कुठली कार घ्यावी?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
19 Nov 2013 - 2:05 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर मंडळी

माझा कार घ्यायचा विचार चालु आहे.
बजेट- ५-६ लाख

वापर शनिवार/रविवार नक्की. इतरवेळी कधीतरी ऑफिसला येण्यासाठी..
नेहमीप्रमाणे जास्त मायलेज,कमी मेंटेनन्स्,सर्व सुविधा,आफ्टर सेल सर्व्हिस या अपेक्षा आहेतच.

काही प्रतिक्रिया
मारुती-- स्पेअर पार्ट स्वस्त आणि मस्त,सगळीकडे उपलब्ध,पण पिक अप नाही (ओवरटेक करताना दम तोडते),पत्रा पुचाट,अक्सिलेटरला जोर लावावा लागतो

फोर्ड्-दणकट गाडी,लाँग ड्राइव्हला मस्त पण सर्विसिंगला महाग,अॅव्हरेज कमी

टोयोटा- गाडी बेस्ट,स्पेअर पार्ट महाग

फोक्सवॅगन- फारशी माहीती नाही

ऑफिसमध्ये आंजाव्रर वेबसाइट बघुन झाल्या असल्याने कृपया त्या लिंक देउ नयेत.प्रत्यक्ष वापरणारर्‍यांचे अनुभव अपेक्षित आहेत.
याआधी मिपावर असा धागा वाचला नाही किंवा राहुन गेला असेल.तर समस्त मिपाकरांना आवाहन कि कार सुचवावी.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

19 Nov 2013 - 2:10 pm | कपिलमुनी

आखुड शिण्गी , बहुगुणी , दुधाची सर्व आहे ..

ई व्ही २ . साधारण ५:५० ला जाते.. एबीएस - एअर बॅग सोडून सर्व अन्यथ्जागा भरपूर ..
आणि पिक अप आणि बिल्ट क्वालिटी हवी असेल तर ह्युंडाईची आय १० घ्या ..पण जागा कमी आहे त्या मधे ..
बाकी भन्नाट पळते !

मी_आहे_ना's picture

19 Nov 2013 - 2:15 pm | मी_आहे_ना

मला स्वतःला तरी @३वर्षं अ‍ॅव्हीओ-युवाचा चांगला अनुभव आहे (हॅचबॅक श्रेणीतली बसण्यासाठी ऐसपैस,@१४-१५ किमी/लि.) पण आता ते मॉडेल बंद झाले (नवीन सेल्-युवाची माहिती नाही) त्यामुळे मित्राकडे असल्याने बघितलेली आय-ट्वेंटी चांगला पर्याय वाटतो.

बाबा पाटील's picture

19 Nov 2013 - 2:29 pm | बाबा पाटील

टाटा इंडिका किंवा इंडिगो,दनकुन वापरा तिनवर्षांनी बदलुन टाका.

अग्निकोल्हा's picture

19 Nov 2013 - 2:32 pm | अग्निकोल्हा

हा शब्द वाचला " पुचाट ". ही शिवी वाटते, याचा अर्थ काय आहे नक्की ? बाकी चालुदे...

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 2:45 pm | शैलेन्द्र

मिळमिळीत/ सपक/ तकलादू इत्यादी..
तुमच्या मनातल्या गोष्टीशी या पुचाटचा संबंध नाही ;)

समजायच काय ? ;)

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 2:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

इथे पुचाट शब्द लेचापेचा,तकलादु,कमी जाडीचा पत्रा या अर्थाने वापरला आहे

कारचा प्रदीर्घ आणि लाखो किमींचा (शहर आणि सफरी) वापर आत्तापर्यंत झाल्याने काही रेकमेंडेशन्स देऊ शकतो.

तुम्ही आधी इंजिनकडून सुरुवात करा. ते निश्चित करुन मग कार ठरवा. कारण बाकी सर्व अ‍ॅस्थेटिक्स दुसर्‍यातिसर्‍या नंबरवर येतात.. आधी महत्वाचं इंजिनच.. कारण देखभाल खर्च,स्पेअरपार्ट्स उपलब्धता, सर्व्हिस, रोजचा इंधनखर्च, विमा, रिसेल व्हॅल्यू अशा बर्‍याच गोष्टी इंजिनवरच अवलंबून असतात.

फियाटचं क्वाड्राजेट

टाटा विस्टा - डिझेल क्वाड्राजेट १.३ लीटर इंजिन.

एक अत्यंत एफिशियंट आणि स्मूथ चालणारं इंजिन आहे. इंधन वाचवण्यासाठी उत्तम, पण ताकदीत कुठे कमी नाही. आत्ताची कार तीन वर्षे चालवतोय, डिझेल इंजिनवर पेट्रोल इंजिनच्या पिकअपचा फील मिळतो. टचवुड, लहानसादेखील प्रॉब्लेम नाही.

हे इंजिन इतकं उत्तम आणि एस्टॅब्लिश्ड आहे की ते १० वेगवेगळ्या कार्समधे वापरलं जातं. बाहेरचा डबडा वेगळा पण आत हृदय हेच.

मी आठवतील ती नावं खाली देतोय. या सर्व डिझेल गाड्यांत (त्यांच्या डिझेल मॉडेलमधे) हेच एक फियाट क्वाड्राजेट सीडीआरआय इंजिन आहे.

टाटा विस्टा
टाटा इन्डिगो मान्झा
मारुती स्विफ्ट
रित्झ
स्विफ्ट डिझायर,
फियाट स्टाईल,
मारुती SX4,
लिनीआ,
ग्रँड पुन्टो

पैकी लिनीआ, मान्झा, SX4, स्विफ्ट डिझायर आकाराने मोठ्या सेडान गटातल्या असल्याने त्या तुमच्या बजेटच्या बाहेर जातात.

उरलेल्या गाड्यांत आता गाडीच्या त्याच उत्तम इंजिनावर उगीच जास्त वजन / लोड न देणारी पण त्याचवेळी जास्तीतजास्त इंटर्नल स्पेस देणारी अशी गाडी आता आपल्याला पहायची आहे.

स्विफ्टची एकूण लांबी कमी असल्याने पुढच्या सीट व्यवस्थित अ‍ॅडजेस्ट करुन आरामात लेगस्पेस केली तर मागच्या सीट्सना पाय ठेवणंही कठीण होतं. त्यामुळे ही गाडी दिसायला काहीजणांना बरी वाटत असली / कॉम्पॅक्ट वाटत असली तरी लेगस्पेस आणि एकूण आतील प्रशस्तपणाबाबत डावी आहे.

फियाट पुन्टो ही गाडी चांगली असावी, कारण मी टेस्ट ड्राईव्ह करुन पाहिली नसल्याने ड्रायव्हर सीटच्या लेगस्पेसविषयी सांगू शकत नाही. पण तिच्या मागच्या भागात बसल्यावर ती काही फार स्पेशस वाटली नाही.

रित्झ ही गाडी बाजारात हल्ली फारशी चालत नाही, बहुधा मध्यंतरी सिरियस प्रॉब्लेममुळे कंपनीने या कार्स रिकॉल केल्या होत्या म्हणून लोक मागणी करत नसावेत किंवा उत्पादन बंद असावे, रिसेल व्हॅल्यूची तर मारामारच आहे.

आता राहिली टाटा विस्टा. त्या प्रकारातल्या इतर गाड्या टेस्ट ड्राईव्ह करुन अत्यंत प्रशस्त लेग स्पेस आणि एकूणच ऐसपैस इन्टेरियरसाठी तसंच अत्यंत आरामदायक ड्रायव्हिंग सीट पोझिशन, कंट्रोल पोझिशन्स यासाठी, तसंच ताकदवान इंजिन, पेट्रोलप्रमाणे पिकअप असे गुण मनात ठसल्याने आणि आधीच ईअरमार्क केलेलं फियाट क्वाड्राजेट डिझेल इंजिन यात असल्याने ती पसंत केली.

त्याखेरीज तपासलेल्या गाड्यांपैकी फोर्ड फिगो ही कारही विस्टाइतकीच उत्तम होती. थोडी बुटकी असल्याने सरळ आत न बसता झुकून सरकून घ्यावे लागत होते हाच बारीकसा तोटा. ड्रायव्हिंग पोझिशन फिगोची जास्त आरामदायक होती.. पण अगदी नकळत इतक्याच पातळीने.. बाकी सर्व तोडीस तोड. केवळ डिस्काउंट वगैरे कमर्शियल कारणांनी फिगो रद्द झाली अन्यथा ती घेतलीही असती.

विस्टा घेऊन तीन वर्षे झाली. यापूर्वी सँट्रो आणि मरिना या दोन कार बरीच वर्षे मोडेस्तोवर वापरल्या आहेत. त्यामुळे विस्टा ही एकुणात पहिलीच कार होती आणि तुलनाच नसल्याने तिच्या प्रेमात आहे असा प्रकार नसूनही या तीन वर्षात रोज या निर्णयाचा आनंद होतो.

तुम्ही दिलेल्या बजेटमधे थो SS डंसं अ‍ॅडजेस्ट करुन येऊ शकणार्‍या काही डिझेल गाड्या (इकॉनॉमी आणि ताकदीसाठी)
मी सुचवून पाहिल्या. आता तुम्हाला निर्णय घेणं सोपं झालं असावं.

