देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले.
कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. त्यांच्या आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनमोल सहकार्याने देश स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर महात्माजींनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. पण देशाला स्वातंत्र्य पर्यंत आणल्यावर असे निर्नायकी अवस्थेत सोडणे चुकीचे होते. कॉंग्रेस जणांनी महात्माजींचा हा सल्ला झुगारला. खुद्द महात्माजींचा सल्ला झुगारून आपल्यात पक्षांतर्गत लोकशाही आहे हे कॉंग्रेस ने सिद्ध केले.
१९४८ साली महात्माजींचा निर्घुण खून करण्यात आला त्यानंतर स्वतंत्र भारतात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली ती कॉंग्रेसने आज भारतात एकही असे गाव नाही जेथे कॉंग्रेस पक्ष नाही . देशातील सर्वसामान्य, धर्मनिरपेक्ष,गोरगरीब, दलित मागासवर्गीय ह्यांना हा पक्ष आपला वाटतो. आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनीही ह्या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. देश आज जो विकासपथावर आहे त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने सत्ता जनतेसाठी राबवली. जाती धर्माच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना.
आता जी २०१४ ची निवडणूक होत आहे त्यात कॉंग्रेस च सत्तेवर येईल ह्यात शंका नाही मात्र दुर्दैर्वाने कॉंग्रेस सत्तेवर आली नाही तर देशाकडे नेतृत्व करण्यासाठी कुठले पर्याय आहेत जे आपल्या नेतृत्वाने देशाला सावरू शकतील. माझ्या मते कॉंग्रेस चे सरकार आले नाही तर तीन नेते असे आहेत ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले तरी देशाचा विकास करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची क्षमता आहे.
त्यातील पहिले नाव आहे शरद पवार साहेबांचे.शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगतीपथावर वाटचाल केली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला आणि धडाडीने काम करण्याची क्षमता असलेला नेता. अल्पसंख्यांक, स्त्रिया, शेतकरी ह्यांच्या समस्येची जाण असणारा आणि ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार जर प्रधानमंत्री झाले तर ते भरीव कामगिरी करू शकतात ती क्षमता त्यांच्यात आहे.
दुसरा नेता म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्य मंत्री मायावतीजी. त्यांनी उत्तर प्रदेशात जो सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करून सत्ता खेचून आणली होती ते आश्चर्यजनक होते. केडर बेस पार्टी म्हणून ब स पा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच देशातील दलित व अल्पसंख्याकामध्ये मायावतीजी ह्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. शतकानु शतके सामाजिक विषमतेखाली पिचणाऱ्या समाजाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्तेवर आणून दाखवणे हे मायावतींचे ऐतिहासिक कर्तुत्व आहे. जर उत्तर प्रदेशात त्यांचा पक्ष ४० जागा पर्यंत मजल मारू शकला तर त्या सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका अदा करू शकतात.
तिसरा नेता म्हणजे मुलायम सिंग यादव. जयप्रकाश नारायण सारख्या कर्तुत्ववान नेत्याचा मुशीत तयार झालेला कर्तुत्ववान नेता. नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार. ज्यावेळी लोकपाल बिल आणून घटनेचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा मुलायम सिंग आणि लालूप्रसाद यादव हे ह्या बिलाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश विकास करत आहे.
मात्र दुर्दैवाने ह्यांच्या पैकी कोणीही सत्तेवर आले नाही तर मात्र देश निर्नायकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याची स्तिथी आहे भारताचा दुसरा पाकिस्तान होईल अशी साधार भीती वाटते. आज आपण मोकळ्या वातावरणात राहत आहोत. लोकशाहीचे फायदे उपभोगत आहोत. पण नंतर मात्र पाक, अफगाणिस्थान इथे जशे फतवे निघतात तसे फतव्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते
प्रतिक्रिया
30 Nov 2013 - 10:19 pm | विद्युत् बालक
=)) . =))
लेख वाचून हसून हसून मेलो मी !
विडंबन आहे असे गृहीत धरतो
30 Nov 2013 - 10:24 pm | उगा काहितरीच
.
+1 :) :) :) :)
30 Nov 2013 - 10:24 pm | बाप्पू
खरंच काय हो ?
भारताला ६० वर्षे होऊन गेली स्वतंत्र होऊन… आणि काही वर्षांचा अपवाद वगळता देश कौन्ग्रेस वाल्यांकडे च आहे. आणि आजूनही देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही?
कधी वेळ मिळाला तर देशाची प्रगती किती वेगाने झालीये ते बघा… हा वेग तुम्हाला बैलगाडी पेक्षा हि कमी आहे वाटत नाही का ?
30 Nov 2013 - 10:32 pm | विद्युत् बालक
सचिन राव तुमच्या लेखाची सालटी निघणार बघा :D
30 Nov 2013 - 11:06 pm | क्लिंटन
पोट धरधरून गडाबडा लोळायची स्मायली आहे का हो कोणाकडे?
