फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
2 Mar 2014 - 11:46 am
गाभा: 

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

2 Mar 2014 - 12:09 pm | आत्मशून्य

.

आबा's picture

2 Mar 2014 - 8:52 pm | आबा

वेळ घालवू नये, असे मत आहे...
"जन्माच्या वेळी असलेली ग्रहांची विशिष्ठ स्थिती भविष्य ठरवते" ही भंपक कल्पना टेस्ट करून घेण्याएवढा पुरावा प्राथमिक चाचणीत सुद्धा मिळाला नाही... तेंव्हा इलॅबोरेट चाचणी तयार करण्याची गरजही नाही

अत्रन्गि पाउस's picture

2 Mar 2014 - 9:30 pm | अत्रन्गि पाउस

फोरकास्टिंग साठी वापरावे :
एखाद्या घटनाक्रमाच्या पुढील घटना जेव्हा 'प्रेडिक्टेबल' असतात तेव्हा त्या शक्यतांची टक्केवारी बघावी..
उदा : एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल कि नही
१. ९० % लाभदायी ठरेल कारण ....कारण ...अमुक ग्रहमान अनुकूल ......
२. ३०% ३ महिन्यांनी धोका वाढेल ... कारण..अमुक ग्रहमान प्रतिकूल..
आणि अजून काही...
किंवा क्ष गुंतवणूक कि य गुंतवणूक करावी आणि त्याची कारणे ..
वरील शक्यता जेव्हा एखादा अर्थतज्ञ नेमका असेच सांगेल तर त्याची 'कारणे' वेगळी असतील आणि मग ते रिझल्ट्स पडताळून बघता येतील...
पण
ज्योतिषी आणि अर्थतज्ञ ह्यांची भाकिते जुळत नसतील तर दोघांचाही कस लागेल आणि रिझल्ट्स पडताळून बघतांना कुणाचे कुठे चुकले हे बघून त्यात दुरुस्ती करता येईल...तसेच पुढचा डेटा पोइट निर्माण करतांना अजून अचूकता अंत येईल...
हे असेच ...वेगवेगळ्या बाबतीत बघता येईल..जसे कि आरोग्य विषयक / नौकरी विषयक / आयुर्हीत साहेब म्हणतात त्याप्रमाणे कर्मचारीनिवड विषयक ...
शेवटी जर हे अनुमान आहे तर हे असेच होईल नं ?
पटतंय का?

अनुप ढेरे's picture

2 Mar 2014 - 10:01 pm | अनुप ढेरे

फलज्योतीष लोक का वापरतात या प्रश्नाचं उत्तर शोधल्यास त्याची चाचणी काय असावी याबाबत काही मदत होऊ शकेल. म्हणजे जो उद्देश ठेऊन लोक ज्योतिषाकडे जातात तो उद्देश समजल्यास तो सफल होतो का? याची चाचणी करता येईल.

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2014 - 10:35 pm | राजेश घासकडवी

कोणीही इन्फ्लुएन्शियल माणूस क्लायंट नसलेला, पण आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आधारावर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करून अब्जाधीश झालेला ज्योतिषी दाखवावा. त्याने आपल्या भविष्याच्या जोरावर १,०००,००० डॉलरचा कल्पित पोर्टफोलियो करावा, त्यात मार्केटच्या दुप्पट रिटर्न्स सतत पाच वर्षं मिळवून दाखवावेत.

अत्रन्गि पाउस's picture

2 Mar 2014 - 10:38 pm | अत्रन्गि पाउस

ह्यापेक्षा वेगळे काही आहे का? आणि फलज्योतिष हा एक मार्ग आहे...कुठलेही फोर्कास्तिंग सारखेच...

“Millionaires don't use Astrology, billionaires do.” ...j p मोर्गोन

मंदार दिलीप जोशी's picture

3 Mar 2014 - 1:31 pm | मंदार दिलीप जोशी

घाटपांड्यांचे उद्योग इथे पण सुरु आहेत असे पाहून मौज वाटली. एका संकेतस्थळावरचे प्रतिसाद इतरांच्या वाचनानंदासाठी देत आहे.

Srd | 2 March, 2014 - 17:19
उपक्रम
स्तुत्य आहे .
१काळ

आम्ही म्हणजे आपली काही बी एन एच एस सारखी दीर्घकाळ पाठपुरावा करणारी संस्था
आहे का ?कारण उदा : शनि ग्रहाचे प्रभाव पाहाण्यासाठी अठ्ठावीस वर्षाँची
दोन तीन आवर्तने जावी लागतील परिणाम नोंदवण्यासाठी .

२प्रश्नाचे स्वरूप

काही प्रश्नांना थोडे ढोबळ अथवा व्यापक रूप
द्यावे लागेल .उदा .शिक्षण
=उच्चशिक्षण ,
धंदा /नोकरी =अर्थार्जन ,मध्यम का अल्प ,
राजयोग=मोठे राजकारणी /उद्योगपती

३ठोस व्याख्या

हे थोडे कठीण आहे .उदा हुशार मुले ,
श्रीमंत माणूस ,सुखी कोणाला म्हणायचे .

४छोट्या छोट्या प्रश्नांची यादी संमत करणे फार गरजेचे आहे .मग
ज्योतिषी/गट/मंडळे त्यांना हवा त्या क्रमांकाचा प्रश्न घेऊन निरीक्षणे ,नोंद
आणि अनुमाने वैज्ञानिक पध्दतीने सादर करतील .

प्रकाश घाटपांडे | 2 March, 2014 - 17:34
>>आम्ही म्हणजे आपली काही बी एन एच एस सारखी दीर्घकाळ पाठपुरावा करणारी संस्था
आहे का ?<<
आम्ही म्हणजे वैज्ञानिक चाचणी घेउ इच्छिणारे लोक. मुद्दा हा आहे कि वैज्ञानिक चाचणी कशी घ्यावी या बद्दल आपल्या मनात असलेले मॉडेल

Srd | 2 March, 2014 - 18:47
ठीक आहे .बाकी मुद्दे कसे वाटले ?

प्रकाश घाटपांडे | 2 March, 2014 - 19:22
या मुद्द्यावरुन चाचणीचे मॉडेल कसे तयार करणार याबद्दली आपली कल्पना सांगा.

Srd | 2 March, 2014 - 23:09 नवीन
"फलज्योतिष" आणि "वैज्ञानिक
पध्दत" या दोन मुद्यांना विचारात घ्यायचे आहे असे धरून

उदा:हरणार्थ
पंचमेश उच्चीचा आहे/नाही याचे शिक्षणाबद्दल काय फल मिळते ते पाहाणे हा
प्रश्न घेऊ.
शंभरेक पहिलीतल्या मुलांच्या /मुलींच्या कुंडल्या नोंदवा .आता नमुने गोळा
करतांना वेगवेगऴया आर्थिक /सामाजिक/धर्मांतील/स्थानांतील प्रत्येकी पंचवीस
कुंडल्या लागतील .आता त्यांचे भविष्य लिहा की खूप /कमी शिकेल वगैरे .नंतर
दहा /पंधरा/वीस वयाला नोंदी करत जाणे .नंतर तीसला अनुमान काढा .

इथे ज्योतिष अभिप्रेत असल्याने आताच्या तीसवयाच्या शिकलेल्या मुलांच्या
कुंडल्या जमा करून काढला एक आलेख असं चालणार नाही .(तसे केल्यास त्याला
सांख्यिकी विश्लेषण statistical analysis असे म्हणा ) तसेच अमुक एक
पध्दतीचे ज्योतिष धरलँ तर सर्वाँचे तसेच पाहिजे .

बघा पटतंय का .

limbutimbu | 3 March, 2014 - 10:17 नवीन
एसार्डी, गुड! स्मित
"परदेशप्रवास" हा शब्द देखिल मला असाच घोळात घालतो. "परदेश" कशाला म्हणावे? व्यक्तिसापेक्ष ती त्रिज्या बदलत जाईल. असो.

मला येरवड्यातील वेड्यांच्या इस्पितळातील मनोरुग्ण, तसेच मुक्तांगणमधिल व्यसनाधिन व्यक्ति याबाबत अभ्यास करायचा आहे. त्यांचा जन्मतारखेचा/रोग केव्हा झाला/लक्षात केव्हा आला/रोगी केव्हा सुधारला वा अजुन बिघडला- याबद्दलचा डाटा मिळाला, तर बरीचशी कोडी सुटून, केवळ "चंद्र बिघडला" किंवा "द्वितीयात राहू/मंगळ" यांनी घोळ केला असे ढोबळ होणार नाही.

याचबरोबर माझे निरीक्षण असे की शारिरीक ताकदीवर गुन्हे करणार्या व्यक्ति व संरक्षण/पोलिसदलातील व्यक्ति यांच्या अंगठ्याची/नखाची ठेवण जवळपास समान असते, मग गुरुप्रभावाची अशी कोणती उणीव गुन्हेगारात असते ते जाणून घ्यायला मला सर्व तर्‍हेचे गुन्हेगार तसेच सर्व पातळीवर काम करणारे संरक्षण/पोलिस दलातील व्यक्तिंच्या कुंडलीचा अभ्यास करायचा आहे.

limbutimbu | 3 March, 2014 - 12:30 नवीन
याचबरोबर, मला "सरकारी नोकरांच्याही " कुंडल्या हव्यात.

ग्रेड ४ ते ग्रेड १ पर्यंत टक्केवारी लावुन पैसा खाणारी "डिपार्टमेण्ट्स" असली तर अधिक चांगले कारण मला फरक शोधुन काढायचा आहे तो असा की "सरकारी कृपाप्रसादाकरता/सेवेकरता" रवीचे स्थान माहात्म्य असावे लागते कुंडलीत, पण रविसारखा ग्रह "भ्रष्टाचाराला " कशी काय साथ देऊ शकतो, ते कोडे उलगडले नाहीये.

भ्रष्टाचाराचा सरळ सरळ संबंध वेळेस 'कुटील" ठरु शकणार्‍या बुधाशी जोडता येतो, पण सरकारी नोकरीकरता चान्गला रवि अन जोडीला कुटिल बुध (चंद्राचे सापेक्ष/साथीने?) हे गणित अजुन जुळले नाहीये. तेव्हा भ्रष्टाचारी व्यक्तिंच्या कुंडल्या बहुसन्ख्येने अभ्यासण्याशिवाय व सांख्यिकी तपासणी केल्याशिवाय पर्याय नाही.

याचबरोबर, भान्गेत तुळस उगवावी या पद्धतीने सरकारी नोकरीत राहुनही तेथिल "पाणीही" न पिणार्‍या अपवादात्मक व्यक्ति माहितीत आहेत, तर त्या काय कारणे अपवाद बनतात, गुरू मंङळाचा कोणता प्रभाव त्यान्ना धोकादायक परिस्थितीतही अपवाद बनवुन ठेवतो ते देखिल अभ्यासायचे आहे.