आता भाग राहतो सर्व्हिसचा. टाटाची सर्व्हिस केंद्रे भरपूर आहेत आणि आत्तापर्यंत मला "एक्सेप्शनल" म्हणता येईल इतकी उत्तम सेवा मिळाली आहे. अगदी जिथे आहे तिथून एक फोन करताच ३५ किलोमीटर दूर येऊन विनामूल्य कार चालू करुन जाण्यापर्यंत. (बॅटरीची वायर लूज झालेली असणे या क्षुल्लक दोषासाठी)

फियाट आणि टाटाचे संयुक्त सर्व्हिस नेटवर्क असल्याने विस्टाऐवजी फियाटचे पुन्टो किंवा इतर मॉडेल घेतलेत तरी सर्व्हिस टाटाचीच.

पेट्रोल गाडी घेणार असाल तर वरील प्रतिसाद रद्दबातल समजावा.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 2:58 pm | शैलेन्द्र

तुमच्या प्रतिसादाशी सहमत..
पण फियाटचे क्वड्राजेट, व रेनॉल्डचे १.५ DCI यांत मला रेनॉल्डचे इंजीन जास्त आवडते, तुम्ही DCI इंजीन असलेली गाडी चालवून पाहीलीय का?

रेनाँ - निसान यांची कोणतीच कार कधी चालवलेली नाही. अर्थातच इंजिनविषयी ऐकून माहिती आहे आणि त्याविषयी एकूण फीडबॅक्स भारीच आहेत. पण थेट अनुभव नाही बुवा..

फोर्ड डिझेल इंजिन्सही तांत्रिकदृष्ट्या एकदम उच्च आहेत असं दिसतं. फियाट क्वाड्राजेट आपल्याइथे खूप अ‍ॅक्सेप्ट झालं आणि दहा मॉडेल्सवर किमान ८-१० वर्षे ट्राईड अँड टेस्टेड, हा एक अ‍ॅडव्हान्टेज.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 3:10 pm | शैलेन्द्र

मला जाणवलेला मुख्य फरक म्हणजे, DCI जास्त स्मूथ आहे, शिवाय माझी वेरिटो, ४थ्या गियरला ३०-४० ला आली तरी नॉक करत नाही (याचा अर्थ मी तशी चालवतो असा नव्हे :) ) आणि तिथुन सरळ ८० पर्यंत उचलता येते, दुसरीकडे मित्राची फिगो, डावुन गियर करावीच लागते.

आनंदी गोपाळ's picture

19 Nov 2013 - 10:56 pm | आनंदी गोपाळ

असो. (वेरिटो ही सेडानच नाहिये इथून माझे मत सुरू होते. फक्त इंजिन पहायचं तर ट्रकच्या चॅसिज जातात रस्त्यावरून त्या पॉवरफुल इंजिनवाल्या असतात) ;)

शैलेन्द्र's picture

21 Nov 2013 - 9:08 pm | शैलेन्द्र

"(वेरिटो ही सेडानच नाहिये इथून माझे मत सुरू होते. फक्त इंजिन पहायचं तर ट्रकच्या चॅसिज जातात रस्त्यावरून त्या पॉवरफुल इंजिनवाल्या असतात) Wink"

तुमची सेडानची व्याख्या सांगता का? आम्हाला बुवा तीन कप्प्यावाल्या गाड्या सेडान वाटतात :)

ग्रेटथिन्कर's picture

21 Nov 2013 - 10:25 pm | ग्रेटथिन्कर

तीनकप्पे

मी आठवतील ती नावं खाली देतोय. या सर्व डिझेल गाड्यांत (त्यांच्या डिझेल मॉडेलमधे) हेच एक फियाट क्वाड्राजेट सीडीआरआय इंजिन आहे.

मारुती ने फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरण कधिच बंद केलं आहे. आता मारुती k-series नावाचं सुझुकी मेड इंजिन वापरते (सर्व गाड्यांमधे). फियाट ही पुर्वी पासुन उत्क्रुष्ट इंजिन बनवणारी कंपनी.
क्वाड्राजेट इंजिन बद्दल सहमत.

रित्झ ही गाडी बाजारात हल्ली फारशी चालत नाही, बहुधा मध्यंतरी सिरियस प्रॉब्लेममुळे कंपनीने या कार्स रिकॉल केल्या होत्या
सिरियस प्रॉब्लेम झालेली आणि रिकॉल केलेली गाडी रित्झ नव्हे. ती गाडी होती Maruti A-Star.
Faulty A-Star
उलट रित्झ ही मारुती ची one of the best selling car आहे.

बाकी सहमत.

चुकीच्या दुरुस्तीबद्दल अत्यंत आभारी आहे. एकुणात जेव्हा हे इंजिन आलं त्या नंतरच्या काळात (२००३ नंतर) या या कार्सनी ते वापरलं असं मनात नोंदवलं गेलं होतं. त्यामुळे हेच इंजिन घ्यावं हा निर्णय झाला होता. मारुती आता ते वापरत नाही ही माहिती नवीन आहे. धन्यवाद. स्विफ्टमधे मात्र अगदी नुकतेच पाहिले तर हेच इंजिन होते. बाकीच्या मॉडेल्सनी स्विच केले असेल..

होय होय.. ए - स्टार गाडी ती...

रित्झ आणि ए- स्टारमधे गोंधळ झाला.. :) शेप सारखाच असतो की काय यांचा?

रित्झचा आकार लहान असावा विस्टा पेक्षा.

वेल्लाभट's picture

19 Nov 2013 - 8:16 pm | वेल्लाभट

हां तेच म्हटलं ! रिट्झ मधे बाजारातील एक आदर्श डिझेल इंजिन आहे. One of the best diesel hatchbacks around. Just wonderful. ढुंगणावर लाथ घातल्यासारखं (पण ट्रेंडी) असं मागचं डिझाईन आवडत असेल तुम्हाला तर रिट्झ डिजेल कव्वा गाडी आहे.

आनंदी गोपाळ's picture

19 Nov 2013 - 11:06 pm | आनंदी गोपाळ

मारूती रिट्झ अन ऑम्नी या गाड्यांसाठी काय वेगळे डायवर लोक्स जन्मास येत असतात काय?
इतक्या बुंगाट दामटणारे लोक्स रस्त्यावर सहसा दिसत नाहीत. अपवाद ट्रक क्याट्यागिरितल्या काही लोकांचा ;)

मारुती अजुनही फियाटचं क्वाड्राजेट डिझेल इंजिन वापरते.

या इंजिन ला गमतिने all india engine असेही म्हणतात.

सुझुकि अजुन त्यान्चा डिझेल इंजिन वर काम करते आहे.

नानबा's picture

20 Nov 2013 - 9:59 am | नानबा

या इंजिन ला गमतिने all india engine असेही म्हणतात.

नव्हे कै.. टीम बीएचपी वाले याला National Diesel Engine of India म्हणतात.

सुखी's picture

20 Nov 2013 - 1:54 pm | सुखी

येकदम करेक्ट... :)

मैत्र's picture

19 Nov 2013 - 10:19 pm | मैत्र

मारुती अजूनही फियाट क्वाड्राजेट इंजिनच वापरत आहे.
स्वतःचं के सिरिज इंजिन हे फक्त पेट्रोल मॉडेलसाठी आहे. डिजेल इंजिन फियाटच आहे.
http://www.marutisuzuki.com/swift/technology.html
DDiS हे तेच क्वाड्राजेट आहे.

चिप्लुन्कर's picture

19 Nov 2013 - 4:50 pm | चिप्लुन्कर

इतका मस्त डीटेलवार प्रतिसाद वाचून ते नक्की डीझेल गाडी घेतील .

आनंदी गोपाळ's picture

19 Nov 2013 - 11:02 pm | आनंदी गोपाळ

सध्या टाटा कंपनी विस्टा मोठ्या प्रमाणात विकायच्या मूडात असल्याने तिला बेल्स अँड व्हिसल्स मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत. उदा. फुकट नॅव्हिगेशन सिस्टीम, टचस्क्रीन ऑडिओ, स्टिअरिंगवर फोन्/ऑडिओ कंट्रोल्स डिकीत लाईट वगैरे वगैरे.

धागाकर्त्यांना विनंती व सुचवणी(सजेशन) कि थोडे बजेट ताणा, अन वर गविंनी दिलेल्या प्रतिसादास माझं शेपूट जोडून पहा.
शेपूट १ :

इंजिन नंतर सर्वात म्हत्वाची ती एबिसीडी असते. 'एबीएस' 'एबीडी' 'एअरबॅग्स' इत्यादि.
सेफ्टी फीचर्स सगळ्यात आधी पहावेत. मग नंतर बाकी सगळे.

शेपूट २ :
डिझेल गाडी अल्टीमेटली स्वस्त पडते. पेट्रोल कार वाल्यांनी कितीही 'डेली रन' गुणिले 'पेट्रोल कॉस्ट' इत्यादी गुण गायीलेत तरीही डिझेलच घ्या. पेट्रोल गाडी घेऊन भर उन्हात काचा उघड्या ठेऊन फिरणारे लोक पाहिले की कीव येते ;)

(माझी सध्याची गाडी : मांझा एलान)

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Nov 2013 - 2:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

सरकार डिझेलवरचे नियंत्रण ६ महिन्यात काढुन घेणार अशी बातमी आहे आजच्या सकाळमध्ये

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 2:51 pm | शैलेन्द्र

काही प्रश्न..
* गाडी कुठे वापरणार आहात? शहर् /गाव?
* महिन्याला किती किमी?
* ठेवणार आहात की दोन चार वर्षाने विकणार? रीसेल व्हॅल्यु हा निकष आहे का?
* प्रवास कसा असणार? कुटुंबात किती लोक आहेत?
* नविन शिकणार की येते? चालवण्याची पद्ध्त कशी आहे? कशी गाडी आवडते?
* "लुक्स" हा निकष आहे का?
* इतर काही खास उपयोग? फर्माइश?