1 Dec 2013 - 11:56 am | सोत्रि
क्लिंटनभौ, ही चालेल का बघा?
- (गडबडा लोळणारा) सोकाजी
30 Nov 2013 - 11:22 pm | बाबा पाटील
साली प्रश्नचिन्हेच संपत नाय राव.......
30 Nov 2013 - 11:34 pm | सिद्धेश महजन
लेख लिहिणार्या या प्रोफाइलचा खरा चेहरा निखिल वागळेचा आहे. १००%.
1 Dec 2013 - 1:15 am | टायलर डर्डन
+१
30 Nov 2013 - 11:48 pm | सिद्धेश महजन
भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला नेता - शरद पवार?
http://lh3.ggpht.com/_OpR8Gexvums/S4Bzjg6AB1I/AAAAAAAAAOg/jAyh3e8nwmQ/s4...
30 Nov 2013 - 11:59 pm | ग्रेटथिन्कर
छान लेख.
नेटभगव्यांकडे दुर्लक्ष करा.
1 Dec 2013 - 1:04 am | खटपट्या
हसावे कि रडावे ते कळत नाहीये. तूर्तास गोंधळलेला….
1 Dec 2013 - 1:55 am | विनोद१८
सचीनभाऊ पायलागू,
बाकी तुमच्या कल्पनातीत कल्पनाशक्तिला माझा सलाम..!! एखद्या सुमार सम्पादकालासुध्धा हेवा वाटावा अशी आहे ती, अगदी उर भरुन आले हो माझे.
तुमच्या सूर्यप्रकाशाइतक्या तेजस्वी सत्याचे प्रयोग आपण नन्तर पाहू. मला सतत छळणार्या एका प्रश्णाला उत्तर दिलेत तर बरे होइल, करण मला वाटते आपला या विषयाचा अभ्यास फारच दान्ड्गा दिसतोय सबब तुमच्याकडून त्याचे उत्तर नक्की मिळेल, माझा प्रश्ण :-
" या देशाला गेल्या १००० वर्षात १९४७ पूर्वी व १९४७ नन्तर आजपावेतो सर्वात जास्त कोणी, कसे व किती लुटले ??? परकीयानी की स्वकियानी ???? या देशाला लूटणे हे परकीयान्चे उद्दीष्ट्च होते व तो आपला अधिकारच आहे असे त्यान्ची समजूत होती परन्तु १९४७ नन्तर आलेल्यानी किती लूट केली अगदी कालपरवापर्यन्त ??? " मला पामराला वाटते १९४७ नन्तर आलेल्यानी हे बरोबर काय ?? याचे उत्तर दिलेत तर मला वाटते तुमचे तुम्हालाच उत्तर मिळेल.
ह्या प्रश्णावरूनच लक्षात येते ती तुमच्यासार्ख्यान्ची उडालेली घाबरगुन्डी आणि ढुन्गणाला पाय लाउन पळता थोडी झालेली भुई, नाही का ??? अरे एव्ह्ढी जर झोप उडाली...???? तर ती उडालेली परत येण्यासाठी येथे एखादा धागा टाकायचा होता कुणाचा सल्ला तरी मागायचा होता, अगदी मोफत मिळाला असता, असो. तुर्त इतकेच
विनोद१८
1 Dec 2013 - 2:22 am | शिद
=))
1 Dec 2013 - 8:03 am | जेपी
आजचा सवाल- सचीनभौची सेंच्युरी होणार का ?
मी देखील वटवटवाघुळे एक ब्रेक घेतो . कुठेही जाऊ नका , पहात राहा . कायपण फेकमत . चला जगावर भुंकू या .
1 Dec 2013 - 4:13 pm | बॅटमॅन
ओ आमच्या जातीला बोलायचं काम नाय हां!!!! अॅट्रॉशिटी दाखल करीन बगा ;) साला ### वागळे, नामसाधर्म्यामुळे आमच्या जातीवर लोक घसरतात.
1 Dec 2013 - 9:47 am | अपूर्व कात्रे
पण लेखन विषय / लेखन प्रकार यात "विडंबन", "विनोद" इत्यादि घालायला विसरलात.
1 Dec 2013 - 9:49 am | ग्रेटथिन्कर
सत्ता येणार ती राहुलजी आणि काँग्रेस यांच्या पुरोगामी विचारांची .
जातीयवादी आणि फेकू लोकांच्या हातात सत्ता देऊ नका.
1 Dec 2013 - 11:06 am | विद्युत् बालक
तुमच नॉलेज मायनिंग करणारे मशीन स्वतावरच चालवले काय ? तुटलेले दिसतेय स्वाक्षरी बदलली न म्हणून विचारले !
