गाभा:
यासिन व रियाझमधील फोन संभाषण
यासिन: भाईजान... एखाद्या छोट्या अणुबॉम्बची व्यवस्था करता येईल का?
रियाझ: नक्कीच करता येईल. पाकिस्तानाच कुठल्याही गोष्टीची व्यवस्था होऊ शकते.
यासिन: सुरत शहर उडवता येईल, असा अणुबॉम्ब मला हवा आहे.
रियाझ: पण त्यात मुसलमानही मारले जातील.
यासिन: हल्ल्याच्या आधी आपण मशिदीत पोस्टर लावू आणि मुसलमान लोकांना गुपचूप शहर सोडण्याच्या सूचना देऊ.
अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Indian-Mujahideen-wanted-t...
हे सर्व भयानक आहे असे वाटत नाही का?
प्रतिक्रिया
30 Dec 2013 - 12:28 pm | आदूबाळ
यासिन लहानपणी डोक्यावर पडला होता का?
30 Dec 2013 - 12:31 pm | वेताळ
पेप्रात काहीपण बातम्या देतात. अणुबॉम्ब इतका सहजासहजी वापरता आला असता तर अक कायदाने त्याचा वापर सर्वात प्रथम केला असता.
30 Dec 2013 - 12:37 pm | थॉर माणूस
>>>हे सर्व भयानक आहे असे वाटत नाही का?
त्यापेक्षा हे सर्व दिवास्वप्न आहे असे वाटते आहे. :)
कै च्या कै पुड्या सोडतोय तो येडा. असल्या गप्पा कुणीही मारतं. कितीतरी लोकांना पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवून टाकायला हवे वगैरे गप्पा मारताना पाहिले आहे. अगदी कसे आक्रमण करावे याच्या चर्चा करताना सुद्धा. हे संभाषणसुद्धा अशाच शिळोप्याच्या गप्पा आहेत बाकी काही नाही.
30 Dec 2013 - 12:50 pm | गवि
हे संभाषण मुळात घडताना रेकॉर्ड झालेलं आहे की यासिनने जबाबात स्वतः वर्णिलेलं आहे?
जर संभाषणच रेकॉर्ड झालं असेल तर सिलेक्टिव्ह, उत्कंठावर्धक अन धक्कादायक अशी फक्त पहिली तीनचार वाक्यंच का उघड केली गेली आहेत. पुढे उत्तर काय आलं आणि कन्क्लुजन काय झालं हा भाग कुठेशी आहे?
पकडला गेलेला अतिरेकी आपण आणखी कायकाय करणार होतो (जे घडलेच नाही) याची सत्य माहिती तपशीलवार पोलीसांना का सांगेल? आणखी गाळात जाण्यासाठी का?
.. या आधी प्रत्यक्ष घडवलेल्या कारवायांबद्दल कबुली देणे / पोलीसांनी ती मिळवणे हे समजण्यासारखं आहे.
पण..
30 Dec 2013 - 1:11 pm | सुहास झेले
हसा लेको सदरातील विनोद मुख्य पानावर आलाय चुकून ;-)
30 Dec 2013 - 1:17 pm | जेपी
मटा वर कितपत विश्वास ठेवावा ???
30 Dec 2013 - 1:28 pm | क्लिंटन
अणुबॉम्ब म्हणजे एखाद्या मोठ्या हल्ल्यासाठीचा सांकेतिक शब्द असेल असे वाटते.पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात अत्याचार केले त्यासंदर्भात पाकिस्तान सरकारने हमिद-उर-रेहमान कमिशन स्थापन केले होते.त्या कमिशनच्या अहवालात पाकिस्तानी सैन्य सामान्य बंगाल्यांना ठार मारणे याला 'बांगलादेशात पाठविणे' असा सांकेतिक शब्द वापरत असे असे वाचल्याचे आठवले. अणुबॉम्ब टाकणे वगैरे शक्य नाही हे मान्य पण भटकलचा पूर्वेतिहास लक्षात घेता तो मोठ्या हल्ल्यासाठीची तयारी करत असेल असे वाटते आणि त्यासाठी अणुबॉम्ब हा एखादा सांकेतिक शब्द असावा (असा तर्क)
30 Dec 2013 - 1:30 pm | मृत्युन्जय
रियाझ आणि यासिन असे बोलले असे पोलिस तपासात समोर आले असे टाइम्स चे म्हणणे आहे आणि ते खोटे असण्याचे कुठलेही कारण सकृतदर्शनी दिसत नाही. पण रियाझ आणि यासिन दोघेही डोक्यावर पडले असावेत किंवा स्वतःला मतिमंद अथवा मनोरुग्ण सिद्ध करुन स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी यासिन असे काहितरी बडबडत असेल असे वाटते. बातमी खरी असेल पण भटकळचे प्लॅन्स कितपत व्यवहार्य असेल शंका आहे.
