कुठेतरी जायचयं,कुठेतरी जायचयं, असं आम्हां उभयतांना बरेच दिवस चालले होते. अनेक लोकांशी चर्चा झाल्या, अनेकांनी अनेक ठीकाणे सुचवली. काही तर परदेशातली होती.पण तिकडे जायचे नव्हते. मग मिपा च्या सदस्यांकडून मदत मागितली.http://www.misalpav.com/node/26383 जरा सांगा कुठे जाऊ !
हक्काची विनंती केली. मिपा सदस्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. खूप ठिकाणे सांगितली. पण परत प्रोब्लेम !
एवढी ठिकाणांची लिस्ट बघुन आम्ही कनफ्युज ! कारण सगलीच ठिकाणे बघण्यासारखी होती. मग आम्ही उभयतांनी फायनल चर्चा करुन मध्य प्रदेशात जायचे ठरवले. बरं दिवस फक्त ४-५ आणि आम्हाला स्वत:च्या गाडीने फिरण्याची भारी हौस! मग काय, बसलो नकाशा घेउन. आणि ठरलं की इंदौर, भोपाळ, ओंकारेश्वर आणि back to pavilion पुणे परत.
दर वेळेला आम्ही आगावू आरक्षण करुन जातो. होटेल चे, तिथे फिरण्याचे - taxi, city tour वगैरे. म्हणजे कसं एकदम सुट्सुटीत होतं. शिवाय त्रास पण होत नाही. पण या वेळेला मात्र असा कोणताही आगावूपणा न करता जो होगा सो देखा जायेगा असं म्हणुन १८ ला सकाळी ५.३० ला निघण्याचा संकल्प सोडला.
बरोब्बर ५.३० ला निघयचे असे ठरवून आम्ही बरोब्बर ६.४५ ला (सकाळीच) निघालो. अ.नगर-शिर्डी-मनमाड-धुळे मार्गे इंदौर ला संध्याकाळी ७.३० ला पोहोचलो. तिथे गगनगामी परिभ्रमण सूचना यंत्र ( इति चित्रगुप्त. मिपा सदस्य) आपलं जी. पी. एस. द्वारे अर्ध्या तासात राजवाडा परिसरात येउन पोहोचलो. शिर्डी परिसरातला रस्ता सोडला तर बाकी रस्ता टकाटक ! धुळे मार्गे तर एन.एच. ३ लागतो. जबरदस्त रस्ता आणि जबरदस्त टोल !अर्थात रस्ता चांगला असेल तर टोल द्यायला कोण नाही म्हणेल? नकळतच खेड्शिवापूरचा टोल आठवला.
असो.
तर हां ! राजवाडा परिसरात पोहोचलो. होटेल चे आगावू आरक्षण नसल्यामुळे निवारा शोधणे क्रमप्राप्त झाले. त्यात एक तास गेला.रूम मिळाल्यावर पटकन आवरुन ( फ्रेश होऊन ;) ), सराफा बाजार च्या दिशेने कूच केले.
सराफा बाझार हा पुण्यातल्या तुळशी बागे इतका प्रसिद्ध आहे. दिवसा तिथे सराफ बाझार असतो म्हण्जे सराफांची दुकाने आहेताणि रात्री खाद्यपदार्थांचे ठेले (स्टॉल) !तिथल्या सराफांनी रात्री आपली दुकाने सुरक्षित असावीत म्हणून दुकानांच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत या ठेल्यांना परवानगी दिली. हे केव्हापासुन चालू झाले ते माहिती नाही.पण आम्ही इंदौर ला येण्याचे ठरवले ते इथे येउन खाण्यासाठीच !
तर सराफा बाझारात काय नाही. चाट - आलु टिक्की, छोले टिक्की, भुट्टे का कीस, गराडू, डोसा, भेळ, पाणीपुरी, गोड पदर्थात- चमच्याने खाता येईल इतकी घट्ट रबडी, मसाला दुधासारखा प्रकार- शिकंजी, गुलाबजामुन, काला जामुन, जिलेबी, हाताच्या पंज्याएवधी ईम्रुती, जिलेबी विथ रबडी. अजुन बरेच काही.