इच्छा तर नाही, पण मजबुरीने देश तसा वेष या न्यायाने तिथे (सरकारी नोकरीत) वागावे लागते म्हणून पैसा खाणारे देखिल आहेत, यांचेवर शनि कसा प्रभाव टाकतो ते देखिल अभ्यासायचे आहे.

वरील काहीच करणे शक्य नसल्याने, जेव्हा माझ्या नशिबात एखादी परमोच्च भ्रष्टाचारी व्यक्ति सामोरी येते, व मला तिचीकुंडली बनवायची संधी माझ्या नशिबाने जर मिळालिच, तरच मी असली सान्ख्यिकी करू शकतो हे वास्तव आहे.

घाटपान्डेसाहेबांचा धाग्याचा उद्देश वरकरणी स्त्युत्य दिसत / भासत असला तरी इये मराठीचीयए नगरी पुण्यनगरित, ज्योतिष/फलनिर्देश याबाबत कोणतेही काम अधिकृत करण्याची सोय नाही/शक्यता नाही/कायदे तर नाहीच नाहीत. शिक्षणात त्याचा सहभाग नाही. आत्यंतिक प्रतिकुल परिस्थितीत हे ज्ञानशाखा मार्गक्रमण करत आहे. व असे असताना कोणत्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात सापडून आयुष्य उद्ध्वस्त करुन घेण्याचा मूर्खपणा होण्याइतपत बुध वा शनि बिघडला असेल अशी व्यक्ति मूळात ज्योतिषी असेलच वा नाही याबद्दल स्वतंत्र संशोधन करावे लागेल मला.... डोळा मारा फिदीफिदी असो.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Mar 2014 - 3:30 pm | प्रकाश घाटपांडे

घाटपांड्यांचे उद्योग इथे पण सुरु आहेत असे पाहून मौज वाटली.

मिपावरील आमचा बिल्ला क्रमांक २७ आहे. आमचे यापुर्वीचे लेखन http://www.misalpav.com/user/27/authored इथे वाचता येईल असो.
मूळ मुद्दा चाचणीच्या संकल्पनांबाबत आहे.

कवितानागेश's picture

3 Mar 2014 - 2:48 pm | कवितानागेश

अहवाल वाचला. त्यात या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचुक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासुन जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे.एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे वीसापेक्षा कमी बरोबर आहेत.सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७.२५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत. हे महत्त्वाचं वाटलं.
त्या २४ उत्तरे बरोबर देणार्‍या ज्योतिषाचा पत्ता मिळेल का? त्यांचाच आभ्यास त्यातल्या त्यात बरा दिसतोय. :)

खटपट्या's picture

3 Mar 2014 - 11:17 pm | खटपट्या

मौताई तुम्ही Data analyst आहात काहो ?
मस्त परीक्षण केलंय

कवितानागेश's picture

3 Mar 2014 - 11:48 pm | कवितानागेश

मी हे असं काहीच नाहीये. फक्त अहवाल वाचल्यावर जाम गंमत वाटली.
हे म्हणजे रॅन्डम मुले गोळा केली. ती एका वर्गात जमवून सगळ्या मुलांना एकच पेपर वाटला.
त्यांनी त्यांच्या "अभ्यासाप्रमाणे" उत्तरे लिहिली. मग सगळ्याच्या मार्कांची बेरीज करुन सरासरी काढून सर्वांना नापास केलं!
म्हणजे (उदाहरणार्थ) ९०% वाला मुलगा एका १५% वाल्या मुलामुळे थेट ४५% टक्क्यांवर घसरला.
जर सगळ्या मुलांनी एकत्र चर्चा करुन उत्तरे दिली असती तर त्यांना एकसारखी( किंवा एकच रीझल्ट लावून) मार्क देउन, "शास्त्राची" कसोटी पाहणं योग्य होतं. पण खरं तर त्यात देखिल अर्थ नाही.
सगळे ज्योतिषी निदान एखादी मोठी परीक्षा पास झालेले आहेत का, हे पहाणं महत्त्वाचं आहेच.
आणि तरीही अशी सरासरी काढणं फारच गमतीशीर आहे.
असो.
मला अजूनही त्या एका जास्तीत जास्त योग्य उत्तरे देणार्‍या ज्योतिष्याच्या पत्त्यात इंटरेस्ट आहे. ;)
बाकी चालूद्यात.

हे म्हणजे रॅन्डम मुले गोळा केली. ती एका वर्गात जमवून सगळ्या मुलांना एकच पेपर वाटला.
त्यांनी त्यांच्या "अभ्यासाप्रमाणे" उत्तरे लिहिली. मग सगळ्याच्या मार्कांची बेरीज करुन सरासरी काढून सर्वांना नापास केलं!
म्हणजे (उदाहरणार्थ) ९०% वाला मुलगा एका १५% वाल्या मुलामुळे थेट ४५% टक्क्यांवर घसरला.

हाऊ मीन यू आर.

कवितानागेश's picture

4 Mar 2014 - 3:16 pm | कवितानागेश

हसू की रडू?

धन्या's picture

4 Mar 2014 - 10:35 pm | धन्या

मी ते गंमतीत लिहिलं होतं.

नुकतंच "अप्लाईड स्टॅटीस्टीक्स"चं एक पुस्तक वाचलं. त्यातल्या मीन, मोड आणि मीडीयन या संज्ञा डोक्यात ताज्या होत्या. वर कोट केलेलं उदाहरण "मीन"चं एक मजेशीर उदाहरण आहे. म्हणून तो विकीचा दुवा चिकटवला.

तुम्ही फारच शिरेसली घेतलंत. आय माय स्वारी बर्का. :)

आत्मशून्य's picture

4 Mar 2014 - 11:58 pm | आत्मशून्य

तुम्ही फारच शिरेसली घेतलंत. आय माय स्वारी बर्का.

असेच म्हणतो.

बाकि या आयमायच दडपण खरोखर लै मोठ्ठ असतं बगा मालक. खरे तर निव्वळ गैरसमज संपणेच/स्पश्ट होणेच पुरेसं असतं. लगेच आयमाय कायले करु रायले असे मी सुधा एका माननियांच्या अशाच नम्रतेच्या दडपणाखाली आल्याने सुचवुन पाहिलं (माझी खवं तपासा) त्यांचा मोठेपणा हा की त्यांनी माझ्या सारख्या फालतु व्यक्तीकडून ते ऐकुनही घेतलं.

स्टॅटबद्दल एका प्रॉफमहाशयांचे उद्गार : जर मीन ची संकल्पना कळ्ळी तर ९५ टक्के स्टॅट कळालं, जर व्हॅरियन्स ची संकल्पना कळ्ळी तर ९९% स्टॅट कळालं. मात्र उरलेल्या १% साठी जीव जातो. (यद्यपि मीन अन व्हॅरियन्स या अतिशय साध्या संकल्पना अतिशय मूलगामी आहेत.)

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2014 - 12:16 pm | श्रीगुरुजी

या चाचणीत दिलेला डाटा (पत्रिका) हा पडताळून पाहिला की नाही याचा उल्लेख नाही. ज्या व्यक्तींच्या पत्रिका दिल्या आहेत त्यांच्या जन्मतारखेचे व जन्मवेळेचे प्रमाणपत्र पत्रिकेबरोबर द्यायला हवे होते. त्यामुळे ज्योतिषांना दिलेल्या पत्रिका पडताळून पाहता आल्या असत्या. ज्योतिषी विरूद्ध ज्योतिषावर विश्वास न ठेवणारे असा हा सामना होता. या सामन्यासाठी एखादी तटस्थ व त्रयस्थ व्यक्ती पंच म्हणून हवी होती. पण या चाचणीत प्रश्नपत्रिका काढणारे, पत्रिका पुरविणारे, उत्तरे तपासणारे, निकाल जाहीर करणारे हे सामन्यातील दोन खेळाडूंपैकी एक खेळाडू होता व त्यांची मते जगजाहीर होती. त्यामुळे या चाचणीला व त्यातील निष्कर्षांना काहीही अर्थ नाही. यातील ३ जणांनी ५५ टक्क्यांहून अधिक भाकीते बरोबर करून सुद्धा त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले कारण इतरांना कमी गुण मिळाले. हा निष्कर्ष तर जास्तच धक्कादायक आहे. ज्यांनी ही चाचणी घेतली त्यांची पूर्वग्रहदूषित मते लक्षात घेतली तर ते काय निष्कर्ष काढतील हे चाचणीपूर्वीच लक्षात आले होते.

सुबोध खरे's picture

5 Mar 2014 - 12:23 am | सुबोध खरे

माऊ ताई
त्या ज्योतिषांचा अनुभव पाच ते तीस वर्षे आहे आणि सरासरी १४.४ वर्षे आहे. आणि त्यांना ४० प्रश्नांची उत्तरे विचारली होती त्यापैकी एका ज्योतिषांची २४ उत्तरे बरोबर आली म्हणजे हे एक ज्योतिषी सुद्धा ६० टक्केच बरोबर आहेत. ( बाकीच्यांची परिस्थिती गंभीरच आहे कारण या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे गुण ३५ टक्के नसून ५०% आहेत) मुळात हा मुलगा हुशार आहे कि नाही याचे उत्तर छाप किंवा काटा करून सुद्धा ५० % बरोबर येऊ शकते याचा अर्थच हा कि हे साठ टक्के संक्याशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे( significant) आहेत कि अनुमान धपका( statistical chance) आहेत हे सांगणे कठीण आहे. म्हणजेच वर केलेल्या परीक्षेत ज्योतिषशास्त्र नापास झाले असा अर्थ माझ्यासारखा सामान्य माणूस सहजपणे काढू शकतो.
"त्यांचाच आभ्यास त्यातल्या त्यात बरा दिसतोय" हे म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी आहे.

कवितानागेश's picture

5 Mar 2014 - 12:49 am | कवितानागेश

जर अनुभवाची सरासरी काढायचे आहे, तर आधी तो अनुभव 'एकत्र' करायला हवा. तेच सांगतेय की जर त्यांनी 'एकत्र' चर्चा करुन उत्तरे लिहिले असती, तर सरासरी योग्य होती.
अवांतरः छाप काट्याचे उत्तर खरोखरच नेहमीच ५०% येते का? माझ्या निरिक्षणाप्रमाणे नाही.
कारण माहित नाहीत. काहींच्या मते कुठलं नाणे वापरतोय, त्यावर ही शक्यता असते...

