दिवस आठवले आपल्या जुन्या मैफिलीचे.....

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture
पंडित मयुरेश ना... in जे न देखे रवी...
20 Dec 2013 - 8:07 pm

सुर पडता कानावर बासरीचे
ढवळुन निघते भावविश्व अंतरीचे
लेखणीतुनी मांडतो दु।ख मनीचे
आठवती दिवस आपुल्या मैफिलीचे.......

नवखे होतो आपण सारेच येथे
धडपडत होतो आपण सारेच येथे
नवनिर्मीतीची होती कास मनी
खुप यश मिलवण्याचा ध्यास मनी

कधी भेट झाली कधी मित्र झालो
कधी सुर जुळले कधी एक झालो
काही होते खास तुझ्यात काही मझ्यात
काही होते खास आपल्यात

रियाज झाले, बैठका झाल्या
कागदावरी काही कविता आल्या
सुराला शब्द शब्दाला सुर भेटले
पहिल्या मैफिलीचे तेथेच ठरले

पहिला कार्यक्रम, दुसरा कार्यक्रम
बोलता बोलता तीन कार्यक्रम झाले
नुसते झाले नव्हे यशस्वी झाले
नाहि! आपण यशस्वी केले

तुझे स्वप्न होते ध्येय होते
झगडालास तु खुप त्यासाठी
मेहनत तर तुझी होतीच
पण आई-वडिलांचे आशिर्वाद होतेपाठी

तुझ कौतुक पाहिल तुझ यश पाहिल
कि मनाला खुप बर वाटायच
कोणीतरी एक किल्ला लढवतोय
यातच समाधान वाटायच

आपल्या वाटा बदलल्या
आपली क्षेत्रही बदलली
सगळ काही बदलल
पण तु मात्र नाहि बदललास

परवा अशीच एक मैफिल दिसली
वाद्यवव्रुंदावनाने होती सजलेली
अजुन थोडा कानसेन आहे मी
म्हणुनच माझी पावले तेथे थबकली

झक्कास झाली जुगलबंदी
युद्धच झाले तबला अन बासरीचे
ओळखीचे सुर कानी पडताच
दिवस आठवले आपल्या जुन्या मैफिलीचे.....

- स्वरचित कविता माझे परममित्र बासरी वादक कै.अमोल देवगावकर यांना समर्पीत.

कला

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Dec 2013 - 9:56 pm | मुक्त विहारि

तुमच्या मनांतील , कै.अमोल देवगावकर , यांच्या बाबतीतल्या भावना व्यवस्थित लिहील्या आहेत.

अमेय६३७७'s picture

20 Dec 2013 - 10:03 pm | अमेय६३७७

आर्तता समर्थरित्या व्यक्त झालीय. अशी मैत्री सहजसाध्य नाही.

तिरकीट's picture

20 Dec 2013 - 10:59 pm | तिरकीट

सुंदर

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture

21 Dec 2013 - 7:16 pm | पंडित मयुरेश ना...

सर्वांनाच प्रतिक्रिये बद्दल धन्यवाअद

पैसा's picture

24 Dec 2013 - 3:17 pm | पैसा

सुरेख!

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture

24 Dec 2013 - 6:36 pm | पंडित मयुरेश ना...

दिल्यात सुरेख प्रतिक्रिया
तुम्हि माझ्या कवितेला
दाद खर तर दिलीत तुम्हि
माझ्या मनातल्या भावनेला