अणु बाँब असा सहजी प्लँट करता येतो का ते माहिती नाही. तो काही टाइम बाँब सारखा पेरता येत असेल असे वाटत नाही. पण असुही शकेल. आजकाल काहिही शक्य होउ शकते. तसे असेल जरी तरी भटकळची बाप माणसे जी पाकिस्तानात बसली आहेत ती असले काही चाळे करु देतील् असे वाटत नाही. भारतात बाँबस्फोट करणे वेगळे आणि थेट अणु युद्ध पुकारणे वेगळे. तसे काही झाल्यास त्याचे काय भयंकर परिणाम होतील हे डोके अधू नसलेला कुठलाही माणूस समजु शकेल. त्यामुळे पाक सरकार असल्या काही कार्यक्रमाला मंजूरी देइल असे वाटत नाही आणि सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय अणु बाँब हस्तगत करणे अवघड आहे. तो काही बाजारात गाजर मूळ्यासारखा विकायला ठेवत असतील असे वाटत नाही.
असो. असोच.
30 Dec 2013 - 2:04 pm | मदनबाण
अणुबॉम्ब चा वापर करणे शक्य नाही,पण Dirty bomb चा वापर केला जाउ शकतो. मध्यंतरी कुठलीशी बातमी वाचली होती की रुग्णालयात उपचारासाठी वापरली जाणार्या उपकरणांमधे असलेल्या रेडिओ अॅक्टीव्ह मटेरिअलचा स्फोट झाल्याने एका भांगारवाल्याच्या जीवावर बेतले होते. अश्या प्रकारचे मटेरिअल जर इतक्या सहजपण भंगारवाल्या पर्यंत पोहचत असेल तर अतिरेकी लोकांनाही ते मिळु शकणार नाही याची खात्री देता येणे कठीण आहे.तसेही पाकड्यांचे उध्योग आपण इतके वर्ष पाहतो... ते तर कुठल्याही थराला जाउ शकतात.पाकिस्तान २६/११ च्या वेळेस अणुबॉब्मचा वापर करण्याच्या विचारात होता हे देखील आपल्याला ठावूक आहेच.
30 Dec 2013 - 2:41 pm | इष्टुर फाकडा
हेच लिहायला आलो होतो !
30 Dec 2013 - 2:22 pm | सूड
>>सुरतवर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लान होता ?????
काय सांगता?? =))))
31 Dec 2013 - 12:43 pm | तिमा
समजा, त्यांनी अणुबाँबचा स्फोट केला असता, तरी भारत सरकार नुसता निषेध करुनच गप्प बसले असते याबाबत काही शंका नाही.
31 Dec 2013 - 5:07 pm | श्रीगुरुजी
>>> समजा, त्यांनी अणुबाँबचा स्फोट केला असता, तरी भारत सरकार नुसता निषेध करुनच गप्प बसले असते याबाबत काही शंका नाही.
आणि त्याचबरोबर "अशा अणुबॉम्बच्या वापरामुळे भारत शांतता प्रकिया अजिबात थांबविणार नाही. आम्ही शांतता प्रक्रिया पुढे सुरूच ठेवू" असे पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावले असते.
"ऐसे बडे शहरोमें ऐसे छोटे छोटे हादसे होते ही रहते है" असे आबा म्हणाले असते.
31 Dec 2013 - 1:08 pm | पिंगू
मटामधल्या बातमीवर कितपत विश्वास ठेवावा? च्यायला हे लोक कायपण छापायला पुढेमागे बघणार नाहीत.
