==========
१/१, १/२,
==========
दुसर्या दिवसाची सकाळ अतीशय प्रसन्न उगवली. आज पुर्ण दिवस समुद्राच्या सान्नीध्यात जाणार होता. पॅटॉंग बीचवर पॅरॅसेलींग करताना वरुन दिसणारं निळशार, पारदर्शी पाणी आज जवळुन पहायला/अनुभवायला मिळणार होतं म्हणुन आम्हि दोघं खुप उत्साहित होतो. काल ह्या सफरीचे पैसे भरताना दोन पर्याय होते......मोठि लाँच (कॅपॅसीटि साधारण १००-१५० माणसं) किंवा छोटि स्पीडबोट (कॅपॅसीटि साधारण ३०-३५ माणसं). वेल पैशाचा फार फरक नव्हता पण छोट्या बोटि ह्या आकाराने लहान असल्याने पार आतपर्यंत जाउ शकतात तसं मोठ्या लाँचना जाता येत नाहि. तीथे गेल्यावर जेव्हा प्रत्यक्ष बघीतलं तेव्हा आपण योग्य निर्णय घेतल्याची पावती मीळाली. शीवाय दुपारचं बुफे जेवण, शीतपेयं, फळ-फळावळ असा जंगी बेत खर्चातच समाविष्ट असल्याने आम्हि निर्धास्त होतो.
टाईमींग आणि पीपल मॅनेजमेंट्च्या बाबतीत मात्र थाई लोकांना फुला मार्क्स! कुठेहि घाई-गडबड-गोंधळ नाहि. आमचा ब्रेकफास्ट संपतोय न संपतोय तोच ड्रायव्हर डायनींग एरीयात आम्हाला शोधत आला! ईतर लोकांना वेगवेगळ्या हॉटेल मधुन पीक अप करुन शार्प ९ ला आम्हि बंदरावर पोचलो सुद्धा.
१. बंदरावर पोचल्यावर तो भन्नाट वारा अगदि आतपर्यंत भरुन घेतला
२. आज टुरमधील कोणकोणत्या भागांना कश्या कश्या ऑडर्स मधे भेटि द्यायच्या हे दाखवणारा फलक
३. सगळ्यांचा वेगवेगळा ग्रुप करुन प्रत्येक ग्रुपला एक एक कलरचा रिबीन टॅग देण्यात आला जेणेकरुन आपल्या ग्रुप मधील माणसं झटकन ओळखता येतील. आमचा हिरवा बावटा होता!
४. आमची स्पीडबोट
५. बंदर जसजसं दुर जाउन खोल समुद्रात जसे शीरायला लागलो तसा स्पीडबोटनी वेग पकडला. बोट जेमतेम पाण्याला स्पर्श करत होती....भन्नाट वाटत होतं
६. महाकाय खडक मधुनच लक्ष वेधुन घेत होते
७. वायकिंग केव्हज (अजुनहि लोकं ईथे वस्ती करुन रहात आहेत....अर्थात माझ्या अंदाजाप्रमाणे टुरीझमला सपोर्ट देण्याकरीता थायलंड सरकारच त्यांची व्यवस्था बघत असेल)
८. पाणीच पाणि चहुकडे....नितळ हिरवं/नीळसर
९. ईथे पोहायला उतरल्यावर अक्षःरश खालचा नितळ तळ दिसत होता.....शब्दात वर्णन करणे अशक्य. एका निवांत क्षणी (भुल गये सब कुछ!)
१०. मग थांबा आला मया बे चा
११. बेट हिरव्यागार गर्द झाडांनी व्यापलेलं आहे
१२. एखादं असं घर अश्या बेटावर असेल तर काय मज्जा येईल ना?
१३. बेटाचीच दुसरी बाजु लो सामा बे ची होती
१४. ईथे कायकिंग ऑप्शन्स पण होते (दोन-तीन माणसं मावतील एवढि छोटि बोट पार तुम्हाला पाण्यातल्या गुहेचं दर्शन करायला नेतात). ह्या बद्दल टुर बुक करताना आधी माहिती नव्हती म्हणुन आम्हि नुसतं बघुनच समाधान मानलं.