भुट्टे का कीस
गराडू
चाट
गुलाबजामुन
स्टॉल
रबडी
म्हणजे हे सगळे पदार्थ एक एक करुन चाखायचे म्हटले तरी ४ दिवस रहावे लागेल. आम्ही थोडे पदार्थ खाल्ले. काय करणार मन हो म्हणत होते पण पोट नाही म्हणत होते. शेवटी पोटाचाच विजय झाला. ( नेहमीचच आहे ).
शेवटी पान मस्टच ! फुलचंद नाही म्हणून बनारस मीठा वर समाधान मानले.
पण पानाने कळस चढविला आणि आम्ही होटेल कडे मार्गस्थ झालो, उद्या राजवाडा बघायचाच हे ठरवुन !
क्रमशः
प्रतिक्रिया
2 Jan 2014 - 8:51 pm | आदूबाळ
आयला....सराफा बाजाराचं वर्णन वाचून कसंसंच झालं... :)
"फुलचंद" हा पारिभाषिक शब्द पुणे सोडल्यास बर्याच पानवाल्यांना कळत नाही. कलकत्ता पत्ता, किवाम, (कच्ची/पक्की/गीली) सुपारी वगैरे फोडून सांगावे.
2 Jan 2014 - 9:20 pm | लॉरी टांगटूंगकर
अगदी अगदी, उतारा म्हणून आत्ताच्या आत्ता नेहमीच्या मिठैवाल्याकडे चक्कर टाकतो.
माझं एक स्वप्न आहे, पानाच्या दुकाना समोर उभं राहून फुल्ल दोनेक पॅरेग्राफभर मोठ्ठं डीस्क्रीप्षन सांगून कस्टमाइझ पान बनवून घ्यायचं.
2 Jan 2014 - 10:23 pm | आनंदराव
चला , मला पण बोलवा पान खायला.
हमें क्या मालूम आप भी पान के शौकीन है...
16 Jun 2014 - 5:29 pm | सामान्यनागरिक
हे असलं पान फक्त औरंगाबादला तारा पान सेंटर वरच मिळेल. इतर ठिकाणी फक्त खांदे उडवुन हे असलं काही इथे मिळत नाही असं उत्तर मिळेल.
2 Jan 2014 - 10:14 pm | आनंदराव
बरं !
2 Jan 2014 - 9:41 pm | सूड
अर्र!! भूक चाळवली. ते गराडू काय प्रकरण आहे? आय मीन कसलं बनवतात काही आयडिया?
2 Jan 2014 - 10:21 pm | आनंदराव
गराडू म्हणजे उकडलेले सुरण तळून त्यावर चाट भुरभुरून देतात. हिवाळा सपशेल आयटम !
3 Jan 2014 - 12:36 am | कवितानागेश
माझ्या माहितीप्रमाणे गराडू/ गोराडू हा वेगळा कंद आहे. लहान असतो, सुरणासारखा मोठ्ठा नाही.
या दिवसात मिळतात. उन्धियोमध्ये घालतात.
19 Jan 2014 - 11:22 am | आनंदराव
उत्तर द्यायला उशिर झाला त्याबद्दल जाहीर माफी !
माहिती बद्दल धन्यवाद !
2 Jan 2014 - 10:22 pm | चित्रगुप्त
छान छान छान.
पुढे काय काय बघितलेत, वाचण्याची उत्सुकता आहे.
अहो, आम्ही मुळचे इंदुरचेच. अर्थात आमच्या लहानपणी होते, तसे इंदुर राहिले नाही म्हणा आता...
फोटो टाकताना तेवढे जरा लहान आकारात टाकावेत. सुमारे ३०० -४०० रुंदीचे. खूप भव्य दृष्य असेल तर ६००, फारतर ७००.
2 Jan 2014 - 10:26 pm | आनंदराव
हो हो. मिपा वर फोटो चिट्कवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पुढच्या वेळेला तुमच्या सुचनेचे पालन केले जाईल.
