A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in राजकारण
14 Feb 2014 - 8:56 pm

केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे.
बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे.
माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोबर भाजपाला पण धुणार.

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

15 Feb 2014 - 2:56 am | आत्मशून्य

हा माणूस मजेशीर आहे... समर्पित आहे. याच्या खेळ्या खरोखर व्यवस्थित पडल्या तर हा झाडु नक्किच स्वच्छता करायला समर्थ वाटतोय. भारतियांना भ्रश्टाचारा रोखायच्या मुद्यावर असे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी राजिनामा देणे हे याआधी अनुभव नसल्याने प्रचंड चक्रावुन सोडणार हे नक्कि...! पण हाच एक चांगला मार्ग आहे कर्तव्यापासुन न ढळण्याचा...! प्रश्न हा आहे की जनता कितपत सुज्ञ आहे ?

आत्मशून्य's picture

15 Feb 2014 - 2:59 am | आत्मशून्य

भाषण वाचत आहोत हे निम्मे भाषण वाचुन झाल्यावर लक्षात येणारी आपली नेतेमंडळी जनतेला का सरकार चालवणे योग्य वाटते देवच जाणॉ!

मारकुटे's picture

15 Feb 2014 - 11:28 am | मारकुटे

सहमत आहे. जनता सुज्ञ आहे. मोदिंपेक्षा केजरीवाल नक्कीच चांगला आहे.

आत्मशून्य's picture

15 Feb 2014 - 8:06 pm | आत्मशून्य

मोदिंपेक्षा केजरीवाल नक्कीच चांगला आहे.

असहमत. एक व्यक्ती म्हणून मोदी केजरीपेक्षा जास्त चांगले आहेत. पण संघटना म्हणुन जे दोष असायला हवेत ते भाजपमधेही आहेत (पण मोदी मात्र तारणहार बनले आहेत). आप मात्र अजुन संघटनात्मक पातळीवरच चाचपडत आहे.

मारकुटे's picture

15 Feb 2014 - 9:19 pm | मारकुटे

राजधर्म न पाळणारा चांगला ? असेल असेल

बंडा मामा's picture

19 Feb 2014 - 7:06 pm | बंडा मामा

जनता सुज्ञ आहे. मोदिंपेक्षा केजरीवाल नक्कीच चांगला आहे.

सगळीच जनता सुज्ञ नसते. मोदींचे भाषण ऐकावे आणि केजरिवाल ऐकावेत. नीरक्षीर करण्याची क्षमता सगळ्यांकडे असतेच असे नाही. पण फेसबुक आणि इंटरनेट्वरचे बरेच वाचाळ सोडल्यास सामान्य जनता मोठ्या प्रमाणात आआपकडे आकर्षीत होत आहे हे निशचित. हे एक प्रकारचे क्राउड सोर्सिंगच आहे. भाजप आणि काँग्रेससारख्या अडगळीतल्या डायनॉसरना हे कळेपर्यंत त्यांचे अस्तित्व संपायला आले असेल. तो पर्यंत चालू दे चाय पे चर्चा...ह्यांचा कचरा उचलायला आआपच आहे.

Chai

इरसाल's picture

21 Feb 2014 - 2:17 pm | इरसाल

पण हा कचरा खरचं पडला आहे असे वाटत नाही.

मारकुटे's picture

15 Feb 2014 - 11:27 am | मारकुटे

चला एक बरे झाले जनतेची सहानुभुती मिळून नरेंद्र मोदी काही सत्तेवर येत नाही. राहुल बाबा आणि त्याची टीम येणार नाही असा अंदाज आहेच. पण ते बरे अशी संघीय चांडाळांची सत्ता येते की काय अशी भिती होती आता ते होणार नाही. एकवेळ अराजक परवडले पण संघीय द्वेषमुलक लोकांचे राज्य नको...

विवेकपटाईत's picture

15 Feb 2014 - 6:35 pm | विवेकपटाईत

संघाचे लोक द्वेष पसरवतात कशावरून??? कुणाला चांडाळ म्हणणे म्हणजे द्वेष पसरवणे नव्हे का? अराजकता म्हणजे काय माहिती तरी आहे का???

मारकुटे's picture

15 Feb 2014 - 9:19 pm | मारकुटे

अराजकता म्हणजे काय माहिती तरी आहे का???
नाही ब्वा ! पण गुजरातेत जशा पद्धतीने मुसलमानांना मारले ते अराजकच होते.

नाही हो.. अहिंसक धरणे, आंदोलन, उपोषण ह्याला अराजक म्हणतात.. दंगली, खळ्ळखट्या़क, लोक्सभेत चाकु, मिर्ची पावडर हे अराजकात मोडत नाहीत..

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2014 - 3:00 am | टवाळ कार्टा

आणि गोध्रा????