रमेश आठवले's picture

19 Nov 2013 - 2:58 pm | रमेश आठवले

मी चार वर्षापूर्वी तुम्ही दिलेल्या किमतीच्या रेंज मध्ये असलेल्या सर्व गाड्यांचा तौलनिक अभ्यास करून
मारुती wagon R ची निवड केली. लिटर मागे किलो meter चांगले आणि मुख्य म्हणजे आतमध्ये उंची चांगली आणि सामान ठेवण्यासाठी इतरांच्या तुलनेत जागा अधिक. विमान तळावर अथवा रेल्वे प्रवासासाठी याचा फायदा भरपूर होतो.
कायद्याच्या बंधनात वेग ठेवल्यास तक्रारीला जागा नाही.

थोडे बजेट वाढवुन फोक्सव्यागन पोलो जि टी आइ घ्या...मस्त गाडि...मी वेन्टो वपरतो...बिल्ट क्वालिटि, कम्फरट, पिकप.जर्म् न इन्जिनिअरिन्ग

योगी९००'s picture

19 Nov 2013 - 3:30 pm | योगी९००

माझे बजेट आणि गरज साधारण तुमच्या प्रमाणेच होत्या.
मी सहा महिन्यांपुर्वी स्विफ्ट डिझायर पेट्रोल घेतली. माझा अनुभव असा आहे,

आवडलेल्या गोष्टी :
१) उत्तम मिलेज - मला नाशिक हायवेला साधारणपणे २३ kmpl मिळते. (जर गाडी ७०-८० या स्पिड्ला चालावली तर )
पेट्रोल साठी इतके मिलेज म्हणजे खुपच झाले.
२) देखभाल खर्च - अजुन नवी असल्याने काहीच नाही. पण मारूती fortpoint ची सर्वीस खुपच छान आहे. घरी येऊन गाडी घेऊन जातात. proactively फोन करतात.
३) डिकी - full sedaan एवढी नसली तरी चार जणांसाठी sufficient आहे. माझी सध्याची गरज भागली जात आहे.
४) interior - मलातरी डिझायरचे interiors अपमार्केट वाटतात. आतमध्ये बसल्यावर रॉयल फिलींग येतो..
५) ओवरटे़कींग - मला तरी कधी दम लावावा लागला नाही.
६) हाय स्पिड - जास्त जोरात पळवताना स्टेबल राहते . ( मी एकदाच १३० किमी/तास ला चालावली). १०० ला कधी येते ते कळतच नाही.
७) इंजिनचा आवाज - जर सर्व काचा बंद असतील तर आतमध्ये जाणवतच नाही की गाडी चालू आहे ते...very low engine noice and vibrations.

न आवडलेल्या गोष्टी :
१) Reverse parking - Reverse Parking चा डिस्प्ले पहिल्या महिन्यातच उडाला. मारूतीने खुप प्रयत्न केले पण Nippon ची सर्विस चांगली वाटली नाही. (nippon is manufaturerer of reverse parking system).
2) A/C - A/C चा फिल्टरमध्ये झाडाची पाने सारखी अडकतात आणि त्यामुळे कधीकधी burning smell येतो. फिल्टर साफ करणे जरा कटकटीचे आहे.
३) pick-up at moderate speed - तुम्ही जर ४०-४५ स्पिडला आणि ४ थ्या gear वर असाल आणि एंजिन जर २००० RPM जवळ असेल, तर जरा गाडीचा pick-up कमी जाणवतो. अशावेळी overtake करताना तिसर्‍या gear ला गाडी आणावी लागते. (जर चढ जरी आला तरी तिसरा gear टाकावा लागतो).

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 3:36 pm | शैलेन्द्र

१) उत्तम मिलेज - मला नाशिक हायवेला साधारणपणे २३ kmpl मिळते. (जर गाडी ७०-८० या स्पिड्ला चालावली तर ) पेट्रोल साठी इतके मिलेज म्हणजे खुपच झाले.

तुम्ही मायलेज कसे काढता?

मालोजीराव's picture

19 Nov 2013 - 4:00 pm | मालोजीराव

टाकी फुल करून

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 4:02 pm | शैलेन्द्र

कोणाची?

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 4:10 pm | शैलेन्द्र

गमतीचा भाग सोडा, पण पेट्रोल कारला इतका मायलेज सहसा मिळत नाही, म्हणुन विचारलं

एक टाकी फुल आणि दुसरी रिकामी असेल तर चांगला मायलेज मिळतो.

जेव्हा नवीन नवीन चालवत होतो, तेव्हा हायवे वर all clear असले तरी ७०-८० च्यावर पळवली नाही. तसेच क्लचचा कमी वापर, योग्यवेळी गिअर बदलणे यामुळे मायलेज चांगला मिळतो. जसा चालवण्याचा अनुभव वाढला तसा गाडीचा वेग ही वाढू लागला आहे त्यामुळे हल्ली मला कमी मायलेज मिळतो.
http://www.carblogindia.com/maruti-swift-dzire-registers-a-mileage-of-42...

एक टाकी फुल आणि दुसरी रिकामी असली तर गाडीचा मायलेज चांगला मिळतो :)

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 4:24 pm | शैलेन्द्र

रिकाम्या टाक्या गॅस पकडतात ;)

lakhu risbud's picture

19 Nov 2013 - 11:35 pm | lakhu risbud

ते कदाचित २ लिटर चे मायलेज सांगत असतील !!

योगी९००'s picture

20 Nov 2013 - 10:37 am | योगी९००

दोन लिटर ..हा हा हा...

नशिब माझे...!!! २३ लिटर / किमी असे नाही म्हणाला ते..

बाकी खालील लिंक वाचून तुम्हाला डिझायर पेट्रोल ३० किमी/लिटर देऊ शकते यावर विश्वास बसायला हरकत नाही.
http://www.zigwheels.com/news-features/news/maruti-suzuki-dzire-register...

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 4:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

@योगी/आरोह-स्विफ्ट डिझायर सेडान असल्याने माझ्या बजेटबाहेर आहे.आणि फोक्सवॅगन जीटीआय सुद्धा
@शैलेन्द्र- गाडी शहरात वापरणार,महीन्याला साधारण १२०० की.मी., प्रवास मुंबै,पुणे,नाशिक,कोकण, साधारण ४-५ जण एकावेळी बसतील. लुक्सचा निकष नाही पण गाडी उंच असेल तर सरळ बसता येते वाकुन शिरायला लागत नाही.३-४ वर्षानी विकणार.चालवता येते.
गवि-तुमच्या डीटेलिंगवर आपण फिदा.पण गाडीचे रनिंग जास्त नसल्याने पेट्रोल कारच घेइन (हा निकष चूक असल्यास सांगावे )आणि पेट्रोलमध्ये CRDi सारखे इंजिन असते का हि एक शंका आहेच.फोर्ड फिगो proce/comfort रेशोमध्ये उजवी वाटत आहे.
@रमेश आठवले-वॅगन आर VXI शेवटचा ऑप्शन म्ह्णुन ठेवली आहे.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 4:08 pm | शैलेन्द्र

३-४ वर्षानी विकणार.

मग मारुती/ह्युंडै हाच पर्याय राहतो.. स्विफ्ट किंवा रीत्झ कशी वाटते बघा..

पण गाडीचे रनिंग जास्त नसल्याने पेट्रोल कारच घेइन

हॅ हॅ हॅ.. सगळेजण असंच म्हणतात.. यापूर्वीची हिस्टरी आहे का हे सिद्ध करण्यासाठी? मग खरं.

आजरोजी डिझेलही किंमतीने वाढत असलं तरी किंमतीत फरक आहेच... डिझेल गाडीला पर्याय नाही. डिझेल गाडी घेतली आणि जरा बेतानेच थोडीथोडी चालवली तरी काही ड्यामेज नाही.. एकदाच सुरुवातीला जास्त किंमत.. पण पुढे चारपाच लाँग ट्रिपमधे पेट्रोलचा खर्च असा काही येईल की सुरुवातीचा फायदा पुसला जाईल.

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Nov 2013 - 5:33 pm | लॉरी टांगटूंगकर

साध गणित,
पेट्रोल गाडी पाच लाखाची, डिझेल सहा लाखाची धरु, चार वर्षात(गाडीचे आयुश्य) एक लाख वीस हजार(किमान -१,००,००० +४% ब्यांकेत पडले तर मिळणारे व्याज) वसुल करायचे आहेत.

मोजा बोटे!

माझ्या गणिता नुसार रोजचे किमान साडे बेचाळीस कि.मि. किंवा चार वर्षात बासष्ठ हजार किमि चालवली तर ती वसुली होइल.

आनंदी गोपाळ's picture

19 Nov 2013 - 11:12 pm | आनंदी गोपाळ

सध्या घरात चार चाकाच्या २ आहेत. इतर २ दुकानाच्या कामाच्या आहेत.

डिझेल स्वस्त पडते.

लोनचे हप्ते. डेप्रिसिएशन. रिसेल व्हॅल्यू. मग दिवसाचे रनिंग. प्लस पेट्रोल व डिझेल यांची दररोज वाढणारि किंमत.

आता मोडा बोटे :)

आनंदी गोपाळ's picture

19 Nov 2013 - 11:14 pm | आनंदी गोपाळ

ब्यांक व्याज वसूल करतेच. टोलनाक्यावर टोल द्यावा लागतोच. गाडीत बसून रस्त्यावर उतरलो, की घासलेट भरायला खिशातले पैसे नगद जातात. टोटल सेव्हिंगचा हिशोबच लागत नाही तिथे त्या क्षणी.

