कॉस्ट कटिंग

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
16 Feb 2014 - 9:59 am
गाभा: 

कॉस्ट कटिंग हा एक परवलीचा शब्द झालाय सगळीकडे. अनावश्यक खर्च कमी करावेत हे खरंच आणि अनुत्पादक खर्च कमी = नफ्यात वाढ हा ढोबळ अर्थ मला मान्य आहे. पण त्याचा सरसकट वापर आणि मूर्ख अंमलबजावणी वर चर्चा हा ह्या धाग्याचा उद्देश.
(सगळ्यात महत्वाचे : हे सगळे जेव्हा भारतीय लोकं भारतीय लोकांसाठी करतात तेव्हा हि पार्श्वभूमी)

तथापि कॉस्ट कटिंग at what cost असा एक प्रश्न आहे ..
उदा :
१. अत्युच्च पदावरील अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे प्रवास करणे / राहणे आपले हे सोडून रिक्षा तून प्रवास सुमार दर्जाच्या एयर लाईन्स मधून जाणे ते हि एकोनोमीने ...फालतू ठिकाणी वास्तव्य करून आपल्या उत्पादक वेळेचा दर्जा घसरवणे असे होत नही का?
२. एका विशिष्ट वेळी कार्यालयातील दिवे मालविणे / ए सी बंद करणे (भलेही लोकं काम करतातच आहेत)ह्यातील असंवेदनशीलता
३. चहा /कॉफी वगैरे (आधीच असलेल्या) क्षुल्लक खर्चात (आणखीन आणखीन) कमीत कमी किमतीचा माल वापरून नगण्य बचत करणे
३. साध्या टिश्यू पेपर वर नियंत्रणे आणणे
४. हौसिंग कोलोनिंमध्ये आवारातल्या दिव्यांची संख्याच कमी करणे आणि असलेल्या दिव्यांना 'मिणमिण' पातळीवर नेणे.किंवा सामान्य दर्जाचे सुरक्षा रक्षक फक्त कमी पगाराच मिळतात म्हणून ठेवणे..
५. कुठल्याही खर्चा बाबत फक्त आणि फक्त 'कमी' खर्च / किंमत हाच निकष ठेवणे.
६. उत्तम प्रतीच्या गाड्या उन्हाळ्यातही काचा खाली करून ए सी नं लावता चालविणे

म्हणजे एखादी युक्ती (उदा: वीज खर्च कमी करायचा तर दिवे मालाव्न्या पेक्षा सेन्सर्स लावणे)वापरून बचत हा मार्ग नं विचारात घेता (ह्यात एखादा 'नवीन खर्च'असेल तर अब्रम्हण्यम ..) आहे तेच कमी करणे हि मनोवृत्ती..

एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात येते तेव्हा तिची किंमत चुकती करून मग तिचा वापर करणे, तिच्या देखभालीवर खर्च करून ती उत्तम प्रकारे मेंटेन करने हि आपली मानसिकता दिसत नही.

म्हणजे एक वेळ जीवनमानाचा दर्जा कमी झाला तरी चालेल पण अधिकार आले कि 'खर्च' कमी करा हि वृत्ती..मला वाटते कुठल्याही मुलभूत सुविधा/ संशोधन / उदात्त भव्य सुंदर गोष्टींना आपल्या आयुष्यात मिळत असलेले कमी कमी महत्व ह्या पाठीमागे हे चुकीचे कॉस्ट कटिंग तत्वज्ञान हातभार लावते आहे..

विकसित समाजांमध्ये कॉस्ट कटिंग होतेच पण म्हणून जीवनमान कायमचे घसरवले जात नही..किंवा ते तसे घसरले तरी पुन्हा पूर्व पदावर ते आणले पाहिजे अशी मानसिकता असते...

जाता जाता :
ऋणं कृत्वा घृतं पिबेत ह्याचे समर्थन नाहीये किंवा लक्ष्मीच्या किळसवाण्या प्रदर्शनाचा निषेधचं आहे....

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

16 Feb 2014 - 10:11 am | खटपट्या

हम्म्म्म !!!

वेल्लाभट's picture

16 Feb 2014 - 10:18 am | वेल्लाभट

जाम मोठा आणि त्रास देणारा विषय आहे.... असो. बरोबर उदाहरणं आहेत.