विवेकपटाईत's picture

16 Feb 2014 - 11:01 am | विवेकपटाईत

पूर्ण पणे चुकीचे आहे. दंगल मोदिनी घडवलेली नव्हती. गोधरा कांड मुळे दंगल घडली. मोदीने त्वरित दंगली बर काबू केला केवळ गुजरात मधेच अल्पसंख्यकांना वाचविण्या साठी ११० हून जास्त दंगेखोरांना पोलिसांनी ठार मारले होते. त्या मुळे समाज कंटकांवर आळा बसला (हे जर भाजप असते तर पुढची निवडणूक मोदी जिंकले नसते). (विश्वास नसेल तर माहिती अधिकार द्वारे खर कळू शकतो. दिल्लीत ३५०० हजार हून जास्त सिखांची हत्या झाली एक ही दंगेखोर मारला गेला नाही. तसे आत्ताच मुजफ्फर नगर मध्ये ही ७४ लोक ठार झाले आणि दंगेखोर एक ही नाही. हीच परीस्थित आपल्याला सर्व 'ठिकाणी दिसेल आपल्या महाराष्ट्रात ही'. कुणाच्या ही विषयी दुर्भावना ठेवण्या आधी बातम्या वाचीत जा.
२. आज गुजरात एकमेव राज्य आहे जिथे पोलीस दलात सर्वात जास्त मुसलमान आहे. (मोदींमुळे हे घडले आहे. विश्वास नसेल तर माहिती अधिकार द्वारे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये पोलीस दलात कुठे मुसलमानांना जास्त प्रतिनिधित्व आहे. आपल्याला सहज कळेल.
३. गेल्या १० वर्षात मुसलमानांची सर्वात जास्त चांगली आर्थिक परिस्थिती गुजरात मधेच झाली आहे. महाराष्ट्रातून ही कित्येक मुस्लीम उद्योजक गुजरात मध्ये स्थानांतरीत झाले आहे.

भुमन्यु's picture

17 Feb 2014 - 1:42 pm | भुमन्यु

खाप पंचायतचे वर्तन अरजकात येत नाही का? कारण केजरीवाल आणि कंपनीने त्यांना देखिल सपोर्ट केलाय. स्वतःचं राज्य सोडुन रस्त्यावर धरणे देत बसणे हे ही अराजकच. एकंदरीत काय आहे केजरीवाल आणि कंपनीने भ्रमनिरास करण्यापलिकडे काहिच नाही केलंय.

---राहुल---

बंडा मामा's picture

19 Feb 2014 - 7:14 pm | बंडा मामा

कारण केजरीवाल आणि कंपनीने त्यांना देखिल सपोर्ट केलाय.

केजरीवाल म्हणतो खापपंचायत म्हणजे लोकांनी एकत्र होऊन निर्णय घेणे. ज्यामधे अयोग्य काहीच नाही. अयोग्य आहे ते खाप पंचायत ह्या नावाखाली गुन्हेगारी कृत्ये करणे. आज खाप पंचायत बंदी केली तर तेच गुन्हेगार अजून कुठली पंचायत काढून भिषण गुन्हे सुरु ठेवतील. ह्याचा अर्थ खाप पंचायतला समर्थन आहे असा होत नाही. कुठेतरी अर्धवट काहीतरी वाचुन मते बनवु नका.

चांगले झाले. आधीच्या झाडूमध्ये चार सडक्या कांड्या जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे घर झाडायला म्हणून ती फिरवली तरी पुन्हा नव्याने काही घाण सुटतच होती. आता त्या चार कांड्या बाजूला सारून एक नवी स्वच्छ झाडू मिळेल अशी आशा.. बोलो आमीन !!

मत तर द्यायचे आहे पण सापनाथ आणि नागनाथ ह्यातल्या कोणाला द्यावे ह्या प्रश्नातून निदान ह्या निवडणुकीत सुटका केल्याबद्दल आपचे आभार.

इरसाल's picture

15 Feb 2014 - 1:30 pm | इरसाल

भारतीय जनतेला आता पर्यंत नेत्यांना एकतर गाडीत बसुन जाताना, व्यासपीठावर भाषणे ठोकताना, टीव्हीवर झळकताना बघायची सवय. प्रत्यक्ष नेता बघायचा म्हणजे निवड्णुक हवी आणी पैसेही नंतर पुन्हा नेते ५ वर्षांनी दिसणार हे गृहितक. त्यात केजरीवाल मुख्यमंत्री असुन रस्त्यावर धरणे वगैरे धरायला लागले म्हटल्यावर पब्लिकच्या आधीच इलॅस्टीक सैल झालेल्या चड्डीची तात्पुरती नाडी तुटल्यासारखे झाले.
आता अल्लाउद्दीनचा चिराग केजरीवालांकडे आहे तरीही अजुन देशात भ्रष्टाचार, लाचलुचपत, टोल वगैरे का संपले नाहीत याची चीड कुठेतरी काढायला काही हवे ना ? असो.
अरे मनुक्षांनो त्याला वेळ तर द्या, चालला तर चालला नाय तर येणारच आपले जुने जाणते.(अस म्हणतात बैलाच्या अंगावर जर गोचीड पक्का झाला असेल तर त्याला काढत नाही कारण त्याचे पोट भरलेले असते तो अजुन रक्त पित नाही त्याला काढला आणी नवा चिकट्ला तर......याचमुळे आपल्याला जुने गोचीडच हवेत)

