भविष्य दर्शन

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
9 Feb 2014 - 6:03 pm
गाभा: 

अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते . कामावर असताना अशा डुलक्या काढताना बॉस ने पाहिले तर महागात पडू शकते . इतकेच नव्हे तर गाडी चालवत असताना येणाऱ्या डुलक्या प्राणघातक अपघातास निमंत्रण देवू शकतात .

पण हीच डुलकी तुम्हाला भविष्यात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब देखील दाखवू शकते . नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात सुमारे ८०,००० लोकांचे अनुभव नोंदवण्यात आले। त्यापैकी सुमारे ६०% लोकांनी डुलकी म्हणजेच microsleep च्या काही सेकंदात पुढे काही दिवसात घडणार्या घटनातील काही अंश पाहिल्याचे सांगितले .

मात्र आश्चर्याची गोष्ट अशी कि जोपर्यंत प्रत्यक्षात त्या घटना घडत नाहीत , तोपर्यंत काहीही आठवत नाही . पण जेव्हा ती पूर्वदर्षित घटना घडते , तेव्हाच " हे आपण पूर्वी अनुभवलेले /पाहिलेले आहे", याची जाणीव होते।

शास्त्रज्ञांच्या मते microsleep च्या दरम्याने मेंदू काही सेकंदासाठी आर इ एम अवस्थेत जातो . त्यावेळी स्थळ-काळ यांची जाणीव लोप पावते . अशा अवस्थेतील भविष्य-काळातील काही दृश्ये अंतर्मनात उमटत असावीत ,असा कयास आहे…

आपणास असे काही अनुभव आहेत का?

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Feb 2014 - 7:05 pm | मुक्त विहारि

अजिबात नाही...

याला देजा-व्हू असे म्हणतात असे ऐकून होतो. हे मेन्दूमधील केमिकल लोच्या आहे असे म्हणतात.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2014 - 7:57 pm | अत्रुप्त आत्मा

@ त्यावेळी स्थळ-काळ यांची जाणीव लोप पावते . अशा अवस्थेतील भविष्य-काळातील काही दृश्ये अंतर्मनात उमटत असावीत >>> मेणबत्ती सरळ करा... उलट धरली आहे!

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 8:07 pm | ज्ञानव

इथे मुदलात मेंदू वगैरे काही पदार्थच नाही तेव्हा....पा स

हे ठरवुनही घडत नाही. पण विशेषतः एखादी अशुभ गोश्ट (माझेबाबत) घडणार असल्यास हे अनेक वेळेला घडते. त्यानंतरचा हे नेहमीप्रमाणचे एक साधे स्वप्न होते, प्रेडिक्शन न्हवे आणी काही वेळ आता जे वाटले ते अजिबात घडु नये/ घडणार नाही हा विचार मनाला पटवण्यात अतिशय अस्वस्थ जातो. साधारण चालु क्षणाच्या दोन +/- दिवसा पर्यंतच्या घटनेबाबत हा अनुभव मी स-पुरावा घेतला आहे. दोन - अश्यासाठी की ती गोष्ट घडलेली असते परंतु अजुन मला खबर आलेली नसते पण द्रुश्य पाहिलेले असते. जास्त करुन वाइट घटनांबाबत हे घडलेले असल्याने व कधीही सदरील घटनाक्रम बदलता आलेले शक्य नसल्याने असे स्वप्न पडु नये याबाबत आग्रही असतो.

याला शास्त्रिय संशोधनाचा आधार सापडला तर हा प्रकार संपुर्ण घालवणे अथवा जास्त धारदार बनवणे आवडेल.

अनिरुद्ध प's picture

11 Feb 2014 - 4:47 pm | अनिरुद्ध प

माझ्या एका मित्राला जागेपणीच असे अनुभव येतात पण कधी कधी,आणि तो ते बोलुन दाखवतो पण नन्तर विसर्तो आनि घट्ना घद्ल्यानन्तर त्याचा अनुभव येतो.

बॅटमॅन's picture

10 Feb 2014 - 2:53 pm | बॅटमॅन

म्हणतात बॉ असं. वैयक्तिक अण्भव मात्र कसलाच नाही.

अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते .

अशी सवय मला शाळेपासुनच आहे... ;) मस्त, पहील्या बाकावर बसुन मास्तरांची/बाईंची नजर चुकवून डुलक्या मारायच्या... आणि आता बॉसची नजर चुकवून.
बाकी लेखात लिहीला आहे तसा अनुभव मात्र कधी आला नाही.

प्रभाकर पेठकर's picture

11 Feb 2014 - 6:16 pm | प्रभाकर पेठकर

असे अनेकांच्या बाबतीत घडते. माझ्या वैयक्तिक जीवनात मीही असा अनुभव अगदी ३-४ वेळा घेतला आहे.
ह्या बाबतीत एका व्यक्तीची भेट झाली होती. त्याचा उल्लेख आधीही इथेच कुठल्यातरी धाग्यावर केला आहे. त्या व्यक्तीला भविष्यातल्या घटना कधीकधी स्पष्ट दिसायच्या. ह्याचा मी अनुभव घेतला होता. त्या व्यक्तीशी ह्या विषयावर चर्चा करताना त्यांनी असे सांगितले की, ' ही शक्ती थोड्याफार प्रमाणार सर्वांकडेच असते. माझ्या बाबतीत (त्यांच्या बाबतीत) ती अतिशय तीव्र आहे म्हणून मला घटना दिसतात. ह्यात दैवी वगैरे कांही नाही. दुर्दैवाने कांही मंडळी ह्याला दैवी मानून मला देवत्व बहाल करतात. पण मी एक, तुमच्यासारखाच, साधा माणूस आहे.'

