लीच सुरु झालेले आहे. आणी यामागे खुपच आर्थिक हितसंबंध असावेत. यावर कोण्या 'हजारेंनी' आवाज उठवायला हवा !

च्याय्ला. फटूंच्या अपेक्षेने धागा उघडला पण निराशाच पदरी आली. बाकी देवळांत घाणेघाण करणार्‍यांबद्दल किती आणि काय बोलावे तितके थोडेच आहे. :(

खटपट्या's picture

7 Apr 2014 - 3:48 am | खटपट्या

हेच म्हणतो

Prajakta२१'s picture

8 Apr 2014 - 4:38 pm | Prajakta२१

फोटोज copy paste होत नाहीयेत blogger मधून इथे.
facebook ची url टाकून पण पहिले पण फोटोज upload होत नाहीयेत
क्षमस्व!

जातवेद's picture

8 Apr 2014 - 7:33 pm | जातवेद

पिकासा वापरा.

प्यारे१'s picture

6 Apr 2014 - 8:14 pm | प्यारे१

नेमके काय नि कसे उपाय करता येतील जेणेकरुन अशा प्रकारचा मनस्ताप टळेल असं आपलं मत आहे?

चौकटराजा's picture

6 Apr 2014 - 9:05 pm | चौकटराजा

या उलट दक्षिण भारतातील बहुतेक सर्व देवळे व परिसर तुलनात्मक रित्या स्वच्छ असतो. बाकी समोरच्या मार्कंडयाचा डोंगर पहात बसणे हा एक विलक्षण अनुभव मला वाटला.

अगदी सहमत आहे. दक्षिणेत लहान मंदिरे सुद्धा बर्‍यापैकी स्वच्छ असतात. आपल्या इथल्यांनाच काय धाड भरलीय कुणास ठाऊक. बंगालमध्येही हीच रड. कालीघाटचे मंदिर पाहिले तेव्हा तर यापेक्षा उकिरडा बरा अशी स्थिती होती. कुठल्याकुठल्या हजार बोळकंडी, तिथे घोंगावणार्‍या माश्या आणि आपल्याला धरून खेचणारे पंडे, झालंच तर देवळात पडलेला निर्माल्याचा खच अन गाभार्‍याजवळची ब्लॅक होल वाटावी असली कोंडी....अजूनही अंगावर शहारा येतो.

तुलनेने दक्षिणेश्वर कालीमातेचे मंदिर मात्र भव्य अन छान स्वच्छ आहे. इस्कॉनवाल्यांची मंदिरेही मस्त स्वच्छ असतात.

बाकी शेगावचे कौतुक लैच ऐकलेय, एकदा जाऊन यायला लागतेच नक्की! अन एकदम शांततेबद्दल आणि स्वच्छतेबद्दल बोलायचे झाले तर निंबाळ मठाला ११०/१०० मार्क मिळतील हे मात्र पक्कं.

प्रचेतस's picture

7 Apr 2014 - 5:53 pm | प्रचेतस

महाराष्ट्रातीलही कित्येक देवळे स्वच्छच आहेत पण आपण तिकडे न जाता पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी जाण्यातच धन्यता मानतो.

हो आहेत, पण तिथेही काही अण्भव वैट आले होते. खिद्रापूरला गेल्तो २००८ साली तेव्हा देवळातच मांजराने विधी करून ठेवलेला होता. पुजार्‍याचेही लक्ष दिसले नाही. नशीब गाभारा सुटला तावडीतनं. :(

प्रचेतस's picture

7 Apr 2014 - 6:23 pm | प्रचेतस

मांजरंच ते. बाकी मांजरे जण्रली मातीत विधी उरकतात. मंदिरातल्या दगडांत कसा काय केला कुणास ठाऊक. पण आम्ही गेलो तेव्हा मंदिर अतिशय स्वच्छ ठेवलेले होते. अर्थात जिथे माणसे नाहीत किंवा अतिशय कमी तिथेच स्वच्छता दिसते.