अजुन एक, दिल्ली राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे जसाकाय भारताचा अख्खा व्यवहार तोच हाकतोय असे मानुन मिडीया आणी लोकही त्याच्या मागे नहाधोके पडले आहेत.

विवेकपटाईत's picture

15 Feb 2014 - 6:33 pm | विवेकपटाईत

खोट बोलणारा, आणि भ्रष्टाचार वाढविणारा माणूस आहे. खालील
१. वीजचे बिल कमी केले नाही. वीज कंपन्यांवर कुठलाही दबाव आणला नाही त्या एवजी सबसिडी वाढवली. वीज चोरांचे (२५००० जवळपास) २५ वीज बिल भरणारे लोक मूर्ख आहेत. एक कोटी भाडेकरू ८-रुपये युनिट च्या हिशोबाने मकान मालकाला देतात (अधिकतम दर ७.५० रुपये युनिट आहे त्याचा पेक्षा जास्त मकान मलिक किरायेदारांकडून घेतात.) दर कमी झाले असते. तर गरिब भाडेकरू लोकांना फायदा झाला असता.
२. पाणी मुफ्त करणार. प्रत्यक्षात १५% दर वाढविले. २०००० लिटर पेक्षा १ लिटर जास्त पाणी वापरले तर ११,००० रुपये वर्षाचे बिल येणार आंनी १ लिटर कमी तर शून्य. (घोषणा झाल्या बरोबर जल बोर्डच्या लोकांनी दारूच्या बाटल्या फोडल्या. दिवाळी केली. आता प्रत्येक ग्राहकाला ब्लेकमेल करता येईल. ११,००० वाचविण्या करता २०००-३००० रुपये वर्षाचे देणे कुणालाही परवडेल. बाह्य दिल्लीत जिथे (निम्न मध्यमवर्ग आणि गरीब लोक राहतात पाणी येताच नाही. माझ्या घरी ही पाणी गेल्या ४-५ वर्षांपासून येत नाही आहे. कारण आमच्या भागात १० वर्षात आबादी १० पटीने वाढली आहे. पाण्याच्या लाईनी जुन्या आहेत त्या भार उचलण्यास असमर्थ आहेत. मोढ्या आणि जास्त पाण्याच्या लाईनीची गरज आहे. फक्त DDA कालोनीत राहणाऱ्या १० लाख लोकांना (त्या पैकी ५०% कडे कार नावाचा पालतू जनावर ही असेलच त्यांनाच फायदा झाला)
३. कंत्राट वर काम करणाऱ्या हजारो बस चालक, शिक्षक यांना नियमित करण्याचे आश्वासन दिले होते. चालक शिक्षक कर्मचारी strike वर गेले होते. त्यांना महिन्यात नियमित करण्याचे पुन्हा आश्वासन दिले होते. पूर्ण करणे अशक्य. पळवाट शोधायची होती.

४. केजरीवालला नियमांची माहिती असेलच, शिकलेले आहेत. खर म्हणजे त्यांना जनलोकपाल पास करायचेच नव्हते. लोक सभा निवडणूकी करता त्याग पत्र दिले.
शेवटी
मी सोडिता सर्वच भ्रष्टे
कर्कशे श्वान फुंके

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2014 - 2:52 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो पटाईतसाहेब, हे आपवाले उगा फुकाच्या फक्या मारत आहेत. ढोंगी एक तर एक नंबरचे आहेत. केजरी तर ढोंगी नंबर एक.
महाराष्ट्रात दमानिया बाईला गडकरींनी उघड आव्हान दिले आहे की आरोप सिद्ध कर म्हणून. तर दमानिया बाई घळपटल्या. स्वतः या बाई शेतकरी असल्याचा खोटा दाखला देऊन ती जमिन अशेतकी करून विकून मो़कळ्या झाल्या. नंतर म्हणे शासनाने हा व्यवहार अनियमिततेमुळे रद्द केला. त्या आता उच्चरवाने सांगत आहेत की त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे म्हणे.