3 Jan 2014 - 1:23 am | अत्रुप्त आत्मा
खादाडीचे सर्व फोटो पाहून वारल्या गेलो आहे.
समांतर:- कॉलिंग खादाड कंपू...
इथे फक्त खाण्यासाठी १ अठवडा जाऊन र्हाण्याचा मानस आहे. कोण कोण येणार?
3 Jan 2014 - 8:34 am | कैलासवासी सोन्याबापु
इंदौर ला एक आठवडा कमी पडेल खायला!!! लाँग लिव्ह् लागतील!!!!, मायला आपण इंदौर ला सेट्ल होणार!!! मुळगाव पण जवळ ३-४ तासावर अन बेस्ट लाईफ!!!अन खाण्यापिण्याची मजा पर्फेक्ट "डीक्रा रानी तो पप्पानी" लाईफ!!!
3 Jan 2014 - 10:25 am | शैलेन्द्र
जोशी (की भट) का "दहीबडा" नाही खाल्ला? अहो तो ज्या पद्धतीने तो दहीवडा उडवतो, ते पाहण्यासारखे असते.
19 Jan 2014 - 11:23 am | आनंदराव
उत्तर द्यायला उशिर झाला त्याबद्दल जाहीर माफी !
नाही खाल्ला ! कारण, मनात जागा असली तरी पोटात पाहिजे ना ..
3 Jan 2014 - 11:10 am | मृत्युन्जय
कचोरी नाही खाल्ली? कचोरी नाही? इंदौरला जाउन कचौरी नाही? फाउल आहे हा. अमरनाथ ला काउन पिंडीचे दर्शन न घेण्याइतका मोठा फाउल समजावा. या एका कारणासाठी तुला मायनस १०. बाकी लेख फक्कड. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जीव जळाला.
19 Jan 2014 - 11:25 am | आनंदराव
कार्यबाहुल्यामुळे उत्तर द्यायला उशिर झाला त्याबद्दल जाहीर माफी !
खाल्ली ना... दुसर्या दिवशी.
3 Jan 2014 - 11:20 am | सुहास..
+१ टु मृत्युंजय !!
शिवाय एकुलत्या एक असलेल्या अन्नपुर्णा मंदिरातही दर्शन झालेले दिसत नाही :)
3 Jan 2014 - 11:39 am | आनंदराव
म्रुत्युन्जय काचोरि खालि विजाया चात हाउस मध्ये! फोतु नाहि काधला खान्याच्या नादात!!!
3 Jan 2014 - 11:50 am | नीलकांत
इंदोर म्हणजे राजवाडा हे तर नक्कीच आहे. मात्र तसाही इंदोरच्या कुठल्याही भागात खवैय्यांची काळजी घेणारी अनेक स्थळे आहेत. चाट आणी चटपटासाठी राजवाडा आणि ५६ भोग (एम.जी. रोड) हे उत्तम आहेत. या ५६ च्या बा़जूच्या चौकात स्वा. सावरकरांचा मस्त पुतळा आहे. मुळात एकदा मला इंदोर मध्ये एकूण पुतळे किती हे मोजायचे आहेत :) प्रत्येक चौकात एक पुतळा या प्रमाणात पुतळे आहेत येथे.
मांसाहारी खाण्याचे शौकीन असाल तर पलासीया चौकातील नफीस, विजय नगर ते सुखलीया दरम्यान सयाजीच्या समोरच्या बाजूच्या गल्लीत असलेल्या केसुर रावली सरोई उत्तम आहे ( ही ऐकीव माहिती, मला सापडलंच नाही हे होटल)
टावर चौकातील ( सपना संगीता थियेटराजवळ) पिशोरी हे पंजाबी ढाबा टाईप रेस्टॉरंट, एकदम झकास आहे. येथील बोटी चिकन, खास पाया सुप, फिश फ्राय, चिकन काटी कबाब अगदी लाजवाब.....
