खान्देशी पद्धतीची शेवभाजी ,अंडाकरी आणि भरली वांगी

आरोही's picture
आरोही in पाककृती
2 Mar 2014 - 3:21 pm

मागच्या आठवड्यात भावाकडे गेले होते तेथे गावावरून आई आली होती मग काय पूर्ण ७-८ महिन्यांनतर आईचे हातचे जेवण मिळणार होते मग सोडणार कोण .मस्त पैकी तिच्या हातची शेवभाजी (खान्देशी शेवभाजी)बनवायला सांगितले .अहाहा काय चव होती ..काहीही केले तरी ती चव कुठेच पुन्हा मिळत नाही ..अगदी मी त्याच पद्धतीने करून बघते पण ती चव खरच येत नाही हे खरेच आहे..
नवऱ्याला हि माझ्या आईच्या हातची त्याच मसाल्यातील कुठलीही भाजी खूप आवडते ..या वेळेस तो सोबत आला नसल्याने त्याला ती खायला मिळाली नाही ...मग काय त्याने फोन करून आईच्या हात चा मसाला बनवून आणायला सांगितले ..मग काय जावयाची इच्छा म्हटल्यावर आईने अगदी अर्ध्या तासात आम्हा तीन माणसांसाठी ७-८ माणसांचा मसाला बनवून दिला ..
अगदी ५ तासांच्या प्रवासानंतर मी घरी आल्यावर तो वाटलेला मसाला शीत कपाटात ठेवून दिला ..
त्याच मसाल्यात मी तीन प्रकारांच्या भाज्या बनविल्या मी शाकाहारी असल्याने माझ्यासाठी शेवभाजी,नवऱ्यासाठी अंडाकरी आणि दुसर्या दिवशी भरली वांगी ..तसेच या मसाल्यात चिकन सुद्धा खूप चविष्ट होते ...

मी विचार केला हि पाककृती मिपा वर देऊयात म्हणून मी आईला फोन करून प्रत्येक पदार्थाचे प्रमाण विचारले तर ती म्हणाली मी असे ठरवून एवढे कधीच काही टाकत नाही नेहमी आपल अंदाजाने घेते ..तरी पण मी प्रमाणाबद्दल सांग असे म्हटल्यावर तिने मला अंदाजे च काही गोष्टी सांगितल्या कि हे एवढे घे ते एवढे घे ...
तेच मी खाली दिलेले आहे

साहित्य: ४ कांदे,अर्धी वाटी सुके खोबरे ,१५ ते १७ लसुन पाकळ्या (हो ती तर यापेक्षा हि जास्त घेते )२ इंच आले ,जिरे २ चमचे ,लाल तिखट ३ चमचे,हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,मीठ चवी प्रमाणे ,कोथिम्बिर ,तेल ४ चमचे ,पाणी

कृती: सर्व प्रथम कांदे ,सुके खोबरे खरपूस भाजून घ्या ,mixar मध्ये कांदे -खोबरे ,आले लसुन जिरे ,मीठ ,कोथिम्बिर ,हळद ,लाल तिखट,गरम मसाला घालून पाणी घालून बारीक वाटून घ्या ..त्यापैकी ३/4
तयार मसाला कढाई मध्ये तेल घालून त्यात टाका ..

masala

आणि पाणी न टाकता तेलात शिजू द्या ..
खालील फोटोत दिसत असल्याप्रमाणे तेल सुटू लागल्यावर त्यात थोडे पाणी घाला .

2

3

पाणी टाकल्यावर त्याला ७ ते १० मी.उकळू द्या ....

चांगली उकळी आल्यावर आच बंद करून त्यात कोथिम्बिर कापून टाका.

4

वरील फोटो तयार भाजी चा आहे .मी माझ्यापुरता भाजी काढून घेऊन त्यात उकलेले अंडे घालून पुन्हा
१-२ उकळ्या येऊ दिल्या ..अंडाकरी तय्यार ...

5

आणि माझ्यासाठी साधी पिवळी शेव ताटात घालून त्यावर तयार रस्सा टाकला ..या भाजीत शेव उकळायचे नसतात ते वरतून टाकावेत ...

6

दुसऱ्या दिवशी त्याचेच मस्त भरली वांगी करायचे ठरवले ..

त्यासाठी ३ वांगी घेतली ,उरलेला अर्धी वाटी मसाला ,त्यात ३ चमचे शेंगदाण्याचे कुट घातले ,मीठ थोडेसे कारण वाटणात घातलेले होते .टोमाटो चिरून ठेवला
वांग्यांना चीर देऊन त्यात मसाला भरला आणि कुकर मध्ये ३ चमचे तेल घातले ,ते गरम झाल्यावर त्यात वांगी आणि उरलेला मसाला टाकला त्यात १ टोमाटो कापून टाकला .१ कप पाणी घालून १ शिटी होऊ दिली .आणि मस्त भरली वांगी तयार ...