मूळ सीड मनी काय लाख दीड लाख भरला तो भरला. गाडी हातात आली.

हप्ता तर जाणारच! होऊ दे चर्चा ;)

सार्थबोध's picture

19 Nov 2013 - 4:26 pm | सार्थबोध

मायलेज छान , भरपूर जागा , उंची चांगली , डिकी मध्ये बरीच जागा, नवीन सोयी- कोलप्सिबल स्टेरिंग,पावर मिरर आणि पावर विंडो, पावर स्टेरिंग …मस्त कौटुंबिक कार, स्पेअर्स स्वस्त , रिसेल किंमत चांगली येते

निशांत५'s picture

19 Nov 2013 - 4:27 pm | निशांत५

Specifically VXI ka, LXI and upper ka nako

दर महिन्याचे १०,००० ते १२,००० किलो मिट्रर पेक्षा जास्त् रनिग असेल तर डिझेल गाडि नहितर पेट्ररोल गाडि.
नहितर, डिझेल गाडिचा फायदा पुसला जातो.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 4:37 pm | शैलेन्द्र

महिन्याला १००००-१२०००?
मग डीझेल गाडी टॅक्सीवाल्यांनाही नाही परवडणार.. :)
महिन्याला १५०० च्या वर रनिंग असेल व CNG option वापरण्याजोगा नसेल तर डिझेल गाडी घ्यावी.

मी वॅगन आर VXI घेतली २०११ मध्ये. अतिशय अप्रतिम कार आहे. मेटेनंन्स पण फार नाही करावा लागत. मायलेज १५ ते १७ किमी देते. चालवताना फार मजा येते. k-series इंजिन आहे. नवनीत ठाणे ह्यांची सर्व्हिस फार उत्तम आहे. लेग स्पेस कार मध्ये फार चांगली आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 4:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

डिझेल स्वस्त म्हणुन डिझेल गाडी घ्यायची तर CNG हाही चांगला पर्याय ठरु शकेल (शहरात)

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 4:43 pm | शैलेन्द्र

*फक्त शहरात मिळत, एकावेळी साधारण १२०-१३० किमी पुरेल इतकच भरता येत.
*बूट मधली जागा वाया जाते.
*इंजीन वॉरंटी संपते.(कंपनी फिटेड नसेल तर)

आणि

मज्ज्जा नाय राव..

धागा निघालाच आहे तर माझाही प्रश्न विचारुन टाकतो.
माझ्या कडे आत्ता वॅगन आर आहे. मला सेदान सिगमेंट मध्ये ११ ते १२ लाख बजेटात पेट्रोल गाडी कोणती घ्यावी हा प्रश्न पडला आहे. होंडा सिटी कि वेरना का वेन्टो अस कनफ्युजन आहे

रेनॉ स्काला पहा.. नुकतीच कलीगने घेतली. उत्तम.

सेदानच का? असा खास चॉईस नसेल तर तुमच्या बजेटमधे इतरही खूप चॉईसेस आहेत की..

सेदानचा क्लास बाजूला ठेवला तर XUV 500 घ्या की. माझं तसं बजेट असतं तर मी डोळे मिटून घेतली असती. वेगळ्याच लेव्हलवर जाऊन बसेल तुमचा डेली ड्रायव्हिंग एक्स्पिरियन्स..

सेदानच हवी आहे हे नक्की, SUV नको आहे.

वेल्लाभट's picture

19 Nov 2013 - 8:12 pm | वेल्लाभट

सनी, किंवा वेर्ना... हँड्स डाउन.
एस एक्स फोर ला मायलेज नाही म्हणून नाहीतर तीही होती.
फोक्सवागन जर्मन कार्स वगैरे ठीक आहेत पण खर्च जाम होतो; प्रत्यक्ष मालकांचे शब्द आहेत. वेन्टो भारी लो आहे बाबा. बाकीच्या गाड्यांना जो गतिरोधक असेल तो हिला डोंगर होतो.

सर्वसाक्षी's picture

20 Nov 2013 - 11:48 am | सर्वसाक्षी

१) खर्च - गेल्या दोन वर्षात एकुण खर्च रु. २१,०००.०० मात्र. तोही केवळ वार्षिक देखभाल, तेल व गाळण्या आदी बदलण्याचा, आणि आसनांच्या उत्तम साफसफाइसह. गाडी घेताना मूळ वॉरंटी २ वर्षे + वाढीव आकारासह पुढील दोन वर्षांसाठी रु. ८०००.०० म्हणजे एकुण गाडी घेतल्यापासुन चार वर्षे - अनिर्बंधीत अंतरासाठी. यात सगळे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल भाग व एसी तसेच सर्व स्विचेस, मोटर्स, रेडीओ, सीडी समाविष्ट. वर्षाला १०५००.०० रु देखभाल खर्च रास्त आहे, अवाजवी नाही. या गाडीला ६ वर्षांची अँटी परफोरेशन गॅरंटी आहे, तळाला खर्च करुन कोटींग करावे लागत नाही. सर्विस अतिशय तत्पर आहे. गाडी नेल्यापासून परत करे पर्यंत सेवा विभागाचे कर्मचारी संपर्कात असतात, ते कामे व खर्च याचा अंदाज देतात व आपल्या संमतीनंतर काम करतात. गाडी परत केल्यावर देयक व पावती मिळाल्याची खातरजमा केली जाते व नंतर सेवेच्या दर्जाचा अभिप्रायही घेतला जातो.
२) स्पीड ब्रेकर - जर वेंटोला स्पीड ब्रेकर डोंगर असेल तर सीटीला तो हिमालय असेल. मी स्वतः पुढे २ मागे ३ असे एकुण ५ प्रवासी घेउन अनेकदा गाडी चालवली आहे. स्पीड ब्रेकरला घासले जातात ते कडक फायबरचे मड फ्लॅप, गाडी नव्हे. ग्राउंड क्लिअरन्स सीटीचा बरा की वेन्टोचा याचा एक तर अनुभव घ्या नाहीतर सीटी चालविणार्‍यांना विचारा ते स्वतः गाडी प्रत्येक स्पीड ब्रेकरला घासल्याची तक्रार करतात.
३) सुरक्षितता. - आणिबाणीच्या परिस्थितीत म्हणजे गाडीला आग लागणे वा पाणी आत शिरणे अशा वेळी देखील दरवाजे लॉक केलेल्या अवस्थेतदेखिल उघडता येतात, आपोआप बंद होत नाहीत. (२६ जुलै २००५ मध्ये अशा घटना घडल्या होत्या)
४) मजबुती - दोन्ही गाड्या पाहा आणि स्वतः ठरवा.

दोन्ही गाड्या स्वतः चालवुन पाहा, एक फोन करायची खोटी, विक्रेते गाडी घेऊन येतील. तुमच्या अनुभवानुसार निवड करा. अर्थात गाडीचा आकार, रुप वगैरे वैयक्तिक निवडी आहेत, त्याला तुलना नाही.

दोन्ही गाड्या चालवुन पाहील्या आहेत.
वेंटो मजबुत आहे, सिटीच इंजीन जास्ती स्मुथ आहे अस वाटत आहे.
सुरक्षा ह्या मुद्दयावर वेंटो चांगली वाट्ते आहे.
काटा परत ५०/५० ला आला आहे.

आणिबाणीच्या परिस्थितीत म्हणजे गाडीला आग लागणे वा पाणी आत शिरणे अशा वेळी देखील दरवाजे लॉक केलेल्या अवस्थेतदेखिल उघडता येतात, आपोआप बंद होत नाहीत.

हीच का ती आणीबाणी ला सीटबेल्ट जाम होणारी आणि दरवाजे लॉक होणारी गाडी ? आतमध्ये अडकलेल्या माणसाचा मृत्यू झाला

vento

vento

सर्वसाक्षी's picture

21 Nov 2013 - 2:45 pm | सर्वसाक्षी

ते तर मेकॅनिकल लॉक आहे! त्याचा आगीशी काय संबंध? (मी सीट बेल्ट्चा उल्लेख केलाही नव्हता.)
खालच्या चित्रात गाडीचा दरवाजा उघडा दिसत आहे. वरच्या चित्रात ड्रायव्हरकडचा दरवाजा दिसत नाही. अपघाताचा तपशिल आहे का?
अनलॉक विषयी अर्थात मला प्रत्यक्ष अनुभव नाही पण फोक्स्वॅगनचा असा दावा आहे. अगदी दरवाजे लॉक करुन बॅटरी काढली तरीही दरवाजे आतुन उघडतात असा त्यांचा दावा आहे - पडताळुन पाहिला नाही.

मालोजीराव's picture

21 Nov 2013 - 2:59 pm | मालोजीराव

तो दरवाजा उचकटून बाहेर काढलाय लोकांनी, वैशाली हॉटेल जवळ घडलेलं हे,
गाडीचा ECU आगीमुळे आधी जळाला किंवा खराब झाला असावा त्यामुळे असेल कदाचित, पण कुठलीच गाडी फुलप्रूफ नसते

लिनिया मी स्वत: मागची अडिच वर्ष वापरतो आहे खटाखट गाडी आहे, नशिबाने आज पर्यंत झिरो मेंटनन्स ,१४० च्या स्पिडलाही अगदी आरामत चालते.फक्त भल मोठ धुड आहे त्याची सवय करुन घेणे गरजेचे.मित्र वेर्ना वापरतो,तो देखिल तीच्याबद्दल चांगलच बोलतो.बाकी ज्याचा त्याचा चॉइस

इरसाल's picture

23 Nov 2013 - 1:51 pm | इरसाल

एकदा व्हर्ना घ्या आणी त्यात शेलचे ७१ रु लिटर चे डिझेल टाकुन चालवुन पहा............ मग मला सांगा.

