विवाह कायदा आणि विधी

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
19 Jan 2014 - 1:02 pm
गाभा: 

मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या...

स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते. त्यामुळे विवाह विधींच्या तपशीलात डॊकावले तर समाजाची गरज ठळकपणे दिसते.

पण मी माझ्या मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे आजची स्त्री मुक्त आहे किंवा मुक्त होऊ पहात आहे. पूर्वी डझन-अर्धा डझन मुलं होणे हे ’नॉर्मल’ असताना ’स्त्री परक्याचे धन’ ही कल्पना समाज स्वीकारू शकत होता. आज हे शक्य आहे का? मला वाटते नाही...

एकेकटी मुले असणारी कुटुंबे हे आज सर्वत्र दिसणारे चित्र आहे. अशा वेळेस जर एकुलती एक मुलगी असेल, त्यात ती शिकलेली आणि कमावती असेल तर ती मुक्त किंवा मुक्त होऊ पहाणारी स्त्री "परक्याचे धन" मानायला कितीजणी (किंवा त्यांचे आईबाप) तयार होतील?
अशा परिस्थितीमध्ये ’माहेरचे पाश’ स्त्रीने तोडायची अपेक्षा ठेवणे हे पण अव्यवहार्यच ठरते. असो...

आता आपण ’नाते’ ही संकल्पना तपासुन पाहु. सुरुवातीला नात्याची व्याख्या करणे योग्य ठरेल - दोन व्यक्तीमधला व्यवहार (अथवा संबंध) त्या कोणत्याही एका किंवा दोन्ही व्यक्तींची तात्कालिक अथवा दीर्घकालीन कोणतीही गरज भागवत असेल तर त्या दोन व्यक्तीमध्ये तात्कालिक अथवा दीर्घकालीन नाते असते. यातील काही नात्याना मित्र, मालक-नोकर, आईबाप, नवरा-बायको अशी नावे मिळालेली आहेत तर कदाचित काही नात्याना अशी नावे नसतील.

दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात. शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन त्या मोडणे दंडनीय ठरते.

या सर्व पार्श्वभूमीवर नवरा-बायकोचे नाते दीर्घकाळ टिकावे किंवा त्या नात्यात प्रवेश करताना जबाबदारीची जाणीव परस्पराना अधिक थेटपणे व्हावी याठी सुस्पष्ट "शपथ" घेतली जावी असे मला वाटते.

मला सध्याच्या बदलत्या संदर्भात "मी अमुक-तमुक चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो. मी पति-पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते." अशी शपथ घेणे जास्त योग्य ठरेल.

मला असं वाटतं अशा प्रकारच्या शपथेने "लग्न" समाजात जास्त गांभीर्याने घेतले जाईल. कृपया हे अभिप्रेत असतच असा प्रतिवाद करु नये. देशाच्या घटनेवर विश्वास आहे हे गृहित धरणं आणि तसे ऍसर्ट करणे यात बराच गुणात्मक फरक आहे.

प्रतिक्रिया

मारकुटे's picture

19 Jan 2014 - 1:43 pm | मारकुटे

अरे वा! युयुत्सू आले.. आता मिपावर स्त्रीमुक्ती चळवळ आणि त्या चळवळीचे विविध पैलू यावर सांगोपांग चर्चा घडायला हरकत नाही.

फक्त प्रतिसादकांना एक विनंती की युयुत्सूंना इतकं पिडू नका की दोन चार वर्षांचा अज्ञातवास त्यांना घ्यावा लागेल.

त्यांना आपलं म्हणा !!

