रानी की वाव

अजया's picture
अजया in भटकंती
26 Jan 2014 - 3:41 pm

बर्‍याच दिवसापासून गुजरातमधल्या राणी की वाव,अदलज,आणि मोढेरा इथले सूर्यमंदिर पाहायला जायचे चालले होते. पण नेहेमी बरोबर येणारे आमचे मित्र मंडळ नुसत्या मूर्ती आणि मंदिर बघायला जायच्या आमच्या बेताला फाटे फोडायला लागण्याआधी दिवाळीच्या दिवशी पहाटे अहमदाबादला जाणार्‍या विमानाचे आरक्षण पक्के करून टाकले!
दुपारीच मेहेसाणामार्गे पाटणला येऊन पोहोचलो. पाटण हे लहानसे खेडेगावासारखे वाटणारे गाव हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. इथल्याच पाटण पाटोला साड्या जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या किमती विचारल्यावर तेवढ्या खर्चात आपण युरोपला जाउन येऊ अशी समजूत घालून पुढे निघालो. कुठेही आपण एखाद्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी जातो आहोत असे वाटत नव्हते. शेवटी एकदा गावाच्या अगदी शेवटाला गाडीने एक वळण घेतले आणि भारतातल्या सुप्रसिद्ध विहीरींची महाराणी म्हणावी अशा राणीं की वाव द्रुष्टीपथास पडली.
बाहेर पार्किंगपासुनच आतल्या गर्दीचा अंदाज आला. दिवाळीतल्या लाभ पंचम ची तमाम गुजराती उद्योजकानी सुट्टी घेऊन ,इथे येऊन कारणी लावली होती बहुतेक! सर्वत्र हिरवळीवर खावानु,पिवानु,मज्जा करानु आलेल्या गुर्जर बांधवांची गर्दीच गर्दी होती! आता आम्हाला वाव बघण्याचे वेध लागले होते. अक्षरश: धावत आम्ही विहिरीच्या पायरी पाशी पोहोचलो. आणि समोरचे अचाट शिल्प वैभव पाहून कुठून सुरू करावे पाहायला तेच कळेनासे झाले! तेव्हढ्यात एका बांधवाशी माझी जुंपली! त्यांचा काहीच दोष नव्हता ते बिचारे एका विष्णू मूर्तीला आय लायनर लावण्यासाठी तिच्या डोळ्याच्या कडेवरुन बॉलपेन फिरवत होते!असो!
राणी की वाव साधारण इ.स.1022 ते 1063च्या दरम्यान सोळंकीराजा भीमदेव याच्या स्मरणार्थ बांधलेली आहे. एक जलमंदिरच असावे त्या काळातले. इथे विष्णू दशावतारची शिल्पे,सुरकन्या,विषकन्या,महिषासुरमर्दिनी ही शिल्पे प्रामुख्याने दिसतात.ती इतकी अप्रतिम कोरलेली आहेत की त्यांचा डौल,सौंदर्य,रेखीवपणा,त्यातले शास्त्र,त्यांचे अलंकार्,आयुधं,चेहेर्यावरील भाव, काय बघू काय नको असे होऊन जाते. केवळ नजरबंदी करणारी कारागिरी! याच विहिरीचा वरुन देखील देखावा बघता येतो. तोही एक विलक्षण अनुभव आहें. मजल्या,मजल्यांच्या रचनेत जवळ्जवळ आठशे शिल्पे सामावली आहेत.तीही एक से बढकर एक. सर्वात तळाशी शेषशायी विष्णूचे शिल्प आहे..
ही विहीर काळाच्या ओघात गाळात लपुन गेली होती.पुरातत्व खात्याने 1980नंतर अत्यंत काळजीपूर्वक उत्खनन केल्याने आता आपल्याला आहे या दिमाखदार स्वरुपात दिसते आहे.
संध्याकाळ होऊन कमी दिसायला लागेपर्यंत भान हरपून शिल्प बघत होतो! खरोखरच अशी ठिकाणं पाहिली की आपण भारतात राहत असल्याचा इतका अभिमान आणि आनंद वाटतो. त्या सुवर्ण काळात भारतातली शिल्पकला कळसाला पोहोचलेली असणार यात शंकाच नाही. त्या अनाम कलाकारांच्या अतुलनिय कामगिरीपुढे नतमस्तक!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

प्रतिक्रिया

>>>त्या सुवर्ण काळात भारतातली शिल्पकला कळसाला पोहोचलेली असणार यात शंकाच नाही.
>>>त्या अनाम कलाकारांच्या अतुलनिय कामगिरीपुढे नतमस्तक!