त्याच्याकडे पाहिले कि ते देवपुत्र भासतात. द्रुष्टाचा नाश करण्यासाठी परमेश्वराने पृथ्वीवर परत एकदा कलियुगात जन्म घेतला आहे.केजरीवाल हे कलियुगातील कली आहेत. गीतेत देखिल भगवान श्रीकृष्णांनी ह्याचा उल्लेख केला आहे.मी वेद किंवा पुराणे वाचली नाहीत पण त्यात देखिल असा उल्लेख नक्की आढळेल. नोस्ट्राडेमस ह्या जगप्रसिध्द भविष्यवेत्त्याने देखिल १८व्या शतकात ह्याबाबत गुढरित्या लिहले आहे. त्यात ह्या महान नेत्याला शायरन असे नाव दिले आहे.तसेच तो भारताला जगात महान शक्ती बनवेल असे सांगितले आहे.
प्रस्थापित समाजातील द्रुष्टलोकाना त्याचा कार्यामुळे झोप येत नाही. जळीथळीकाष्टी त्याना केजरीवाल दिसत आहेत.

विवेकपटाईत's picture

16 Feb 2014 - 11:05 am | विवेकपटाईत

गीतेच्या जागी वर्तमान पत्र वाचा. शिवाय लोकसभेच्या निवडणुकी नंतर पितळ पूर्णपणे उघडे पडणारच आहे. अत्यंत निराशा होईल. सत्य कळल्यावर.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2014 - 2:53 pm | llपुण्याचे पेशवेll

ते वेताळबाबांनी उपहासाने लिहीले असावे.

काय पण मना बंदे में दम है . मिपाच्या मेन बोर्डावर 3 धाग्यात फक्त त्याचीच चर्चा चालु आहे .

मराठी_माणूस's picture

16 Feb 2014 - 11:26 am | मराठी_माणूस

तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही

अगदी बरोबर

पारंपारीक राजकारणात रस / अभ्यास असणाऱ्यांना, प्रस्थापितांना, तसेच अशा राजकारणाच्या लाभधारकांना ते न पचाणारे आहे

अर्धवटराव's picture

16 Feb 2014 - 11:30 am | अर्धवटराव

आणि म्हणुनच एक आम आदमी म्हणुन त्याच्याविषयी जास्त काळजी वाटते. इतक्या कमी वेळात इतक्या सकारात्मक मुल्यावर लोकं एकत्र झाले आहेत, त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हि खीर नासता कामा नये.

त्यावेळी जटाधारी रुद्र तांडव करण्याचा भास होतो.त्याच्यावर जर कोणी स्र्तोत्रे रचली असतील तर इथे शेअर करावी अशी माझी विनंती आहे.

आतिवास's picture

16 Feb 2014 - 12:28 pm | आतिवास

स्तोत्र नाही, पण हे एक आहे :

विनंती: इतपत विनोदाला आयुष्यात स्थान असावं, त्यावरुन राजकीय मतांविषयी अटकळ बांधू नये

काही सदस्यांना ब्लॉग उघडता येत नाहीत (विशेषतः कार्यालयातून) म्हणून खाली कॉपी पेस्ट केली आहे पूर्ण कविता.

मां गंदा सा मफलर दे दे केजरीवाल बन जाऊं,
झाड़ू लेकर हाथ में तेरी भ्रष्टाचार मिटाऊं।
एक गंदा सा एक स्वेटर दे दे पहन के उसको जाऊं,
खांस-खांस कर सबसे बोलूं भ्रष्टाचार मिटाऊं।
पढ़-लिख कर क्या होगा मां तू रखदे सभी किताबें,
तू तो बस बाजार से मुझको टोपी एक दिलवा दे।
पढ़-लिखकर भी केजरीवाल बस एक नौकरी पाए,
लेकिन चमका तभी सितारा, जब झाड़ू अपनाए।
अन्ना जी के मंच पे चढ़कर कर दिया सबको ढीला,
बीजेपी को मात दे गए डर गईं इनसे शीला।
आज बैठकर दिल्ली में वो कर रहे हैं नौटंकी,
बिजली देंगे और पानी से भरेंगेसबकी टंकी।
टी.वी पर दिन रात दिख रहे, गुम शाहरुख-सलमान,
झाड़ू थाम के भी मिल सकता है गर इतना सम्मान।
तो फिर काहे रात को जग कर पढ़-पढ़ आंखें फोढ़ूं,
मैं भी क्यों न झाड़ू लेकर उनके साथ ही दौड़ूं....।।