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2014 - 2:05 pm | श्रीगुरुजी

या चाचणीच्या निकालासाठी त्रयस्थ/तटस्थ पंच नेमण्यात आले नव्हते असे पूर्वी वाचले होते. असे करणे म्हणजे नदाल वि. फेडरर सामन्यात या दोन खेळाडूंपैकीच एकाने खेळाबरोबरच रेफ्रीचेही काम करण्यासारखे आहे. मुळात ही चाचणी घेणार्‍या दाभोळकर व नारळीकर यांची ज्योतिषाविषयीची मते जाहीर आहेत. आपल्या मताप्रमाणेच चाचणीचा निकाल काढता यावा ही त्यांची मनातून इच्छा असणारच. त्यामुळे त्यांनी चाचणीसाठी पुरविलेल्या पत्रिका अचूक होत्या का याविषयीच शंका आहे. ज्यांचा ज्योतिष या कल्पनेलाच कडाडून विरोध आहे तेच चाचणी घेणार, तेच पत्रिका पुरविणार आणि तेच निष्कर्ष काढणार! ते काय निष्कर्ष काढणार होते हे चाचणीआधीच स्पष्ट होते.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2014 - 2:53 pm | प्रकाश घाटपांडे

मी या चाचणीचा समन्वयक होतो. फलज्योतिष चाचणी समन्वय इथे तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2014 - 1:30 pm | श्रीगुरुजी

तुम्ही सुद्धा काही काळ अंनिसशी संबंधित होता असे या दुव्यात लिहिले आहे. एकंदरीत या चाचणीत तटस्थ/त्रयस्थ पंच नव्हते. ज्यांची ज्योतिष या विषयाबद्दल ठाम मते आहेत त्यांनीच ही चाचणी आयोजित केली होती व त्यांनीच निष्कर्ष काढला. म्हणजे सामना खेळणारे आणि रेफ्री एकच होते. असो.

काही गोष्टींची गंमत वाटली. मतिमंद शाळेत जाणारा मुलगा म्हणजे "मतिमंद" आणि सामान्य शाळेत जाऊन सलग ३ वर्षे ७० टक्के गुण मिळविणारा तो "हुशार" ही व्याख्या गंमतीची वाटली. सर्व मुले या दोनच कॅटॅगिरीत बसतात का? सामान्य शाळेत जाणारा एक "मतिमंद" मुलगा माझ्याच सोसायटीत राहतो. वरील व्याख्येनुसार तो "मतिमंद" ठरत नाही. मग त्याची पत्रिका तपासल्यावर एखादा ज्योतिषी त्याला मतिमंद ठरवत असेल तर ते चूक कारण तो तसल्या शाळेत जात नाही आणि एखाद्या ज्योतिषाने त्याला मतिमंद ठरवले नसेल तर तेही चूक कारण तो जन्मतःच मतिमंद आहे. असो.

ज्योतिषांची फक्त या एकाच मुद्द्यावर चाचणी घेऊन अंनिसने आपल्याला सोयिस्कर निष्कर्ष काढलेले दिसत आहेत. अजून काही चाचण्या घेऊन मग नंतर ठाम निष्कर्ष काढला असता तर ते योग्य झाले असते. साधी मधुमेहाची चाचणी घेताना सुद्धा २ वेगवेगळ्या दिवशी रॅन्डम शर्करा तपासून नंतरच निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे इथेसुद्धा अजून चाचण्या घेणे आवश्यक होते.

मतिमंद, हुशार इ. विशेषणे सापेक्ष आहेत. ज्याप्रमाणे परदेशगमनाचा योग हा सापेक्ष आहे त्याचप्रमाणे एखाद्या मुलाला मतिमंद, हुशार, मठ्ठ, बुद्धिमान इ. म्हणणे हेदेखील सापेक्ष आहे. आईनस्टाईन ५ वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता असे वाचले होते. अशा मुलाला काही जणांनी नक्कीच मतिमंद ठरविले असणार. असो.

या चाचणीतल्या निदान काही पत्रिकांचे सर्व किंवा निदान काही ज्योतिषांनी केलेले सविस्तर विश्लेषण पहायला मिळेल का? त्यावरून ज्योतिषी चुकले का अंनिसने पूर्वग्रहदूषित निष्कर्ष काढले याचा अंदाज येईल. एखाद्या खरोखरच मतिमंद असलेल्या मुलाच्या बाबतीत वेगवेगळ्या ज्योतिषांनी कसे विश्लेषण केले होते हे वाचायला आवडेल. त्यांनी खरोखरच तो मतिमंद होता असा ठाम निष्कर्ष काढला होता का तो अत्यंत हुशार आहे असा निष्कर्ष काढला होता का त्याच्या पत्रिकेत त्यांना अभ्यासातील हुशारीऐवजी काही वेगळ्या क्षेत्रातले गुण दिसले होते का त्यांनी तो मतिमंद आहे असे स्पष्ट न लिहिता संदिग्ध शब्दात निष्कर्ष काढले होते ... हे सविस्तर वाचायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2014 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

...त्यात या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचुक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासुन जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे.एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे वीसापेक्षा कमी बरोबर आहेत.सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७.२५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत.

ही चाचणी पद्धती फारतर ज्योतिषी लोकांची व्यक्तिगत पात्रता ठरवण्यासाठी उपयोगी आहे, ज्योतिषशात्राची कसोटी म्हणून योग्य नाही.

ज्योतिषशास्त्राची कसोटी अश्या चाचणीने करता येईलः

१. सर्वप्रथम भविष्य वर्तवले जाण्यासंबंद्धिचे नियम / निकष कायम करून ते कसे वापरले जावेत ते स्पष्टपणे लिहून ठेवले पाहिजे.

२. तेच (आणि केवळ तेच) नियम, त्याच (आणि केवळ तीच) मान्य पद्धती वापरून कुंडल्यांचे भविष्य लिहीले गेले पाहिजे.

३. तपासलेल्या कुंडल्यांची कमीत कमी संख्या (मिनिमम सँपल साईझ) स्टॅटिस्टिक्सने ठरवलेली असावी.

३. नियम तेच असल्याने आणि ते तसेच वापरले जात असल्याने कुंडली माणसाने वाचली किंवा संगणकाने, काही फरक पडणार नाही. जर भविष्य सांगणार्‍या माणसाचे खाजगी ठोकताळे अथवा इंटूइशन वापरली जाणार असेल तर फारतर ती (वादाकरिता) एखाद्या माणसाची अतिंद्रिय शक्ती मानली जावू शकेल पण ती प्रक्रिया शास्त्रीय नसेल.

४. हीच वरची प्रक्रिया तेच नियम, तसेच वारंवार वापरून, तशीच फलनिष्पत्ती (आउटकम) येणे जरूर आहे.

५. वरच्या प्रक्रियेने आलेले भविष्याचे निर्णय स्टॅटिस्टिक्सली सिग्निफिकन्ट (९५% कॉन्फिडन्स लेव्हल / कोएफ्फिशंट) असले तर भविष्य सांगणे शास्त्र आहे असे म्हणता येईल.

आदूबाळ's picture

5 Mar 2014 - 3:41 pm | आदूबाळ

ही चाचणी पद्धती फारतर ज्योतिषी लोकांची व्यक्तिगत पात्रता ठरवण्यासाठी उपयोगी आहे

द्याट इज द होल प्वाईंट एक्का काका.

ज्योतिषशास्त्रात स्टोकॅस्टिक / नॉन-डिटर्मिनिस्टिक गोष्टी (उदा. गुरूंची कृपा) एवढ्या आहेत, की फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी म्हणजे पर्यायाने फलज्योतिषी लोकांची वैज्ञानिक चाचणी - असाच अर्थ घ्यावा लागेल.

गुरूंची कृपा असलेला कॉम्प्युटर कुठून आणणार?

(आता बालाजीची कृपा असलेलं मंगळयान असू शकतं तर गुरूकृपा असलेला कॉम्प्युटर का नसू शकतो या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नाही. ;) )

ज्योतिष शास्त्राची वैज्ञानिक चाचणी करू पहाणार्‍यांबाबत ज्योतिषप्रेमी असा आक्षेप घेताना आढळतात "अमुकतमुक माणूस ना? त्याला काय घंटा कळतंय? तो [फलज्योतिष/पारंपारिक/कृष्णमूर्ती/टॅरो] वाला/वाली आहे. नुस्तं [परीक्षा देऊन/मेडलं मिळवून/चार बुकं वाचून] ज्योतिषी होता येत नाही. त्याला [हजारो कुंडल्या पहाण्याचा अनुभव/पहाटे उठून घासलेली सबलॉर्ड्ची कोष्टकं/बाबांचा अनुग्रह] लागतो."

हा तिढा सोडवण्यासाठी काय पाहिजे?
१. अचूक उत्तरं सांगणारे ज्योतिषीच उरतील अशा कसोट्या/परीक्षा/इयत्ता
२. सहज पडताळून पहाता येणारी उत्तरं

पहिली इयत्ता हो/नाही उत्तरांची ठेवता येईल (म्हणजे ५०-५० प्रोबॅबिलिटी)
उदा. [पुणे/मुंबई/नागोठणे/छत्तरपूर/रिओ डि जानिरो] मध्ये [१२ जुलै १९६१] रोजी पाऊस पडला होता की नव्हता?
याचं उत्तर हो/नाही मध्ये देता येईल आणि सहज पडताळूनही पहाता येईल.

मग दुसरी इयत्ता ३३-३३-३३ प्रोबॅबिलिटीची
तिसरी २५-२५-२५-२५ ची
वगैरे.

चित्रगुप्त's picture

3 Mar 2014 - 8:47 pm | चित्रगुप्त

भविष्यकथन हे कोणत्याही पद्धतीने केलेले असो, त्यात इंद्रीयातीत, तर्कातीत बोधाचा मोठाच भाग असतो, 'अचानक सुचून जाणे' हे कला, साहित्य, काव्य निर्मितीप्रमाणेच भविष्यकथनातही घडत असते. त्यामुळे अशी चाचणी करता येईल, असे वाटत नाही.

मूकवाचक's picture

4 Mar 2014 - 2:57 am | मूकवाचक

+१

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

फलज्योतिषाची कुठल्याच प्रकारची चाचणी असू नये.

ज्यांना फलज्योतिष हे थोतांड आहे असं वाटतं ते फलज्योतिष्याच्या वाटेला जातंच नाहीत. त्यांच्यावर कितीही वाईट प्रसंग ओढवला तरी ते "बाकी सगळे उपाय करुन पाहिले, हा ही करुन पाहू." अशी तकलादू कारणं देत ते तथाकथित अधिभौतिक गोष्टींच्या कधीच नादी लागत नाही.