1 Dec 2013 - 10:14 am | वडापाव
ग्रेटथिंकरांची विनोदबुद्धी वाखाणण्याजोगी आहे खरी!!! =))
सचीनभौ मला चुकून वाटलं की तुम्ही हे उपरोधानं लिहीलंय की काय!! =))
1 Dec 2013 - 10:46 am | टवाळ कार्टा
चायला....खुप दिवसांनी अतिशय उच्च कोटीचा विनोदी लेख वाचायला मिळाला....और आन्दो ;)
1 Dec 2013 - 10:49 am | अन्या दातार
कोणी सत्तेवर यावे हे सांगणारे तुम्ही कोण? निवडणुका होणार आहेतच! काँग्रेस आली नाही तर लगेच निष्पक्ष झाल्या नाहीत असे गळे काढू नका. काँग्रेसशिवाय साधारण ८-१० वर्षे तरी देशाने बघितली आहेत. पैकी ५ वर्षे तर खरंच सुस्थितीत बघितली आहेत. सबब, जनतेच्या सूज्ञपणावर विश्वास ठेवायला हरकत नसावी.
1 Dec 2013 - 11:04 am | विद्युत् बालक
नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार
मित्रानो ,
आपण एक खेळ खेळूया तुमच्या मता प्रमाणे ह्या लेखातील सर्वात इनोदी विधान सांगा !
1 Dec 2013 - 11:07 am | जेपी
1 Dec 2013 - 11:21 am | डॉ सुहास म्हात्रे
1 Dec 2013 - 11:54 am | सचीन
काँग्रेसशिवाय साधारण ८-१० वर्षे तरी देशाने बघितली आहेत. पैकी ५ वर्षे तर खरंच सुस्थितीत बघितली आहेत. सबब, जनतेच्या सूज्ञपणावर विश्वास ठेवायला हरकत नसावी.>>>>>>>>>>>बरोबर आहे तुमचे ती पाच वर्षे खरच सुस्तीथित गेली होती पण नेते लोकांची. फक्त अपवाद संसदेवर झालेला हल्ला मला वाटते ती देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल कि प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपून बसावे लागले होते. कंदाहार प्रकरण मंत्री महाशय स्वत अतिरेक्यांना घेऊन त्यांच्या मित्रांकडे सोपवून आले होते.जनतेला असली सुस्तिथी नकोशी वाटलेली असावी म्हणून पुढच्या निवडणुकीत घरी बसवले
1 Dec 2013 - 12:02 pm | अन्या दातार
काँग्रेस सत्तेवर असती तर असे झालेच नसते का?
त्यापूर्वी कोणत्याच अतिरेक्याला सोडले नव्हते का?
1 Dec 2013 - 12:05 pm | सोत्रि
सचिनभौ प्रतिसादही देत आहे धाग्यावर. मस्त आता जंगी सामना व्ह्यायलाच हवा!
खरंय! खरे काय ते कळूनच ह्या डोळ्यावर झापडे लावून, ऑफिसच्या ए.सी. ची गार हवा खाऊन 'भोपळ्यात बी गार' झालेल्या ह्या नव मध्यमवर्गाला.
अरे प्रतिसाद काय देताय उपहासानं, लेख पाडलाय वाघानं!
सगळ्यांचा एकच दावा, सचिनभौच खरा सिंहाचा छावा!!
सचिनभौ होहोदे चर्चा, होऊ दे खर्च!!
- (सचिनभौ समर्थक) सोकाजी
1 Dec 2013 - 1:07 pm | श्रीगुरुजी
>>> फक्त अपवाद संसदेवर झालेला हल्ला मला वाटते ती देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल कि प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपून बसावे लागले होते.
हा हल्ला काँग्रेसच्या कारकीर्दीत झाला असता तर नक्कीच पप्पू आणि कुटुंबीय हातात ढालतलवार घेऊन लढायला गेले असते.
>>> कंदाहार प्रकरण मंत्री महाशय स्वत अतिरेक्यांना घेऊन त्यांच्या मित्रांकडे सोपवून आले होते.जनतेला असली सुस्तिथी नकोशी वाटलेली असावी म्हणून पुढच्या निवडणुकीत घरी बसवले
सप्टेंबर १९९३ मध्ये काश्मिरमध्ये लष्कराने मशिदीला वेढा घालून १०-१२ अतिरेक्यांना कोंडले होते. डिसेंबर १९९३ मधील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तत्कालीन काँग्रेस सरकारने वेढा उठवून सर्व अतिरेक्यांना हलवा-पुरी, चिकन बिर्याणी (हलाल पध्दतीने केलेली), बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने मानाचे पागोटे देऊन त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते. हातात सापडलेल्या पण तरीही सहीसलामत सोडून दिलेल्या नंतर किती सहस्त्र निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले असतील खुदा जाने. इतर असंख्य पापांप्रमाणेच हे महापापही काँग्रेसचंच.
जनतेने या देशद्रोही नालायकांना १९९६, १९९८ व १९९९ अशा लागोपाठ ३ निवडणुकात कंबरड्यात लाथ घालून घरी बसविले होते. २०१४ मध्येही यांच्या पृष्ठभागावर जनता असाच सणसणीत लत्ताप्रहार करणार आहे.