31 Dec 2013 - 5:42 pm | निनाद मुक्काम प...
माझ्या मते
एका अतिरेक्याने भारतात अणू बॉंब टाकण्याची इच्छा त्याच्या बॉस कडे व्यक्त केली.
आता हिरोशिमा चा इतिहास सगळ्यांना माहीत असल्याने
अणू बॉंब हे कुठल्याही देशाला व दहशतवादी संघटनांना
अमोघ अस्त्र वाटते ,
त्यामुळे त्याने अशी इच्छा व्यक्त करणे त्याच्या कट्टर भारत विरोध मानसिकता पाहता साहजिक आहे ,
पण जेव्हा त्याचा बॉस पाकिस्तानात काहीही अशक्य नाही असे म्हणतो तेव्हा हेच वक्तव्य अण्वस्त्र पाकिस्तानात
सुरक्षित नाहीत ,ते दहशतवाद्याच्या हाती जाऊ शकतात असे भारत व अमेरिका सातत्याने आरोप जागतिक व्यासपीठावर करत असतात , तेव्हा दोन शक्यता निर्माण होतात
पहिली अशी अण्वस्त्र मुक्त पाकिस्तान हे सामाईक स्वप्न साकार करण्यासाठी भारत व अमेरिका उगाच
पाकिस्तानवर आरोप करतात किंवा खरेच ह्या आरोपात तथ्य असू शकते.
आणि दुसरी शक्यता खरी मानली तर वरील संभाषण हे दिवास्वप्न मानाने मूर्खपणाचे ठरेल ,
डर्टी बॉंब व त्याने एखादे शहर उध्वस्त करणे अश्या धर्तीचे कथानक परदेशी व भारतीय सिनेमामध्ये दाखवले आहे ,
तेव्हा आपण वाईट शक्यता लक्षात घेता खबरदारी बाळगली पाहिजे
मुळात ह्या संभाषणाचा मोदी ह्यांना गुजरात पर्यायाने भारतात फायदा होणार ,ते सुद्धा मुस्लिम मुलीचे दहशतवाद्यांच्या समवेत कंठस्नान घातले. ह्यावरून
अर्थात सध्या सरकारी सी बी आय व
मोदी ह्यांना सहानुभूती असणारे आयबी ह्यांच्यात शीत युद्ध चालू आहे ह्या पार्श्वभूमीवर हे संभाषण बाहेर आले आहे , त्या सत्याचा अंश की ह्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे
मोदी ह्यांना ह्यांचा राजकीय फायदा होणार . मात्र आपल्या गुप्तचर संस्थांना अधिक निधी पुरवून अधिक अधिकार देणे व त्याच्या पाठी सरकारने ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे..
1 Jan 2014 - 3:15 pm | सुबोध खरे
यासीन भटकळ संभाषण हे काही वृत्तपत्रे किंवा टीव्ही वर सनसनाटी बातमी देण्यासाठी असेल असे वाटत नाही. दहशतवादी लोकांचा मूळ हेतू हा जनतेत दहशत फैलावून आपले काम साध्य करणे असते. यात अणुबॉम्ब प्रत्यक्ष असलाच पाह्हीजे असे नाही. कारण अणुबॉम्बच्या अस्तित्वामुळे जितकी दहशत निर्माण होते ती त्याच्या प्रत्यक्ष वापरामुळे होत नाही. दहशत वाद्यांचा मूळ हेतू असा डर्टी बॉम्ब वापरून दहशतीचे वातावरण निर्माण करणे हा आहे http://en.wikipedia.org/wiki/Dirty_bomb या मदनबाण यांनी दिलेल्या दुवयात म्हटल्याप्रमाणे जर काही किरणोत्सारी द्रव्ये दहशतवाद्यांच्या हातात लागली आणी त्यांनी सुरत शहराच्या पाणी पुरवठ्यात ती मिसळली आणी जनतेत बातमी पसरविली तर प्रचंड घबराट निर्माण होईल कोणी तंत्रज्ञ GM (GEIGER MULLER) कौंटर घेऊन तेथे गेला तर पाण्यात किरणोत्साराचा उत्सर्ग होत आहे हे दिसेल. आणी मग त्याचा प्रभाव कितीही कमी असेल तरी आपली जनता सुरत शहर रिकामे करील.जेथे गणपती दुध पितो किंवा येशूच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत हे पाहायला लक्ष्वधी लोक आपली सारासार बुद्धी गहाण ठेवून गर्दी करतात तेथे काय होणार? बाहेरचे कामगार आप आपल्या राज्यांमध्ये परत जातील. बाटलीबंद पाण्याला पेट्रोल पेक्षा जास्त भाव द्यावा लागेल. तेथील उद्योगधंदे बंद होतील. म्हणजेच दहशतवाद्यांचा हेतू साध्य होईल.
