श्रीनगर ट्रीप बाबत सल्ला हवा आहे ..

आरोही's picture
आरोही in भटकंती
24 Feb 2014 - 11:05 pm

सर्व मिपाकर उत्साहाने मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे ...

पुढील महिन्यात आम्ही पती पत्नी आणि माझा मुलगा वय ३ वर्षे , श्रीनगर ट्रीप ला जात आहोत तर सोबत अजून चार कुटुंबे आहेत त्यात ३ मुले पाच वर्षाच्या आतील आहेत.
मला हे विचारायचे होते कि खासकरून गुलमर्ग ,सोनमर्ग,पहलगाम या ठिकाणी जाताना मुलांच्या सोयीसाठी कोणत्या वस्तू सोबत घ्याव्यात ... आणि कुणी जाऊन आल्या असतील तेथे तर कोणत्या गोष्टी कराव्यात किवा करू नयेत याची हि कृपया महिती द्यावी...
आम्ही ६ दिवसांसाठी जात आहोत ..
आणि अजून एक विमानात पहिल्यांदाच जात असल्याने काय काळजी घ्यावी मुलांची ??
आणि मुलांसाठी काही पदार्थ करून नेऊ शकते का??कोणते??आणि विमानात ते नेता येतात काय ??? +)

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 11:26 pm | आत्मशून्य

.

सुबोध खरे's picture

25 Feb 2014 - 11:38 am | सुबोध खरे

काश्मी र मध्ये सुरक्षितता आणि लहान मुले इ इ चा विचार केल्यास केसरी टूर बरोबर जावे असा सल्ला आहे. तेथे त्यांची सर्व स्थानिक माणसे "बांधलेली" आहेत त्यामुळे दंगल इ स्थितीत त्यांच्या गाड्यांना वा पर्यटकांना खास "वेगळी" वर्तणूक मिळते. साधारण २५-३० टक्के महाग पडेल पण कोणताही त्रास न होता आपली ट्रीप पार पडेल. ( हि शिफारस फक्त काश्मीर सहली साठी आहे)

सहमत. आम्ही सचिनतर्फे गेले होतो त्यांचेही तिथे चांगले नेटवर्क होते.

आदूबाळ's picture

25 Feb 2014 - 12:01 pm | आदूबाळ

फोटो टाका नक्की.

श्रीनगर विमानतळावर अत्यंत कसून तपासणी होते, हँड बॅगेतील सर्व सामान, कॅमेरा वगैरे सर्व दाखवावे लागते तेह्वा सुटसुटीत सामान बाळगा. काढा घालायला सोपे पडेल.

पुतळाचैतन्याचा's picture

25 Feb 2014 - 12:37 pm | पुतळाचैतन्याचा

गुल्मर्ग गोन्दोल चे तिकित ओनलायिन घेउन जा...स्तेज-२ ला ओन्लायिन तिकित नसेल तर सोडत नाहित...बाकि केसरि ने जा हे मात्र १००% "खरे" आहे..होउ दे खर्च...!!!

चौकटराजा's picture

25 Feb 2014 - 6:16 pm | चौकटराजा

आपल्यासारखे जेवण ही तुमची मजबूरी असेल तर राजबाग परिसरात हॉटेल " शहा" येथील रेस्ट्रोमधे गुजराथी थाळी मिळेत.
झिरो ब्रीज पार करून गेले की झेलमच्या पलिकडील तीरावर हा परिसर आहे. वैश्णवी ढाबा प्रकारचे जेवण चालत असेल तर
दल लेक चा काठ.

अगदी उपयुक्त अशी माहिती दिली आहे सर्वांनी त्याबद्दल आभार ..अजून कुणास काही माहिती असल्यास
कृपया मदत करावी ....+)

प्रसाद१९७१'s picture

26 Feb 2014 - 4:38 pm | प्रसाद१९७१

पाकीस्तान चा VISA काढायला विसरू नका !!!

उगा धाग्याचे काश्मीर करू नका =))

बाकी पाकिस्तानचा व्हिसा मिळाला तर मलाही पाहिजे आहे. एकदा जाऊन बघूनच येतो भेंडी आहे काय प्रकार ते. लाहोर, अटक अन पेशावर बघू दिली तरी बास झाले खरे तर.

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Feb 2014 - 8:12 pm | लॉरी टांगटूंगकर

शिरेश हाय का? मला पण यायचं आहे.

प्रतिभा रानडे यांची एक दोन पुस्तकं मध्ये वाचनात आली होती. त्या मुंबईच्या आहेत आणि त्यांच्या पाकिस्तानात एकापेक्षा जास्त चकरा झालेल्या आहेत.

येस, शिरेसलीच म्हणतोय. एकदा जाऊन यायची इच्छा आहे, पण साला ते प्रकर्ण इतके सरळ नाही असे ऐकलेय. पाहू काय होते ते.

काळा पहाड's picture

6 Feb 2015 - 1:11 am | काळा पहाड

वर्ष होत आलं की. कधीचा प्लान ठरतोय म्हणे तुमचा?

अत्रन्गि पाउस's picture

6 Feb 2015 - 8:46 am | अत्रन्गि पाउस

मला लाहोर, कराची, पेशावर इथे जायचय...

प्रभाकर पेठकर's picture

6 Feb 2015 - 2:10 am | प्रभाकर पेठकर

श्रीनगरात हाऊसबोटीत न राहता जमिनीवरच्या हॉटेलात राहा.

गुलमर्ग आणि सोनमर्ग ह्या दोन्ही ठिकाणांना भेट देण्यात फायदा नसतो. दोन्ही ठिकाणे निसर्गदृष्यांच्या संदर्भात सारखीच आहेत. ( हे एका काश्मिरी मित्राने सांगितले आहे) पैकी सोनमर्गला गेलात तर खिलनमर्गला जाता येईल. सोनमर्ग खिलनमर्ग डोंगरातला आणि घोड्याच्या पाठीवर बसून करायचा प्रवास आहे. घोडेवाला बरोबर असतो आणि तोच घोड्याची ओठाळी (बरोबर आहे नं शब्द) धरून तुम्हाला खिलनमर्गला नेतो. वाटेवर अर्ध्या अंतरावर एक धाबा येतो तेथे आलूपराठा आणि राजमा अप्रतिम मिळतो. जरा उपाशी पोटी जा. अत्यंत सुखदायी अनुभव आहे.

खिलनमर्गला बर्फावरून स्लेजच्या आधारे घसरत येण्यात थ्रील आहे. गुलमर्गला गेलात तर फक्त गुलमर्ग आणि परत श्रीनगर. सोनमर्गला गेलात तर सोनमर्ग - खिलनमर्ग व्हाया आलूपराठा-राजमा धाबा हा अनुभव राजस आहे.

बाकी सुरक्षेच्या बाबतीत मी गेलो तेंव्हाची आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. तेंव्हा वरील सल्ल्यांचा विचार करावा.

पहेलगामला जरूर जा. टॅक्सीने जाणार असाल तर आधीच (श्रीनगरच्या) हॉटेलच्या मॅनेजरला विचारून भाव ठरवून घ्या. अर्ध्यावाटेत ड्रायव्हर मार्ग बदलण्याबद्दल विचारणा करेल (कारण तो शिफारीश करणारा रस्ता अधिक निसर्गसौंदर्याने नटलेला आहे असे कारण तो देतो) पण त्याच्या शिफारशीला टाळून तुमच्या ठरलेल्या मार्गानेच जा.