1 Dec 2013 - 12:03 pm | सचीन
सत्ता येणार ती राहुलजी आणि काँग्रेस यांच्या पुरोगामी विचारांची .
जातीयवादी आणि फेकू लोकांच्या हातात सत्ता देऊ नका.>>>>> जनता सुज्ञ आहे. देशातील गोरगरीब, दलित, सामान्य माणसे ह्यांचा पक्ष म्हणजे कॉंग्रेस पक्ष. देशातील सर्वधर्मियांचा ज्यांच्यावर विश्वास आहे असे कॉंग्रेस चे नेतृत्व आहे. भारतात कॉंग्रेस पक्ष सोडून असा कोणता पक्ष आहे कि त्यातील एखाद्या नेत्याबद्दल देशातील सर्वधर्मियांना विश्वास वाटतो?
1 Dec 2013 - 4:20 pm | ग्रेटथिन्कर
छान, काँग्रेसच योग्य पर्याय वाटतो मला... गोरगरीब दलितांसाठी.
1 Dec 2013 - 12:07 pm | सचीन
कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर असताना कधी देशाच्या सर्वोच्च अशा संसदेवर हल्ला झाला का?
कोणत्या अतिरेक्याला कॉंग्रेस चे राज्य असताना स्वताच्या शेजारी विमानात बसवून एखाद्या मंत्र्याने त्याच्या साथीदाराकडे नेले का?
1 Dec 2013 - 12:59 pm | श्रीगुरुजी
>>> कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर असताना कधी देशाच्या सर्वोच्च अशा संसदेवर हल्ला झाला का?
काँग्रेस सत्तेवर नसताना कधी ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुम्बई स्टॉक एक्सचेंज, एअर इंडिया इमारत, मुम्बईतल्या लोकल्स इ. असंख्य ठिकाणी असंख्य हल्ले झाले होते का?
>>> कोणत्या अतिरेक्याला कॉंग्रेस चे राज्य असताना स्वताच्या शेजारी विमानात बसवून एखाद्या मंत्र्याने त्याच्या साथीदाराकडे नेले का?
सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने वेढा देऊन कोंडले असताना कोणत्या आणि किती अतिरेक्यांना हलाल चिकन बिर्याणी, हलवापुरी, बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने पाकिस्तानला जाऊन देण्यात आले होते?
1 Dec 2013 - 12:13 pm | सुहास..
मला आधी हे सांगा की हा शरद पवारसाहेब कोण ?
1 Dec 2013 - 12:20 pm | पैसा
ट्रोल अॅलर्ट!
1 Dec 2013 - 1:23 pm | श्रीगुरुजी
>>> देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे.
देशाची वाट लावायला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे.
>>> पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.
आम्हाला नाही असला प्रश्न पडत. देशाची वाट लावण्याचे कौशल्य काँग्रेसइतके दुसर्या कोणत्याच पक्षाकडे नाही.
>>> २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले.
फिदी फिदी ...
>>> अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले.
देशाचा विकास काँग्रेसमुळे झाला नसून काँग्रेस अनेक वर्षे सत्तेवर असूनसुद्धा झालेला आहे.
>>> कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. त्यांच्या आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनमोल सहकार्याने देश स्वतंत्र झाला.
नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इ. नी अत्यंत हालअपेष्टा सोसल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनाही जर गाद्यागिरद्या, लोडतक्के, पंखे इ. सुविधा असलेली स्थानबद्धता मिळाली असती तर देश कधीच स्वतंत्र झाला नसता.
>>> स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर महात्माजींनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. पण देशाला स्वातंत्र्य पर्यंत आणल्यावर असे निर्नायकी अवस्थेत सोडणे चुकीचे होते. कॉंग्रेस जणांनी महात्माजींचा हा सल्ला झुगारला. खुद्द महात्माजींचा सल्ला झुगारून आपल्यात पक्षांतर्गत लोकशाही आहे हे कॉंग्रेस ने सिद्ध केले.
कसली डोंबलाची लोकशाही? दारूची चटक लागलेला प्रत्यक्ष आपल्या मातापित्यांचे सुद्धा ऐकत नाही. मग सत्तेची चटक लागलेले गांधींचे काय ऐकणार?
>>> १९४८ साली महात्माजींचा निर्घुण खून करण्यात आला त्यानंतर स्वतंत्र भारतात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली ती कॉंग्रेसने आज भारतात एकही असे गाव नाही जेथे कॉंग्रेस पक्ष नाही .
भारतात असे एकही गाव नाही जिथे दारूगुत्ता, भ्रष्टाचारी, गावगुंड नाहीत.
>>> देशातील सर्वसामान्य, धर्मनिरपेक्ष,गोरगरीब, दलित मागासवर्गीय ह्यांना हा पक्ष आपला वाटतो. आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनीही ह्या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. देश आज जो विकासपथावर आहे त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने सत्ता जनतेसाठी राबवली. जाती धर्माच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना.