हेच. असंच.
अप्रतिम मूर्ती नि कलाकुसर. सुंदर धागा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2014 - 4:41 pm | निनाद मुक्काम प...

आजच्या काळात भारत केवळ विशिष्ट शेत्रात आपले करियर करावे म्हणून पालक आपल्या पाल्याला भरीस पाडतात, त्यात चित्रकला व शिल्पकला हे शेत्र औषधाला सुद्धा सापडत नाहीत .
पण असे काही अद्वितीय पाहिले की मती कुंठीत होते.

दिपक.कुवेत's picture

26 Jan 2014 - 4:51 pm | दिपक.कुवेत

अजुन हवे होते. एका नविन ठिकाणीची माहिती सांगीतल्याबद्दल धन्यवाद. याच विहिरीचा वरुन काढलेला एखादा फोटो असेल तर टाक म्हणजे भव्यतेचा अंदाज येईल.

आयुर्हित's picture

26 Jan 2014 - 5:24 pm | आयुर्हित

अद्भुत शिल्प!!!! अद्भुत शिल्पकारी!!!!
धन्य ते राज्यकर्ते, धन्य ते शिल्पकार!!!!
नशीब तुमचे आणि आमचेही, आजतागायत हे शिल्प परकीय विध्वंसकारांपासून जपून राहिले.
लेख व फोटो आवडले.
धन्यवाद.

श्रीनिवास टिळक's picture

26 Jan 2014 - 5:34 pm | श्रीनिवास टिळक

अप्रतिम नक्कीच!राणीकी वाव हे नाव सार्थच आहे. जलमंदिर हाही एक संलग्न विषय आहे. त्यावरील अधिक माहितीसाठी डॉक्टर कल्याणरामन यांच्या एका लेखाचा (Step wells: water temples of India) दुवा देत आहे. http://bharatkalyan97.blogspot.com/2011/09/stepwells-of-india-and-byblos...
अवांतर: काही दशकांपूर्वी सातारा जलमंदिर नावाचे एक प्रकरण गाजले होते. ते जलमंदिर अजून अस्तित्वात आहे का?

विजुभाऊ's picture

27 Jan 2014 - 12:50 am | विजुभाऊ

सातार्‍यात जलमंदीर आहे. ते अजुनही आहे. मात्र ती राजघराण्याची खाजगी मालमत्ता आहे

यशोधरा's picture

26 Jan 2014 - 5:35 pm | यशोधरा

सुंदर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2014 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

वॉव म्हणावी अशिच हि वाव आहे. या अनवट ठिकाणाची ओळख करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. भारतात भेट देण्याच्या ठिकाणात भर पडली !

स्वगतः जगभर यापेक्षा आकाराने लहान आणि कलेने कनिष्ठ असणार्‍या ठिकाणांची कितितरी पटींनी जास्त काळजी, मार्केटिंग आणि फायदा केला जातो हे जाणवून काय वाटलं ते काय सांगावं?

सस्नेह's picture

26 Jan 2014 - 6:21 pm | सस्नेह

पण इतकेच ? विहिरीचे फोटो आणखी इतर कोनातून काढले असतील तर टाक ना !
शिल्पे सगळी सुस्थितीत दिसताहेत. खरंच सुंदर आहेत.

मधुरा देशपांडे's picture

26 Jan 2014 - 6:32 pm | मधुरा देशपांडे

सुंदर आहेत शिल्पे.

सुहास झेले's picture

26 Jan 2014 - 7:22 pm | सुहास झेले

सहीच... अजून फोटो असतील तर येऊ देत :)

अप्रतीम कलाकुसर आहे. अगदी देखणी वाव.

कंजूस's picture

26 Jan 2014 - 8:18 pm | कंजूस

खरीच छान दिसते आहे वाव .दिलेल्या फोटोंवरून कल्पना आली .संध्याकाळ होईपर्यंत पाहिली + १. जातो पुढच्या वेळेस .धन्यवाद .