अर्थातच. मांजराला काय कळतेय म्हणा. पण माणसांचे लक्ष असू नये हे विचित्र वाटले. बाकी गर्दीच्या मुद्याबद्दलही सहमत आहे.

जाताजाता अजूनेक अण्भव सांगायला हर्कत नै. गोष्ट आहे २००८-०९ ची. पाताळेश्वरला गेल्तो, बोर्ड लिहिला होता "चपला देवळात आणू नयेत", पण काही लोकांनी आपल्या चपला आत ठेवल्या होत्या त्यांना मात्र कोणी काही बोलत नव्हते.

चौकटराजा's picture

8 Apr 2014 - 10:14 am | चौकटराजा

वल्ली हे शिल्प संशीधक आहेत. ते अशा देवळातून जात असावेत ज्याना लोकाश्रय फारसा नाही. सबब वर्दळ नाही सबब घाण नाही. त्यामुळे महाराश्ट्रातील देवळे वल्लीना स्वच्च दिसली असावीत. कदाचित काही देवळे स्वच्छ असतीलली पण परिसर ...? उत्तम उदाहरण म्हणजे अम्बरनाथ येथील शिवालय !

त्रिवेणी's picture

6 Apr 2014 - 9:09 pm | त्रिवेणी

हल्ली तीर्थक्षेत्रांचे बाजारीकरण झाल्याने जाण्याचे टाळते(अपवाद- शेगाव).

यसवायजी's picture

6 Apr 2014 - 11:40 pm | यसवायजी

(अपवाद- शेगाव).
+१६३०
मंदीर आणी उद्यानात अगदी माफक दरात, स्वच्छ-सुंदर व्यवस्था.

सगले पर्वदले पन तुलजपुरच्य आइ भवनिच्या मन्दिरात गुतखा खाउन थुन्कनरे आइ भवनिचे सेवेकरि म्हन्वनरे पुजरि बघितले कि हत्बल व्हायला होत.... :(

रेवती's picture

7 Apr 2014 - 6:00 pm | रेवती

?

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2014 - 6:34 pm | चौथा कोनाडा

सगळे परवडले पण तुळजापुरच्या आई भवानी मंदिरात गुटखा खाऊन थुंकणारे आई भवानीचे सेवेकरी म्हणवणारे पुजारी बघितले की हतबल व्ह्यायला होतं ......
(ठीकय ना परिजात ?)

प्यारे१'s picture

7 Apr 2014 - 7:04 pm | प्यारे१

ब्रोब्रंय!

शुचि's picture

8 Apr 2014 - 11:59 pm | शुचि

पारीजात,
कॅपिटल एल = ळ
कॅपिटल एन = ण
परवडले = पी ए आर ए वी ए कॅपिटल डी ए एल ई
भवानी = बी एच ए वी ए ए एन आय आय

इरसाल's picture

10 Apr 2014 - 2:34 pm | इरसाल

एकंदरीत त्यांच्या लिहीण्याच्या पद्धतीवरुन त्यांचे नाव परिजात ऐवजी फळीगाट असावे अशी शंका येतेय.

मैत्र's picture

11 Apr 2014 - 12:31 pm | मैत्र

फुटलो!! :)

ती लोळणारी स्मायली टाका रे कोणी तरी

फळीगाट :)

पंढरपूराचे देऊळ स्वच्छच आहे .हजार वर्षाँपूर्वी वारीला जेमतेम पाच हजार भाविक येत असतील ते गोपाळपूर आणि आताचे (नदीपलीकडचे )पूर्व येथे उतरत होते .त्याकाळी नद्यांवर धरणेही नव्हती .आता एकाच वेळी आठ लाख लोक सामावून धरण्याची क्षमता कोणत्या गावात आहे ?रोजचेच निरनिराळ्या वाहनातून पाच हजार येतात .हीच स्थिती पावणाऱ्या इतर देवस्थानांची आहे .कशी राहणार स्वच्छता ?

जायच आहे सप्तशृंगीला. धन्यवाद प्राजक्ता२१ ! आता मनाची तयारी करुन जाईन. पण जाईनच.