खि खि खि खि ...
>>> आता जी २०१४ ची निवडणूक होत आहे त्यात कॉंग्रेस च सत्तेवर येईल ह्यात शंका नाही मात्र दुर्दैर्वाने कॉंग्रेस सत्तेवर आली नाही तर देशाकडे नेतृत्व करण्यासाठी कुठले पर्याय आहेत जे आपल्या नेतृत्वाने देशाला सावरू शकतील. माझ्या मते कॉंग्रेस चे सरकार आले नाही तर तीन नेते असे आहेत ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले तरी देशाचा विकास करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची क्षमता आहे.
हे ३ नेते म्हणजे दिग्विजय, बेनीप्रसाद वर्मा आणि अमरसिंग
>>> त्यातील पहिले नाव आहे शरद पवार साहेबांचे.शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रात पूर्वी प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेते होते. ते जेव्हा काँग्रेसच्या दारात ९ महिने ताटकळत होते, तेव्हा जनतेला खरी ओळख पटली. जाणता राजा ही उपाधी अशीच आहे.
>>> महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगतीपथावर वाटचाल केली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला आणि धडाडीने काम करण्याची क्षमता असलेला नेता. अल्पसंख्यांक, स्त्रिया, शेतकरी ह्यांच्या समस्येची जाण असणारा आणि ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार जर प्रधानमंत्री झाले तर ते भरीव कामगिरी करू शकतात ती क्षमता त्यांच्यात आहे.
हसून हसून पोट दुखायला लागलं.
>>> दुसरा नेता म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्य मंत्री मायावतीजी. त्यांनी उत्तर प्रदेशात जो सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करून सत्ता खेचून आणली होती ते आश्चर्यजनक होते. केडर बेस पार्टी म्हणून ब स पा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच देशातील दलित व अल्पसंख्याकामध्ये मायावतीजी ह्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. शतकानु शतके सामाजिक विषमतेखाली पिचणाऱ्या समाजाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्तेवर आणून दाखवणे हे मायावतींचे ऐतिहासिक कर्तुत्व आहे. जर उत्तर प्रदेशात त्यांचा पक्ष ४० जागा पर्यंत मजल मारू शकला तर त्या सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका अदा करू शकतात.
मायावती जर पंतप्रधान झाली तर पुढील ५ वर्षात भारतातल्या पानपट्टींच्या ठेल्यांची जेवढी संख्या आहे, त्याच्यापेक्षा जास्त संख्येने तिचे स्वतःचे पुतळे उभारले जातील.
>>> तिसरा नेता म्हणजे मुलायम सिंग यादव. जयप्रकाश नारायण सारख्या कर्तुत्ववान नेत्याचा मुशीत तयार झालेला कर्तुत्ववान नेता. नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार. ज्यावेळी लोकपाल बिल आणून घटनेचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा मुलायम सिंग आणि लालूप्रसाद यादव हे ह्या बिलाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश विकास करत आहे.
आता बास झालं हं. हसून हसून गडाबडा लोळायला लागलोय.
>>> मात्र दुर्दैवाने ह्यांच्या पैकी कोणीही सत्तेवर आले नाही तर मात्र देश निर्नायकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याची स्तिथी आहे भारताचा दुसरा पाकिस्तान होईल अशी साधार भीती वाटते. आज आपण मोकळ्या वातावरणात राहत आहोत. लोकशाहीचे फायदे उपभोगत आहोत. पण नंतर मात्र पाक, अफगाणिस्थान इथे जशे फतवे निघतात तसे फतव्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
तुमचं वय किती? तुही इयत्ता कंची?
>>> आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते
तुमच्या बालबुद्धीचा हेवा वाटतो.
असेच लेख लिहीत चला आणि करमणूक करत चला.
1 Dec 2013 - 1:29 pm | विद्युत् बालक
गुर्जी साहेब ,
कशाला कॉंग्रेसच्या बगल बच्च्यांच्या व नाठाळांच्या नादी लागताय ?
रविवारच्या दिवशी मस्त आराम करा झाली तेवढी करमणूक भरपूर झाली
1 Dec 2013 - 4:24 pm | ग्रेटथिन्कर
भाजपच्या सतरंज्या उचलणार्यांना कशाला काय सांगताय
1 Dec 2013 - 1:24 pm | सचीन
२०१४ मध्येही यांच्या पृष्ठभागावर जनता असाच सणसणीत लत्ताप्रहार करणार आहे.>>>>>>>
गेली ११ वर्षे जनता कोणाच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे ते हि सांगा गुरुजी
1 Dec 2013 - 1:27 pm | श्रीगुरुजी
>>> गेली ११ वर्षे जनता कोणाच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे ते हि सांगा गुरुजी
गेली साडेनऊ वर्षे काँग्रेसची टोळी जनतेच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे आणि तुमच्यासारख्यांना या लाथा गोड वाटत आहेत.