ज्यांचा फलज्योतिष या प्रकारावर विश्वास आहे, त्यांना कुणी कितीही सांगितलं की बाबारे असं काही नसतं तरीही त्यांचा विश्वासही अतूट असतो. त्यामुळे ते फलज्योतिष हे थोतांड आहे असं सांगणार्‍यांना फाटयावर मारतात आणि अमुक एक ज्योतिषी कसे अचुक भाकीत सांगतो हे सांगत फीरतात.

तसं ज्योतिष हा बर्‍यापैकी निरुपद्रवी प्रकार आहे. थोडं फार आर्थिक नुकसान होतं. अर्थात ज्योतिष्याकडे जाणारे आपल्याला फी परवडणार्‍या ज्योतिषाकडेच जातात. एखादा हातवर पोट असणारा पंचतारांकीत हॉटेलमध्ये उतरणार्‍या ज्योतिष्याकडे कधीच जात नाही. ते त्याच्या खिशाला परवडणार नसतं.

फलज्योतिष्याचा सर्वात मोठा धोका असतो, स्वयंसुचना. अर्थात सेल्फ सजेशन. जर का एखादया ज्योतिषाने नकारात्मक भाकीत केले आणि ज्या व्यक्तीबद्दल भाकीत केले आहे ती व्यक्ती कमकुवत मनाची असली तर त्याचे परिणाम भीषण होऊ शकतात. त्या व्यक्तीचं मन तशी घटना घडणारंच आहे अशी सुचना स्विकारते, माणूस स्वतःच त्या घटनेसाठी पोषक वातावरण तयार करतो. आणि कधीकधी तशी नकारात्मक घटना घडतेही.

आत्मशून्य's picture

3 Mar 2014 - 11:54 pm | आत्मशून्य

फलज्योतिष्याचा सर्वात मोठा धोका असतो, स्वयंसुचना. अर्थात सेल्फ सजेशन. जर का एखादया ज्योतिषाने नकारात्मक भाकीत केले आणि ज्या व्यक्तीबद्दल भाकीत केले आहे ती व्यक्ती कमकुवत मनाची असली तर त्याचे परिणाम भीषण होऊ शकतात. त्या व्यक्तीचं मन तशी घटना घडणारंच आहे अशी सुचना स्विकारते, माणूस स्वतःच त्या घटनेसाठी पोषक वातावरण तयार करतो. आणि कधीकधी तशी नकारात्मक घटना घडतेही.

हे खरे आहे. अफ्रिकन जुजु सुधा याच पध्दतिने काम करते असे मानले जाते.

विकास's picture

4 Mar 2014 - 12:23 am | विकास

जर का एखादया ज्योतिषाने नकारात्मक भाकीत केले आणि ज्या व्यक्तीबद्दल भाकीत केले आहे ती व्यक्ती कमकुवत मनाची असली तर त्याचे परिणाम भीषण होऊ शकतात.

अमोल पालेकर, दिप्ती नवल, श्रीराम लागू, विनोद मेहरा, दिना पाठक आदी असलेला अनकही ह्या चित्रपटाची कथा अशीच काहीशी आहे. फक्त त्याचा शेवट असा विचित्र आहे की ज्योतिषाला मानणारा म्हणू शकेल की भविष्य खरे ठरले तर न मानणारा म्हणू शकेल की बघा भविष्य वर्तवणे वगैरे मध्ये काही दम नाही!

चिं. त्र्य. खानोलकरांच्या कालाय तस्मै नमः या नाट्यकथेवर हा चित्रपट आधारीत आहे.

स्पंदना's picture

4 Mar 2014 - 5:53 am | स्पंदना

त्यातली भिमसेन जोशींनी गायलेली गाणी अप्रतिम आहेत. तसच 'मुझको भी राधा बनायदे" हे दोन वेगवेगळ्या मूडमध्ये आशा भोसलेंनी गायलेल गीतही अप्रतिम!

प्रकाश घाटपांडे's picture

4 Mar 2014 - 9:40 am | प्रकाश घाटपांडे

अनकही पाहिला नाही. बघायला हवा.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Mar 2014 - 9:23 am | प्रकाश घाटपांडे

ज्यांना फलज्योतिष हे थोतांड आहे असं वाटतं ते फलज्योतिष्याच्या वाटेला जातंच नाहीत. त्यांच्यावर कितीही वाईट प्रसंग ओढवला तरी ते "बाकी सगळे उपाय करुन पाहिले, हा ही करुन पाहू." अशी तकलादू कारणं देत ते तथाकथित अधिभौतिक गोष्टींच्या कधीच नादी लागत नाही.

हे मत सरसकट मान्य नाही. हा मोठा विषय आहे. बाकी गोष्टी पटतात.

विकास's picture

3 Mar 2014 - 11:52 pm | विकास

अशी विचारपूर्वक चाचणी करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पण अशा चाचणीचे उद्दिष्ट जर लोकशिक्षण करणे असेल तर त्याचे भविष्य मात्र मी छातीठोकपणे सांगू शकेन. ;)

अवांतर पण समांतर उदाहरणः मध्यंतरी एका भारतीय आहारतज्ञाचे भाषण एका भारतीयांच्या कॉन्फरन्समधे ऐकण्याचा योग आला. भाषण / प्रेझेंटेशन एकदम प्रभावी होते. उद्देश भारतीयांना त्यांच्या आहारातील उगाच आलेले दोष दाखवणे होता आणि त्यावर किती सोपे उपाय आहेत हे सांगणे (थोडक्यात सकारात्मक) होता. पब्लीकने मन लावून ऐकले, कुतुहलापोटी योग्य ते प्रश्न विचारले आणि भाषण संपल्यावर सर्वजण मसालेदार चटमटीत जेवणासाठी कोक/पेप्सी घेण्यासाठी शिस्तित उभे राहीले. :(

प्रकाश घाटपांडे's picture

4 Mar 2014 - 9:25 am | प्रकाश घाटपांडे

पण अशा चाचणीचे उद्दिष्ट जर लोकशिक्षण करणे असेल तर त्याचे भविष्य मात्र मी छातीठोकपणे सांगू शकेन. Wink

लोकशिक्षण हा हेतु नाही.डॉक्युमेंटेशन हा आहे. मात्र लोकशिक्षणासाठी तो उपयोगी ठरतो.

करायची एखादी चाचणी जर आपण घेणार असाल तर त्या परिक्षेला बसायची माझी मनापासुन इच्छा आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Mar 2014 - 9:29 am | प्रकाश घाटपांडे

इतर पद्धती म्हणजे फ्युचरॉलॉजी वगैरे अस म्हणता आहात काय? चाचणीचा विषय फलज्योतिष आहे.पण तुम्ही म्हणता तसे इतर पद्धतीने भाकीत व फलज्योतिषाच्या माध्यमातून भाकित यात किती तफावत येते हे पाहणे ही रोचक ठरेल.

आत्मशून्य's picture

4 Mar 2014 - 12:14 pm | आत्मशून्य

मी सरसकट याला पॅटर्न स्टडी इतकेच म्हणेन्/म्हणायचो. एखाद्या परिस्थीतीबाबतचे बहुतांश पॅटर्न अभ्यासले तर त्याचे अतिशय मिळते जुळते अथवा अचुक प्रेडिक्शन करता येते. जितके व्यवस्थीत पॅटर्न तपासु तितका निकाल निर्दोष बनतो असे निरीक्षण आहे. (याला थोडी अँथ्रोपोलॉजीचीसुधा कधी कधी जोड द्यावी लागते) हा प्रकार ढोबळमानाने व्यक्ती वर्तणूक, नातेसंबंध, क्रीडा स्पर्धा निकाल, मार्केट ट्रेंड सारख्या ठीकाणी उपयोगी पडू शकतो.

मराठीप्रेमी's picture

4 Mar 2014 - 12:02 pm | मराठीप्रेमी

नंदकुमार जकातदार यांनी या ठिकाणी काही ठाम दावे केले आहेत (२ मिनिटांपासून पुढे बघावे). त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एक संख्याशास्त्रीय चाचणी केली होती आणी त्या चाचणीचा निकाल अनुकूल असा आला.

तुमच्या या ज्योतिशांच्या वर्तुळात ओळखी आहेत, तुम्ही यासंदर्भात अधिक माहिती मिळवून देऊ शकाल काय?

मारकुटे's picture

4 Mar 2014 - 2:31 pm | मारकुटे

कशासाठी चाचणी हवी?

फलज्योतिषाची चाचणी काय असावी हे सामान्य लोक ज्यांना त्यातलं ज्ञान नाहीये असे लोक सांगू शकणार नाहीत. ज्यांचा फलज्योतिषाचा गहन अभ्यास आहे तेच लोक सांगू शकतील. डॉक्टर ची परीक्षा दुसरा सेनिओर डॉक्टरच करू शकेल न. कोणीही कसा करू शकेल ?

आबा's picture

4 Mar 2014 - 4:33 pm | आबा

डॉक्टरची परिक्षा दुसरा डॉक्टर करू शकतो याच कारण असं की "मेडिकल सायन्स" हे शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध होउन मान्यताप्राप्त झालं आहे. त्यामुळे चाचणी ही फक्त त्या विशिष्ठ डॉक्टरची असते, संपूर्ण मेडीकल सायन्स ची नाही. ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत ज्योतिषी चांगले आहेत की वाईट हे ठरवायचंच नाहीये, ज्योतिषशास्त्रंच शास्त्रीय कसोट्यांवर उतरतय का हे पहायचं आहे. त्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही...
एखादा ज्योतिषी चांगला की वाईट हे ठरवण्याची वेळ अजून आलेलीच नाही, प्रश्न त्याहीपेक्षा जास्त मूलभूत आहे, हेच बर्‍याच जणांना कळत नाहीये.
...
मला स्वतःला असं वाटतं, की कोणताही ज्योतिषी अश्या कोणत्याही अधिकृत चाचण्यांसाठी पुढे येणार नाही. पूर्ण शास्त्राचं स्टँडर्डायझेशन करून ग्राहक संरक्षण कायद्याचं लचांड मागे लाउन घेण्यापेक्षा, अडचणीत सापडलेल्या लोकांना गाठून त्यांना खोटी आशा दाखवून पैसे उकळायचे हा सेफ जुगार आहे. शास्त्रीय मान्यता हवीय कोणाला?!