म्हणजे पाहू. कारण वैवाहिक संबंधांचा सारा डोलारा त्यावर उभा राहाणारे.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2014 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा

मला स्वतःला विवाहविधी म्हणजे असाच-एखादा कालमानानुसार योग्यप्रकारचा शपथविधी'च असावा असे वाटते. तसाही मागे मी माझ्या एका मित्राचा विवाहसंस्कार घरच्याघरी केला होता.. तेंव्हा भारतमातेचा फोटो... दोन हार.. आणी मी तयार केलेली एक शपथ वचनांची जंत्री (ज्याचा मी त्या दोघांकडूनही नातेवाइकांसमोर उच्चार करून घेतला होता. ) एवढच धार्मिक विधींच साहित्य आणी व्याप्ती होती. नंतर त्यांनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आणी विषय संपला! :)

प्रकाश घाटपांडे's picture

19 Jan 2014 - 2:34 pm | प्रकाश घाटपांडे

तयार केलेली एक शपथ वचनांची जंत्री (ज्याचा मी त्या दोघांकडूनही नातेवाइकांसमोर उच्चार करून घेतला होता. )

गुरुजी टाकाच ती शपथवचनांची जंत्री

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2014 - 4:11 pm | संजय क्षीरसागर

पण "भारतमातेचा फोटो.." कश्यापायी याचा निर्णय झाला पाहिजे!

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2014 - 5:56 pm | टवाळ कार्टा

"कोनाड्यातल्या व्हिंदमातेच्या" पेटंट उखाण्यासाठी =))

वैयक्तिक शपथाना कायद्याच्या पातळीवर फारसा अर्थ नसतो. माझं म्हणण अस आहे की सुस्प्ष्ट आणि कायदेशीर अशी शपथ हवी. मी सुचवलेल्या शपथेमध्ये १ले वाक्य कोर्टमॅरेज मध्ये असेतच.

वैयक्तिक शपथाना कायद्याच्या पातळीवर फारसा अर्थ नसतो. सुस्प्ष्ट आणि कायदेशीर अशी शपथ हवी

कोर्टात गीतेवर हात ठेवून घेतलेल्या 'खरे बोलेन, खोटे सांगणार नाही' ह्या कायदेशीर शपथे असली तर चालेल का?

- (आईशपथ बुचकळ्यात पडलेला) सोकाजी

दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन
जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/
कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात.
शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन
त्या मोडणे दंडनीय ठरते.

मोड्न्याबद्द्ल काय दंड असावा ?

युयुत्सु's picture

19 Jan 2014 - 4:14 pm | युयुत्सु

मोडण्या बद्दलचा दंड पोटगी/अलीमनीच्या रुपाने कोर्ट ठरवते.

बर्फाळलांडगा's picture

19 Jan 2014 - 5:13 pm | बर्फाळलांडगा

मला सध्याच्या बदलत्या संदर्भात "मी अमुक-तमुक
चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो. मी पति-
पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक,
भावनिक, बौद्धिक
गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते." अशी शपथ
घेणे जास्त योग्य ठरेल.

ही शपथ संपूर्ण मटेरिएलिस्तिक वाटते अगदी एक मेकाण्चि कुंडलिनी जागृत करायची अट सुधा त्यात सामाविष्ट केलि तरी. इतका स्वार्थिपना योग्य वाटत नाही... नवरा हां पति आहे परमेश्वर नाही अन बायको ही अन्न पूर्णा असेलच याची काय खात्री ? थोडक्यात विवाह ठरवताना ज्या गोष्टी बघायची मुभा आहे त्याचा विवाह करताना जाच कशाला ?

युयुत्सु's picture

19 Jan 2014 - 7:00 pm | युयुत्सु

लग्न ठरवताना अनेक मटेरिअलगोष्टींचाच विचार होतो. तेव्हा मत्टेरिअलिस्टिक शपथ घेणे नसावे

बर्फाळलांडगा's picture

19 Jan 2014 - 7:03 pm | बर्फाळलांडगा

हां धागा विवाह ठरवण्याच्या विधी बाबत नसून विवाह करणेच्या विविधि बाबत आहे आणि त्या अनुषंगाने आपले विचार अस्थानी प्रस्तुत होतात आहे. माइंड इट!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2014 - 2:54 pm | अत्रुप्त आत्मा

@दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात. शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन त्या मोडणे दंडनीय ठरते. >>> कोणाकडून दंडनीय ठरते? किंवा ठरावे??? असे तुंम्हाला* वाटते? :)

*युयुत्सु

युयुत्सु's picture

19 Jan 2014 - 4:15 pm | युयुत्सु

वर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आलेच आहे...