1 Dec 2013 - 4:28 pm | ग्रेटथिन्कर
भाजपच्या काळात रामराज्यच होते...वाजपेयीला लोक अशानं आळशी होतील असं वाटलं मग ते आपणहून पायउतार झाले.. कित्ती तो त्याग.... हो की नै रे गुर्जी
1 Dec 2013 - 1:29 pm | सचीन
सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने वेढा देऊन कोंडले असताना कोणत्या आणि किती अतिरेक्यांना हलाल चिकन बिर्याणी, हलवापुरी, बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने पाकिस्तानला जाऊन देण्यात आले होते?>>>>
गुरुजी तुमच्या कडेच हे पदार्थ बनवण्याचे कंत्राट दिलेले होते वाटते पदार्थांची नावे अगदी बरोबर सांगताय म्हणून विचारले
1 Dec 2013 - 1:33 pm | श्रीगुरुजी
तुम्ही बालीश प्रश्न विचारू नका. नवीन लेख पाडा. तेवढीच सर्वांची फुकट करमणूक.
1 Dec 2013 - 1:35 pm | विद्युत् बालक
आला का लायनीवर ?
उत्तर नसले कि घसरलेच हे वैयक्तिक पातळीवर
1 Dec 2013 - 2:13 pm | श्रीगुरुजी
>>> गुरुजी तुमच्या कडेच हे पदार्थ बनवण्याचे कंत्राट दिलेले होते वाटते पदार्थांची नावे अगदी बरोबर सांगताय म्हणून विचारले
नाही हो. आम्हाला कसं हे कंत्राट मिळणार! कंत्राटं हिसकावणे आणि त्याद्वारे प्रचंड खादाखादी करणे ही तुमच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची कामं.
1 Dec 2013 - 1:35 pm | सचीन
कशाला कॉंग्रेसच्या बगल बच्च्यांच्या व नाठाळांच्या नादी लागताय ?
रविवारच्या दिवशी मस्त आराम करा झाली तेवढी करमणूक भरपूर झाली>>>>
शरद पवारांच्या आजाराविषयी प्रतिसाद दिल्यामुळे नाठाळ कोण आहे हे कळले . जा रविवारचा दिवस आहे बालका खेळत बस
1 Dec 2013 - 1:40 pm | विद्युत् बालक
सध्या शरद पवारची अवस्था एक पाय यु पी ए मध्ये तर दुसरा पाय तिसऱ्या आघाडीत ठेवता ठेवता त्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या प्रदीर्घ स्वप्नावर मात्र मधल्या मध्ये पाणी पडतेय बघा
1 Dec 2013 - 1:41 pm | बाळराजे
*dash1* *DASH* *WALL*
1 Dec 2013 - 1:56 pm | सचीन
शरद पवार हे धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते आहेत.
९ खासदारांचे १९० करण्याचा अजेंडा त्यांच्या कडे नाही.
1 Dec 2013 - 2:06 pm | विद्युत् बालक
धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते
म्हणजे काय हो?
मुस्लिम नेत्यांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी झोडणे कि गल्लीत कोणी विचारेना व दिल्लीत कोणी भिक घालेना म्हणून परत दिल्लीश्वरांचे बूट पोलिश करणे?
1 Dec 2013 - 2:18 pm | श्रीगुरुजी
>>> शरद पवार हे धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते आहेत.
फिदी फिदी फिदी फिदी . . .
धर्मनिरपेक्षता म्हणजे अतिरेक्यांना सहानूभूती व पाठिंबा, फर कॅप घालून इफ्तार पार्ट्या झोडणे, मुस्लिमांना आरक्षण, हाज यात्रा व इतर सवलतींची खैरात अशी काहींची व्याख्या असते.
>>> ९ खासदारांचे १९० करण्याचा अजेंडा त्यांच्या कडे नाही.
कसे करणार? त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर (खरं तर महाराष्ट्रातले काही जिल्हे सोडले तर) कोणी हिंग लावून विचारत नाही.
1 Dec 2013 - 4:43 pm | ग्रेटथिन्कर
तेरी दिवसाच्या सत्तेसाठी गुडघ्याला बाशींग बांधणार्याला काय त्याग माहीत सोनियाजींचा...
सोनियाजी म्हणजे आपल्या भारताला लाभलेलं एक खंबीर नेतृत्व आहे व त्यांचा वारसा भारताचे लाडके व्यक्तीमत्व राहुलजी यशस्वीपणे चालवत आहेत...
विष्णुने जसे सत्य रक्षणार्थ अवतार घेतले तसे गांधी घराणे भारताच्या उद्धारासाठीच आहे. काय त्या त्यागाला परीसीमा आहे की नाही.!
असो मी तर माझे मत काँग्रेसच्या खंबीर नेतृत्वालाच देणार....