भ ट क्या खे ड वा ला's picture

26 Jan 2014 - 8:58 pm | भ ट क्या खे ड वा ला

अदलज,आणि मोढेरा या बद्दल हि लिहा.
फोटो अजून हवेत.
बर झालं आक्रमकांच्या काळात गाडली गेली होती ते.
(खरोखरच अशी ठिकाणं पाहिली की आपण भारतात राहत असल्याचा इतका अभिमान आणि आनंद वाटतो. त्या सुवर्ण काळात भारतातली शिल्पकला कळसाला पोहोचलेली असणार यात शंकाच नाही. त्या अनाम कलाकारांच्या अतुलनिय कामगिरीपुढे नतमस्तक!) १००% सहमत.
अवांतर : काही ठिकाणी विहिरीला बाव, छोट्या विहिरीला बावडी म्हणतात.

विजुभाऊ's picture

27 Jan 2014 - 12:53 am | विजुभाऊ

भटक्या ही घ्या अडलजच्या विहीरीची माहिती.
http://misalpav.com/node/15718

भ ट क्या खे ड वा ला's picture

27 Jan 2014 - 2:51 pm | भ ट क्या खे ड वा ला

धन्यवाद विजुभाऊ

चिगो's picture

27 Jan 2014 - 4:53 pm | चिगो

बर झालं आक्रमकांच्या काळात गाडली गेली होती ते.

हेच म्हणतो.. खिद्रापूरच्या मंदिरातली शिल्पे बघून "आक्रमणाआधी ही शिल्पे किती सुंदर असतील" ह्याचा विचार करुन जीव हळहळत होता..

सुंदर ठीकाणा.. गुजरात-भेटीचा बेत मनात बळ धरतो आहे.. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2014 - 9:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा अशा नवनवीन माहितीमुळे अधिक श्रीमंत होत जातं. मन:पूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

26 Jan 2014 - 9:16 pm | स्वाती दिनेश

सुंदर शिल्पे!
लेख आवडला,
स्वाती

प्रचेतस's picture

26 Jan 2014 - 9:39 pm | प्रचेतस

अशक्य सुंदर आहे हे.

दुसरा फोटो सर्वपरिचित वराहावताराचा तर तिसरा फोटो बुद्धावताराचा. हिंदूंनी बुद्धाला पण अवतारात सामावून घेतले. बुद्धाच्या एका हातात कमळाची कळी तर दुसर्‍या हातात अक्षमाला तर तिसरा हात वरदमुद्रेत तर चौथ्या हाताने उत्तरीय पकडलेले दिसतेय.
चौथ्या फोटोत सुरसुंदरीच्या उजवीकडे आहे तो विष्णूचा दहावा अवतार- कल्की. हा नेहमीच त्याच्या पांढर्‍या घोड्यासह असतो.
पाचवा फोटो भैरवाचा. नवव्या फोटोत बहुधा महिषासुरमर्दिनी दिसतेय.
नवव्या फोटोत डावीकडे वामन अवतार आहे. वामनाची छत्री हे त्याला ओळखण्याचे सर्वात महत्वाचे लक्षण. त्याच्या बाजूला उजवीकडे कोपर्यात बहुधा कृष्णावतार आहे.
तर शेवटचा फोटो परशुरामाचा - विष्णूचा सहावा अवतार. परशु अगदी उठून दिसतोय. परशुरामाच्या दोन्ही बाजूंना लहान लहान चौकटींत विष्णूचे बाकीचे अवतार कोरलेले दिसताहेत.

अनेकानेक धन्यवाद वल्ली,माहितीसाठी!

आतिवास's picture

26 Jan 2014 - 9:51 pm | आतिवास

नवी माहिती मिळाली. भेट देण्याच्या स्थळांच्या यादीत नाव लिहून ठेवले आहे.