असे अनेकदा डुलक्या न काढताच होते. जागेपणी, ड्रायव्हिंग करताना, एकदम काहीतरी वाटते आणि त्या व्यक्तिसंदर्भात काही माहिती, निरोप, फोन असे येते. दरवेळी फार महत्वाच्या गोष्टी असतात असे नाही, उदा. काल (मिक्सरवर चटणी वाटताना) सहज आठवण आली की मामेबहिणीला नव्या वर्षाच्या शुभेच्छांनंतर फोन नाही झाला आणि ५ मिनिटात वहिनीचा फोन आला की त्यांनी मामेबहिणीला फोन केला व सध्या गडबडीत असल्याने फक्त खुषाली कळवली आहे. यात काही फार मोठे असे नाही पण गंमत वाटली. तसेच एका बाईंचा फोन एवढ्यात कधीतरी येणे अपेक्षित होते आणि मला मात्र त्यांच्याकडून मिळणार्‍या माहितीवर आधारित काही गोष्टी ठरवायची घाई झाली होती. त्यात माझ्या हातून थोडीफार सांड लवंड झाल्याने व्हॅक्युम क्लिनिंग चालले होते. मनात या बाईंचाच विषय होता. क्लिनर बंद केला आणि त्यांचा फोन मी न उचलल्याने त्या निरोप ठेवत होत्या. मग पटकन फोन उचलून पुढील बोलणे झाले.

मी सहमत आहे . अनेक वेळा असा अनुभव येतो . काही अशुभ असेल तर हमखास स्वप्नात येते पण ते कधिच टाळता येत नाही

सुबोध खरे's picture

11 Feb 2014 - 7:29 pm | सुबोध खरे

११ वी आणि १२ वी मध्ये गणिताच्या तासाला डुलक्या येत असत आणि गणितात अगदी कमी गुण मिळणार असे स्वप्न पडत असे.हे स्वप्न अगदी खरे झाले म्हणुनच मी वैद्यक शाखेला गेलो.
आजही आपलि परीक्षा जवळ आली आहे आणि गणिताचा अभ्यासक्रम काय आहे हे माहितीच नाही अशी स्वप्ने पडतात.

आबा's picture

12 Feb 2014 - 5:01 am | आबा

सिरीयसली ?!

मदनबाण's picture

12 Feb 2014 - 5:09 am | मदनबाण

माझ्या बाबतीत जरा वेगळा प्रकार आहे,अन् तो भविष्य दर्शनाशी संबंधीत नाही, त्यामुळे विषयंतर होउ नये म्हणुन थांबतो.

Prajakta२१'s picture

12 Feb 2014 - 9:43 am | Prajakta२१

कधी कधी असे होते
त्या वेळी लक्ष दिले जात नाही पण मग तशाच घटना घडताना पहिल्या कि वाटते अरे हे आधीच कुठेतरी पहिले होते किंवा काही काही गोष्टी/घटना करताना वाटते हे आधी पण झाले आहे आणि आपण रिपीट करत आहोत deja vu सारखे

पैसा's picture

12 Feb 2014 - 6:23 pm | पैसा

संशोधन वगैरे माहित नाही. पण काही अनाकलनीय कारणाने असं होतं खरं. कधी स्वप्नात तर कधी कधी चांगली जागी असताना पण मला माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम घडवणार्‍या घटना घडतील असं जाणवलं आहे. आणि अशा वेळी धूसर नव्हे तर अगदी स्वच्छपणे कोणीतरी प्रत्यक्ष बोलून सांगितल्यासारखे विचार मनात येतात. जेव्हा जेव्हा स्वप्नं पडली तेव्हा ती सिनेमा पाहिल्यासारखी नंतर व्यवस्थित आठवत होती. असे निदान २ जागेपणीचे तर ३ स्वप्नांचे अनुभव आता आठवत आहेत. असं का होतं याचा मी कधी विचार केला नाही. कदाचित मी स्पेशल असेन! ;)

प्रसाद गोडबोले's picture

13 Feb 2014 - 12:11 am | प्रसाद गोडबोले

आपणास असे काही अनुभव आहेत का?

कंटीन्युअसली मला हा अनुभव येतो...येत आहे ,पापण्या मिटल्या की नॅनो स्लीप लागते , तेवढ्याय मी पुढील काही क्षणात काय करणार आहे हे डोळ्या समोर येते ...आणि काय आश्चर्य ...अगदी ९९% वेळा सेम तसेच घडते !!

त्यामुळे ह्यात काही विशेषही वाटत नाही आता .

(अवांतर : आत्ता पुर्वपरिक्षण ह्या बटनावर क्लिक केल्यावर एक नॅनोस्लिप लागली त्यात असे भविष्य दिसले की मी व्याकरणातल्या चुका इग्नोर मारुन "प्रकाशित करा" ह्या बटनावर क्लिक करणार आहे ...आता बघुया हे भविष्य खरे होते का ते :D )