1 Dec 2013 - 2:03 pm | सचीन
कधी वेळ मिळाला तर देशाची प्रगती किती वेगाने झालीये ते बघा… हा वेग तुम्हाला बैलगाडी पेक्षा हि कमी आहे वाटत नाही का ?>>>>>>>
देशाची प्रगती अत्यंत वेगाने सुरु आहे देश मंगळावर जावून पोहोचलाय.युवा पिढी इंटर नेटच्या दुनियेत वावरत आहे WHATS UP KAY NI FACEBOOK KAY.दिवाळीला बाजारात गेले तर कुठेही जा कपड्यांच्या दुकानात जा कि इलेक्ट्रोनिक्स च्या दुकानात कि हॉटेलात तुडुंब गर्दी . लोकांची खर्च करण्याची क्षमत अफाट वाढलीय .बाप्पू तुम्हीच सांगा काँगेसच्या राज्यात गेल्या १० वर्षात तुमची प्रगती झालीय कि अधोगती . तुम्हाला उत्तर मिळेल
1 Dec 2013 - 2:23 pm | श्रीगुरुजी
>>> काँगेसच्या राज्यात गेल्या १० वर्षात तुमची प्रगती झालीय कि अधोगती
अर्थात अधोगतीच. आणि हे कोणाच्याही अगदी सहज लक्षात येईल (काही अपवाद वगळता).
1 Dec 2013 - 2:12 pm | सचीन
बालका धर्मनिरपेक्ष नेता तो असतो जो देशातील सर्व धर्मियांना मान देतो जो इफ्तार पार्ट्याही झोडतो नि दिवाळीचा आनंदही लुटतो नि ख्रिसमसला हि शुभेच्छा देतो जो देशाच्या नागरिकांना धर्माच्या दृष्टीने न बघता एक भारतीय समजतो.
1 Dec 2013 - 7:19 pm | ग्रेटथिन्कर
बरोबर, या देशावर मुस्लिम ख्रिस्ती बौद्ध बांधवांचा हिंदूच्या इतकाच हक्क आहे. किंबहूना हिंदूनी आपल्या या बांधवांच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे.
हिंदूच्या विकासाबरोबरच ख्रिस्ती आणि मुस्लिमांच्या विकासाला प्राधान्य देणार्या पक्षालाच येणार्या इलेक्शनमध्ये निवडून द्या.
1 Dec 2013 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा
मला एकच प्रश्न पडतो आहे~"माणुस स्व खुशीनी अंधत्व ,नेमकं का आणी कशासाठी स्विकारत असावा?" :)
1 Dec 2013 - 2:20 pm | श्रीगुरुजी
>>> मला एकच प्रश्न पडतो आहे~"माणुस स्व खुशीनी अंधत्व ,नेमकं का आणी कशासाठी स्विकारत असावा?"
स्वखुशीनी अंधत्व की उपजत बावळटपणा?
1 Dec 2013 - 2:22 pm | विद्युत् बालक
सचिन राव बहुतेक पवारांच्या मुशीतून घडले असावेत
1 Dec 2013 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा
सदर लेखन हे ,उपजत बावळटपणा वाटत नाही..ज्या पद्धतिनी लेखक उपप्रतिसाद देतोय,ते पहाता तर नक्कीच नाही!
1 Dec 2013 - 2:22 pm | तिमा
सध्या एवढेच पुरे!
1 Dec 2013 - 2:31 pm | विद्युत् बालक
तिमा ताई !
तुमची पहिली स्मायली काय करतेय नक्की?
1 Dec 2013 - 2:41 pm | तिमा
स्मायलीच्या खाली 'worthy' असं लिहिलंय. काय करतीये कोण जाणे.
- ति(लोत्त)मा ताई
1 Dec 2013 - 7:07 pm | विद्युत् बालक
आजकाल पुरुष असून स्त्रियान सारखे नाव धारण करण्याचे प्रमाण वाढले आहे :D
1 Dec 2013 - 7:23 pm | बॅटमॅन
तिमा = शॉर्ट फॉर्म ऑफ तिरशिंगराव माणूसघाणे.
1 Dec 2013 - 7:25 pm | विद्युत् बालक
आयला =)
1 Dec 2013 - 6:56 pm | बॅटमॅन
तिमा ताई =)) =)) =)) =)) =))
1 Dec 2013 - 2:28 pm | सचीन
अर्थात अधोगतीच. आणि हे कोणाच्याही अगदी सहज लक्षात येईल (काही अपवाद वगळता)
हा प्रश्न मी बाप्पुना विचारला होता उत्तर तुम्ही दिलेय कि बाप्पुंची अधोगती झालीय हा काय प्रकार आहे?
गुरुजी पोट हल्ली तुमचे जास्त दुखतेय जास्त हसू नका.