From: Piyusha Jha

मूकवाचक's picture

17 Feb 2014 - 5:26 pm | मूकवाचक

नित्य नवा भ्रष्टाचार| कुठे कुणावर अत्याचार|
झाला सर्वत्र हाहाकार| भारतदेशी||

कुणी वैफल्याने ग्रस्त| कुणी महागाईने त्रस्त|
कुणी सदा भयग्रस्त| जन गांजलेले||

कुणी भोळा गांधीवादी| अडगळीतला समाजवादी|
असे सारे विसंवादी| गोळा करावे||

कुणी भ्रष्ट सत्ताधारी| कुणी निधर्मी नामधारी|
मीच नीतीचा कैवारी| हवा करावी||

नवा सत्याचा प्रयोग| करावे माध्यमांना सजग|
नीट लावावी फिल्डींग| उपोषणा बसावे||

संधी लाभता उचित| अण्णा सोडावे गल्लीत|
ध्येय आपले दिल्लीत| ध्यानी घ्यावे||

आयुर्हित's picture

16 Feb 2014 - 2:12 pm | आयुर्हित

आजच्या युगातला श्री ४२० : एक घातक विकृती
"प्रहार" वरचा संपादकीय अग्रलेख वाचा अराजकीय अरविंदाचा अलविदा
आणि सर्वांनी डोळस पणे मतदान करण्यासाठी सज्ज व्हा!

श्रीगुरुजी's picture

16 Feb 2014 - 2:45 pm | श्रीगुरुजी

सध्या तरी केजरीवालांनी अत्यंत चातुर्याने बाजी मारली असे दिसत आहे. केजरीवालांना काहीतरी करून हुतात्मा होऊन आपली लोकप्रियता वाढवायची होती जेणेकरून पुन्हा निवडणुक झाल्यास स्वबळावर बहुमत मिळेल. यासाठी त्यांनी अत्यंत चातुर्याने जनलोकपाल विधेयक समोर आणले. त्याच्याआधी अंबानींविरूद्ध प्राथमिक चौकशीचा अहवाल दाखल करून आपण अंबानींच्या व पर्यायाने भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत ही प्रतिमा निर्माण करून घेतली. नंतर लगेचच २-३ दिवसात जनलोकपाल विधेयक आणून आपली बाजू अधिक भक्कम केली.

हे विधेयक जरी मंजूर झाले असते तरी नायब राज्यपाल तांत्रि़क कारणावरून ते फेटाळतील याची त्यांनी खात्री होती. हे विधेयक विधानसभेत सादर करावे का नाही या कारणावरून मतविभाजन केल्यावर भाजप व काँग्रेसच्या सदस्यांनी त्याला विरोध करून विधेयक आणून दिले नाही. ही सुवर्णसंधी न गमावता तातडीने केजरीवालांनी त्याचे भांडवल करून राजीनामा देऊन स्वतःची प्रतिमा उंचावली.

इथेच भाजपने घोडचूक केली. हे विधेयक विधानसभेत सादर करावे का नाही याविषयी सभापतींनी मतविभाजन केल्याचे ठरविल्यावर भाजपने अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती की नायब राज्यपालांनी हे विधेयक विधानसभेत आणू नका असा आदेश दिलेला आहे. त्यामुळे ते आणावे का नाही याविषयी सभागृहाचे मत घेणे हे चुकीचे आहे. याविषयी सभापतींनीच स्वतःच्या अधिकारात निर्णय घ्यावा. जनलोकपालला आमचा पाठिंबा आहे. परंतु हे विधेयक आणावे का नाही याविषयावर आमचे आमदार मतविभाजनात भाग घेणार नाहीत व ते तटस्थ राहतील. अशा परिस्थितीत हे विधेयक आणावे या बाजूने आपची २७ मते व आणू नये या बाजूची १० मते मिळून हे विधेयक आणावे असा कौल मिळाला असता. त्यानंतर प्रत्यक्ष विधेयकाला मतदानात पाठिंबा देऊन ते विधानसभेत मंजूर करून घेऊन भाजपने आपली प्रतिमा शाबूत राखली असती. नंतर अपेक्षेप्रमाणे राज्यपालांनी हे विधेयक नाकारून परत पाठवून दिले असते व त्या कारणावरून केजरीवालांनी राजीनामा दिला असता. या सर्व प्रकरणात भाजप विधेयकाच्या बाजूने आहे व फक्त काँग्रेसच विरोधात आहे हे दिसले असते.

भाजपने विधेयक आणण्यालाच विरोध करून निदान दिल्लीत तरी आपली प्रतिमा खालावून घेतलेली आहे. त्याऐवजी विधेयक आणावे का नाही या विषयावरच्या मतदानात तटस्थ राहून व नंतर विधेयकाला पाठिंबा देऊन आपण जनलोकपालच्या बाजूचे आहोत हे दाखवून केजरीवाल विरूद्ध काँग्रेस+राज्यपाल असा सामना होउन द्यायला पाहिजे होता. आता केजरीवाल विरूद्ध काँग्रेस+भाजप+राज्यपाल असा सामना झाल्याचे दिसत आहे.