बाकी जैन नमकीन मधील वेगवेगळ्या स्वादाचे नमकीन छानच, अपना नमकीन नावाचे दूकान मस्तच आहे.
तुमची इंदोर वारी पुढील भागात वाचायला उत्सुक आहेच. कुठे गेलात काय पाहीले?
- नीलकांत
3 Jan 2014 - 3:59 pm | कपिलमुनी
प्रत्येक शहरात एक असतोच !!
19 Jan 2014 - 11:26 am | आनंदराव
उत्तर द्यायला उशिर झाला त्याबद्दल जाहीर माफी !
परत जायला लागणार आहे. हे सगळे खायला ....
3 Jan 2014 - 12:08 pm | वेल्लाभट
आह........ इंदोर... खाऊ.... खाऊ.... आणि खाऊ.......
सुंदर.... फोटो अजून चालतील की. तेवढीच व्हर्च्युअल सहल आमची...
19 Jan 2014 - 11:27 am | आनंदराव
उत्तर द्यायला उशिर झाला त्याबद्दल जाहीर माफी !
पुढच्या भागात टाकतो ...
3 Jan 2014 - 3:09 pm | मोदक
५६ दुकानमध्ये वेगवेगळ्या स्वादाची पाणीपुरी खाल्लीत का..?
माझे खादाडीचे फटू देवू काय..?
19 Jan 2014 - 11:28 am | आनंदराव
उत्तर द्यायला उशिर झाला त्याबद्दल जाहीर माफी !
खाल्ली... पुढच्या भागात लिहितोय.
11 Jan 2014 - 4:53 pm | पैसा
पुढचा भाग?
11 Jan 2014 - 6:26 pm | राही
मुंबईतले गुजराती लोक कोनफळाला गोराडुं किंवा गोरा कंद म्हणतात. कोनफळातही दोन प्रकार असतात. एक जमिनीतला कंद आणि दुसरा म्हणजे या कंदातून उगवलेल्या वेलीवर पानाच्या अॅक्सिल मध्ये फुललेल्या फुलापासून तयार झालेले वेडेवाकडे कंदसदृश गोळे. (करांद्यासारखे.) याला काही लोक भेबडें म्हणतात. ही भेबडेसुद्धा कोनफळासारखीच लागतात. ऊंधियुंत कोनफळ वापरतात, सुरण नव्हे.
सराफा बाजारचे वर्णन वाचून आणि पाहून थंडीत जठराग्नि चाळवला.
कै. 'भोचक' यांची आठवण आली.
पुढील लेख लवकर येऊ द्यात.
19 Jan 2014 - 11:29 am | आनंदराव
उत्तर द्यायला उशिर झाला त्याबद्दल जाहीर माफी !
उत्तम महिती दिलित.... धन्यवाद !
16 Jun 2014 - 5:32 pm | सामान्यनागरिक
प्रत्येक वाक्य ' हमारे ईंदोर में ऐसा होता है........ किंवा कभी नही होगा.....' असे सुरु होते आणि संपते
17 Jun 2014 - 2:05 pm | तुमचा अभिषेक
फोटो फारसे क्लीअर नसूनही सारे पदार्थ चविष्ट वाटताहेत, :)
ईंदोर बोले तो खादाडी हे गणित आधी माहीत नव्हते .. येऊद्या दुसर्या दिवशीचेही..
15 Aug 2014 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उद्या इन्दोरला चाललो काय खाऊ काय पाहू ते सांगा नंतर तक्रार चालणार नाही.
16 Aug 2014 - 4:41 pm | कंजूस
रबडिवाले पदार्थ खा .काचमंदिर बारानंतर पाहता येईल .राजवाडा आहेच .माहेश्वर /मांडू जाऊन येण्यापेक्षा तिथे राहिलात तर मजा येईल .विशेषत: पाऊसानंतर मांडू मस्तच असेल .महाकाळेश्वर/ओंकारेश्वरच्या दर्शनाची शक्यता श्रावणामुळे देता येत नाही .
16 Aug 2014 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
on the way indor !