भयकारक भानगड

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in भटकंती
1 Mar 2014 - 2:01 pm

माझा भुताखेतांवर किती विश्वास आहे, हे मलाच माहिती नाही. भुतासारखी अक्राळविक्राळ माणसे बरीच भेटली. त्यांना सहन केल्यामुळे कदाचित भीती थोडी कमीही झाली असेल. पण खरे सांगायचे तर, अतींद्रिय शक्ती या विषयावर माझे मत अजून तयार व्हायचे आहे. अर्थात भुताटकी म्हटले की कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला आकर्षण वाटतेच. कदाचित त्यामुळेच राजस्थानमधील "झपाटलेला" भानगड किल्ला पाहायची सुप्त इच्छा फार दिवसांपासून होती.

आंतरजालावर भानगडबद्दल अनेक चर्चा होत असतात. 'सनसनी' टाईपचे टीव्ही शो सुद्धा इथे कॅमेरे घेऊन येऊन गेलेले आहेत. दिव्य आंतरजालीय प्रथेनुसार दोन्ही बाजूंचे प्रवक्ते (भूत आहे / भूत नाही) हमरीतुमरीवर येऊन भांडतात.

भानगड हा दौसा शहरापासून २५ कि.मी. वर आहे. जयपूर-आग्रा महामार्गावरून आत वळावे लागते. कुठेही दिशादर्शक पाटी नसल्यामुळे योग्य रस्ता शोधणे हीदेखील एक भानगडच होऊन बसते.
Route to Bhangarh fort

आम्हाला निघायला थोडा (बराच!) उशीर झाल्यामुळे किल्ल्याच्या दरवाजाशी पोचेपर्यंत जवळजवळ सहा वाजले. पुरातत्व खात्याच्या पहारेदाराला त्यामुळे थोडा वैताग-कम-राग आल्यासारखा वाटला. "लवकर आटपा" अशी सूचनावजा धमकी देत त्याने आम्हाला आत जाऊ दिले. किल्ला साडेसहा वाजता बंद होत असल्यामुळे आमच्या हातात एक तासाहून कमी वेळ होता.

Bhangarh 2

भानगड या नावाची कीर्ती काहीही असली, तरी पुरातत्व खात्याने लावलेल्या फलकांवर मात्र भूत, प्रेत, आत्मा, सैतान या सर्वांचा उल्लेख पूर्णपणे टाळलेला आहे, हे पाहून थोडे हसू आले.

Bhangarh 1

किल्ल्यात शिरताच एका गोष्टीची मात्र पुरेपूर खात्री झाली: जर भुतेखेते खरेच असली तर त्यांना भानगडसारखी दुसरी जागा शोधून सापडणार नाही. एकदम प्राईम प्रॉपर्टी! स्विश अ‍ॅड्रेस! म्हणजे काय, की "भुताळी किल्ला" हे शब्द उच्चारताच जे चित्र डोळ्यासमोर येते, ते भानगडच्या रूपाने हुबेहूब प्रकट झाले आहे की काय असे वाटावे. याची कारणे खालीलप्रमाणे:

१. किल्ला जरी भुईकोट असला, तरी त्याच्या तिन्ही बाजूंनी कराल कडे उंच उठलेले आहेत. शिखरांच्या पलीकडे सरिस्का व्याघ्र अभयारण्य पसरलेले आहे. त्यामुळे त्याबाजूने यायला रस्ता नाही.

२. किल्ला जवळच्या गावापासून मैलभर दूर आहे. आसपास घरे, दुकाने, रस्ते असे काहीही नाही. केवळ निबिड जंगल आहे.

३. आडबाजूला असल्याकारणाने पर्यटकही कमी असतात.

४. माकडे आणि मोर मुबल़क संख्येने आढळतात. माणसांची त्यांना फारशी भीती वाटताना दिसत नाही.

Bhangarh 3

५. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किल्ला बराचसा सुस्थितीत आहे. आत तीन मंदिरे, एक तलाव आणि एक उंच बालेकिल्ला आहे.

Bhangarh 4

Bhangarh 5

या बालेकिल्ल्याचा समोरचा भागात पूर्वी तुरुंग होता. त्याच्या कोठड्यांचे दरवाजे एखादा विक्राळ जबडा उघडल्यासारखे भासतात.

Bhangarh 6

काही भागाची मात्र पडझड झालेली आहे.

Bhangarh 7

Bhangarh 8

किल्ल्याच्या भिंतींजवळ रान माजलेले आहे. भानगड हे एक संरक्षित स्मारक असले, तरी कोणत्याही बाजूने उडी मारून आत प्रवेश करणे कठीण नाही.