कंत्राट घेतले नव्हते तर काय मेजवानीला होतात का? पदार्थांची नाव अचूक सांगताय
1 Dec 2013 - 2:35 pm | श्रीगुरुजी
>>> हा प्रश्न मी बाप्पुना विचारला होता उत्तर तुम्ही दिलेय कि बाप्पुंची अधोगती झालीय हा काय प्रकार आहे?
अधोगती कोणाची झालीय ते लेख वाचल्यावर लगेच लक्षात आलं.
>>> गुरुजी पोट हल्ली तुमचे जास्त दुखतेय जास्त हसू नका.
मग तुम्ही लेखन आणि प्रतिसाद थांबवा. नाहीतर आम्हाला हसू आवरणार नाही.
>>> कंत्राट घेतले नव्हते तर काय मेजवानीला होतात का? पदार्थांची नाव अचूक सांगताय
अहो, या अतिरेक्यांना सहीसलामत सुखरूप सोडून दिल्याची लाजिरवाणी आणि देशद्रोही घटना काँग्रेसवाल्यांनी आपण मोठा पराक्रम केल्याच्या थाटात जगजाहीर केली होती (निवडणुकीत 'त्यांची' मतं हवी होती ना). त्यामुळे आम्हालाच काय पण सगळ्या जगाला हा 'मेजवानीचा पराक्रम' कळून भारताची नाचक्की झाली होती.
1 Dec 2013 - 7:24 pm | ग्रेटथिन्कर
शांतीयात्रा काढण्याच्या मुर्ख लोकांच्या नादात कारगिलमध्ये आपले सातशे जवान मारले गेले... हा वाजपेयींचा पराक्रम जगजाहीरच आहे.
1 Dec 2013 - 2:34 pm | प्यारे१
टिपर्या!
दांडिया!!
गरबा!!!
1 Dec 2013 - 2:41 pm | सचीन
सन्मानाने मानाचे पागोटे देऊन त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते. >>>>>
गुरुजी मेजवानीचे जावून द्या पागोट्याचे कंत्राट तरी तुमच्याकडे होते का?
1 Dec 2013 - 2:44 pm | श्रीगुरुजी
काय मुद्दाम करताय का उपजतच काहीतरी कमी आहे? कंत्राटं, कंत्राटातला भ्रष्टाचार इ. काँग्रेसवाल्यांची कामं. आमचा असल्या कामांशी व काँग्रेसशी दुरूनही संबंध नाही.
1 Dec 2013 - 2:47 pm | श्रीगुरुजी
>>> गुरुजी मेजवानीचे जावून द्या पागोट्याचे कंत्राट तरी तुमच्याकडे होते का?
मुख्य म्हणजे कधी पागोटं घालणे, कधी फर कॅप, कधी गांधी टोपी, कधी फेल्ट हॅट तर कधी टापशी गुंडाळणे (आणि त्याखाली भ्रष्टाचार लपविणे) ही काँग्रेससारख्या निधर्मी पक्षाची कामं. आमचा याच्याशी संबंध नाही.
1 Dec 2013 - 2:50 pm | सचीन
नाही गुप्तहेरा सारखी सारी माहिती देताय .मेजवानीला काय काय पदार्थ होते ते सांग्रसंगीत सांगताय, पागोटे दिले ते सांगताय म्हणून आपली एक शंका दुसरे काही नाही. तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर. तुमच्यापुढे आम्ही म्हणजे वाडग्या समोर वाटी......
1 Dec 2013 - 2:52 pm | श्रीगुरुजी
>>> तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर. तुमच्यापुढे आम्ही म्हणजे वाडग्या समोर वाटी......
एवढं मात्र खरं बोललात.
1 Dec 2013 - 6:07 pm | जोशी 'ले'
आयला, सचीन ....72 झाले हं, आता आऊट :-)
1 Dec 2013 - 6:09 pm | चौकटराजा
पंतप्रधान - सुशील कुमार शिंदे. ( जातीय अडचण नाही )
कायदा मंत्री- सचिन सावंत
माहिती व प्रसिद्धी- कुमार केतकर
हुसेन दलवाई- कोणतं खातं द्यावं बरं ?
नबाब मलिक- हुसेन दलवाईंचे राज्यमंत्री
जितेन्द्र आव्हाड- जातीय सलोखा मंत्री
नारायण राणे- रसायन उदयोग.
1 Dec 2013 - 7:10 pm | वडापाव
:P
1 Dec 2013 - 7:25 pm | सचिन कुलकर्णी
की निवडणुका कश्या जिंकाव्यात याचे गणित कॉंग्रेसला चांगलेच अवगत आहे.
1 Dec 2013 - 7:33 pm | सचीन
जनता बुद्धू नाहीये कॉंग्रेसने विकास केला नसता तर त्यांना जनतेने कधीच घरी बसवले असते.
जसे अवघ्या ५ वर्षात भाजपला बसवले.
1 Dec 2013 - 7:34 pm | संपादक मंडळ
या धाग्यावर कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने धागा वाचनमात्र करत आहोत.