यासीन काही डोक्यावर पड्ल्या मुळे असे वक्तव्य करीत असेल असे वाटत नाही. आय एस आय सारखी संघटना जिच्यावर तिथल्या लष्कराचे सुद्धा पूर्ण नियंत्रण नाही आणी ज्यातील लोकांचे दहशतवादी संघटनेशी संधान आहे हे सिद्ध झालेले आहे अशा संघटनेकडून किरणोत्सारी द्रव्ये मिळवणे त्याना तितके अशक्य नाही. जर ते भारताच्या आर्थिक राजधानीत समुद्रमार्गे येऊन पंचतारांकित हॉटेलात लोकांना ओलीस ठेवू शकतात तर हे मुळीच अशक्य नाही.
मी जैविक किंवा रासायनिक बॉम्ब बद्दल बोलतच नाही.जैविक बॉम्ब ला गरीबाचा( गरीब राष्ट्राचा) अणू बॉम्ब म्हणतात,
कल्पना करा कि सुरतच्या पाणीपुरवठ्यात पोलियोचे विषाणू मिसळले तर महत्प्रयत्नाने ज्या रोगाचे निर्मुलन होण्यापर्यंत आलो तो रोग सुरतच्या भावी पिढीला अक्षरशः पांगळे करेल.
सरीन किंवा सोमन सारख्या रासायनिक द्रव्याचा एक (डीओ स्प्रे) फवारा जर मुंबईत सी एस टी च्या स्थानकात नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या जमावात मारला तर तर काही डझन लोक तत्काळ (१-१० मिनिटात) मृत्यू मुखी पडतीलआणी त्यांना किंवा जे जगतील त्यांनासुद्धा समजणार नाही काय झाले ते. ( एक डीओ स्प्रे विमानातून आणणे किती अवघड आहे?) आता प्रर्यंत असे हल्ले झाले तेंव्हा ते हल्लेखोर दुरून त्याचे नियंत्रण करीत असत. पण आता आत्मघाती हल्ल्यात दहशतवादी प्रत्यक्ष हजार राहून असे करत आहेत तेंव्हा त्याचा विध्वंस किती जास्त असेल?
तेंव्हा एखादा दहशतवादी जेंव्हा असे म्हणतो तेंव्हा ती केवळ पोकळ वल्गना आहे असे गृहीत धरून चालत नाही. गुजरातमध्ये काहीही झाले तरी नरेंद्र मोदींना त्याचा फायदा होणार आहे किंवा मुसलमानांविरुद्ध कट आहे असे म्हणणे म्हणजे अशा गोष्टींचा राजकीय स्वार्था साठी वापर करणे होय. या गोष्टींपासून राजकारण वेगळे ठेवावे असे मला वाटते. तसेच सगळे मुसलमान दहशतवाद्यांशी हात मिळवून आहेत हा ९९. ९% राष्ट्रप्रेमी मुसलमानांवर अन्याय आहे. अशाने जे मुसलमान खरोखर दहशत वादाविरोधात उभे राहणार असतील त्याना दूर लोटले जाईल.
अशा परिस्थितीत आपल्याला खरी गरज आहे ती राजकीय स्वार्थ दूर ठेवून देशभक्ती असण्याची. आपण आपसात कितीही भांडत असू पण परकीय शक्तीशी लढताना राजकीय स्वार्थ दूर ठेवून एकत्र होणे आवश्यक आहे. महाभारतात आपण हेच शिकलो कि बाहेरच्या लोकांसाठी आम्ही एकशे पाच आहोत पण ते जर प्रत्यक्ष व्यवहारात आणू शकलो नाही तर त्या शिक्षणाचा काय फायदा?