Bhangarh 9

किल्ल्यात एक लांबच लांब बाजारपेठ आहे. यामधील एकूण एक दुकानांची छपरे उडालेली आहेत. असे म्हणतात की प्राचीन शापाच्या प्रभावामुळे नवे छप्पर टाकले तरी ते टिकत नाही.

Bhangarh 10

Bhangarh 11

किल्ल्याबद्दल अनेक वदंता प्रचलित आहेत. त्यामध्ये राजे, राजकुमारी, साधू, वासंनांध जादूगार, काळी जादू, रक्तपात, कत्तली, युद्धे, दगाबाजी अशा सुरस, चमत्कारिक गोष्टींची रेलचेल आहे. (इच्छुकांनी विकिपीडिया पहावा).

भुताखेतांची खिल्ली उडवणारे बेडर कंपूदेखील मागे नाहीत. त्यांनीही या कथा खोडून काढलेल्या आहेत (इच्छुकांनी गूगल करून पहावे).

एका उंच कड्यावर, दूर, एकाकी अशी एक राजस्थानी छत्री उभी आहे. असे म्हणतात की शापवाणी उच्चारणारा तो सैतानी जादूगार इथे बसत असे.

Bhangarh 12

किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ एक नवीन हनुमान मंदिर आहे.त्याचा पुजारी भुताखेतांची कल्पना उडवून लावतो. "माणसापेक्षा भयंकर भूत दुसरे नसतेच," हा त्याचा दावा आहे.

पण रात्री तो देवळाला कुलूप ठोकून झोपायला घरी जातो!

असा हा भानगड. आता मला जर विचाराल की "बाबा, एक रात्र या किल्ल्यात राहून दाखवशील का?", तर उत्तर द्यायला जरा कठीण जाईल.

आहेत का कुणी बहाद्दर?

Bhangarh 13

******

हे ब्लॉग पोस्ट इंग्रजीमध्ये थोड्या वेगळ्या स्वरूपात इथे वाचायला मिळेल.

भानगडः

जयपूरपासून साधारणपणे ९० कि.मी. (सकाळी निघून संध्याकाळी परत येता येते)
जवळचे शहर/ रेल्वेस्थानकः दौसा.
रस्त्याची परिस्थिती: जयपूर ते दौसा उत्तम चारपदरी महामार्ग. दौसानंतर साधा राज्यमार्ग.
जवळपास इतर पाहण्याजोगे: सरिस्का अभयारण्य, आभानेरी विहीर, अजबगड किल्ला.

प्रतिक्रिया

पहिला हा धागा भटकंतीत चुकुन आला की काय वाटल.
पण नाही. ही भटकंतीच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2014 - 3:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिर्षकातली भानगड भटकंतीसंबद्धी आहे हे वाचून आनंद झाला. पण काहितरी चटपटीट वाचायला मिळेल असे वाटले होते म्हणून थोडा भमनिरासही झाला ;)

सुहास झेले's picture

1 Mar 2014 - 4:26 pm | सुहास झेले

आहेत का कुणी बहाद्दर?

चला एक कट्टा करू इथे...हा का ना का. कॉलिंग कट्टाश्री :) ;-)

मुक्त विहारि's picture

3 Mar 2014 - 9:32 pm | मुक्त विहारि

जरूर करु या.

एखादी मस्त १८/२० दिवसांची फक्त राजस्थान टूर आखू या.

पण ह्या अशा टूरला वल्ली आणि बॅट्मॅन हवेतच.

आतिवास's picture

1 Mar 2014 - 4:41 pm | आतिवास

नवीन 'भानगड' कळली! जायला पाहिजे इथं एकदा.

भानगडच्या जवळ अजबगड पण दिसतोय ! जायला पाहिजे !

रमेश आठवले's picture

1 Mar 2014 - 6:01 pm | रमेश आठवले

उत्कृष्ट वर्णन आणि छायाचित्रे पाहून चलत मुसाफिर या गाण्याची पुढची ओळ आठवली -मन मोह लिया रे -----

चलत मुसाफिर's picture

4 Mar 2014 - 9:57 am | चलत मुसाफिर

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

जेपी's picture

1 Mar 2014 - 6:14 pm | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :clapping:

मृगजळाचे बांधकाम's picture

1 Mar 2014 - 7:34 pm | मृगजळाचे बांधकाम

आग बाब्वो,दिवसा धवल्या झपाटेल माणूस इथे

पण उगाच चंद्रकांता सिरीअलची आठवण मात्र झाली. त्याचे टायटल साँग माझे फेवरीट गाणे आहे.