राजीनाम्यानंतर घेतलेल्या सर्वेक्षणात दिल्लीत आपला ६७ टक्क्यांहून अधिक मतदारांचा पाठिंबा दिसत आहे. भाजपला २३ टक्के व काँग्रेसला फक्त ६ टक्के मतदार अनुकूल आहेत. दिल्ली विधानसभेची फेरनिवडणुक झाली तर आपला ७० पैकी किमान ५० जागा मिळतील असे चित्र आहे. एकंदरीत केजरीवालांनी बाजी मारली असून भाजपने नाहक स्वतःची प्रतिमा खालावून घेतली व काँग्रेसकडे गमावण्यासारखे काहीही नसल्याने त्यांना कोणताच फरक पडलेला नाही.

विधेयकाला आधी राज्यपालांची मंजुरी हवी, गृहखात्याची मंजूरी हवी हे सर्व तांत्रिक मुद्दे आहेत. हे विधेयक विधानसभेत सादर होऊन मंजूर व्हायलाच पाहिजे.

विवेकपटाईत's picture

8 Mar 2014 - 6:51 pm | विवेकपटाईत

एक माणूस शिवाय खोटं बोलण्याशिवाय काहीच करत नाही. विधान सभेत बिल वर चर्चा झालीच नव्हती. बिलच्या प्रती ही वाटण्यात नव्हत्या आल्या. चर्चा उप राज्यपालांच्या पत्रावर झाली होती. शिवाय जाताजाता अंतरिम बजेट मध्ये आवश्यक तरदूत ही केल्या नाही. ज्यांचे फळ दिल्लीवासियाना एप्रिल पासून भोगावे लागतील.

गुरुजी, दिल्लीची विधान सभा ही पूर्ण विधान सभा नाही. निवडणुकी आधी सर्वाना माहित आहे. आधी गृहखाते बिल मंजूर करते आणि नंतर दिल्ली विधान सभा. इथे प्रश्न होता, जर गृहखात्याने बिल मंजूर केले असते तर? रिस्क कोण खेणार.
शिवाय सत्तादलाचे थिंकटेंक किती डोकेबाज आहे, निवडणूक हरले तरी सत्ता या घटकेला त्यांच्या जवळ आहे.

प्राचीनकाळी ऋषी मुनी तपोबलाने शत्रूच्या नाशासाठी शक्ती उत्पन्न करायचे.
ती शक्ती ज्या कामासाठी निर्मित झाली ते कार्य योग्य रीतीने करत आहे.

बाबा पाटील's picture

16 Feb 2014 - 8:48 pm | बाबा पाटील

आपच्या लोकसभेत कमीत कमी १० जागा,आणी दिल्लीत पुर्ण बहुमत्,एका नोकरशहाची चाल राजकारण्यांना भारी पडणार,आणी १० जागावर हा पठ्या किंगमेकर ! अब आयेगा मजा...!

अजुन काही वर्तवता येते का बघा.

जेंव्हा अमावस्येच्या रात्री वेताळाने झपाटल तेंव्हा पासुन हा बाबा पाटील, भविष्यवाला बाबा झाला.....बम्म भोले...!

केजरीवालांनी एकूणच भारतीय राजकारणाला एक नवा आयाम दिलाय हे नक्की.
भल्याभल्या नेत्यांचा वाचाळपणा बघितला की आआपने काय गोंधळ उडवून दिलाय याची कल्पना येते.

ते बलशाली,शक्तीशाली आणि वाचालशाली भारत नक्की बनवणार .

रमेश आठवले's picture

17 Feb 2014 - 12:24 pm | रमेश आठवले

केजरीवाल राजीनामा देण्यासाठी उत्सुक होते हे सर्वांना माहित होते.
परंतु एकदा मुख्य मंत्री पद स्वीकारल्यावर ते सोडण्या आधी काही शासकीय पाउले उचलायची जबाबदारी त्यांच्यावर येते हे ते सोयीस्कर पणे विसरले.
दिल्ली राज्यासाठी कायदे करावयास केंद्र सरकारची पूर्वानुमती घ्यावी लागते. हा नियम २००२ सालापसून आहे. केजरीवाल यांना हा नियम बरोबर वाटत नसला तरी तो मुद्दाम त्यांच्या विरुध्द केलेला नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते आणि जन लोकपाल कायदा विधान सभेत मांडण्या आधी केंद्र सरकार कडे पाठवणे गरजेचे होते. फार तर त्यांनी केंद्राची अनुमती काही दिवसात ( १५ दिवस ?) मिळायला हवी असा आग्रह धरायला हवा होता. अशी अनुमती मिळणारच नाही असे गृहीत धरण्याचे कारण काय ?
उप राज्यपालांनी त्यांना लिहेलेल्या पत्रात अनुमती शिवाय बिल मांडू नका एवढेच लिहिले होते.