बॅटमॅन's picture

5 Mar 2014 - 12:38 am | बॅटमॅन

मला स्वतःला असं वाटतं, की कोणताही ज्योतिषी अश्या कोणत्याही अधिकृत चाचण्यांसाठी पुढे येणार नाही. पूर्ण शास्त्राचं स्टँडर्डायझेशन करून ग्राहक संरक्षण कायद्याचं लचांड मागे लाउन घेण्यापेक्षा, अडचणीत सापडलेल्या लोकांना गाठून त्यांना खोटी आशा दाखवून पैसे उकळायचे हा सेफ जुगार आहे. शास्त्रीय मान्यता हवीय कोणाला?!

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

अन हे करायचं म्हटलं की त्यांना कळायचं बंद होतं अन बिनबुडाचे व्यक्तिगत हल्ले सुरू होतात. भेद समजून घेण्याची कुवत तर नसतेच, त्यात पित्त खवळले की "आधीच मर्कट तशातहि मद्य प्याला" असे प्रताप सुरू होतात.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2014 - 12:56 am | अत्रुप्त आत्मा

@अन हे करायचं म्हटलं की त्यांना कळायचं बंद होतं अन बिनबुडाचे व्यक्तिगत हल्ले सुरू होतात. भेद समजून घेण्याची कुवत तर नसतेच, त्यात पित्त खवळले की "आधीच मर्कट तशातहि मद्य प्याला" असे प्रताप सुरू होतात.>>> +१ कुठलंही आव्हान कधिह्ही स्विकारायचं नाही. बाहेर बाता ठोकायच्या,आणि आव्हान देणार्‍यांसमोर पार्श्वभागाला पाय लाऊन पळ काढायचा,किंवा स्वतःचे हसे करून घ्यायचे. हा ज्योतिषांचा कायमचा ठरलेला खेळ आहे. एकाही ज्योतिषाला खुलेपणानी- "हे शास्त्र खरं/खोटं कसंही असलं तरी माझ्या भविष्यकथनचा आणि उपाययोजनेस्तव होणार्‍या मार्गदर्शनाचा(म्हणजे त्यातल्या व्यावहारीक उपाय योजनांचा! ;) ...) जातकांना फायदा होतो".. हे मान्य करण्याचं धाडस किंवा सद् बुद्धी झालेली नाही. :)

बॅटमॅन's picture

5 Mar 2014 - 2:16 pm | बॅटमॅन

"हे शास्त्र खरं/खोटं कसंही असलं तरी माझ्या भविष्यकथनचा आणि उपाययोजनेस्तव होणार्‍या मार्गदर्शनाचा(म्हणजे त्यातल्या व्यावहारीक उपाय योजनांचा! Wink ...) जातकांना फायदा होतो"..

यात "हे शास्त्र खरं/खोटं कसंही असलं तरी" हीच तर गोम आहे. हे कबूल केलं तर धंदाच बसेल ना. तस्मात फायदा होतो हे तर म्हणतात, पण शास्त्राबद्दल कसलाही संशय समोरच्याच्या मनात येऊ देत नाहीत. :)

पण एक मजा आहे. अशीही तुरळक उदा. पाहिली आहेत की आर्थिक प्राप्ती होत नसली तरी ज्योतिषाची प्राणपणे भलामण केली जाते. तेव्हा मात्र त्रांगडं कळत नाही खरंच. असो.

रामचंद्रनच्या "फँटम ब्रेन" पुस्तकातून याचं टेंटेटिव्ह कारण कळतं
फॉल्स स्टॅटिस्तिक्स तयार करण्याची, मेंदूची क्षमताच यासाठी कारणीभूत आहे...
कोरीलेशन जोडण्यासाठीची आतुरता हे मानसाच्या मेंदूचं लक्षणचं आहे, आपण तीच उदाहरणे लक्षात ठेवतो जी आपल्या पूर्वग्रहांना सपोर्ट देतात, यासाठीचे इंट्रेस्टींग प्रयोग सुद्धा आहेत बिहेव्हियरल सायन्स मध्ये...

त्यामुळे कागदावर डाटा मांडून ग्राफ वगैरे काढणे हा सेफ मार्ग आहे, किंवा कारण विचारणे

ते बाकी खरं!!! ढगात साईबाबा इ. शोधणे वैग्रे गोष्टी त्यातूनच येतात खर्‍या.

शेवटी आकड्यांच्या शिस्तीशिवाय पर्याय नाही हेच खरं.

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 11:49 am | मंदार दिलीप जोशी

असहमत. हा विषय इतका मोठा आणि गुंतागुंतीचा आहे की एवढं करायला कुणालाही वेळ नसतो.

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2014 - 3:44 pm | अत्रन्गि पाउस

फलज्योतिष आणि हवामान अंदाज / निवडणूक अंदाज /अर्थविषयक अंदाज अशी करता येईल का ?
काही ज्ञात आणि बर्याच अज्ञात parameter चा वापर करून केलेले अंदाज असं ह्याकडे बघितले तर ??

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2014 - 3:46 pm | अत्रन्गि पाउस

फलज्योतिष आणि मेडिकल ह्यांची तुलना करायची झाल्यास...रोग निदान ह्या स्टेप पर्यंतच बघितल्यास..??

आबा's picture

5 Mar 2014 - 8:15 pm | आबा

अत्रंगी,
दोन मिनिटासाठी ज्योतिषा बद्दलचं "माझं" मत सोडून द्या,
असंही गृहीत धरा, की ज्योतिशांचे अंदाज आणि हवामानाचे अंदाज यांचं एरर मार्जिन सारखच असतं...
तरीही "शास्त्र" म्हणण्यासाठी नुसतं कोरीलेशन असून चालत नाही (हे नेसेसरी आहे सफिशियंट नाही)
भविष्य वर्तवण्याचं एक मॉडेल तयार करावं लागेल आणि त्या मॉडेल साठी कोरीलेशन, फॉल्सीफायेबिलीटी आणि रीप्रोड्युसीबीलीटी या अटी पूर्ण व्हाव्या लागतील...

हवामानाचं मॉडेल वरील अटी पूर्ण करतं, ज्योतीषशास्त्राचं तपासावं लागेल (हे करण्यात वेळ घालवू नये असं माझं मत आहे, कारण कोरीलेशनची अट सुद्धा पूर्ण होत नाही)

सुबोध खरे's picture

5 Mar 2014 - 12:32 am | सुबोध खरे

आबा तुम्ही तर त्यांच्या चडडीलाच हात घालताय *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

मला स्वतःला असं वाटतं, की कोणताही ज्योतिषी अश्या कोणत्याही अधिकृत चाचण्यांसाठी पुढे येणार नाही

हम्म अब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे .. कारण ते ज्योतिषी नाहीचेत . ते फक्त लोकांना ठगाव्णारे भोंदू आहेत .आत्ताच्या काळामध्ये फलज्योतिषातला खरा ज्योतिषी सापडणं दुर्मिळ. त्यामुळे त्याची चाचणी हि ठरवणं हि तेवढंच अवघड . पण त्यातलं तज्ञ सापडत नाही म्हणून त्या शास्त्रालाच खोटं ठरवणं चुकीचा आहे असं मला वाटतं.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2014 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा

कारण ते ज्योतिषी नाहीचेत . ते फक्त लोकांना ठगाव्णारे भोंदू आहेत . http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif
http://www.sherv.net/cm/emo/laughing/facebook-laughing-smiley-emoticon.gif
आत्ताच्या काळामध्ये फलज्योतिषातला खरा ज्योतिषी सापडणं दुर्मिळ. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif
एकाच मुद्यात दोन दोन खेळ
एक चिवडा तर दुसरी भेळ!!! :p

बॅटमॅन's picture

5 Mar 2014 - 4:40 pm | बॅटमॅन

एकाच मुद्यात दोन दोन खेळ
एक चिवडा तर दुसरी भेळ!!!
कशाचा कशाला नाही मेळ
हाताला लागलं फक्त केळ ;) ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2014 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा

@हाताला लागलं फक्त केळ >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 11:50 am | मंदार दिलीप जोशी

पण त्यातलं तज्ञ सापडत नाही म्हणून त्या शास्त्रालाच खोटं ठरवणं चुकीचा आहे असं मला वाटतं.

बरोबर !! :)

'परीक्षा' याबाबतची फक्त एक दोन छोटी छोटी उदाहरणं देते.
शाळेतल्या मुलांसाठी (५वी व ८वी) एक गणिताची परीक्षा आहे. विशेषतः अंकगणिताची. प्रज्ञा परीक्षा. त्याला आधी एक प्राविण्य परीक्षा घेउन मुले निवडली जातात. फायनल परीक्षेला जी बसतात त्यापैकी २० मध्ये १ अश्या प्रमाणात पास होतात.
अशा वेळेस अंकगणिताला आपण 'थोतांड' ठरवत नाही.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एक राज्यपातलीवरची भौतिकशास्त्राची परीक्षा घेतली जाते. त्यातून फक्त पहिल्या १% मुलांना सर्टिफिकेट मिळतं. बाकीच्यांना काही नाही. त्या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या मार्कांची सरासरी काढली तर ती सुद्धा ५०% च्या खाली जाईल. पण आपण भौतिकशास्त्र 'थोतांड' ठरवत नाही. ;)
.....
...... कारण आपल्याला माहित असतं (पक्षी:कबूल असतं!) की हे विषय गुंतागुंतीचे आहेत!
पण ज्योतिषदेखिल गुन्तागुन्तीचे आहे हे लक्षात घेण्याइतकादेखिल त्याचा अभ्यास फारसा कुणी केलेला नसतो.
कारण ते जुने आहे!! :D
तसेही मधल्या काळात या शस्त्राचा इतका र्‍हास झाला आहे की लग्नासारख्या गोष्टीत फक्त चंद्र नक्षत्र बघितले जाउ लागले, आणि बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाउ लागले. फक्त चंद्र बघणे/ फक्त नाड बघणे ही केवळ आळशीपणाची हद्द आहे. त्यामुळे ऑलरेडी हे शास्त्र लयालाच गेले आहे. चाचण्या घ्या अथवा घेउ नका, हे ज्ञान बुडालेलं आहेच.
असो.
राहता राहिलं फसवणुकीबद्दल. एकजण अडचणीत आहे असं पाहिल्यावर दुसरा ताबडतोब त्याची अडचण वाढवून स्वतःचा फायदा घ्यायला बघतो. मनुष्यस्वभाव 'बनेल'च आहे. अगदी ८-१० वर्षाची भावंड देखिल एकमेकांना 'आईला नाव सांगेन' म्हणून ब्लॅकमेल करुन गैरफायदा घेताना दिसतात. 'अभ्यासात मदत करतो. बदल्यात तुझ्याकडची अमुकतमुक वस्तू मला दे गपचुप'. असे कुठलंही मोठं भावंड लहान भावंडाला करताना दिसेल. थोडक्यात, गैरफायदा घेणं हा माणसाचा स्वभाव आहे. त्याला कुठलेतरी निमित्त मिळतंच. शिवाय, ज्या समाजांमध्ये ज्योतिष वगरै नाही, तिथे नखशिखांत प्रामाणिकपणा दिसतो का? आज ज्योतिष आहे, उद्या अजून काहितरी असेल... माणूस दुसर्‍याला फसवायचा थांबणार नाही.