सौंदाळा's picture

3 Mar 2014 - 8:19 pm | सौंदाळा

मस्त माहिती आणि फोटो.
अशा अजुन काही जागा माहित असतील तर येऊ द्यात अजुन

चलत मुसाफिर's picture

4 Mar 2014 - 9:56 am | चलत मुसाफिर

धन्यवाद. माझ्या प्रवासविषयक (इंग्रजी) ब्लॉगवर अन्य लेखन वाचू शकता. प्रतिक्रियांचे स्वागतच आहे.

चित्रगुप्त's picture

3 Mar 2014 - 9:02 pm | चित्रगुप्त

भानगढ वर लेख आणि फोटो बघून आनंद वाटला.
ही जागा मी काही वर्षांपूर्वी मुद्दाम जाऊन बघितलेली आहे. फोटो हुडकून टाकेन. प्राचिनत्वाच्या प्रेमींना आवडण्यासारखी जागा आहे.

कवितानागेश's picture

3 Mar 2014 - 10:43 pm | कवितानागेश

मस्त जागा आहे. खरं तर सगळ्याच किल्ल्यांबाबत अश्या भूताच्या अफवा पसरवून ठेवायच्या.
जो कुणी इथल्या भिंतीवर नाव लिहेल, त्याच्या घरी इथलं भूत येइल कायमचं रहायला!! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2014 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

@असा हा भानगड. आता मला जर विचाराल की "बाबा, एक रात्र या किल्ल्यात राहून दाखवशील का?", तर उत्तर द्यायला जरा कठीण जाईल.

आहेत का कुणी बहाद्दर?>>>हो म्हणालो असतो,
पण आमच्या किल्ल्यात आंम्हीच काय रहायचे अजून? http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

सुहास झेले's picture

3 Mar 2014 - 10:53 pm | सुहास झेले

बुवा, चला की जाऊ सगळे स्पेशल २६ घेऊन आणि रात्रीचा मुक्काम करू इथे ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2014 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

@रात्रीचा मुक्काम करू इथे >>> ह्ही ह्हा ह्हा हहा ह्हा...!!! http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif हम तैय्यार है! =))

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 Mar 2014 - 11:34 pm | भ ट क्या खे ड वा ला

आमच्या कोकणात भुते चिक्कार, त्यात घुंगराची काठी वाजवत जाणारे भूत फारच फेमस
एकदा नातूवाडी धरणाच्या परिसरातील भुताला भेटण्याचा प्रयत्न केला होता ,पण त्या रात्री काठी काही वाजली नाही. द मा मिरासदार यांची भुताचा जन्म हि कथा आठवली.

पैसा's picture

10 Mar 2014 - 2:49 pm | पैसा

एका नवीनच किल्ल्याची माहिती मिळाली! याला भानगड नाव देणारा मराठी होता की काय?! ;)

चलत मुसाफिर's picture

11 Mar 2014 - 8:01 pm | चलत मुसाफिर

हे नाव बहुधा "भान सिंग"पासून आले आहे. मराठी "भानगडी"शी संबंध नाही (नसावा!)

भानगड वाचून प्रश्न पडला. ;)

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2014 - 6:29 pm | प्रसाद गोडबोले

भुतंखेतं असतात हे १००% सत्य आहे ...अहो मला स्वतःलच चेटुक आणि वेताळ वश आहेत ते सांगत असतात एकसे एक किस्से (आता मी लोकांना सांगुन थकलो पण कोणी विश्वास ठेवायला तयारच होत नाही ) ...

आणि हा भानगड सुप्रसिध्द आहेच आहे ! पुढे मागे कधी तरी योग नक्की येईल . :)

अमोल मेंढे's picture

11 Mar 2014 - 12:17 pm | अमोल मेंढे

तुमची स्वाक्षरी

भगवान बुध्द हे श्रीविष्णुंचे नववे अवतार होते !

पटली नाही

प्रसाद गोडबोले's picture

12 Mar 2014 - 12:00 am | प्रसाद गोडबोले

बरं .

सुखी रहा :)

प्यारे१'s picture

10 Mar 2014 - 6:54 pm | प्यारे१

भारीच्च!
भानगड हा शब्द ह्या गडापासून आला आहे का?

भानगडीला भिडायची इच्छा आहे.. तेव्हा होऊ दे खर्च.. :)

वाह!! हपिसात असताना फटू दिसले नव्हते, आता दिसले. जबरी प्रकरण दिसतंय!!!!!!

अन नावातला श्लेष तर लैच आवडला. भारीच!!

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 7:06 am | चलत मुसाफिर

श्लेष अभावित होता. आणि उघडही. *smile*