इन्दुसुता's picture

26 Jan 2014 - 9:56 pm | इन्दुसुता

लेख आवडला, शिल्पांची छायाचित्रे आवडली. सुंदर कलाकुसर!!!
वल्ली यांनी दिलेली माहिती आवडली.
भारतात भेट देण्याच्या ठिकाणात भर पडली !
अगदी असेच म्हणते.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2014 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा

प्रत्येक शिल्प बघतांना अंगावर रोमांच उभे रहातायत हो! :)

आता कधी बघायला जायला जमणार आहे..कोण जाणे? :(

किसन शिंदे's picture

26 Jan 2014 - 11:28 pm | किसन शिंदे

अतिशय सुरेख आहेत ही सगळी शिल्पे. फोटोंबद्दल धन्यवाद.!

आनन्दिता's picture

27 Jan 2014 - 2:26 am | आनन्दिता

आवडलं!!! शिल्पे तर अप्रतिम आहेत....

अजया's picture

27 Jan 2014 - 8:33 am | अजया

धन्यवाद सर्वांनाच!

पद्मश्री चित्रे's picture

27 Jan 2014 - 9:58 am | पद्मश्री चित्रे

सुरेख शिल्प आणि लिहिलयस् पण छान

सुरेख फोटो आणि माहिती...
पाटण हे लहानसे खेडेगावासारखे वाटणारे गाव हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. इथल्याच पाटण पाटोला साड्या जगप्रसिद्ध आहेत.
एक प्रश्नः- पाटोल्या की पटोला साड्या ?

जेपी's picture

27 Jan 2014 - 10:10 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

विजुभाऊ's picture

27 Jan 2014 - 10:20 am | विजुभाऊ

मदनबाण त्या साड्यांचे नाव" पटोला" असेच आहे.
त्यावरुन एक गुजराथी गाणे देखील फेमस आहे.
"हेला जी रे मारे हाटु पाटणथी पटोला लावजो"

रमेश आठवले's picture

27 Jan 2014 - 11:25 am | रमेश आठवले

आशा भोसले यांनी हे गाणे बरेच वर्षापूर्वी गायले आहे आणि ते इ पी रेकोर्ड वर प्रसिद्ध झाले होते. गाण्यात म्हटल्या प्रमाणे ही साडी महाग (मोघा) असते आणि एक साडी विणायला एक दीड वर्ष लागते.
पटोळा विणणारे फार थोडे कारीगर आता आस्तित्वात आहेत.
अमिताभ बच्चन यांनी गुजरातच्या पर्यटन विभागासाठी केलेल्या जाहिराती टी व्ही वर दाखवल्या जातात- त्यापैकी एका जाहिरातीत पटोळा साडीची तारीफ आहे.
http://lp.downloadquick.net/?lpid=3143&sysid=406&appid=362&subid=3366216120

पिलीयन रायडर's picture

27 Jan 2014 - 12:34 pm | पिलीयन रायडर

सुंदर लेख आणि अप्रतिम फोटोज!!

अडालज, राणी नु वाव आणि मोढेरा इथले सुर्यमंदिर अत्यंत अप्रतिम आहेत.
अहमदाबाद इथे मुक्काम करुन वरील ठिकाणे आणि अक्षरधाम पहाणे सोयीस्कर आहे. आम्ही अशी ६ दिवसांची ट्रिप केली होती. जर कुठे डिटेल्स मिळाले तर टाकते.. आणि फोटो सुद्धा!!

डिटेल्स टाका .कुठुन सुरुवात केली आणि एका दिवशी काय पाहिले ,कोणत्या ठिकाणी किती वेळ लागतो .

पुजा होणारी देवळे बघायला फार वेळ वाया जातो .ऐतिहासिक ठिकाणे मात्र सकाळी सहा ते संध्या सहा उघडी असतात .