बाळ सप्रे's picture

5 Mar 2014 - 5:33 pm | बाळ सप्रे

त्यापैकी २० मध्ये १ अश्या प्रमाणात पास होतात.
अशा वेळेस अंकगणिताला आपण 'थोतांड' ठरवत नाही

ढ विद्यार्थ्यांमुळे विषय थोतांड ठरत नाही हे खरे. नापास होणार्‍या सर्वच ज्योतिष्यांना 'ढ' ठरवुन किती वेळ ज्योतिषशास्त्राची पाठराखण करणार?? आणि अशाप्रकारे जर जगात एकही ज्योतिषी हुषार ठरणार नसेल तर ज्योतिष हे 'मृतशास्त्र' म्हणून आत्ता ज्योतिषाचा व्यवसाय करणार्‍या व्यक्तिंचा बुरखा का फाडु नये??

आबा's picture

5 Mar 2014 - 10:12 pm | आबा

सप्रे साहेब,
"कुंडलीवरून भविष्य ठरू शकतं" हा दावा तपासण्यासाठी ज्योतीषशास्त्राच्या ज्ञानाची गरजच नाही
१) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का?
२) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का?
या "दोन्हीं"ची उत्तरे "हो" आहेत का हे पहावं लागेल...
यासाठी ज्योतिषाचं नॉलेज लागतच नाही..

घाटपांडेंच्या अहवालातून दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळतंय... त्यामुळे पुढच्या चाचण्यांची गरजचं नाही
ती चाचणी मुद्दामच अशी तयार केली आहे की जिच्या निकालावर ज्योतिष्यांच्या ज्ञानाचा काहीही परिणाम होणार नाही.
मी म्हैस यांना हेच सांगायचा प्रयत्न करतोय.
असो,

याचाचणीत पास होणं ही पहिली स्टेप झाली...
भविष्य वर्तवण्याचं मॉडेल तयार करण ही फार नंतरची गोष्ट...

बाळ सप्रे's picture

6 Mar 2014 - 11:19 am | बाळ सप्रे

तुमचे मुद्दे बरोबरच आहेत..

पण आत्ताच्या ज्योतिषांना ज्ञान नाही.. ज्यांची चाचणी घेतली ते भोंदु आहेत अशा कुशंकांना उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय मी.. जर कोणीच पास होत नाही तर सध्या जगात ज्योतिषाचे ज्ञान असणारं कुणीच नाही .. असं असेल तर व्यवसाय करणारे सगळेच भोन्दु..

बॅटमॅन's picture

5 Mar 2014 - 5:37 pm | बॅटमॅन

जयंत नारळीकर, घाटपांडेकाका, इ. लोकांच्या जॉइंट पेपरबद्दल काय मत आहे?

http://www.currentscience.ac.in/Downloads/article_id_096_05_0641_0643_0.pdf

कवितानागेश's picture

5 Mar 2014 - 6:41 pm | कवितानागेश

त्याच अहवालाबद्दल तर सुरु आहे चर्चा. ( ती कपाळावर हात मारणारीस्मायली आहे का कुठे?)
असो. माझं या अहवालाबद्दलचं मत 'बाबावाक्यम प्रमाणम' असं आहे. =))
अवांतरः या धाग्यावर जेम्स रॅन्डी आणि अब्राहम कोवूर यांचं नाव अजून आलं नाहीये. ;)

बॅटमॅन's picture

5 Mar 2014 - 6:49 pm | बॅटमॅन

ओके.

सिलेक्शन बायसचा आरोप करावयाचा झाला तर तो दोन्ही बाजूंनी करता येतो. :)

अन तुझ्या प्रतिसादात 'ज्योतिषाचा र्‍हास' अन काही अनरिलेटेड उदा. यांची सांगड घालून ज्योतिषाचे छुपे समर्थनच दिसते आहे. त्यापलीकडे हाती काहीच लागत नाही. मुळात ती उपमा वेल-फॉर्म्ड नाहीच्चे. असो.

ज्योतिषात इतके वाद आहेत की सांगता पुरवत नाही. एकदा प्रेडिक्शनची मानके काय ती नीट ठरवा तरी, च्यायला यांचंच आपापसात धड नाही आणि वर इतरांनी चुका दाखवल्या की ओरडायचे याला काय अर्थ आहे? हे तुला उद्देशून बोलत नाहीये. काही ज्योतिषांना दाखवल्यावर असे म्हणाल्याची उदा. ठौक आहेत त्याबद्दल म्हणालो.

आबा's picture

5 Mar 2014 - 8:02 pm | आबा

व्यक्तीनिरपेक्षता असावी असंच म्हणतोय की हो मी ताई, ज्योतिषी कसा आहे याची परिक्षा घ्यायचीच नाहीये आपल्याला (म्हणजे घाटपांडेंना)
असं बघा...
ज्योतिषशास्त्रातील मूलभूत गृहीतक असं आहे की,
"आकाशातल्या ग्रहांच्या आपल्या जन्माच्या वेळच्या आभासी स्थितीवरून आपले भविष्य निश्चित होते"...
ही आभासी स्थिती नोंदवण्याची पद्धत म्हणजे कुंडली मांडणे, ही कुंडली कोणीही मांडू शकतो त्यात काही विषेश नाही
आता यावरून जर ज्योतिषशास्त्र खरं ठरवायचं असेल तर खालील अटी पूर्ण व्हाव्या लागतील

१) भविष्य वर्तवण्याचं तंत्र सारख्या परंतू दोन वेगळ्या व्यक्तींच्या कुंडल्यांवर वापरलं असता, एकच उत्तर यायला हवं
२) भविष्य वर्तवण्याचं तंत्र एकाच कुंडलीवर दोन वेगळ्या व्यक्तींनी वापरलं असता एकच उत्तर यायला हवं (हेच तुम्हीही म्हणताहात)
३) हे तंत्र सर्व कुंडल्यांसाठी वापरता यायला हवं. (ज्या कुंडली साठी वापरता येणार नाही तीजसाठी रिप्रोड्युसीबल कारण देता यावं)
४) आणि हे तंत्र फॉल्सीफायेबल असावं

हे झाले प्राथमिक चाचणी साठीचे निकष, प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा परिणाम तपासणारी चाचणी जास्त काँप्लीकेटेड असेल,
पण करता येणं शक्य आहे...

आता इथून पुढच्या पॅराग्राफ कडे दुर्लक्ष केलं तरी चालेल...
आता प्रोब्लेम असा होतो की, कुंडली मांडेपर्यंत सर्व ठीक आहे, कोणालाही करता येईल. भविष्य वर्तवण्याचं रिप्रोड्युसीबल "तंत्र" मात्र कोणी सांगत नाही. "गुरूकृपा असावी लागते", "देवावर विश्वास असावा लागतो" अशी अक्षरशः काहीही उत्तरं मिळतात, मुद्दा असा आहे गुरूकृपा वगैरे लागत असेल तर दुसरी अट पूर्ण होत नाही.

ब्लॅकमेलींग किंवा गैरफायदा घेण्याची वृत्ती यावर काही लिहीत नाही, विषयांतर होईल.

बॅटमॅन's picture

5 Mar 2014 - 10:51 pm | बॅटमॅन

तहे दिल से सहमत.

अन 'काही ज्योतिषांमुळे पूर्ण शास्त्राला बोल लावता येत नाही' असे म्हणायचे असेल तर घाटपांडेकाका अन नारळीकरांना सगळे बोगस ज्योतिषीच भेटले होते असे म्हणावे लागेल.

आबा's picture

5 Mar 2014 - 11:03 pm | आबा

मी जास्त जनरल दावा करतोय...
सप्रेंना दिलेलं उत्तर इथे पण देतो
"कुंडलीवरून भविष्य ठरू शकतं" हे कोरिलेशन तपासायचं आहे
त्यासाठी
१) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का?
२) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का?
या "दोन्हीं"ची उत्तरे "हो" आहेत का हे पहावं लागेल...
यासाठी ज्योतिषाचं नॉलेज लागतच नाही..
घाटपांडे एट ऑल. मधली चाचणी अशीच आहे की जिच्या निकालावर ज्योतिष्यांच्या ज्ञानाचा काहीही परिणाम होणार नाही.
या चाचणीत पास झालं तर फक्त कोरीलेशन आहे हे कळेल
भविष्य वर्तवण्याचं मॉडेल तयार करणं ही फार नंतरची गोष्ट...

बॅटमॅन's picture

5 Mar 2014 - 11:19 pm | बॅटमॅन

काहीएक एरर मार्जिन अलाउ करूनही हे मॉडेलच्या चौकटीत बसवणे मुष्किलच नै तर नामुमकिन आहे!!!!

आबा's picture

5 Mar 2014 - 11:23 pm | आबा

शिवाय
नुसतं कोरीलेशन कळून मॉडेल तयार करताही येणार नाही
मॉडेल साठीची समीकरणे लिहायला..
"ग्रहांचा आयुष्यावर का (आणि किती) परीणाम होतो" याचा साधा नियम माहीत पाहीजे
या बाबतीत अंधार आहे :)

बॅटमॅन's picture

5 Mar 2014 - 11:25 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!! :)

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 11:52 am | मंदार दिलीप जोशी

चर्चचे सार आले आहे या प्रतिसादात.