Prajakta२१'s picture

8 Apr 2014 - 4:34 pm | Prajakta२१

आत्ता रामनवमी ते चैत्र पौर्णिमा देवीची यात्रा असल्यामुळे गर्दी जास्त असेल
प्रवासात काळजी घ्या

तुमच्यातकडनं 'वडाप' जात आसंन की! का 'हात दाखवा गाडी थांबवा' हाय? ;)

स्पंदना's picture

9 Apr 2014 - 5:26 am | स्पंदना

हात नाय दाखवणार आम्ही.
आम्ही कमळ दाखवणार अन गाडी थांबवणार.
जाउन येते का नाही बघच तू प्यारे१!

प्रमोद देर्देकर's picture

8 Apr 2014 - 9:00 am | प्रमोद देर्देकर

अहो कंजुस साहेब बरोबर आहे तुमचं स्वच्छता कर्मचारी अपुरे पडत असतील. पण म्हणुन कशी राहणार स्वच्छता असे म्हणुन कसे चालेल? इथेच तर स्वजबाबदारीने वागायला नको काय? आपली स्वच्छ्ता आपणच नको काय पाळायला? भारतीयांची मनोवृतीच बदलण्याची गरज आहे. जिकडे तिकडे मग ते इस्पितळचे आवार असो, सरकारी वाहन (ट्रेन, बस) असो , देवुळ असो पान किंवा गुटखा खावुन पचापच थुंकुन परिसर खराब करणार्‍याला जबरी शिक्षा व्हायला पाहिजे. अरे आतमध्ये तुमचा स्वःतहाचा आजारी माणुस बरा होण्यासाठी धडपड करतोय आणि तुम्ही ही अशी भिंती रंगवुन रोगराईला आमंत्रणच देताय. (जे.जे. के.ई. एम. इस्पितळ) आणि जे लाख लोक म्हणताय ते काय फक्त आपल्याकडेच आहे काय? आपल्या पेक्षाही काबाला जास्त लोक सर्व जगभारातुन जातात तिथे असे पचापच थुंकलेली माणसे दिसत नाहीत खरं तर तांबुलसेवनाचे प्रमाण आपल्या पेक्षा त्यांचाकडे जास्त असुन सुध्दा. तिच गोष्ट चर्च मधिल तिथे कसे मग वातावरण स्वच्छ असते.
लोकांची फक्त मानसिकता याला कारणीभुत असते.

भारतीय मनोवृत्ती बदलायला पाहिजे खरं आहे .पंढरपुरात तर त्यांना रोजची हुंडीतले पैसे मोजायला वेळ मिळत नाही (त्याचा रोज लिलाव होतो) ते नदी वाळवंटाकडे कधी लक्ष देणार .

मोक्षदा's picture

8 Apr 2014 - 9:47 pm | मोक्षदा

सेप्त्शुंगी हे माझ्या माहेरचे कुलदैवत आहे त्यची खास गोष्ट आहे या देवीला कळसावर एक झेंडा लावतात वर्षातून एकदाच एकाच कुदुंब ठरलेले व्यक्ती तो झेंडा लावते जाताना नवीन कपडे घालून जाते झेंडा कळसावर चढवल्यावर येताना त्याचे कपडे पूर्ण चिंध्या झाल्येल्या असतात माझ्या मते जाताना येतंच रस्ता खूप अरुंद असल्याने असे होत असावे या बद्दल कोणाला काही अजून योग्य माहीत असल्यास लिहावे

स्पंदना's picture

9 Apr 2014 - 5:27 am | स्पंदना

बाप रे! नविनच माहीती!
नक्की कारण कळेल का?

सचिन कुलकर्णी's picture

10 Apr 2014 - 5:43 pm | सचिन कुलकर्णी

आणि विशेष म्हणजे हा रस्ता कोणालाच माहित नाही. त्या व्यक्तीलादेखील तो रस्ता नंतर सांगता येत नाही.
बहुधा चैत्र पौर्णिमेला हा झेंडा लावला जातो.