नानबा's picture

19 Nov 2013 - 4:51 pm | नानबा

होंडा सिटी कि वेरना का वेन्टो अस कनफ्युजन आहे

होंडाने सिटीचं उत्पादन बंद केलं आहे. नुकतंच ऑफिसमधल्या एकांना घ्यायची होती म्हणून बरीच शोधाशोध केली, पण सगळ्या होंडा शोरूम्समधून एकच उत्तर आलं की नवी सिटी जानेवारीमध्ये लाँच होणार आहे.
बाकी व्हेर्नाचा ग्राऊंड क्लियरन्स फारच कमी आहे. खड्डेमय रस्ते आणि उंच स्पीडब्रेकर्सना बंपर हमखास घासतो.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 4:56 pm | शैलेन्द्र

११-१२ लाखाचं बजेट असेल तर वेन्टो डीझेल बघा ना ,

सर्वसाक्षी's picture

19 Nov 2013 - 6:11 pm | सर्वसाक्षी

एकदा टेस्ट ड्राईव्हला जा, जर्मन उत्पादकांचा आत्मविश्वास म्हणजे काय ते दिसेल. तुमच्या बरोबर आलेला विक्रेता स्वतः सांगतो की खड्ड्यात घाला, हळु करायची गरज नाही. गाडी स्थीर आणि दणकट आहे. पिक अपही उत्तम. न्यायची म्हटली १४० -१६० ला न झुलता सहज जाते. एसी सह ठाणे पुणे साधारण १८ किमी/ प्रतिलिटर (पेट्रोलवर) मिळते तेही राजमार्गावर १००-१२० ला चालवुन. मुंबईच्या बीटुबी वाहतुकीत १०.-१०.५० मिळते. सर्विसिंग वर्षातुन एकदा/ १५००० किमी वर. शिवाय स्वतः सर्विस सेंटरला जायची गरज नाही.
शक्य असल्यास १ लाख अधिक द्या आणि ऑटोमॅटिक घ्या, विशेषतः मुंबईत रोज चालवायची असेल तर.

वेल्लाभट's picture

19 Nov 2013 - 8:11 pm | वेल्लाभट

सनी, किंवा वेर्ना... हँड्स डाउन.
एस एक्स फोर ला मायलेज नाही म्हणून नाहीतर तीही होती.
फोक्सवागन जर्मन कार्स वगैरे ठीक आहेत पण खर्च जाम होतो; प्रत्यक्ष मालकांचे शब्द आहेत. वेन्टो भारी लो आहे बाबा. बाकीच्या गाड्यांना जो गतिरोधक असेल तो हिला डोंगर होतो.

आनंद's picture

20 Nov 2013 - 10:19 am | आनंद

धन्यवाद!
सिटी कडे कल वाढतो आहे, जानेवारीत मिळत असली तरी हरकत नाही.

विटेकर's picture

20 Nov 2013 - 11:34 am | विटेकर

शान आहे हो गाडीला ! गेली ३ वर्षे वापरत आहे . मज्जा .
दोन तोटे :
१. ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे
२. पेत्रोल जरा जास्त लागते.
पण गाडीची हौस फिटते महाराजा !

विनोद१८'s picture

27 Nov 2013 - 12:52 am | विनोद१८

माझ्या मते 'स्कोडा - रयापिड' विचारात घेऊ शकता, अतिशय उत्तम जर्मन बनावटीचे इन्जिन, मजबूत बान्धणी, कमी मेन्टेनन्स व सुरक्षित तसेच तुमच्या बजेट मध्ये बसणारी. एकदा शोरुमला जाउन याच. सध्या त्यान्च्या काही डिस्काऊन्ट ऑफर्स चालु आहेत. एक लक्षात असू द्या 'जर्मन' गाड्या केव्हाही उत्तमच.

विनोद१८

बिहाग's picture

22 Dec 2015 - 10:00 pm | बिहाग

होंडा सिटी. रीसेला छान. रोज वापरायला सर्वोत्तम .

मारुती ने फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरण कधिच बंद केलं आहे. आता मारुती k-series नावाचं सुझुकी मेड इंजिन वापरते (सर्व गाड्यांमधे). फियाट ही पुर्वी पासुन उत्क्रुष्ट इंजिन बनवणारी कंपनी.
क्वाड्राजेट इंजिन बद्दल सहमत.

भौ, मारुती अजुन पन फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरतं फक्त त्याचं नाव डी डी आय (ड्रीम डिझल) अस ठेवलय. k-series इंजिन हे फक्त पेट्रोल कार्स मधे येते आणी डी डी आय एस (फियाटचं क्वाड्राजेट) हे डिझल इंजिन आहे.

वॅगन आर बद्दल बरीच अनुकूल मतं आहेत. खरंच आहे ते. ही एक बेस्टसेलर गाडी आहे. विशेषतः नवी वॅगन आर.

फक्त एकच मुद्दा जरा लक्षात आणून द्यावासा वाटतो, जो केवळ तुलनेनेच सिद्ध होऊ शकेल. वॅगन आरच्या मागच्या सीटवर तीनजण नीटपणे बसू शकत नाहीत. लहान मुले ठीक,पण तीन नॉर्मल आकाराचे मोठे लोक तिथे बसताना खूप ओढाताण होते. बाळसेदार मोठे लोक तर अशक्यच.

नुसती तीन पार्श्वभागांच्या एरियाची बेरीज असा भाग नसतो.. जरा मोकळीक लागतेच.. प्रवासात / लिफ्ट देताना एकमेकांशी जवळचं नातं नसलेले एक स्त्री आणि दोन पुरुष किंवा उलट, असं कॉम्बिनेशन नातेवाईकांत मित्रमंडळात किंवा कलीग्जमधे झालं तर इतके खेटून बसवता येत नाहीत.

सँट्रो बरी मग त्याबाबतीत. मागचा भाग किंचित फुगीर असल्याने तीनजण आरामात बसतात. मी तर पहिली कार म्हणून वॅगन आर या एका मुख्य कारणाने नाकारली होती. नवी वॅगन आर थोडी वाईड दिसते पण प्रत्यक्षात हा इफेक्ट किरकोळच आहे.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 4:51 pm | शैलेन्द्र

दुसरं, वॅगन आर घेवून कधी ८०-९० च्या वेगात कॉर्नरींग कराव लागतंय अशी कल्पना करुन बघा.. प्रचंड अन्स्टेबल गाडी आहे ती. या वेगात गाडी वळवावी असा याचा अर्थ नव्हे पण आणीबाणीच्या वेळी जेंव्हा असं कराव लागतं तेंव्हा गाडीवर विसंबता आलं पाहीजे

मी_आहे_ना's picture

19 Nov 2013 - 5:29 pm | मी_आहे_ना

अगदी ह्याच मुद्द्यासाठी वॅगन-आर रद्द केली. (उंची छान आहे, पण बहुधा त्यामुळेच स्टॅबिलिटी अफेक्ट होते)

राजेंद्र मेहेंदळे साहेब, CNG ला पीक अप मिळत नाही चांगला तसेच मेटेनंन्स पण फार ठेवावा लागतो. परत जर बाहेर गेलात तर CNG पंप फारसे मिळत नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 8:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

हम्म हे नवीन समजले..बाहेर CNG पंप नाहीत हे खरे

मुळातच गाड्या, ड्रायव्हिंग हा अत्तिशय जिव्हाळ्याचा विषय असल्याने 'ज्या वाटेला जायचं नाही तिथला पत्ता कशाला विचारायचा?' हा नियम न मानता गाड्यांचे रिव्ह्यूज, स्पेक्स मी वाचत, अभ्यासत असतो. त्यावर आणि स्वानुभवावर आधारित माझी काही मतं/सल्ले तुम्हाला सांगतो.

५-६ लाखाच्या रेंज मधे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गविंनी म्हटल्यानुसार इंजिन, किंवा तांत्रिक बाबी पहिले, मग दृश्य बाबी असा क्रम असावा.

नंबर १ पर्याय. मारुती. आमच्या घरात आजवर केवळ मारुतीच्या गाड्या आल्यात. परंतु मांडतोय ती मतं अनबायस्ड आहेत.
स्विफ्टः ड्रायव्हिंग चं वेड असेल; तर यासारखी पेप्पी गाडी नाही. मायलेज खूप भारी नाही पण खूप कमीही नाही. १५-१६. रियलिस्टिक. मागे बसायला इतर गाड्यांच्या तुलनेत अडचण होते. सिटी असो किंवा हायवे; दोन्हीसाठी योग्य. तुम्ही दिलेल्या वापरास साजेशी. डिझेल इंजिन जबरदस्त आहे; पण सर्वसाधारण नियमानुसार डिझेल घेणार असाल तर रनिंग भरपूर असलेलं बरं; तरंच डिझेल ची प्फ्युएल इकॉनॉमी जमेची बाजू ठरते. पेट्रोलही सुरेख आहे.
मारुती ची ASS (वेगळा अर्थ न काढणे. आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणायचंय) सर्वोत्तम आहे यात वाद नाही.

वॅगन आर - एक ट्राईड अ‍ॅण्ड टेस्टेड गाडी. उंच किंवा बुटक्या सर्वांनाच स्विफ्ट पेक्षा जास्त आरामशीर बसता येईल अशी. मायलेज छान. १७-१९. ड्युओ चा पर्याय उपलब्ध. लगेज स्पेस सुधा चांगली. गाडी तुम्हाला निराश करायची नाही.