या सूचनेचा अनादर करून केजरीवालांनी बील मांडण्याचा प्रयत्न केला आणि असे करणे बेकायदेशीर आहे असे सांगत विरोधकांनी त्याना बील मांडू दिले नाही . बीला मधील तरतुदी वर सभागृहात चर्चा झालीच नाही.

ही वस्तुस्थिती असताना विरोधकांनी बील पास होऊ दिले नाही असा कांगावा करत केजरीवाल यांनी राजीनामा दिला .

विवेकपटाईत's picture

8 Mar 2014 - 6:42 pm | विवेकपटाईत

सत्य हे आहे बिल मांडलाच नव्हता, उप राज्यपालांच्या पत्रावर चर्चा झाली होती. जाता जाता अंतरिम बजेट मध्ये आवश्यक तरदूत इत्यादी ही केल्या नाही, त्याचे फळ दिल्लीच्या जनतेला एप्रिल पासून भोगावे लागतील.

खरं म्हणजे, प्याद्याचा वापर योग्य ठिकाणीच होतो आहे.

त्याना शपथ घेतली त्या दिवसापासुन राजीनामा घ्यायचा होता कुठलेही कारण नसताना त्यांनी राजीनामा दिला.त्यामुळे खेचरवाले बाबा व त्याचे सर्व'खेचरे' उर्फ बाबा भगत ह्याना कोण आनंद झाला आहे. त्याचे सगळे भाट आता 'दम'बाजीची चर्चा करत आहेत.वस्तुथितीचा विपर्ह्यास करुन जनतेची दिशाभुल करत आहेत. खेचरीवाल ला आता आवरला नाहीतर वाट लावेल देश्याची.

खेचरीवाल ला आता आवरला नाहीतर वाट लावेल देश्याची.असल काही होत नाही. मुघल्,इंग्रज,काँग्रेसवाले,गेला बाजार संघवाले सगळे प्रयत्न करुन दमले,या देशाची वाट काही लागली नाही,त्यामुळे केजरीवाल काही वाट लावेल अस शक्य नाही.या मातीचा गुणधर्म आहे, कुनीही अती मातला की त्याला घरी पाठवायचा,इतिहास पहा,इथे अराजक माजत नाही,भारताची लोक आणी भारतीय लोकशाही दोन्हीही भक्कम आहेत्,चिंता नसावी.

वेताळ's picture

17 Feb 2014 - 1:38 pm | वेताळ

राज्य करायचे तर तसे गुण तुमच्यात पायजे का नाय? कुस्ती खेळायची तर मातीत उतरल पायजे.अंगाला माती लागनार,दुसर्या गड्याचा घाम चिकटनार.पन तुम्ही राव डाव खेळायला नग पन बक्षिस हव म्हनटल्यावर कस व्हनार? राजकारन काय कम्प्युतर गेम हाय का?सगली बटन आनि चीतकोड तुमच्या हातात असायला?जिंकला नाय कि फोडलं मशीन.दम असनारी लोक दम धरुन दम टिकवुन खेलत्यात,ह्योतर पळपुटा हाय.

१. दिल्ली निवडणुक पुन्हा झाली तर (रा रा आली म्हणजे ६ महिन्याच्या आत घ्यावी लागेलच) निवडणुकांचा खर्च कुणामुळं झाला असं मानायचं?
२. पुन्हा अशीच परिस्थिती आली तर काय? (कुणा एका पक्षाला बहुमत न मिळणं)
३. निवडणुकांना किती खर्च होईल.
४. ह्या मधल्या काळात काही गोंधळ झाला तर त्याला थेट जबाबदार कोण?

बाबा पाटील's picture

17 Feb 2014 - 1:58 pm | बाबा पाटील

त्यांची पठडी अजुनही नोकरशहा व एन.जी.ओ. वाल्यांची अशी विचित्र संमिश्रण आहे,त्यांना वेळ द्यायलाच हवा,शिकतील हळु हळु. मात्र प्रयोग झालेच पाहिजेत्,हेच तर आपल्या लोकशाहीच सुत्र आहे.म्हणुन तर म्हटल मातला की ठोकला,लोक बरोबर घरी पाठवतात.इंदिराबाईंना पण पाडलच होत ना.त्यामुळे जनतेला गृहित धरता कामा नये.बिहार मध्ये एके काळी फक्त लालु राज होत आता ते विठठल विठ्ठल करत बसलय्,प.बंगालचा डाव्यांचा अभेद्य किल्ला ढासळाच ना ? ही स्थित्यंतराची प्रक्रिया आहे,या गोष्टी घडत राहणार्,फक्त आपण त्याचे मुक साक्षिदार व्हायचे की सक्रिय सहभागी व्हायचे हा निर्णय प्रत्येकानेच घ्यायचा आहे.भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणाची
ही प्रक्रिया आहे,जे समोर येइल त्यातुन सत - असत निवडायचे आहे.ते खुद्द जनतेने.