मी गेलो होतो इकडे ट्रेकिंग म्हणून जुन्या वाटेने पायऱ्या चढून ,देवळात वर गेलो नाही .चहा वडाच्या टपऱ्या फारच भयानक वाटल्या .समोरचा मार्कंडयाच्या डोंगरावर जावेसे नाही वाटले .तीन वाजता एका टैक्सीवाल्याने साठ रु/सीटने सिबिएस ला सोडले पाच वाजता .तिथून रिक्षावाले स्टेशनचे ५०रु सीट मागत होते .एका माणसाने धीर दिला .मग एका बसने पावणे सहाला स्टेशन जेमतेम गाठले .तिकीटाच्या चार पाच खिडक्या होत्या .तिकीट पटकन मिळून पाच पन्नासची तपोवन मिळाली .पन्नास रुपयात नऊला घरी पोहोचलो .
नाशिक मनमाडकडून संध्याकाळी परत येतांना तपोवन गाडी चुकली की फारच हाल होतात .कसारा टैक़्सीवाले येतांना फारच गंडवतात .ईगतपुरीच्या जवळ रिपेंरिंगची गरेज आली की गाडी खराब झाली पुढे घाट आहे सांगून आपल्याला दुसऱ्या खाजगी बस मध्ये बसवतात .अर्धेपण पैसे परत देत नाहीत .सगळे सेटिंग असते .साडे आठच्या कसारा गाडीला हे हमखास होते .

फोटोची लिंक : http://prajaktascooking.blogspot.in/

प्रसादाच्या जेवणाची सोय त्यामानाने बरी होती
गडावर( १५ रु. एका ताटासाठी)
शेगाव संस्थानच्या भक्तनिवासात....
त्यांचे भोजन आणि अल्पोपहार गृह पण आहे त्तिथे जेवण आणि नाष्टा -चहापाण्याची सोय कमी दरात आणि चांगली आहे अर्थातच वेळ मर्यादा आहे
( ३५ रु. थाळी आणि रात्री १० नंतर गेले तर कढी भाताचा प्रसाद विनामूल्य )

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2014 - 8:10 am | चौथा कोनाडा

हो, आम्ही पण तिथल्या प्रसादाचा लाभ घेतला होता. जेवण छान वाटले. एकंदरीत गर्दीच्यावेळी विविध कारणांनी व्यवस्था कोलमडते व त्याचा फटका आपल्याला बसतो. माझ्या मते सप्तशृंगीगड वणी हे सुंदर व इकॉनॉमिकल पर्यटन स्थळ आहे. आजकाल काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, स्वतःची सहनशक्ती वाढवणे, स्वतः इरिटेट न होणे ही काळाची गरज आहे. हे जमले तर बरीच पर्यटन-स्थळे व तीर्थ-क्षेत्रे यांचा आनंद आपण उपभोगू शकू.

सविता००१'s picture

11 Apr 2014 - 3:33 pm | सविता००१

ला आम्ही ३ वर्षांपूर्वी गेलो होतो. तिथल्या प्रायव्हेट जीप पेक्षा एस.टी.च छान आणि सोयीची वाटली होती. खूप गंडवतात हे जीप आणि टॅक्सीवाले. पण वर चौथा कोनाडा यांनी लिहिल्याप्रमाणे हे ठिकाण खरच खूप सुंदर आहे. श्रावणात जायचं तिथे.सुंदर निसर्गसौन्दर्य अनुभवायला मिळतं. तेव्हा खूप गर्दी नसते. त्यामुळे सोय पण तशी चांगली होते.

मी एक ट्रेकर's picture

11 Oct 2014 - 8:59 pm | मी एक ट्रेकर

सप्तशृंगी गडावरच्या भक्तनिवासाची व्यवस्था अतिशय घाणेरडी आहे. तिथला मुक्काम टाळलेलाच बरा…. गडावरून दिसणारा मार्कंड्या मात्र बराच वेळ दृष्टी खिळवून ठेवतो...
सप्तशृंगी गडाचा एक फोटो
Saptashrungi