7

प्रतिक्रिया

काल मसाला केला हा. मस्त झाला. मी शेव घालुन काल रात्री खाल्ली. सकाळी अंडी उकडुन घातली. उद्या चिकन करेन म्हणतेय,
एका नविन मसाल्याबद्दल धन्यवाद.

आरोही's picture

21 Mar 2014 - 9:53 am | आरोही

खरेच अपर्णा ताई ..या मसाल्यातले चिकन एकदा करून बघच , मग मला कळव कशी चव होती ते ...+)

प्रभाकर पेठकर's picture

21 Mar 2014 - 4:15 am | प्रभाकर पेठकर

छायाचित्रे दिसत नाहीत. पण एकंदर पाककृती आणि प्रतिक्रिया वाचून, भारतात परतताच एक प्रयोग हाणायचा मनसुबा रचला आहे.

आरोही's picture

21 Mar 2014 - 10:13 am | आरोही

+)

बॅटमॅन's picture

21 Mar 2014 - 1:02 pm | बॅटमॅन

आय हेट शेवभाजी.

पण वांगी रस्सा काय कातिल दिस्तोय!!!! नादच खुळा. खान्देशची चव एकदा घ्यावीच लागेल असं दिस्तंय!!!

आय हेट शेवभाजी.

पण शेवभाजीचा तिरस्कार कशासाठी?

शेवभाजी आवडणारा
-अनंत

इरसाल's picture

22 Dec 2014 - 3:36 pm | इरसाल

शब्द मागे घे.........नाय तर....
ये माझ्याकडे तुला खावु घालतो एकदा खान्देशी शेवभाजी....मग बसशील बोटं चाटत ;)

विवेकपटाईत's picture

21 Mar 2014 - 1:27 pm | विवेकपटाईत

सौ. सोबत हा लेख वाचला. आज संध्याकाळी शानिबाजारातून सौ. १००% वांगी आणणारच. आत्ता तोंडाला पाणी येतय. बाजरीची कणिक घरी आहेच. धिरडे करून बघणार.

फोटो आणी मसाला दोन्ही सुरेखच...करावाच लागेल..

जेपी's picture

25 Mar 2014 - 9:59 am | जेपी

sunday speacial

मस्त दिसतेय अंडाकरी ..रंग अगदी परफेक्ट ...+)

स्पंदना's picture

2 Apr 2014 - 3:15 am | स्पंदना

आह! जेपी!!
आज परत करावा लागणार हा मसाला.

प्यारे१'s picture

1 Apr 2014 - 10:05 pm | प्यारे१

कोन वर काडला ह्यो धागा ?????

काय कामं हायती का न्हाय???????
गप र्‍हावा की जरा. ;)

जेपी's picture

2 Apr 2014 - 6:28 pm | जेपी

शंभरी प्रतिसादकर्ता -जेपी

सिद्धार्थ ४'s picture

21 Dec 2014 - 11:41 am | सिद्धार्थ ४

फोटो दिसत नाहीत :(

बोका-ए-आझम's picture

21 Dec 2014 - 10:52 pm | बोका-ए-आझम

वा वा! खान्देश माहेर जरी नसले तरी सासर आहे. त्यामुळे यातले दोन प्रकार चाखलेले आहेत. दुर्दैवाने घरी कोणी खात नसल्यामुळे अंडाकरी फक्त कल्पना करू शकतो पण बाकीचे दोन प्रकार आमच्या सासरी अफलातून बनतात! आणि हे मी कनपट्टीवर बंदूक लावलेली नसताना म्हणतोय;);)

vikrammadhav's picture

27 Nov 2016 - 7:42 pm | vikrammadhav

झणझणीत !!!!!

जयन्त बा शिम्पि's picture

28 Nov 2016 - 11:13 pm | जयन्त बा शिम्पि

त्रिवेणी, मी बी १ जानेवारी ना रोज भारतमां यी राह्यनू, मुंबईथून धुयाले भी जासू, माले असं वाटंस बठ्ठा खान्देसी मिपावरला मियीसनी धुये नहीतर जडगावले " गटग " कराले काय हरकत शे ? आत्तेपासीन काहीतरी सुरवात कराले जोयजे. बाकी लोकेस्ले बी इच्यारी देख. माले व्यनि करशी तरी बी चालंस.

त्रिवेणी's picture

30 Nov 2016 - 8:23 am | त्रिवेणी

कधीपर्यंत आहात भारतात.सध्या जळगाव फेरी नाही.पुण्यात येणार आहात काय? पुण्यात करु या मस्त भरीत कळण्याची भाकरी,पुरीच गटग.बाकी मिपाकरांनाही आमंत्रण देता येईल.

धागा वाचुन आज सांच्याला दोन वांग्याचा बळी दिला,
1 2
3