१५. मंकि बे च्या पॉईंटवर माकडं न दिसली तर नवलचं. त्यांची पोट्पुजा केल्यावर आम्हाला आमच्या भुकेची जाणीव झाली
जेवण बुफेचं होतं पण चीकन, पोर्क, बीफ ज्या तर्हेने होतं ते पाहुन चीकन खायला पण भीती वाटत होती. म्हणुन गप गुमान भातावर भाजी घेतली व एक्स्ट्रा चीली फ्लेक्स टाकुन जरा ठसकेबाज बनवला! मी घेतलेले चीली फ्लेक्स बघुन आमच्या ग्रुप मधील चायनीज मंडळीनी तोंडात बोटं आपल्या चॉपस्टिक घातल्या :D
१६. पोटभर जेवल्यावर / रशरशीत कलींगडाच्या फोडि खाल्ल्यावर जरा शतपावली करत आसपासचा परीसर न्याहाळला
१७. सफरीचा शेवट्चा थांबा होता खाय नाय आयलंड (सॉल्लीड नाव आहे ना?). नाव खाय नाय असलं तरी टुर कंपनीने थाई फळं/कलींगड/मोसंबी-संत्र जोडिला पॅप्सी/कोक/मीरींडा ह्यांची रेलचेल ठेवलेली :D
१८. परत पाण्यात डुंबल्याचा मनसोक्त आनंद घेतल्यावर रंगीत माशांना खाउ घालण्याचा कार्यक्रम झाला
१९. परतण्याआधी ते स्वच्छ निळसर/हिरवं पाणी डोळे भरुन पाहुन घेतलं
२०. परतीच्या वाटेवर....हॉटेलवर परल्यावर मस्त गरम पाण्याचा वॉश (बेसवॉश च्या धर्तिवर :D)/शॉवर घेतला व दोन एक तास मस्त ताणून दिली
२१. पोहुन/उलट्या-सुलट्या तंगडया हालवुन भारी हुए पैरों को थाई मसाज करवाया! अहाहा मसाज केल्यावर जडावलेले पाय काय हलके झाले म्हणुन सांगु!
२२. हलक्या झालेल्या पायांनी खवळलेला जठराग्नी थाई स्टाईल लॉबस्टर खाउन शांत केला!.....उद्या चेकआउट करुन पट्टाया कडे प्रयाण करायचं होतं
प्रतिक्रिया
2 Dec 2013 - 6:10 pm | अक्षया
अप्रतीम फोटो..:)
2 Dec 2013 - 6:14 pm | सचिन कुलकर्णी
आणि तेवढेच खुशखुशीत वर्णन.
पु. भा. प्र.
2 Dec 2013 - 6:23 pm | रेवती
मस्त फोटू आहेत, पाण्याचे आणि स्पीडबोटीचे! वर्णन तर छानच!
2 Dec 2013 - 6:35 pm | प्यारे१
मस्तच! छान फोटो नि वर्णन .
2 Dec 2013 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट फोटो, खूप आवडले ! वर्णनही छानच !
3 Dec 2013 - 8:39 am | प्रचेतस
जबरी.
मजा आली वाचून.
3 Dec 2013 - 10:41 am | अत्रुप्त आत्मा
लगता है हम्कू भी ऐसी ट्रीप करनी पडेगी।
वो समुंदर ---- क्या पानी...! क्या पानी...! क्या पानी...! .. साला येकदम लाजवाब!
3 Dec 2013 - 6:51 pm | अनन्न्या
आणि वर्णनही! शेवटच्या फोटुत कोणता प्राणी आहे?
3 Dec 2013 - 7:04 pm | दिपक.कुवेत
मनुष्यप्राण्याने लॉबस्टर पकडलाय (कोलंबीच्या जातकुळितली)
3 Dec 2013 - 7:19 pm | अनन्न्या
तसा मनुष्यप्राणी कधीतरी पाहिल्याचे आठवतेय पण हा त्याच्या हातातला प्राणी पहिल्यांदाच पाहिला.
3 Dec 2013 - 7:12 pm | हरिप्रिया_
मस्त वर्णन अन सुंदर समुद्र!!!
4 Dec 2013 - 11:13 am | पियुशा
क्या फोटु !! मस्त निळ निळ पाणी अहाहा ....टुर करावी तर अशी !
4 Dec 2013 - 11:59 am | युगन्धरा@मिसलपाव
खरच क्या बात? क्या बात ? क्या बात (मिथुन चक्रवर्ती स्टाईल बरं का?) ..........
अप्रतिम फोटो........
4 Dec 2013 - 12:23 pm | युगन्धरा@मिसलपाव
फोटो पाहुन बेला शेंडेच गाण आठवलं.
'निळ्या मनाचे निळे किनारे निळ्या जळाची निळसर खळखळ' ( खळखळ की थरथर आठवत नाही भावना समजुन घ्या)
4 Dec 2013 - 11:37 pm | पैसा
लिखाण, फोटो सगळंच मस्त रे दीपक कुवेतवाले!
5 Dec 2013 - 5:48 am | दीपा माने
छान वर्णन,माहिती आणि फोटोतुन आमचीही सैर झाली.
5 Dec 2013 - 10:45 am | सत्याचे प्रयोग
लइ लइ भारी