अत्रन्गि पाउस's picture

19 Jan 2014 - 3:22 pm | अत्रन्गि पाउस

विवाह मंत्रोपाचारांमध्ये विविध देवांना करून वधू वरील अधिकार सोडण्याचे आवाहन असते असे समजते...हे खरे आहे का?
असे असल्यास सांप्रत हि गोष्ट कुणालाही अमान्य असावी...आणि म्हणून काही आमूलाग्र बदल झाल्यास स्वागतच असावे...
तथापि एक मुद्दा असा कि आपण इथे किमान समान विवाह उपचार काय आहेत ह्याची एक जंत्री कुणी टाकू शकेल का ?
फारच जटील आहे बुवा हे सगळे..परत त्या गांधर्व विवाह, वैदिक / पारंपारिक, राक्षस इत्यादी विवाह प्रकार...
असो एक उत्तम धागा...
जाता जाता : इथे प्रत्येक २ / ३ प्रतीसादानंतर लैव्ह कामेंत्री करायला चांगलाच स्कोप आहे...:D

युयुत्सु's picture

19 Jan 2014 - 4:16 pm | युयुत्सु

विवाह मंत्रोपाचारांमध्ये विविध देवांना करून वधू वरील अधिकार सोडण्याचे आवाहन असते असे समजते...हे खरे आहे का?

लाजाहोम हा त्याच करता केला जातो.

विनायक प्रभू's picture

19 Jan 2014 - 8:48 pm | विनायक प्रभू

आभिणंदन.
़कुठ्लीही टोकाची भुमिका न घेतलेली १च पोस्ट.
मातीच्या रस्त्यावर जोरात बैल गाडी पळवणारे आणि धूळ उडवणारे भरपूर आहेत सध्या.

सुबोध खरे's picture

19 Jan 2014 - 10:36 pm | सुबोध खरे

"दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात. शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन त्या मोडणे दंडनीय ठरते."
"मोडण्या बद्दलचा दंड पोटगी/अलीमनीच्या रुपाने कोर्ट ठरवते."
दुर्दैवाने असा करार एखाद्या स्त्रीने मोडला तर तिला कोणता दंड होतो? कायदा हा बराचसा स्त्रियांच्या बाजूने आहे. कनिष्ठ वर्गातील स्त्रियांसाठी तो तसा असावा हेही ठीक आहे पण मध्यम आणि उच्च वर्गातील पुरुषांसाठी तो अतिशय जाचक ठरलेला आहे. एखादी स्त्री असा करार मोडून जर आपल्या माहेरी परत न येण्यासाठी निघून गेली तर त्या पुरुषाच्या आयुष्याची दहा वर्षे आणि पुढील आयुष्य भर १/३ उत्पन्न इतका दंड बसतो. या बद्दल आपले काय म्हणणे आहे? तेंव्हा अश परिस्थितीत या शपथेची एका कागदाच्या चिठोर्यावर खरडलेल्या मजकुरापेक्षा जास्त किमत नाही.

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2014 - 11:15 pm | संजय क्षीरसागर

मला सध्याच्या बदलत्या संदर्भात "मी अमुक-तमुक चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो. मी पति-पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते." अशी शपथ घेणे जास्त योग्य ठरेल.

या पैकी "मी अमुक-तमुक चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो". हा भाग तर कोर्ट मॅरेजमधे येतोच.

आणि पुढचा भाग : "मी पति-पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते."

हे ओघानं येतंच. इतक्या किरकोळ गोष्टीसाठी मग पोस्ट कशाला हवी?

