जे का रंजले गांजले

Rahul Bhuskute's picture
Rahul Bhuskute in काथ्याकूट
8 Jan 2014 - 4:09 pm
गाभा: 

आमटे हे कुटुंब हे खरोखर आदरणीय आहे. बाबा आमटेंची मुले (डॉ. प्रकाश आमटे) हेच त्या आदिवासींच्या शाळेत शिकले व कुठलही आधुनिक सोविसुविधा नसताना डॉक्टर बनवून दाखवले. जिथे कुष्टरोग म्हटले तर आपल्या अंगावर काटा येतो व त्यांच्या जवळ पण जायची भीती वाटते. अश्या लोकांना आपले म्हणून जवळ केले व ते समाज कार्य केले ते खरोखर वंदनीय आहे. "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा." जेंव्हा सरकारांनी ९ वरील gas सिलेंडर वरील अनुदान रद्द केले तेंव्हा डॉ. प्रकाश आमटेनी असे सांगितले कि आम्हाला गस सिलेंडर भरपूर लागतात व सिलेंडर मध्ये आमचे खूप पैसे खर्च होतील. तेंव्हा सर्वानी जमल तर सरकार वर दबाव टाका कि अश्या सामाजिक संस्थाना सरकारांनी ह्या कायद्यातून वगळावे. किंव्हा आपण आपल्या वैयक्तिक स्तरावर खारीचा वाट उचलावा.

सन्दर्भ- http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5389487619746656803&Se...(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0)

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Jan 2014 - 11:31 am | पैसा

पण अशा अगदी खर्‍या समाजसेवी संस्थांना सुद्धा स्वतंत्रपणे वेगळी सबसिडी देता येईल का याबद्दल शंका आहे. त्यांना इतर काही पर्यायी इंधनव्यवस्था जसे की गोबरगॅस, बायोगॅस, सौर ऊर्जा इ. वापरणे शक्य नाही का? लोक आनंदाने अशा प्रकल्पांसाठी देणग्या देतील.

कवितानागेश's picture

13 Jan 2014 - 1:29 pm | कवितानागेश

सहमत. बायोगॅसच्या नवीन चांगल्या शेगड्या आता मिळतात. त्याचा प्रसार व्हायला हवाय.