आय१० ग्रँड - नवीन चेहरा. पण अतिशय प्रॉमिसिंग. रिव्ह्यूज सुरेख आहेत. स्पेक्स वरूनही ती गाडी चांगलीच आहे यात शंका नाही. साधी आय१० चांगली आहेच; पण हिच्यात खूप गोष्टी सुधारलेल्या आहेत. काही फीचर्स तर सी क्लास सेडान्स मधे नाहीत अशी आहेत. त्यामुळे हिचा विचार कराच. ह्युंडईची पेट्रोल व डिजेल दोन्ही इंदिन्स डोळे मिटून घेण्यासारखी आहेत. त्यामुळे ती चिंता नसावी. मायलेज चांगलं. १७-१९

फोर्ड फिगो - फोर्ड हा ब्रँड तसा नवीन नाही; (एस्कॉर्ट, आयकॉन, इ.) पण आता खूप बदललेला आहे. फिगो गाडी सर्वगुणसंपन्न आहे. पण नख-याची आहे. मेंटेनन्स लई जास्त येऊ शकतो. बाकी जागा, फीचर्स, पर्फॉर्मन्स, सगळं मस्त. नक्की विचार करायला हरकत नाही.

महिंद्रा व्हेरिटो व्हाईब - केवळ महिंद्रा ब्रँड एका विशिष्ट प्रकारच्या गाड्यांबरोबर जोडला गेलेला आहे म्हणून की काय, पण या गाडीला हायलाईट केलं जात नाही. अनसंग हीरो प्रमाणे असलेली ही गाडी खरं तर खूप छान आहे. स्पेस मधे हिला दुसरी कुठलीही गाडी मागे टाकू शकत नाही. बसण्याची स्पेस असो वा सामानाची. रेनो चं १.५ लि. इंजिन स्विफ्ट डीडीआयस (व्हाईब फक्त डिझेल मधे येते) इतकं पेपी नसलं तरी इट्स अ वर्कहॉर्स. टेक माय वर्ड. Driving behaviour of the car isnt really refined though, as much as that of i10 or i10 grand and WagonR.

बाकी रिट्झ आहे, सेल आहे, लिव्हा आहे, विस्टा आहे. या सगळ्याही आपापल्या जागी छान आहेत. पण माझ्या मते टॉप पाच पर्याय असे असावेत. If I was at your place.

1. आय१० ग्रँड (टेक्नॉलॉजिकली लेटेस्ट, खूप फीचर्स आणि विश्वसनीय इंजिन)
२. वेरिटो व्हाईब (प्रचंड स्पेस, स्टर्डी डिझाईन, चांगलं डीजेल इंजिन)
३. वॅगन आर किंवा स्टिंग रे (ट्राईड टेस्टेड, मस्त ऑल राउंड समाधान देणारी गाडी. नो नॉनसेन्स)
४. फिगो (केवळ बसायला खूप लो, आणि खर्चिक, म्हणून नंबर ४)
५. सेल/व्हिस्टा/लिव्हा (सगळं छान असूनही स्टँड आउट न होणा-या गाड्या. म्हणून शेवटी. माझ्या मते बरं का.)

बघा बुवा.

ऑल द बेस्ट.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 5:07 pm | शैलेन्द्र

महिंद्रा व्हेरिटो व्हाईब - केवळ महिंद्रा ब्रँड एका विशिष्ट प्रकारच्या गाड्यांबरोबर जोडला गेलेला आहे म्हणून की काय, पण या गाडीला हायलाईट केलं जात नाही. अनसंग हीरो प्रमाणे असलेली ही गाडी खरं तर खूप छान आहे. स्पेस मधे हिला दुसरी कुठलीही गाडी मागे टाकू शकत नाही. बसण्याची स्पेस असो वा सामानाची. रेनो चं १.५ लि. इंजिन स्विफ्ट डीडीआयस (व्हाईब फक्त डिझेल मधे येते) इतकं पेपी नसलं तरी इट्स अ वर्कहॉर्स. टेक माय वर्ड. Driving behaviour of the car isnt really refined though, as much as that of i10 or i10 grand and WagonR.

मी बराच वेळ ही गोष्ट बोलणार होतो, पण थोड थांबलेलो..

मी गेली १ वर्ष महींद्रा वेरिटो चालवतोय, वर्षभरात ४२००० किमी रीडींग आहे, मुंबैहुन थेट नागपुर, जबल्पुर ते खाली नांदेडपर्यंत , आजवर सर्विसिंग सोडुन खर्च शुन्य.. मेटल क्वाळीटी ए १, , बिल्ट अतिशय मजबुत, गाडी रस्ता पकडुन चालते, ८०-१०० या टप्प्यात गाडी लोण्यासारखी पळते. आत जागा इतकी आहे की SUV वाल्यांनापण कॉम्प्लेक्स येतो. प्रचंड मोठा बूट..

वाइब मध्येही या सगळ्या गोष्टी मिळतील पण ३-४ वर्षात विकणार असाल तर नका घेवू

वेल्लाभट's picture

19 Nov 2013 - 8:05 pm | वेल्लाभट

द्या टाळी

गवि साहेब, तुमचा मुद्दा चु़कीचा आहे कारण माझ वजन ११५ किलो. असुन मी, माझी आई जी बर्‍यापैकी स्थुल आहे व माझी बायको आम्ही आरामात मागे बसु शकतो. माझ्या साईजला साजेशी म्हणुनच मी वॅगन आर VXI घेतली.

निशांत५'s picture

19 Nov 2013 - 4:58 pm | निशांत५

स्वीफ्ट LXI/VXI घेउन टाका

अजुन ऐक टाटा इंडिगो नविन ताकदवान इंजिन असलेली जरुन घ्या. ५ लाखात येत. अतिशय सोलीड इंजिन आहे. मायलेज साधारणपणे १३ ते १५ मीळत. मी ती २०१३ सप्टेंबर मध्ये घेतली. ३ महिन्यात ८००० किमी चालवली आहे. गविसाहेब म्हणाले तसे टाटांची सर्व्हिस ऐ वन आहे. गाडी चालवायला ही अतिशय दमदार आहे. लेगस्पेसलाही ठीक आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 5:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि माझा गोंधळ वाढत चाललाय..म्ह्णजे तुम्ही सर्व बरोबर सांगताय त्याबद्दल वादच नाही
पण माझे निकष बदलत/वाढत चालले आहेत ..
एक अजुन प्रश्न---डिलरनुसार किंमत बार्गेन होउ शकते का? म्ह्णजे अमुक डिलर नवीन म्ह्णुन किंमत कमी..तमुक एस्टॅब्लिश म्हणुन no compromise वगैरे

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 5:26 pm | शैलेन्द्र

होतं ना :) तुम्ही टेस्ट ड्राइव्ह सुरु करा.. हळुहळु कुठुन घ्यायची ते ठरेल..

दिपस्तंभ's picture

19 Nov 2013 - 5:44 pm | दिपस्तंभ

माझ्या मते आपण फोर्ड इकोस्पोर्ट बाबत (टाइटनिएम सिरिज्)आधिक माहिति घ्यावी. हि सुद्धा आपल्या बजेट मधे आहे आणि शीवाय दणकट सुद्धा.....

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 7:05 pm | शैलेन्द्र

५-६ लाखात टाइटनिएम?

वेल्लाभट's picture

19 Nov 2013 - 8:04 pm | वेल्लाभट

शी... फ्रँन्कली, ही गाडी फोर्ड ने केवळ डस्टर च्या तोडीचा आपला पत्ता उतरवायचा म्हणून अट्टाहास करून काढलेली आहे चायला. अ‍ॅग्रेसिव्ह फ्रंट डिझाईन सोडलं तर वाया आहे ही गाडी. माझ्या मते यायची नाही ६ च्या आत; आणि आली तरी नका घेऊ असा माझा सल्ला आहे.

मालोजीराव's picture

19 Nov 2013 - 8:28 pm | मालोजीराव

भारतात पैसा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे साहेब !
लाँच नंतर डस्टर ला ५०००० चा टप्पा गाठायला १० महिने लागले ईकोस्पोर्ट ने ते ३ महिन्यात केलंय

वेल्लाभट's picture

19 Nov 2013 - 8:47 pm | वेल्लाभट

असेना का! ती गाडी नाहीच आहे मुळी पैसे घालण्यासारखी.
ईकोस्पोर्ट चं आधीच खूप हाईप करून ठेवलं गेलं होतं. त्यामुळे धडाधड बुक केल्या लोकांनी. पण बहुतांश मंडळी पस्तावतायत आता; ओळखीतलंच एक उदाहरण आहे माझ्या.
Duster is just far better than the others in the class. आता डस्टर ने प्राइस जवळजवळ दीडपटीच्या वर केलीय लाँच पासून.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 10:38 pm | शैलेन्द्र

भारतातल्या पब्लिकला आपल्या गरजेपेक्षा, लोकांचं बघुन किंवा लूक बघुन गाडी घ्यायची वाईट सवय आहे..
डस्टर, इकोस्पोर्ट या गाड्या थोड्या ऑफरोडींगसाठी बनवल्यात. ज्याला बराच वेळ एकट्याला गाडी चालवायचीय, किंवा पुणे/मुंबईसारख्या शहरात चालवायचेय, त्याने कार घ्यावी, एव्हरेज चांगला मिळतो, स्वस्तही पडते..

मालोजीराव's picture

20 Nov 2013 - 1:20 pm | मालोजीराव

भारतातल्या पब्लिकला आपल्या गरजेपेक्षा, लोकांचं बघुन किंवा लूक बघुन गाडी घ्यायची वाईट सवय आहे...

