गाभा:
माझ्या ओळखीचे एक व्यक्ती सतत म्हणायचे की आजकालचे आय ए एस ऑफिसर हे सगळॅ कॉन्व्हेन्ट मधले आहेत आणि त्यान्चा सामान्य माणसाच्या जीवनाशी / शेतकर्यान्च्या जिव्हाळ्याच्या प्रश्नान्शी काहीही सम्बन्ध न आल्याने सगळी नोकरशाही व किम्बहुना राज्यव्यवस्था कुचकामी व कागदी बाहुली ठरते ...
हे मला बर्याच अन्शी पटले .
खरोखर एखादा शेतकर्याचा मुलगा आय ए एस झाला , किम्वा आय ए एस परीक्षे मध्ये येणारे प्रश्न शेती/शेतकरी व त्यान्च्या समस्या या सन्दर्भात असले , तर परिस्थितीत काही फरक पडू शकेल का?
प्रतिक्रिया
12 Jan 2014 - 8:51 pm | ज्ञानव
तुम्हि एखाद्या आय ए एस माणसाबरोबर प्रत्यक्ष कधी काम केले आहे का?
12 Jan 2014 - 9:11 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
आमच्या रानातला राखणदार त्याच्या पोराला कान्वेंटात शिकवतो, आता बोला???? सगळ्यांनाच अनुकरणाची नशा चढलीए.
12 Jan 2014 - 9:39 pm | टवाळ कार्टा
शिकवुदेकी...फक्त मराठी मराठी करणार्या (आणि न करणार्यासुध्धा) नेत्यांच्या मुलांनीच कान्वेन्टमधे शिकायचे का काय
12 Jan 2014 - 9:24 pm | चिगो
बरं मग? बाकी तुमच्या ओळखीतल्या त्या व्यक्तीला "अभ्यास वाढवा" हे माझ्याकडून सुचवा.. "आजकाल" बराच फरक पडलाय म्हणतात बुवा परिस्थितीत..
12 Jan 2014 - 10:25 pm | नीलकांत
शेतकरीच काय तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणार्यांचेही मुलं आय.ए.एस. झालेली आहेत. त्यामुळे वरील लेखातील भावनेशी सहमत नाही.
अनेक शेतकर्यांची मुले आय.ए.एस. आणि अन्य अखील भारतीय सेवांत आहेत. खरं तर कुणीही त्या पातळीवर पोहोचू शकतो हे सध्याच्या व्यवस्थेचे अत्यंत महत्वाचे लक्षण आहे असे मला वाटते.
सध्या मराठीतही स्टिलफ्रेम (फारूक नाईकवडी) सारख्या पुस्तकांतून अखील भारतीय सेवांत निवड झालेल्या लोकांच्या संघर्षाचे वर्णन मिळते. ते पुस्तक जरी वाचले तरी समजेल की या परिक्षांसाठी मेहनत आणि समर्पण हीच सर्वात महत्वाची पात्रता आहे.
जाता जाता चिंगोंशी सहमती दर्शवत परत सांगतो की त्यांना सांगा की अभ्यास वाढवा.
12 Jan 2014 - 10:36 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
कॉन्व्हेंटचा प्रश्न नाही, तो अधिकारी सामान्यांशी किती आत्मियता ठेवतो हे महत्वाचे ....गावोगावचे बहुतेक तलाठी शेतकर्याचीच पोरं असतात, तरीही शेतकर्यांकडून बक्षीस मिळाल्याशिवाय कामं करत नाहीत, असले लोक काय कामाचे?