सुबोध खरे's picture

5 Mar 2014 - 7:27 pm | सुबोध खरे

राहवत नाही म्हणून लिहित आहे. आतापर्यंत लोक फक्त फायदा होतो किंवा नाही या बद्दल लिहित आले. ज्योतीष शास्त्रामुळे( ज्योतीषांमुळे) अपरिमित नुकसान झालेल्या दोन मी स्वतः पाहिलेल्या घटना लिहित आहे.
१) नौदलाचे हेलीकोप्तर गोव्याजवळ समुद्रात कोसळले आणि दोन्ही वैमानिक बेपत्ता होते. नौदलाच्या पाणबुड्यांनी ते समुद्रात जेथे बुडाले तेथे त्याचे अवशेष शोधून काढले. मधल्या कालावधीत एका वैमानिकाच्या बायकोला एका ज्योतिषाने सांगितले कि तुमचा नवरा कुठल्यातरी किनार्याला लागला आहे आणि बेशुद्ध आहे तुमची ग्रह दशा सुधारली कि परत येईल. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली आणि अपघातीमृत्यू म्हणून दोन्ही पायलटच्या बायकांना विमा, निवृत्तीवेतन, प्रोवीडंट फंड असे सर्व आर्थिक लाभ देण्याची वेळ आली त्यावेळी या बायकोने आपले यजमान मृत आहेत हे स्वीकारण्याचे नाकारले. जोवर ती त्या चौकशी अहवालाचा स्वीकार करीत नाही तोवर तो सैनिक( अधिकारी) missing in action(कामाच्या अनुषंगाने बेपत्ता) म्हणून मानावे लागते आणि बायकोला सात वर्षे पर्यंत अर्धाच पगार मिळतो आणि बाकी सर्व अनुषंगिक फायदे सात वर्षे पर्यंत मिळत नाहीत. नौदलाच्या पाणबुड्यांनी त्या अपघात केलेल्या कसून तपासणी मध्ये तेथे समुद्रात एक मूत्रपिंड आणि आतड्यांची काही वेटोळी सापडली होती. ती चौकशीसाठी जपून ठेवलेली होती.त्या अवशेषांची डी एन ए चाचणी केली गेली. त्या वैमानिकाच्या वडिलांचे डी एन ए त्या मूत्रपिंडातील आणि आतड्यातील पेशींच्या डी एन ए शी जुळले आणि त्यानंतर त्या वैमानिकाच्या वडिलांनी आपला मुलगा मृत झाला आहे हे मान्य केले आणि आपल्या सुनेलाही समजावले आणि या कहाणीवर पडदा पडला. सुदैवाने दुसर्या वैमानिकाच्या बायकोने हा अपघात मान्य केलेला होता( तिच्या यजमानांचे अवशेष सापडले नाहीत). जर पहिल्या वैमानिकाचे अवशेष जुळेल नसते तर सात वर्षे तिच्या मुलांना अर्ध्या पगारावर कोणतेही फायदे न मिळता जगावे लागले असते. शिवाय जोवर नवरा मृत घोषित होत नाही तोवर अनुकंपा तत्वावर बायकोला नोकरी देत आली नसती. आज ती नौदलाने दिलेले पूर्ण आर्थिक फायदे आणि नोकरी करून मुलांचे शिक्षण पुरे करू शकत आहे( नवरा गेल्याचे दुक्ख आयुष्यभराचे आहे पण त्याला कोणी काही करू शकत नाही.
२) मी मुंबईतील एका मोठ्या कोर्पोरेट रुग्णालयात काम करीत असताना एक निम्न मध्यमवर्गातील रुग्ण हृदयविकाराच्या झटक्यानंतर भरती झाला. तो प्रथम एका छोट्या रुग्णालयात भरती झाला होता तेथून त्यांनी तातडीने आमच्याकडे त्याला हलविले दुर्दैवाने याला आलेला झटका इतका मोठा होता कि त्याला आणेपर्यंत तो बेशुद्ध होता आणि त्याचा मेंदू मृत झाला होता. सर्व उपाय करूनही फारसा फायदा झाला नव्हता.त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू होता. आता त्याला व्हेन्टीलेटर वरून काढण्यासाठी नातेवाईकांची परवानगी आवश्यक होती. मधल्या काळात त्यांना एका ज्योतिषाने सांगितले आहे कि त्यांच्या कुंडलीत मृत्युयोग नाही. यामुळे त्या रुग्णाच्या बायकोने कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू ठेवा असे सांगितले. मोठ्या रुग्णालयात अती दक्षता विभागात बिल फार झपाट्याने वाढत जाते. जेंव्हा त्या बायकोच्या खिशातील( उधार आणलेले इ ) सर्व पैसे संपले तेंव्हा मोठ्या मुश्किलीने तिने कृत्रिम श्वासोच्छ्वास बंद करण्यासाठी परवानगी दिली. यावेले पर्यंत तिच्या खिशातुन जवळ जवळ चार लाख रुपये खर्च झाले होते. तिला आणल्या दिव्शीच स्पष्टपणे सांगितले होते कि नवर्याचा मेंदू मृत झाला आहे तेंव्हा उगीच पैसे खर्च करून फायदा नाही. पण ज्योतिषावर विश्वास ठेवल्यामुळे तिचे अपरिमित नुकसान झाले. हेच चार लाख रुपये तिला फार मोलाचे होते.

दुहेरी नुकसान योग होता असा तर्क आणखी एक ज्योतिषी काढेल .आडांख्यांचा आधार घेऊन किती चालायचे याचे तारतम्य हवेच .

कवितानागेश's picture

5 Mar 2014 - 11:02 pm | कवितानागेश

माझ्या कल्पनेपलिकडे वाट लागलिये!

बॅटमॅन's picture

6 Mar 2014 - 11:22 am | बॅटमॅन

कशाची ज्योतिषाची ;) =))

कवितानागेश's picture

6 Mar 2014 - 12:59 pm | कवितानागेश

लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या कल्पनांची....
असो. मला समाजप्रबोधन करण्यात इन्टरेस्ट नाही.

...हर एक दुजेसे ज्यादा सयाने है!

लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या कल्पनांची....

त्या पेपरमध्ये नक्की काय चूक आहे ते सांग गं. लोकांच्या कल्पनांशी करायचेय काय? लोक तर बह्वंशी मूर्खच असतात.

समाजप्रबोधन वैग्रे जाऊदे खड्ड्यात. तो तीन पानांचा पेपर नक्की कुठे चुकला आहे इतकं समजलं तरी बास आहे आमच्यासारख्यांना. असो.

अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता हसण्यापेक्षा नक्की काय म्हणायचं ते सांगा. चाचणी 'ज्योतिषांची' आहे कि 'ज्योतिष शास्त्राची' ?
लीमाउजेट चा 'ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय..' हा प्रतिसाद वाचा. मला जे म्हणायचं तेच exactly त्यांनी म्हनला आहे .

डॉक्टरची परिक्षा दुसरा डॉक्टर करू शकतो याच कारण असं की "मेडिकल सायन्स" हे शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध होउन मान्यताप्राप्त झालं आहे.

शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करणारे त्या विषयातले तज्ञ असावे लागतात न. दुसरी गोष्ट अशी कि चाचण्या घेताना त्यासाठी काही माध्यम असावी लागतात. जसा कि ह्या केमिकल मध्ये ते केमिकल मिसळला कि हे तयार होतं. इथे हि केमिकल्स माध्यम म्हणून काम करतात . तसा फलज्योतिष शास्त्राची चाचणी घेण्यासाठी अशी कोणतीही माध्यम उपलब्ध नसतात.
मग ती कशी करायची ?

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 1:18 pm | आत्मशून्य

तुम्हाला घडणार्‍ञा गोष्टी मनासारख्या वाटत नसल्याप्रमाने का उत्तरे लिहताय ?

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2014 - 1:21 pm | अत्रुप्त आत्मा

@अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता हसण्यापेक्षा नक्की काय म्हणायचं ते सांगा. >>> आधी तुंम्ही घाटपांडे काकांचा ब्लॉग अख्खा वाचा! मग कदाचित तुंम्हाला आमच्या हसण्याचे कारण कळेल. :)

बॅटमॅन's picture

6 Mar 2014 - 2:16 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो. बर्डन ऑफ प्रूफ ज्योतिषांवर असते.

आबा's picture

6 Mar 2014 - 6:20 pm | आबा

ठीक आहे परत लिहितो,
ज्योतिष शास्त्राचं मॉडेल तयार करणे, आणि ते तज्ञांकडून तपासणे, ही फार नंतरची गोष्ट झाली

"आकाशातील ग्रहतार्‍यांच्या आपल्या जन्माच्या वेळी असलेल्या भासमान स्थितीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो"
फक्त हा दावा तपासायचा आहे...
त्यासाठी प्रचंड ज्ञानाची गरज नाही, फक्त
१) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का?
२) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का?
या दोन्ही प्रश्नांची उत्तरे "हो" आहेत का हे पहावे लागेल...

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2014 - 8:59 pm | श्रीगुरुजी

>>> १) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का?

एक उदाहरण देतो. माझ्या ओळखीचे एक जुळे भाऊ-बहीण आहेत. दोघेही काही मिनिटांच्या अंतराने जन्माला आले. त्यांच्या कुंडल्या अर्थातच बहुतेक सारख्या आहेत. त्यांच्या आयुष्यातील मला आढळलेले साम्य -

(१) दोघांनीही एकाच महाविद्यालयातून शास्त्र शाखेत पदवी घेतली (भावाने भौतिकशास्त्रात व बहिणीने संख्याशास्त्रात. द्वितीय वर्षापर्यंत दोघांचेही सर्व विषय समान होते. फक्त शेवटच्या वर्षात विषय बदलले.)

(२) दोघांनीही विद्यापीठात संगणक शास्त्राच्या मास्टर्स पदवीची प्रवेश परीक्षा दिली. दोघांनाही प्रथम यादीत प्रवेश मिळाला नाही. दोघेही प्रतिक्षा यादीत होते. कालांतराने बहिणीला कसाबसा प्रवेश मिळाला. भावाला न मिळाल्यामुळे त्याने बाहेरून संगणक प्रशिक्षण घेतले.

(३) दोघांनीही माहिती तंत्रज्ञान विषयात करिअर केले.

(४) दोघेही लग्नानंतर अमेरिकेत एकाच शहरात स्थायिक झाले आहेत.

(५) दोघांनाही एकच अपत्य आहे.

(६) दोघांचेही लग्न मुलगा/मुलगी पाहून, ठरवून झाले. दोघांचेही जोडीदार त्यांच्याच जातीतलेच आहेत.

अजून एक उदाहरण आहे. दोन भिन्न कुटुंबातील महिलांचा जन्मदिवस एकच आहे. जन्मवेळ नक्की माहिती नाही. पण दोन तासांच्या फरकाने जन्मलग्न बदलते. त्यामुळे कुंडली काही प्रमाणात एकच व काही फरक आहेत.

(१) दोघीही पुणे शहराच्या आसपास जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या.
(२) दोघी हिंदी व मराठी हेच विषय शिकवत होत्या.
(३) दोघीही वर्णाने सावळ्या, दिसायला सर्वसाधारण व चष्मा होता.
(४) दोघीही दिर्घायुषी आहेत.

>>>> २) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का?

अशांच्या कुंडलीत काही ग्रहयोग एकसारखे असतात. घटस्फोट, शिक्षण, काही विशिष्ट रोग्/आजार हे अशी विशिष्ट ग्रहस्थिती असलेल्या बहुसंख्य कुंडल्यात दिसून येतात.