आमच्या कार्यालयात मध्यंतरी कोण किती चहा पितं याची नोंद करायला पिऊन ला सांगण्यात आलं होतं. मग तुम्ही मशीनजवळ गेलात की तो असा लपून वहीत नोंद करायचा डिटेक्टिव्हसारखी. हे जेंव्हा कळलं, तेंव्हा म्हटलं.. कठीण आहे.... हे असं चोर असल्यासारखं बघणार तुमचा माणूस आमच्याकडे.... नको तुमचा चहा ******. मग खालच्या टपरीवर जाऊन प्यायला लागलो.

अनेक उदाहरणं. ऐकलेली वाचलेली अनुभवलेली. जौदे.

प्यारे१'s picture

16 Feb 2014 - 12:41 pm | प्यारे१

तुमचा चहा पिऊन झाला की पिऊन नोंद करायचा. चान चान!

कॉस्ट कटिंग साठी असले उपाय करण्यापेक्षा ऑफिसमधे एलईडी लाईट्स बसवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, LEED सर्टिफिकेशन करून घेणे असंही करू शकतात.. अशी बरीच ऑफिसेस आहेत जी प्लॅटिनम / गोल्ड सर्टिफाईड आहेत.. ज्यांच्यात सुर्यप्रकाशाचा भरपूर वापर, बांधकाम साहित्य, फर्निचर इ. पर्यावरणपूरक आहेत.
कॅपिटल इन्व्हेस्ट्मेंट जास्त आहे पण त्याचा पेबॅक पिरिअड पाहता असे उपाय करणे अवघड नाही.. कॉस्ट कटिंगसाठी एम्प्लॉयी कपात करणे हा उपाय पटत नाही.. कालच माझ्या घरमालकाला घरी बसा म्हणून सांगण्यात आलं.. ऑफिसमधे गेला अन दोनच तासात तीन महिन्यांचा बेसीक पगार देउन घरी पाठवलं..

ह भ प's picture

16 Feb 2014 - 1:58 pm | ह भ प

समजा एका कंपनीत जगभरात ५ लाख लोक काम करतात ते रोज ३ वेळा चहा पितात.. एका चहाची किंमत १० रुपये समजू.. दिवसाचा खर्च ३० रू... महिन्याचा ७५० रू.. असा सगळंचा सगळ्यांचा वर्षाचा खर्च..?? ४५,०००,०००,००.. चहाच्या मागे असंही गणित असेल..

कंपन्या फायद्यासाठीच अस्तित्वात असतात!
जरा आपण Employer च्या बाजुने विचार करून पहावा व सर्व गोष्टी अपोआप clear होतील.
आजचे हे ताजे उदाहरण पहा : आयबीएम’ कंपनीत १५ हजार कर्मचा-यांवर बेकारीची कु-हाड (साभार: प्रहार)
त्यांचीही काही मजबुरी असेलच, कोणीही Employer विनाकारण कुठल्याही employee ला त्रास देत नाही.

तुमची बाजू: तुम्हाला जर याची चीड येत असेल, तर आपण स्वत:ची कंपनी काढायला मोकळे आहातच की.
"खुद को कर बुलंद इतना कि खुदा खुद आके तुमसे पुछे कि बता तेरी रज़ा क्या है|"

अजून एक महत्वाचा विचार: Every Bad Boss/Employer is good for the Economy!
पहा हा विचार पटतो का ते?

वेल्लाभट's picture

16 Feb 2014 - 3:09 pm | वेल्लाभट

ही गोष्ट क्लियर नाही होत, की दोन तासाच्या फुटकळ मीटिंग साठी फाइव्ह स्टार ला दोन लाख रुपये का मोजते कंपनी, जर एका इमेल मधे काम होऊ शकतं तर? व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या इक्विपमेंट्स ना उगाच्च्च्च मेंटेनन्स देऊन एखादं बिजनेस प्रपोजल डिस्कस करायला अमेरिकेत का जातात केबिनवाली मंडळी? अनेक गोष्टी आहेत ज्या क्लियर नाही होत....

बिजनेस प्रपोजल डिस्कस करायला म्हणजे Order मिळवण्यासाठी जर असेल तर हा खर्च Customer ला Happy करण्यासाठीच असतो.

कंपनीचे अन्नदाते (प्रॉफिट सेंटर) वर जास्तीत जास्त खर्च केला जातो जेणे करून जास्त Orders मिळाव्यात.
तेवढाच कंपनीचे अन्नखाते (कॉस्ट सेंटर) वरचा खर्च कमी करणे हे अपरिहार्य असते.

१२ वर्षापूर्वी हे लक्षात आल्यावर मी services कडून (९ वर्षाच्या अनुभवाअंती) sales कडे वळलो!