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 2:10 pm | प्यारे१

>>> भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणाची ही प्रक्रिया आहे

लोकशाही बळकट करण्यासाठी राजीनामा ?
एक विधेयक मांडू न देता आल्यानं ज्या जनतेनं निवडून दिलं त्या जनतेला (जसं आधी विचारलं वगैरे) विश्वासात न घेता थेट राजीनामा?
त्याचे लोकशाही मार्गाचेच इतर पर्याय विचारात न घेता राजीनामा?
कशी काय लोकशाही बळकट होणार अशानं?

त्यांना शिकण्यासाठी त्याची किम्मत अदा करायची ती जनतेनं? आमचा राव्हल्या बरा की त्यापेक्षा! (हा उपहास आहे)

अपेक्षा असणाराकडूनच अपेक्षाभंग होतो. हा माणूस वेगळा आहे, शिकलेला आहे, अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आहे असा काहींचा विश्वास होता म्हणून त्याला यश मिळालं. इतर पक्षांनी काहीही केलं तरी काय करु शकणार अशी स्थिती होती. त्यात हा 'कल्की अवतार'(हाही उपहास आहे) आला. त्याचेही पाय मातीचेच का असं वाटलं म्हणून अपेक्षाभंग.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2014 - 2:59 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो आता उदो उदो करायचाच आहे तर ते कोणत्याही कारणानं उदो उदो करतंच राहणार.

फक्त अंबानी ह्यांच्या वर एफ. आय. आर. दाखल केली म्हणूनच हे सरकार पडले असे नाही.
अनेक गोष्टी होत्या.
आप सरकार ने काही केसेस दाखल केल्या होत्या.
शीला दीक्षित ह्यांनी अनधिकृत वस्त्यांना दिलेली प्रोव्हीजनल प्रमाणपत्रे.
शीला दीक्षित सरकार आणि भाजपच्या महापालिकेच्या लाईट खरेदी बद्दल.
शीख दंग्या वर एस. आय. टी.
वीज कंपन्यांचे ऑडीट. जे म्हणे शक्य नव्हते.
आता हे सगळे करणारे सरकार एक होऊन काँग्रेस अन भाजप ने पाडले त्यात आश्चर्य काय?

केजरीवाल सरकारने हे सर्व नसते केले तर त्यांचे लोकपाल बिल नक्कीच पास झाले असते, अन आता कॉंग्रेस भाजपला आलेला संविधानाचा पुळका दिसला नसता.

काही चुका कुणाही कडुन होतातच, त्याचा प्रमाणा बाहेर बाऊ करण्यात अर्थ नाही.

काही लोक निराश आहेत काहींना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत, पण ह्या सरकारने नक्कीच पुष्कळ काही बदलले.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2014 - 4:13 pm | llपुण्याचे पेशवेll

केजरीवाल सरकारने हे सर्व नसते केले तर त्यांचे लोकपाल बिल नक्कीच पास झाले असते, अन आता कॉंग्रेस भाजपला आलेला संविधानाचा पुळका दिसला नसता.
हा संविधानाचा पुळका जेव्हा आण्णांचे आंदोलन चालू होते व आण्णांना जेल मधे टाकण्याचे चालू होते तेव्हा सुधा भाजपाला आलेला होता. जेटलींचे त्यावेळचे भाषण ऐका.

सव्यसाची's picture

17 Feb 2014 - 6:54 pm | सव्यसाची

आता हे सगळे करणारे सरकार एक होऊन काँग्रेस अन भाजप ने पाडले त्यात आश्चर्य काय?

थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो.
सरकारने राजीनामा दिला असून कुणीही त्यांचा पाठींबा काढून घेतला नाही किंवा त्यांच्यावरती अविश्वास ठरावही आणला नाही.

आजच्या लोकसत्ता मधील अग्रलेख:
कुडमुडे कुड्तोजी

जयनीत's picture

17 Feb 2014 - 7:59 pm | जयनीत

पण एक महत्वाचा मुद्दा. जे सरकार त्यांनी आणलेले बिल टेबल ही करू शकत नाही त्याचा अर्थ त्या सरकार वर सभागृहाचा विश्वास नाही हाच सरळ अर्थ होतो.
थोडक्यात अविश्वास प्रस्ताव.
जर आप सरकार ने राजीनामा दिला नसता तर आज टी. व्ही. वर कॉंग्रेस भाजप अन संविधानाचे तज्ञ हाच मुद्दा हिरीरीने मांडून त्यांच्या वर संधी साधू पणाचा अन खुर्चीला चिकटून बसण्याचा आरोप लावतांना दिसले असते.