आबा's picture

6 Mar 2014 - 9:23 pm | आबा

एक्झॅक्टली हेच टेस्ट करायचय
(आणि उलटं सुद्धा)

बाळ सप्रे's picture

7 Mar 2014 - 11:36 am | बाळ सप्रे

दोघेही काही मिनिटांच्या अंतराने जन्माला आले. त्यांच्या कुंडल्या अर्थातच बहुतेक सारख्या आहेत.

या उदाहरणावरुन या जुळ्यांचे भविष्य बर्‍यापैकी सारखे ठरले याला समान कुंडली (पक्षी- त्यावेळची ग्रहस्थिती सारखी होती) हे कारण अजुनही सिद्ध होत नाही. कुंडलीपेक्षा ज्या वातावरणात वाढले त्यातील समानता, एकमेकांवरील प्रभाव ही कारणे जास्त योग्य वाटतील. याउलट त्याच वेळी जन्मलेल्या इतर मुलांच्या भविष्यातील समानता दाखवता येईल का ?? तरच हे सिद्ध होउ शकेल . त्यातही consistency हवीच.. जी जुळ्यांच्या उदाहरणात देखिल नाहिये.. कारण जीवनात समानता नसणारी कित्येक जुळ्यांची उदाहरणे पहायला मिळतात..

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2014 - 12:32 pm | श्रीगुरुजी

>>> या उदाहरणावरुन या जुळ्यांचे भविष्य बर्‍यापैकी सारखे ठरले याला समान कुंडली (पक्षी- त्यावेळची ग्रहस्थिती सारखी होती) हे कारण अजुनही सिद्ध होत नाही. कुंडलीपेक्षा ज्या वातावरणात वाढले त्यातील समानता, एकमेकांवरील प्रभाव ही कारणे जास्त योग्य वाटतील. याउलट त्याच वेळी जन्मलेल्या इतर मुलांच्या भविष्यातील समानता दाखवता येईल का ?? तरच हे सिद्ध होउ शकेल . त्यातही consistency हवीच.. जी जुळ्यांच्या उदाहरणात देखिल नाहिये.. कारण जीवनात समानता नसणारी कित्येक जुळ्यांची उदाहरणे पहायला मिळतात..

याकडे बघण्याचे पूर्णपणे परस्परविरोधी दृष्टिकोन असू शकतात. माझ्या दृष्टीने या जुळ्या मुलांची आयुष्ये म्हणजे एकाच स्थानकातून एकाचे वेळी सुटलेल्या व एकाच दिशेने व एकाच गतीने जाणार्‍या दोन शेजारच्या रुळांवरील गाड्या आहेत. दोघांचीही आतापर्यंतची आयुष्ये जवळपास एकसमान घटनांनी भरलेली आहेत. हा योगायोग आहे असाही काही जणांचा दृष्टीकोन असू शकेल. पण एकाच घरातील जुळ्या नसलेल्या भावंडांची आयुष्ये समान वातावरणात वाढून सुद्धा पूर्णपणे भिन्न असलेली अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत. त्यामुळे एकाच घरात जन्मलेली जुळी मुले व जुळी नसलेली मुले यांची तुलना केली तर जुळ्या मुलांचे आयुष्य बरेचसे एकसारखे दिसते पण जुळ्या नसलेल्या मुलांची आयुष्ये बरीचशी भिन्न असतात असा निष्कर्ष काढता येईल व त्यासाठी ग्रहस्थिती कारणीभूत आहे असेही म्हणता येईल. (जुळ्या मुलांचे अजून एक उदाहरण म्हणजे पोलिसदलात उच्च पदावर गेलेले जुळे अवस्थी बंधू).

मी दिलेल्या दुसर्‍या उदाहरणात दोन भिन्न कुटुंबात एकाच दिवशी एकाच शहरात जन्मलेला दोन महिलांची माहिती दिली आहे. त्यांची प्रत्यक्ष जन्मवेळ मला माहीती नाही परंतु जन्मदिवस एकच आहे. त्यांच्याही आयुष्यात बराचसा सारखेपणा दिसलेला आहे.

बाळ सप्रे's picture

7 Mar 2014 - 12:39 pm | बाळ सप्रे

हा योगायोग आहे असाही काही जणांचा दृष्टीकोन असू शकेल

जेव्हा एकाच वेळी जन्मलेल्या अनेक मुलांचे भविष्य सारखे दाखवता येईल तेव्हा तो नियम ठरेल .. तिथपर्यंत तो योगायोगच !!

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2014 - 12:53 pm | श्रीगुरुजी

माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे. त्यावरून हे मी नक्की सांगू शकतो की ग्रहस्थितीचा जीवनावर नक्कीच परीणाम होतो. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्यानुसार त्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये दिसून येतात व ती रास त्या व्यक्तीची जन्मरास समजली जाते.

उदा. जन्माच्या वेळी मिथुन राशीत चंद्र असेल तर ती व्यक्ती मिथुन राशीची असते. मिथुन राशीच्या व्यक्ती बोलण्यात अतिशय चतुर, बोलक्या व अत्यंत धारदार, जिव्हारी लागेल अशा बोलणार्‍या असतात. कन्या रास असणारे बहुतेक नास्तिक आढळतात तर मीन व कर्क राशीच्या व्यक्ती अत्यंत श्रद्धाळू, देवभोळ्या अशा असतात. वृषभ व तूळ या दोन्ही रसिक राशी, पण वृषभ हे शृंगारिक रसिक असतात व तूळवाले कलाप्रेमी असतात. कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावावरून त्या व्यत्कीची जन्मरास ओळखता येते तसेच कोणत्याही व्यक्तीच्या राशीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव समजतो.

या अगदी प्राथमिक गोष्टी झाल्या. याचा काय उपयोग आहे? जन्मवेळच्या ग्रहस्तिथीचा व नंतर तत्कालीन ग्रहस्थितीचा आयुष्यावर नक्कीच प्रभाव पडतो व त्यानुसार आपली दिशा ठरवायला मदत होते.

उदा. पोलिस इन्स्पेक्टर हा कधीही मीन/कर्क अशा मृदु स्वभावाच्या राशींचा नसावा. त्यासाठी मेष, मकर अशा राशींच्या कर्तव्यकठोर व धाडसी व्यक्तीच योग्य ठरतात. मिथुन राशीच्या व्यक्तींशी वाद घालण्याच्या भानगडीत पडू नये.

मी पूर्वी एक हलकाफुलका लेख लिहिला होता. वेळ असल्यास जरूर वाचावा.

http://www.misalpav.com/node/24104

ही राशीनुसार स्वभाववैशिष्ट्ये ही हलकाफुलका लेख वाचण्यापुरतीच ठीक असतात. :-)
त्याहुन जास्त त्यात तथ्य नसते !!

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2014 - 10:48 pm | श्रीगुरुजी

:smile:

घाटपांडे काकांच्या ब्लोग वर हसताय होय. मग ठीक आहे.

तुम्हाला घडणार्‍ञा गोष्टी मनासारख्या वाटत नसल्याप्रमाने का उत्तरे लिहताय ?

अहो नाहीच वाटत मला घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या. तुम्हाला प्रतिसाद समजलं नसेल तर सोडून द्या. ज्याला उद्देशून लिहिलंय त्याला समजलं ना मग बास

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2014 - 5:32 pm | अत्रुप्त आत्मा

@घाटपांडे काकांच्या ब्लोग वर हसताय होय. मग ठीक आहे. >>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र..........म्हशी, वाचायला'च येत नाही होय अजुन? मग र्‍हायलं! :p

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 7:28 pm | आत्मशून्य

अहो नाहीच वाटत मला घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या.

जरा नामस्मरण वाढवा मग!

चौकटराजा's picture

6 Mar 2014 - 8:22 pm | चौकटराजा

पूर्वीच्या काळी लोकाना आजच्या सारखे बरेच उद्योग वगैरे काही नसत. वीजेचा शोध लागलेला नव्हता. रात्री टीव्ही बघण्याची सिनेमाच्या तिसर्‍या शो ची काही सोय नव्हती. तीन पाळ्यात काम कारणारे कारखाने ही नव्हते. आजच्या सारखी सामान्य लोकात बर्यापैकी देखील सुबत्ता नव्हती. मग माणसाने एक करमणूक शोधून काढली.रात्री आकाशात तासंतास डोळे लावून पहात रहायचे. त्यात बदल काय होतात हे समजून घ्यायचे. विज्ञानातील प्रगति यथातथाच असल्याने मानवी जीवनात घडणार्‍या अनेक घटनांचा अर्थ लावता येत नसे. सबब एका बाजूला आपले जीवन कसे घडत असेल या मागे पृथेवीवरील घटकांखेरीज काही घटक बद्ल घडवून आणत असतील काय अशा उत्सुकतेपायी आकाशातील हालचाल व आपले नशीब यांचा संबंध आहे असा ग्रह मानवाने करून घेतला. मग जलद हालचाल कोण करतो तर चंद्र .
म्हणून चंद्राला रास ठरवण्यात महत्व प्राप्त झाले. कारण त्याची हालचाल जास्तीत जास्त कॉम्बेनेशन निर्माण करू शकते.
मग कोण लुकलुकतात कोण नाही यावरून ग्रह व तारे, तसेच कधीतरी उगवणारे धूमकेतू यांचा प्रवेश या कोम्बीनेशन मधे झाला. हळू चालणारा शनि , वर आकाशात कधीही न येणारे बुध व शुक्र व बाकीचे असा फरक समजून आला. मग आणखी निरूद्योगी लोकानी युती, प्रतियुती, दशा महादशा असल्या गोष्टी घुसडवून हे शास्त्र जीवनाइतकेच अतर्क्य करून
टाकले. तार्‍याना या तथाकथित शास्त्रात काहीही महत्व नाही कारण त्यांचे अचलत्व.बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने तारकाना महत्व मिळणे शक्य नव्हते. मग त्यांचा उपयोग फक्त एखाद्या नाटकात मागचा पडदा असतो त्याप्रमाणे नक्षत्रांच्या आकृती ग्रह्स्थानांच्या संदर्भासाठी झाला.

आज जगातील एकूण लोकसंख्येचा विचार केला तर अस्तिकांची व जोतिष शास्त्रावर विश्वास न ठेवणार्‍यांची संख्या जास्त आहे. नस्तिकांचा या शास्त्रावर अबलंब जवळ जवळ शून्य असतो. पण देव मानणारे देखील फालतू कारणासाठी पूर्वीसारखे पंचांग हातात घेऊन आज काय आमावास्या आहे का शनिवार आहे का वाईट दिवस आहे का, खरेदी करू का असे काही पहात बसत नाही. एकच प्रयोग करून पाहाण्यासारखा आहे. गुरूपुष्यामृत नसतानाही सोने स्वस्त करून पहा खरेदी होते की नाही ते.