यकदा हिकडं गावठानात या समोरच्यानी मर्शीडिज बेंज घेतली कि हा बांगडीवाली गाडी घेतुय आन शेजारचा वाघुर लावलेली दारात उभी करतोय

विजुभाऊ's picture

19 Nov 2013 - 5:50 pm | विजुभाऊ

मी सध्या ह्युन्दाई आय २० वापरतोय. एकदम झकास. १२० /१३० च्या स्पीडला एकदम स्टेडी चालते. रीअर सीट कम्फर्टेबल. दोन्ही बाजुचे आरसे, कार रेडीओ यांचे कन्ट्रोल्स स्टेअरिंग मधे आहेत. पाचवा आणि सहावा गिअर वापरताना अक्षरशः तुम्ही येन्जॉय करत असता.
इतर फीचर्स जसे रीव्हर्स घेताना मागे एखादे ऑब्जेक्ट आले तर तुम्हाला सिग्नल मिळतो वगैरे .
गाडी एकदम भन्नाट. रोड क्लीअरन्स थोडा कमी आहे. अ‍ॅव्हरेज कमी आहे. पण ड्रायव्हिंग कम्फर्ट ला तोड नाही.

प्रचेतस's picture

19 Nov 2013 - 5:52 pm | प्रचेतस

माहितीपूर्ण प्रतिसाद.
वाचनखूण साठवत आहे.

जर तुम्ही ऐखाद्या कंपनीत नोकरी करत असाल व ती कंपनी कार डिलरच्या कंपनी डिसकाउंट यादीत असली तर तुम्हाला त्या डिलर कडुन कंपनी डिसकाऊंट मिळतो. मलाही असाच मिळाला होता.

चिरोटा's picture

19 Nov 2013 - 6:14 pm | चिरोटा

रेनोची स्कॅला आणि निसानची सनी.दोघांचेही इंजिन रेनॉचे आहे.दोन्ही गाड्या मोठ्या असल्याने ८ ते ९ लाखापर्यंत जातात.
टोयोटा एटियॉस लिवा बघा. no-nonsense गाडी म्हणतात.६ लाखापर्यंत बेसिक मॉडेल यायला हरकत नाही.

मी-सौरभ's picture

19 Nov 2013 - 7:24 pm | मी-सौरभ

रिसेल कार हा ऑप्शन आहे का?
असल्यास ८-१० लाखांची नवी गाडी एक वर्षा नंतर रिसेल ला ५-६.५ लाखात मिळू शकते.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 8:56 pm | शैलेन्द्र

रिसेल गाडी ही पहिल्या लग्नाचा घटस्फोट झालेल्या व्यक्तीसारखी असते, ती चांगलीही असु शकते पण पहिला घटस्फोट का झाला असावा हा प्रश्न छळत राहतो. :)

ओळखीत, रोजच्या पाहण्यात वगैरे असेल तर घ्या, ट्रु व्हॅल्यु वगैरेला फारसा अर्थ नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 7:34 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण स्पेअर पार्ट्बद्दल गॅरंटी काय? म्हणजे कितीही true value/first choice म्हटले तरी..

म्हणजे सोर्स चांगला पाहीजे.शिवाय पहीला ओनर की दुसरा ओनर ,RTO transfer वगैरे आलेच

मी-सौरभ's picture

19 Nov 2013 - 7:50 pm | मी-सौरभ

मग द्या एकदा ट्राय. काही शोरुम रिसेल वर पण एक वर्षाचि गॅरेंटी देतात. उदा. ह्युंदाई

एस्टिलोबद्दल लोकांचं काय मत आहे?

योगी९००'s picture

20 Nov 2013 - 11:27 am | योगी९००

एस्टिलो ही ईतर मारूती hatback सारखीच आहे. Alto आणि wagon R च्या मधला ऑप्शन.

माझ्यामते नवीन alto एस्टिलोपेक्षा फारच बरी आहे . त्यापेक्षा एस टी लो. (म्हणजे एस टी ने प्रवास करा).

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2013 - 10:52 am | संजय क्षीरसागर

वापर शनिवार/रविवार नक्की. इतरवेळी कधीतरी ऑफिसला येण्यासाठी..
नेहमीप्रमाणे जास्त मायलेज,कमी मेंटेनन्स्,सर्व सुविधा,आफ्टर सेल सर्व्हिस या अपेक्षा आहेतच.

I-10 Auto घेऊन टाका. मस्त चालवा. विषय संपला!

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Nov 2013 - 7:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

पेट्रोल फार खातात हो Auto transmission गाड्या :(

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2013 - 12:57 am | संजय क्षीरसागर

पेट्रोलचा विचार सोडा. गाडीची मजा घ्या.

तुम्ही ब्रियो पाहिली का?

झकासराव's picture

20 Nov 2013 - 11:15 am | झकासराव

भारी आहे सर्व चर्चा.
विस्टा मध्ये प्रचंड जागा आहे. :)

मध्यंतरी एक धागा होता की.
त्यात दुचाकी आणि चारचाकीची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती होती.
शोधतोय पण सापडेना..

वामन देशमुख's picture

20 Nov 2013 - 12:12 pm | वामन देशमुख

मध्यंतरी एक धागा होता की.
त्यात दुचाकी आणि चारचाकीची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती होती.
शोधतोय पण सापडेना...

हा इथे आहे: दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

झकासराव's picture

20 Nov 2013 - 5:18 pm | झकासराव

धन्यवाद वामनराव. :)

विटेकर's picture

20 Nov 2013 - 11:40 am | विटेकर

डिजेल वाली .. ही अप्रतिम कार आहे .. अगदी आखूड शिंगी , बहुदुधी , कमी चारा खाणारी !
व्हॅल्यु फोर मनी आहे ! फक्त इकडून तिकडून ( कर कर , कच कच वगैरे ) तर थोडे दुर्लक्श करा. कधी कधी आपोआप हे आवाज बंद होतात. ओवर टेक करताना थोडीशी सस्लगिश वाटेल पण अगोदरची पेट्रोल वाली कार असेल तरच ! अन्यथा मजा कराल.हाय एन्ड , सेफ्टी फिचर वाली घ्या.
थोडे बजेट ताणाल तर मान्झा पण मस्त आहे.

आर्य's picture

20 Nov 2013 - 3:56 pm | आर्य

वा ! वाचुन आनंद वाटला, मी ही याच विवंचनेत होतो. wagon R / आय१० मधली द्वीदा संपलेली नाही.

पण सघ्या पार्कींग फार क्रिटीकल आहे, दादरला भाड्याने रहात असल्याने तर जास्तच
मालक ३००० रु महीना सांगतोय....तोच भाव आहे सध्या ...लोकांचा ऐवढा हप्ता असेल.

कपिलमुनी's picture

20 Nov 2013 - 4:07 pm | कपिलमुनी

कधीपण आय१० !

जबरदस्त पिक अप ..आतमधे wagon R पेक्षा जास्त जागा (अनुभवाचे बोल)..
मॉड्र्न ईंटेरीयर..ह्युंडाईची रीलायबल टेकनोलॉजी..

टेस्ट ड्राईव्ह करा .. दोन्ही गाड्यांची ..आय१० घ्याल

झकासराव's picture

20 Nov 2013 - 5:36 pm | झकासराव

नवीन वॅगन आर आणि नवीन आयटेन नाही चालवली पण आयटेन मध्ये आतमध्ये जास्त जागा हे पटत नाही मला तरी.
आयटेन स्मुथ मख्खन वै आहे चालवायला.
वॅगन आर देखील मस्त स्मुथ चालते.
गीअर शिफ्टिन्ग आयटेनच जास्त स्मुथ वाटलं.
दोन्ही गाड्यात सेफ्टी फीचर्स काही फारसे नाहियेत..
आयटेन हाय स्पीडला जास्त स्टेबल असेल.
चालवुन नाही पाहिली.

माझ्या मते सगळ्याच गाड्या टेस्ट ड्राईव्ह घेताना, किंवा अगदि नवीन असताना / पहिल्या वर्षी उत्तम वाटतात, खरी चांगली गाडी नंतरही चांगली वाटते. त्यामुळे, कोणाकडे तीन वर्ष जुनी गाडी असेल तर त्याच्या टेस्ट ड्राईव्ह चा अनुभव घेउन काय ते ठरवा -

आय दहा चांगली असेल हो पण जागा मात्र फार नाही त्यात. बसल्यावर मोडेल की काय असे वाटते पण मोडली नाहीये कधी. आमचे ढीगभर सामान कोंबून आलं गेलं तरी चांगली चालली. पिक अप चांगला वाटला. बाकी गाडीतलं काही कळत नाही पण वाचतीये.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Nov 2013 - 4:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

टायपो आहे काय? एक शुन्य कमी पडलेय....जाता जाता...माझे पार्किंग रिकामेच आहे...भाड्याने देइन म्हणतो :)))

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Nov 2013 - 5:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

एस टी लो <<<प्रचंड टाळ्यांची स्मायली>>>

ग्रेटथिन्कर's picture

20 Nov 2013 - 8:45 pm | ग्रेटथिन्कर

रामप्यारी' घेउन टाका किंवा टारझन वंडरकार ...विदाऊट पेट्रोल फुल कंट्रोल...

एस's picture

20 Nov 2013 - 11:46 pm | एस

कुणाला बीट चा उल्लेखही करावासा वाटला नाही याचे आश्चर्य वाटतेय.

शैलेन्द्र's picture

23 Nov 2013 - 1:01 am | शैलेन्द्र

जागा हा एक भाग सोडल्यास मस्त गाडी..

टाटा आरीया, सफारी स्ट्रॅाम, काय कराव

आनंदी गोपाळ's picture

23 Nov 2013 - 8:42 pm | आनंदी गोपाळ

हँड्स डाऊन विन.