1 Jan 2014 - 3:31 pm | आदूबाळ
+१
काय सुंदर प्रतिसाद आहे!
1 Jan 2014 - 3:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
देशप्रेमापेक्षा पक्षप्रेम आणि / किंवा स्वार्थ वरचढ समजून व्यक्तव्य आणि कृती करणारे लोकच भारताचे खरे शत्रू आहेत. आणि असे करण्याने ते स्वतःचे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचेही नुकसान करत असतात हे समजण्याइतकीही बुद्धी त्यांच्याकडे नाही हे भारताचे खरे दुर्दैव.
1 Jan 2014 - 4:34 pm | अर्धवटराव
जगाच्या कानाकोपर्यात सदासर्वकाळी असच सो कॉल्ड राजकारण चालत आलं आहे, पुढेही हे असच होत राहणार. एक देश म्हणुन भारताची केस स्टडी केल्यास आज जे काहि आपल्या राजकारणात होत आहे ते तसच होणार होतं. भारत म्हणजे संघटीत युरोपखंड आहे. या क्षेत्रात देशप्रेम कधिच एकात्मतेचा धागा नव्हता. त्याचं कलम चढलं इंग्रजी अम्मलामुळे. पण त्यामुळे ६०-७० वर्षात एतद्देशीयांची, खास करुन अंमलदारांची मानसीकता थोडीच बदलणार आहे. पक्षीय/क्षेत्रीय राजकारणावर देशकारणाने वरचढ व्हायचं असेल तर देशकारणातले फायदे इन्टेसली दृगोच्चर व्हायला हवे. त्याशिवाय विकासाभिमुख देशप्रेम डेव्हलप होत नाहि. देशकारणाचे प्रयत्न चिकाटीने राबवल्या गेलेत, अजुनही होताहेत. पण ज्यांनी हि धुरा वाहायची त्यातले अर्धे लोकं घराणेशाहिच्या मानसीकतेत अडकले, इतरांना गतवैभवाचे गोडवे गाण्यापासुन फुरसत नाहि आणि जुन्या-नव्याचा योग्य संकर करण्याची दृष्टी नाहि. उरले सो कॉल्ड मायनॉरिटीज, तर ते आपल्या केवीलवाणेपणात सुरक्षा शोधणार त्यामुळे दूरदृष्टीची शक्यताच मावळते. हि सगळी भारतीय मानसीकतेची व्यवच्छेदक लक्षणं आहेत, त्यापासुन आपली इतक्या लवकर सुटका नाहि.
1 Jan 2014 - 4:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
आय डिस अग्री अर्धवटराव!!!, एकात्मता ही अगदी वैदिक काळा पासुन किंवा सिंधु संस्कृती पासुन नसेल पण इंग्रज यायच्या आगोदर एकात्मतेचा भाव टोटल मिसिंग होता असं नाही म्हणता येणार, अर्थात मी इथे चाणक्य त्याचे अखंड भारताचे स्वप्न वगैरे टकळी नाही लावणार पण एका वेगळ्या अँगल ने विचार करा, बारा ज्योतिर्लिंगे ?? मुख्य सण (भले साजरे करायची कर्मे प्रत्येक ठीकाणी वेगळी असतील)? आपण फक्त भाषिक फॅक्टर वर बोलतो अन त्या आधारावर "भारतात एकात्मतेचा भाव नाही" ह्य निष्कर्षाला येतो. मला वाटते इंग्लिश लोक येणे हे फक्त एक संप्रेरक (कॅटॅलिस्ट) म्हणुन ठळकपणे दिसते, एकात्मतेची भावना सुप्त होती कारण ती इंग्रज यायच्या आधी कधी वर यायची गरजच नव्ह्ती पडलेली, इंग्रज आले ते "व्हाईट मॅन्स सुपिरियॉरीटी" थेरी घेऊन. हा एक माझा विचार आहे.
1 Jan 2014 - 4:56 pm | बॅटमॅन
पोलिटिकल एकात्मतेची भावना = देशप्रेम असे समीकरण रूढ झाल्याने तसे प्रतिसाद येणारच. चाणक्य वैग्रेंसारख्यांनी अखंड भारताचा विचार केला होता. शिवाय सांस्कृतिकदृष्ट्या एकीकरणाचा विचार कायम दृढमूल होताच.
