सोने : बघावे, घ्यावे की -----

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
20 Dec 2013 - 6:49 pm
गाभा: 

एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.-

आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या
व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या
बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे
काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे
क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच. खरे तर सोने
हा काही माझ्या आकलनाचा प्रांत नाही पण तरीही जागतिक बाजारांत मागणी पुरवठा
तत्वावर मोठ्या प्रमाणांत व्यवहार होणारी ती एक कमॉडिटी असल्याने मुलभुत नव्हे
पण काही तांत्रिक बाबींचा उहापोह करता येतो का ते पहातो.

एकदा सोने ही कमॉडिटी असल्याचे मान्य केले की भावातील चढ-उतार होतच असणार हे
ओघाने आलेच आणि जेथे तेजी आहे तेथे कधी ना कधी मंदी येणारच, खरे तर हा तर्क
अगदी जन्म आहे म्हणजे मृत्यु असणारच या गृहितकाएवढाच स्पष्ट आहे. पण तरीही आपण
अनेकदा विवेकबुद्धी सोडुन वागतो आणि अडचणींत येतो.

सोने कधीच घसरत नाही.-- अशा अज्ञानमुलक गृहितांच्या पार्श्वभुमीवर बाजाराने
दिलेले असे अनपेक्षित झटके ( ते देणे हे बाजाराचे व्यवच्छेदक लक्षणच आहे) ठळक
मथळ्यांचे विषय होतात. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या किरकोळ गुंतवणुकदाराने काय
करावे ह्या प्रश्नावरील हा माझा व्यक्तीगत दृष्टीकोण मी सांगणार आहे.

असा रामायणाला सुरवात होते ती काही ना काही कारणाने बाजारांत एखाद्या वस्तुकडे पहाण्याचा
गुंतवणुकदारांचा कल बदलल्याने. त्या कारणांची मीमांसा हा आताच्या लेखनाचा विषय नाही मात्र, येथे सोन्याबाबत तो तेजीकडुन मंदीकदे बदलला आहे एवढेच आपण गृहित धरु या,
बाजारांत विक्रीचा जोर वाढुन भावपातळी खाली जावु लागते. परिस्थितीनुसार अशा
विक्रीची तीव्रता कमी अधिक असते.

कधीतरी भावांतील फरक मोठा असुन भाव नुसते घसरण्याऐवजी गड्गड्ल्यास बाजारांत
प्रमुख दोन प्रतिक्रिया पहावयास मिळतात.

(१) भाव खुप खाली गेल्याने सुरवातीस आक्रमकपणे विक्री करणारे थोडीशी उसंत
म्हणुन का होईना थांबतात अणि (२) स्वस्ताईच्या प्रतिक्षेत असलेले किरकोळ
गुंतवणुकदार खरेदी साठी गोळा होतात. यामुळॅ भावपातळीत सुधारणा होते. खुप मोठ्या
घसरणीनंतर आलेल्या भावांतील अशा उसळीला तांत्रिक परिभाषेंत 'Dead Cat Bounce'
असे म्हटले जाते. ( अगदी मेलेला प्राणीही खुप उंचावरुन खाली आपटल्यास उसळु शकतो
या अर्थी.)

या अशा फसव्या तेजीमुळे वर उल्लेखलेले किरकोळ खरेदीदार त्यांच्या फायदेशीर
सौद्याचा आनंद उपभोगणार, तोच बाजारातील आणखी एक वर्ग या धुमश्चक्रींत सामील
होतो, हा असा वर्ग असतो, ज्याने तेजीचा कल असताना असा वस्तुची खरेदी ( अर्थातच
चढ्या दराने) केलेली असते व नंतर आलेल्या मंदीत वेळीच भाग घेता न आल्याने
घुसमटुन तो बाजार सुधारताच 'बाहेर पड्ण्याच्या' मनस्थितींत असतो. पॉज
घेण्यासाठी थांबलेले आधीचे मंदीवाले व हे घायकुतीला आलेले गुंतवणुकदार विक्रीचे
पुढ्चे आवर्तन सुरु करतात व बाजार अधिक खालची पातळी दाखवु शकतो. ----ह्या
खेळाचे प्रयोग अनेकदा होतात.

असे अनुभवास येते की प्रदीर्घ कालावधीनंतर जेंव्हा बाजारात अशी एखादी मोठी घसरण
येते, तेंव्हा प्रकरण एका भागांत संपत नाही, थोड्या थोड्या अंतराने असे
मंदीचे धक्के बसलेले दिसतात. बाजार विश्लेषकांच्या मते बा्जार कधीच एखाद्या
कारणाने , एखाद-दुसरया दिवसासाठी वगैरे आपला दीर्घकालीन कल बदलत नाही. या बाबत
कारण मीमांसा करताना नेहमीच 'cockroach theory' चा मनोरजक दाखला दिला
जातो.म्हणजेच ज्या प्रमाणे if you see one cockroach in your home, there are
likely many more,----- मंदी्ला कारणीभुत असणारया कारणांचेही काहीसे असेच आहे.
ती ही झुरळांप्रमाणेच एक एक करुन दृष्टॉत्पत्तीस येउ लागतात.

आपण लक्षांत ठेवावयास हवे की भावपातळीचा तळ निश्चित होणे ही एक प्रक्रिया आहे,
घटना नाही. ('Bottom formation is a process, not an event') खरे म्हणजे
गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच
वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही
गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो.
कालच्या पेक्षा आज स्वस्त आहे,--- केवळ हाच खरेदीचा निकष कसा काय असु शकतो
? --- उद्याचे काय ?? हा प्रश्न माझ्या मते अधिक महत्वाचा आहे

तेंव्हा केवळ वृत्तपत्रीय मथळ्यांकडे पाहुन दिवाळी/दसरा साजरा करण्याची अनाठायी
घाई केल्यास कदाचित शिमगा ह्या सणाचे स्मरण ही नंतर होवु शकेल ह्याची जाणीव असो
द्यावी.

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

24 Nov 2015 - 11:28 am | मार्मिक गोडसे

किसके साथ?