आमची फक्त पाच दिवसाची सहल होती. मुख्यतः सुर्यमंदिर आणि रानी की वाव इथली शिल्पकला बघायला जाणे हाच उद्देश होता. त्यामुळे हे सर्व बघायला प्रत्येक ठिकाणी अर्धा दिवस तरी लागायचा आम्हाला! आम्ही अह्मदाबाद विमानतळावरुन गाडी ठरवली होती. अह्मदाबादच्या हॉटेलमध्ये सामान टाकुन थेट पाटणचा रस्ताच धरला. तिथुन रात्री अह्मदाबादला परत आलो. साधारण अडीच तास लागतात. दुसर्या दिवशी आधी अडलज वाव्,हाथीसींग जैन मन्दिर्,अहमदाबादच्या मुख्य बाजारात असणार्या मशिदीच्या मागिल भिंतीवर अप्रतिम जाळीकाम आहे,ते पाहुन्,मोढेराला गेलो. तिथे प्रत्येक भिंतीवर एकेक कथा आहे. आतुन आणि बाहेरुन! मोढेरा पाहुन आम्ही बडोद्याल गेलो. तिथे दोन दिवसात लक्ष्मी विलास पॅलेस (रवीवर्म्याच्या वरीजीनल पेंटींग),सन्ग्रहालय,चंपानेरचा किल्ला,सरदार सरोवर प्रकल्प्,गरुडेश्वरला नर्मदामैयाची भेट! असा कार्यक्रम करुन परतलो!पूजाअर्चा चालणार्या देवस्थान झालेल्या देवळांमध्ये जायचे फार पूर्वीच सोडले आहे!

कंजूस's picture

29 Jan 2014 - 4:06 pm | कंजूस

उपयुक्त माहिती आहे .
धन्यवाद .
आताच आम्ही बदामी ,हम्पी करून आलो .
चांगला अनुभव आला .

बॅटमॅन's picture

27 Jan 2014 - 2:03 pm | बॅटमॅन

नेटवर याचे फटू आधी पाहिले होते. काय खतरनाक प्रकार आहे, बघून मजा आली एकदम!!!!!

वेल्लाभट's picture

27 Jan 2014 - 2:27 pm | वेल्लाभट

ह्म्म.... मी अहमदाबाद ला गेलेलो असताना हे ठिकाण राहिलेलं बघायचं. मस्तच आहे. फोटो सुपर आहेत.

सानिकास्वप्निल's picture

27 Jan 2014 - 4:01 pm | सानिकास्वप्निल

अप्रतिम शिल्पे, छानच लिहिले आहेस
आवडेश :)

भाते's picture

27 Jan 2014 - 4:42 pm | भाते

फोटो आणि माहिती, दोन्ही आवडले.

सगळ्या मिपाकरांच्या मागणीनुसार आणखी फोटो हवेत.

michmadhura's picture

27 Jan 2014 - 4:52 pm | michmadhura

छानच लिहिले आहेस, अप्रतिम शिल्पे आणि तेवढेच छान फोटो.

जागा छान आहे, फोटो छान आलेत हे ही नक्की, अजुन हवे होते हे ही नक्की ...आवडले आहे हे ही नक्की ........

अवांतर : पाचव्या फोटो मध्ये उगा तो/ती जो कोणी आहे तो/ती मोबाईलवर बोलतो/ते आहे असे वाटुन गेले ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jan 2014 - 5:57 pm | बिपिन कार्यकर्ते

बेष्ट!

अनन्न्या's picture

29 Jan 2014 - 7:35 pm | अनन्न्या

अप्रतिम शिल्पं!

इशा१२३'s picture

31 Jan 2014 - 9:01 am | इशा१२३

नविन ठीकाण कळले. मस्त माहीतीही छान!

प्रभाकर पेठकर's picture

31 Jan 2014 - 10:23 am | प्रभाकर पेठकर

चांगली शिल्पे आहेत. श्री. वल्लींच्या माहितीनुसार ह्या शिल्पांचा आस्वाद घेतला.
एखाद्या मोठ्या सुट्टीत अहमदाबाद ची रानी नि 'बाव' पहायलाच पाहिजे.

पैसा's picture

1 Feb 2014 - 2:41 pm | पैसा

सगळं वर्णन आणि फोटो केवळ अप्रतिम! इतर ठिकाणांबद्दलही सवडीने लिही. बघायच्या यादीत आणखी भर पडत आहे. या बावड्या बुजवून टाकल्या होत्या म्हणून बरे. नाहीतर विध्वंसच बघायला मिळाला असता. अशा कदाचित आणखीही कुठे विस्मृतीत गेलेल्या बावड्या गुजरात-राजस्तानात असूही शकतील अजून.

अमोल केळकर's picture

1 Feb 2014 - 5:01 pm | अमोल केळकर

सुरेख :)

अमोल केळकर