युरोपातली टीचभर राज्ये आणि त्यांचा राष्ट्रवाद आपल्यापेक्षा अगदी वेगळा आहे. त्या चष्म्यातून इकडे बघितले की तसे वाटणारच पण मुळात तो चष्मा लावणेच चूक आहे. इंग्रज येण्याआधी भारत जणू डिसकनेक्टेड होता हे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. पोलिटिकल एकात्मतेची कल्पना युरोपियन आहे आणि तीही गेल्या चारेकशे वर्षांत उदयास आलेली आहे. भारत म्हणजे संघटित युरोपखंड आहे हे वाक्य पटणेबल आहे पण देशप्रेम भारतात पॅन इंडियन लेव्हलवर कधीच नव्हते हे वाक्य तितकेच चुकीचे आहे.
अगदी युरोपातदेखील रेनेसाँ होण्याअगोदर ही भावना नव्हतीच. समाज, भाषा, संस्कृती आणि राजकीय प्रभाव या चार गोष्टी युरोपियन चष्म्यातून पाहिले तर एका जागीच असतात. त्यांपैकी एक सोडून अन्य गोष्टींनीही संस्कृती/समाज बनू शकतो हे त्यांच्या पचनीच पडत नाही.
पण दुर्दैवाने अभ्यासक्रमांतून हे कधी शिकवले जात नाही जे की शिकवले गेले पाहिजे. अलीकडची फ्याशन आहे ती. तरी काही ठिकाणी उदा. शेल्डन पोलॉकच्या पुस्तकांमध्ये थोडाथोडा वेगळ्या सिस्टिमचा स्वीकार केला गेलेला दिसतो. तो एक स्वागतार्ह बदल आहे.
1 Jan 2014 - 5:57 pm | अर्धवटराव
एक्का साहेबांचा मूळ मुद्दा, कि पक्षीय वा तत्सम संकुचीत फायदे देशप्रेमावर वरचढ का होतात. त्याचं कारणच असं आहे कि आपल्याकडे देशकारण हे राजकारणाभोवती गुंफलं गेलं नव्हतं. इंग्रजांपूर्वी आपल्या देशपातळीवरील ऐक्याचा पाया आपली संस्कृती होती (अजुनही आहे). इंग्रज आल्यानंतर आपल्याला राजकारणामार्फत ऐक्य साधण्याची गरज भासली व त्याकरता प्रयत्न झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले व आपण फॉर्मली देशकारणाला राजकारणाचं इंजीन जोडलं. पण अजुन पावेतो हा बदल भारताच्या मानसीकतेत म्हणावा तेव्हढा झीरपला नाहि कारण आपल्या राजकारणाची, अंमलादारीची जुनी व्यवच्छेदक लक्षणं अजुनही गळुन पडली नाहित.
1 Jan 2014 - 6:04 pm | बॅटमॅन
अर्थात, याच्याशी सहमत आहे. काही लोकांच्या मनात हा ऐक्यभाव नांदत असेलही पण न झिरपण्याचे कारण तुम्ही म्हणता हे आहेच.
1 Jan 2014 - 4:59 pm | अनिरुद्ध प
+१११ आम्ही १०५ हिच निती योग्य वाटते.
2 Jan 2014 - 2:41 am | निनाद मुक्काम प...
गुजरातमध्ये काहीही झाले तरी नरेंद्र मोदींना त्याचा फायदा होणार आहे किंवा मुसलमानांविरुद्ध कट आहे असे म्हणणे म्हणजे अशा गोष्टींचा राजकीय स्वार्था साठी वापर करणे होय. या गोष्टींपासून राजकारण वेगळे ठेवावे असे मला वाटते.
तुमची येथे काहीतरी गल्लत झालेली दिसत आहे.
राजकारणात जेव्हा समाजात एखादी घटना कोणत्याही स्तरावर झाली तरी त्याचा आपसूकच परिणाम होतो.
राजकारण हे समाजात घडणाऱ्या गोष्टींपासून अलिप्त राहू शकत नाही कारण राजकारण हे समाजातील माणसांवर आधारित आहे. मग ती माणसे प्रत्यक्ष जनता असो किंवा पक्षाचे कार्यकर्ते किंवा पक्षाला निधी पुरवणारा व्यापारी असोत.