कवितानागेश's picture

19 Jan 2014 - 11:35 pm | कवितानागेश

हल्ली विधी केले जातात ते केवळ 'सोहळ्याचा" एक भाग म्हणूनच होतात.
त्यामुळे त्यात वधूवरांचा बौद्धिक- मानसिक सहभाग अधिक गंभीरपणे होईल, अश्या पद्धतीच्या शपथा विवाहविधीत सामिल केल्या तर उत्तमच आहे.

युयुत्सु's picture

20 Jan 2014 - 10:08 am | युयुत्सु

"दुर्दैवाने असा करार एखाद्या स्त्रीने मोडला तर तिला कोणता दंड होतो? कायदा हा बराचसा स्त्रियांच्या बाजूने आहे. कनिष्ठ वर्गातील स्त्रियांसाठी तो तसा असावा हेही ठीक आहे पण मध्यम आणि उच्च वर्गातील पुरुषांसाठी तो अतिशय जाचक ठरलेला आहे. एखादी स्त्री असा करार मोडून जर आपल्या माहेरी परत न येण्यासाठी निघून गेली तर त्या पुरुषाच्या आयुष्याची दहा वर्षे आणि पुढील आयुष्य भर १/३ उत्पन्न इतका दंड बसतो. या बद्दल आपले काय म्हणणे आहे? "

आपण व्यक्त केलेली भीति सार्थ आहे. पण तरीही मला काही गोष्टींमुळे ही भीति कमी होईल असे वाटते. मी सुचविलेली शपथ जर कायदेशीर स्वरूपात पुढे आली तर -

० केवळ विवाह सोहळ्याला हौसे-मौजेचे स्वरुप न राहता जबाबदारीचे भान देणारा विधी असे पण स्वरुप येउ शकते.
० कायदा स्त्रियांच्या बाजुने असला तरी करार/नाते कुणी कसे मोडले यावर पुढचे बरेच काही अवलंबुन असते.
० बर्‍याच पुढारलेल्या देशात (जर्मनीचे उदा मला ठाउक आहे) न्यायालये स्त्री कमविण्यास सक्षम असेल तर पोटगी मागितल्यास बाहेरचा रस्ता दाखवते. आपल्याकडे पण हे अधुन-मधुन होते पण माध्यमे स्त्रियांचा कैवार घेत असल्याने अशा केसेसना प्रसिद्धी देत नाहीत.

मला मुख्यत: स्त्रीवादी अशा प्रकारच्या शपथेला राजी होतील का याविषयी उत्सुकता आहे

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2014 - 3:21 pm | प्रसाद गोडबोले

मुळातच लग्न संस्था ,( मग ती कोनत्याही देषा धर्मातील असो ,) ही एक खुप मोठ्ठा झोल आहे .

उगाच नसती कटकट ...
---
ओपन रीलेशनशिपला ओपन सपोर्ट !!

बर्फाळलांडगा's picture

20 Jan 2014 - 3:33 pm | बर्फाळलांडगा

ओपन रिलेशनशिप ही फार मोठी जबाबदारी आहे आणि त्याची आवड कायम राहिलच असे नाही. विवाह ही सोय प्रथम आणि नाते नंतर आह म्हणून जबाबदारी ही विखुरता/विभागता येते म्हणून त्याची आवड ओसरली तरी कोण रस्त्यावर येत नाही. थोडक्यात क्न्पुबाज हे विवाहित जोड्प्या परमाने असतात जी सामान्य लोकांसाठी नक्कीच सुलभ गोष्ट आहे.

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2014 - 7:15 pm | प्रसाद गोडबोले

बर्‍याच जणांना नाही पटत .... चालायचच ...
असो
तोवर हे पहा
http://www.youtube.com/watch?v=5ocbZhRQS9I

(अवांतर : व्हिडियो इथे कसा अपलोड करतात ?)