==================
भाग १, भाग २, भाग ३,
==================
आज सहलीचा चौथा आणि पुखेत मधला शेवटचा दिवस. ह्या दोन दिवसात ईथल्या समुद्रानी वेड लावलं होत. पुन्हा कधीतरी फक्त पुखेतवारी करायची आणि जीवाचं पुखेत करायचं हा निश्चय करुन बँकॉक कडे प्रयाण केलं. आता पुढले दोन दिवस पट्टाया मधे वास्तव्य होतं. यथाअवकाश बँकॉक एअरपोर्ट वर उतरुन व दोन तासाचा प्रवास करुन ईबीस पट्टाया मधे चेकईन केलं.
१. पुखेत एअरपोर्ट ची काहि क्षणचीत्रे
२. जाताना परत एकदा ऑर्किडनी मुका निरोप दिला
३. चेक ईन झाल्यावर फ्रेश होउन दोन-एक तास मस्त ताणुन दिली आणि जरा पाय मोकळे करायला आम्हि बाहेर पडलो. हॉटेल पासुन जवळच टिफनी शो चं सभागॄह होतं. पण दोघांचं एकमत झालं कि छक्के/लेडिबॉईज चा शो बघण्यापेक्षा नुसतेच उंडारु. शो बघुन वरती त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचे पैसे देण्यापेक्षा आम्हिच एकमेकांचे फोटो काढुन घेतले :D
४. दुसर्या दिवशी ठरलेल्या वेळि गाडि आली आणि आम्हि नाँग नोच व्हिलेज विथ थाई कल्चरल आणि एलीफंट शो बघायला निघालो. कित्येक एकरवर पसरलेलं हे गार्डन लँडस्केपचा उत्तम नमुना आहे. जोडिला आहेत थाई कल्चरल आणि एलीफंट शो. आत शीरल्याबरोबर गजराजाने दर्शन दिलं.
५. आजुबाजुच्या शुशोभीत/वेल प्लॅन्ड बागा बघण्यात वेळ कसा गेला कळलचं नाहि
६. बटरफ्लाय हिल वर खरी फुलपाखरं काय दिसली नाहि पण ईतर प्रेक्षणीय 'पाखरं' मात्र बरीच होती :D मग शो ची वेळ होईस्तवर त्यांनाच 'पहाण्याचा' कार्यक्रम झाला.
७. कल्चरल शो हाउस च्या बाहेर विराजीत गणपती बाप्पा. शो हाउस कडे जाताना आजुबाजुला बरीच शॉपींगची दुकानं होती. वेल आम्हि शॉपींग बॅंकॉक मधे करायचं ठरवल्याने नुसत्या किमती पाहुन अंदाज घेतला जेणे करुन नंतर घासाघीस करायला सोपं :D. शेवटि बार्गेन केल्याशीवाय काय आपल्याला ना खरेदिचा आनंद येत ना विकत घेतलेल्या वस्तुचा
८. कल्चरल शो मात्र बघण्यालायक होता. जुन्या संस्कृती/चालीरीतींचा सुंदर मिलाफ. ह्या शोचे खरे व्हिडिओ बघण्यासारखे आहेत. सगळे व्हिडिओ सफरीच्या शेवट्च्या भागात एकत्रीत करणार आहे
९. शो संपल्यावर जाताना मधेच एका ठिकाणी वाघोबा आणि रंगीत पोपट होते. बाकि लोकांनी अगदि उत्साहाने वाघाच्या डोक्यावर हात वगैरे ठेउन फोटो काढला तरी आमची काय हिम्मत झाली नाहि. साखळदंडाने बांधला तरी शेवटि वाघच तो! त्यामुळे त्याचे दुरुनच फोटो काढणे पसंत केले.
१०. आय हाय.......पण वाघाला दुर लोटलं तरी ह्या वाघीणींना मात्र जवळ केलं :D (फोटो काढण्यापुरतं यार!). कल्चरल शो मधल्या नृत्यांगना
११. कल्चरल शो संपल्यावर पुढला शो हत्तींचा होता. पण आपण सर्कशीत बघतो त्याच करामती होत्या त्यामुळे आम्हाला काय त्यात नाविन्य वाटलं नाहि पण विदेशी विरांगना उगाचच त्यांच्या लीला पाहुन किंचाळत होत्या जसं काहि हत्ती आयुष्यात पहिल्यांदाच पहात होत्या......खैर अपनी अपनी सोच!
१२. ह्या ओपन बस मधे बसुन पुर्ण गार्डन आरामात बघता येतं
१३. ह्या नंतर जेम्स गॅलरीला भेट देउन होम मीनीस्टरसाठि भेट घेतली.......शेवटि बीवी खुश तो जहाँ खुश. एक मीनी ट्रेन साधारण २० मि. तुम्हाला वेगवेगळ्या दालनातुन फिरवुन आणते जीथे जेम्स बनवण्याची प्रक्रिया अगदि चलचित्रासहित दाखवत होते. प्रवेश फ्रि असला तरी शेवटि गोड गोड बोलुन काहि ना काहि घ्यायला लावतातच. हॉटेलवर परतल्यावर जेवुन थोडि वामकुक्षी घेतली. संध्याकाळि मिनी सयाम बघायला जायचं होतं
प्रतिक्रिया
8 Dec 2013 - 2:14 pm | प्रचेतस
मस्त.
मजा आली बघून.
8 Dec 2013 - 2:59 pm | पैसा
लै भारी!
8 Dec 2013 - 3:36 pm | रुस्तम
सही है....
8 Dec 2013 - 3:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख...!!!
-दिलीप बिरुटे
8 Dec 2013 - 4:04 pm | भाते
बारश्यापद्धल हो. नेहमीचे नाव वाचायची सवय असल्यामुळे नविन नाव वाचुन दचकायला झाले.
मिपावर आता बारश्याची लाट येणार असे वाटले होते, पण तसे काही झाले नाही असे वाटत असतानाच…
जाऊ दे. फ्वाटु मात्र झक्कास आहेत हं. तो दहावा फोटु बघुन मात्र हेवा वाटला. तुमचा नव्हे हो, बाजुला बसलेल्या त्या बाहुल्यांचा.
8 Dec 2013 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त ! हा भाग छान रंगलाय !!
8 Dec 2013 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त ! हा भाग छान रंगलाय !!
8 Dec 2013 - 5:11 pm | प्यारे१
मस्त ! हा भाग छान रंगलाय !!
*****
(तिसरा जयजयकार)...
8 Dec 2013 - 10:23 pm | संजय क्षीरसागर
लेख तर सुंदर झाला आहेच.
8 Dec 2013 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा
लै मंजे लै भारी!!!
9 Dec 2013 - 12:27 pm | अक्षया
हा ही भाग छानच ..
9 Dec 2013 - 12:52 pm | मी_आहे_ना
वाचतोय..
11 Dec 2013 - 12:32 pm | शशिकांत ओक
मित्रा, सुंदर फोटो व समर्पक कथन यामुळे रंगत वाढली....