एक उदाहरण देतो
फार पूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटलांचे विधान आले.
कि मला मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव दिसत आहे.
ह्या एका विधानाने जनतेत योग्य तो संदेश गेला.
व पुढे निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली. तेव्हा आता सारखी आक्रमक प्रसार माध्यमे व शब्दांचा कीस काढणारे पत्रकार किंवा तथाकथित राजकीय तज्ञ छोट्या पडदा व्यापून नव्हते.
आता सुद्धा हे संभाषण जाहीर झाले , तेव्हा
मोदी ह्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला किंवा नाही केला तरी जनतेच्या मनावर एक दडपण व टांगती तलवार राहणार , पुढे निवडणुकीत जनता आपल्या नेत्यात कणखर व आक्रमक नेतृत्व हे समंजस ,शांत नेतृत्वापेक्षा जास्त शोधणार म्हणजे पर्यायाने मोदी ह्यांना आपसूकच फायदा होणार , हे जाहीर आहे.
हि एक घटना नाही तर अश्या अनेक छोट्या मोठ्या घटनांची नोंद जनता घेत असते म्हणूनच निवडणुकीत कधीकधी एखादी लाट निर्माण होते.
ह्या संभाषणाचा कोर्टवर नाही पण प्रसार माध्यमावर
नक्कीच परिणाम होईल. कारण एका निरपराध मुलीला गुजरात मध्ये दहशतवादी म्हणून मारले अशी आवई उठवणाऱ्या लोकांनी आता ह्या संभाषणाची बातमी दिली आहे.
म्हणजे जे लोक सुरतवर अणुहल्ला करण्याची गोष्ट करतात , ती लोक मोदी ह्यांचा घातपात करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतात. हि भावना जनतेत प्रबळ होईल व ती मुलगी निरपराध होती का हा मुद्दा आपसूकच मागे पडेल.
कोणत्याही घटनेचे पडसाद हे उमटतात.
मी वरती लिहिले अगदी तसेस होईल असा माझा दावा नाही मात्र असे घडण्याची शक्यता आहे.
जेव्हा पाकडे पंत प्रधान शरीफ नुकतेच काश्मीर विषयी बरळले , तेव्हा मनमोहन ह्यांनी माझ्या हयातीत असे घडणे शक्य नाही. हे जेव्हा म्हटले तेव्हा कोणीही त्यांच्यावर हे स्वतःचे नंबर वाढवत आहे असा आरोप केला नाही. कारण देशाचा पंत प्रधान ह्या नात्याने असे बोलणे हे अपेक्षित होते.
आज मोदी ह्यांच्या राज्यात एका शहराला निशाणा दहशतवादी संघटना मोदी ह्याच्या राजवटीला दोषी मानून करण्याची गोष्ट करत असेल तर येथे आपसूकच मोदी ह्यांचा संबंध येतो. त्यावर मोदीं ह्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून एखादे वक्तव्य जर केले तर ते देखील सयुक्तिक आहे.
2 Jan 2014 - 10:50 am | मदनबाण
तसेच सगळे मुसलमान दहशतवाद्यांशी हात मिळवून आहेत हा ९९. ९% राष्ट्रप्रेमी मुसलमानांवर अन्याय आहे.
प्रचंड सहमत ! इथे यासिन आणि त्याच्या सारख्या पिल्लावळीचे हे उध्योग आपण पाहतोय तर तिथे नागपरात जवळपास २००० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक राहत आहेत ! जे इथे आले पण परत कधीच गेले नाहीत. आपला देशात तर आओ जाओ घर तुम्हारा ही है ! असे म्हणावे अशी स्थीती आहे,बांग्लादेशी लोकांची आपल्या देशातील संख्या किती हे जरा गुगलबाबाला विचारुन तर पहा !
संदर्भ :- 2,000 visiting Pakistanis overstaying in Nagpur माझ्या माहिती प्रमाणे किती पाकिस्तानी नागरिक राहत आहेत याची आरटीआय याचिका दाखल करणारा हा एक मुसलमान व्यक्तिच आहे.