जरा थांबायची तयारी असेल तर फोक्सवॅगन 'अप' चा विचार करा.. मी थांबलोय.. नाहितर वॅगन-आर व्हीएक्साय / आयटेन ग्रँड १.२ मॅग्ना घ्यायचा विचार होता..

चिरोटा's picture

22 Nov 2013 - 4:42 pm | चिरोटा

रिनो पल्स बरी वाटतेय.त्यांचे पेट्रोल इंजिन चांगले आहे. ६ लाखापर्यंत RXL-Petrol येते.दोन वर्षांचा इन्शुरंस मोफत आहे.लहान गाड्यांमध्ये दोन प्रकार आहेत हे हल्ली कळले. Basic hatchback व premium hatchback.Basic मध्ये wagon R,i10,figo येतात तर premium मध्ये i20,pulse,micra,Ritz,punto येतात.
micra व pulse चे इंजिन रिनोचे आहे.डिझेल गाडी पाहिजे असेल तर फियाटची घ्यावी.

दाते प्रसाद's picture

27 Nov 2013 - 10:45 am | दाते प्रसाद

मी गेले दोन वर्षें मान्जा वापरत आहे (डिझेल) शहरात १४-१५ कि मी प्रतिलिटर आणि हाइवे ला २४. देखभालीचा खर्च अत्यंत कमी आहे. सामान ठेवायला भरपूर जागा अणि बसायला आरामदायक.टाटांची सर्व्हीस चांगली आहे।service करता गाडी पिकप आणि ड्रोप करतात (without any extra charge) ( Concorde Motors, Bangalore) फक्त शहरात पार्किंगला त्रास होउ शकतो, तेवढं बघा.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2013 - 12:39 pm | llपुण्याचे पेशवेll

मी ५ लाखात फोक्सवॅगन पोलो गेऊन आपली गाडी चांगली आहे असे मानून राहत आहे. :) जोवर फारसा आर्थिक भार पडत नाही आणि गाडीचा वापर कमी आहे तोवर ते सुख फारच आल्हाददायक असेल असे वाटते. असो. :)

झकासराव's picture

27 Nov 2013 - 2:45 pm | झकासराव

मी जुनीच गाडी गेह्तली आहे..

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Dec 2015 - 6:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

स्टिंग रे VXI घेतली आहे. वॅगन -आर चे सर्व फिचर शिवाय ट्युबलेस टायर, अलॉय व्हील्स. मिरर कंट्रोल, प्रोजेक्टेड लँप्स आणि ४५ हजारचा डिस्काउंट ... सर्व अक्सेसरी सकट ५ ला पडली. ६ महीने होत आले. तक्रार नाही.

पुन्हा सर्व सल्लागारांचे धन्यवाद.

होबासराव's picture

22 Dec 2015 - 7:33 pm | होबासराव

जर कोण्या मिपाकराने घेतलि असल्यास अनुभव सांगा.

सुबोध खरे's picture

22 Dec 2015 - 7:42 pm | सुबोध खरे

एक वेगळा विचार--
ज्याला कार विकत घ्यायची आहे त्याने आपली कार पक्की करण्यापूर्वी
http://www.carzonrent.com/car-rental-Mumbai-4/ येथून एक दिवसासाठी ती कार भाड्याने घ्या.
अडीच ते तीन हजार रुपये जातील पण एक दिवस संपूर्ण स्वतः कडे ती कार असेल. किंवा तसेही नको असेल तर तासावर भाड्याने घ्या ओंड सिटी किंवा डस्टर सुद्धा १६० रुपये तासाला भाड्याने मिळेल चार तास फिरवा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. आवडली तर विकत घ्या. फुकट मिळणाऱ्या पाच मिनिटांच्या टेस्ट राइड पेक्षा नक्कीच जास्त माहिती आणि अनुभव मिळेल.
आवडली नाही तर घेणे नाही आणि देणे नाही.

संदीप डांगे's picture

22 Dec 2015 - 7:46 pm | संदीप डांगे

+१०००

चांदणे संदीप's picture

22 Dec 2015 - 7:52 pm | चांदणे संदीप

सर क्या आयडिया है! :)

प्रसाद१९७१'s picture

23 Dec 2015 - 10:07 am | प्रसाद१९७१

आधीची रीट्झ गाडी बदलायची आहे. स्विफ्ट चा विचार चालू आहे. पण रस्त्यावर नविन बलेनो बघितली आणि आवडली, मुख्य म्हणजे बलेनो चे १५ इंची टायर. खरे तर मला रिट्झ आवडते तिच्या उंचीमुळे.

नविन बलेनो बद्दल काही मते, माहीती आहे का?

सुखी's picture

23 Dec 2015 - 10:13 am | सुखी

बलेनो ही मारुती कडची सर्वोत्तम दिसणारी कार आहे.

खालच्या लिन्क वर पुर्ण माहिती मिळेल.

http://www.team-bhp.com/forum/official-new-car-reviews/171209-maruti-bal...

What you'll like:

• A well-priced, smart looking hatchback
• User-friendly cabin with loads of space! Can easily seat 5 tall adults
• Accommodating 339 liter boot. The 2nd biggest among hatchbacks (after the Jazz)
• Peppy petrol, efficient diesel & smooth automatic - take your pick
• Comfortable ride quality matched to neutral handling
• Dual Airbags & ABS with EBD are standard across all variants!
• Maruti's excellent after-sales service & fuss-free ownership experience
• Loaded with features such as UV-cut glass, projector headlamps + DRLs, reversing camera, Apple CarPlay, navigation, electrically-foldable ORVMs and more

What you won't:

• Ordinary interior quality is Swift-like. Several budget grade parts in here
• Rear seat headroom & under-thigh support are limited for tall passengers
• Light build quality (weighs merely 865 kilos). Lacks the solidity of its rivals
• CVT variant only in Delta trim (one above base). Suffers from rubber-band effect on the highway too
• More substantial & premium Elite i20 is priced only Rs. 17,000 - 37,000 above
• Waiting period running over 4 months for some variants / cities
• Sold exclusively through Nexa outlets. Limits the reach of the car

मैत्र's picture

23 Dec 2015 - 12:10 pm | मैत्र

गाडी घ्यायची आहे असे अनेक महिने चालू आहे. निर्णय होत नाहीये. जानेवारीत घ्यायची आहे.

सद्य परिस्थिती / पार्श्वभूमी:
१. गेली बरीच वर्षे ह्युंडाई अ‍ॅक्सेंट पेट्रोल वापरतो आहे. वापर अतिशय कमी होता. मोठा प्रॉब्लेम कधी आला नाही. फारसे हायवे ड्रायव्हिंग झाले नाही. आता गाडी बरीच जुनी झाली आहे एकूण रनिंग कमी असूनही. ट्रॅफिकमध्ये एसी कमी पडतो.
हायवे वर खूप भरवसा वाटत नाही. गाडी दणकट आहे, पण त्यामुळे आणि जुन्या इंजिनमध्ये जास्त ओव्हरटेकिंग कपॅसिटी नाही.
२. बरीच वर्षे सेडान वापरल्याने आतल्या ऐसपैस जागेची सवय आहे. (अ‍ॅक्सेंट सिटी / व्हर्ना कॅटेगरी नाही पण जागा प्रचंड आहे.)
३. पेट्रोलच पाहिजे. डिझेल प्रदूषण नको आणि त्या अधिक मायलेज व अधिक पॉवर इतका वापर नाही.
रोजचे ऑफिस जाऊन येऊन १०-१२ किमी एकूण पार्किंग ते पार्किंग. - २२०-२५० किमी / महिना
शनिवार रविवार मिळून - किमान २५-३० किमी ते कमाल ७०-८० किमी - १२० ते कमाल २०० किमी / महिना
माझ्याकडे दुचाकी नाही. त्यामुळे ३-४ किमी अंतरालाही गाडीच वापरली जाईल.
भविष्यात जवळपासची १५०-३०० किमी परिघातील ठिकाणे फिरण्याचा मानस आहे.

सेडान पर्याय आणि मतः
१. सियाझ - होम मिनिस्ट्री व्हेटो - मारुती नको आणि फ्रंट डिझाईन सेडानचे नाही. परंपरागत स्विफ्ट बेस ची कॉपी आहे.
२. व्हेंटो / रॅपिड / लिनिया - आफ्टर सेल्स सर्व्हिसचे प्रॉब्लेम्स - दणकट पण dull डिझाईन्स. कमी फीचर्स
फोक्सवॅगनच्या जागतिक फ्रॉड केस मुळे आणि भारतात ३ लाख गाड्या रिकॉलच्या बातमीमुळे भरवसा नाही.
लिनिया सेल्स प्रचंड कमी आहे. - सिटी ७००० असेल तर लिनिया ४००-५०० आहे.
३. होंडा सिटी - विशेष कारण काही नाही. गाडी उत्तम आहे. डिलरचा अनुभव वाईट आहे. दोन तीनदा खेपा घालून काही सपोर्ट नाही. गाड्या उत्तम विकल्या जातात त्यामुळे ते बेफिकीर आणि उर्मट आहेत. हाच अनुभव सर्व्हिस मध्ये आहे. (बंगलोर). गाडी एक्स्चेंज घेत नाहीत.
४. व्हर्ना - पहिली पसंती - ह्युंडाईच्या सवयीमुळे, आणि जुनी गाडी परत देण्याच्या सोयीमुळे आणि दिसायला आवडते.
आतले false wood कचकड्याचे कमी दर्जाचे वाटते.
इतर सेडान प्रमाणे काही गोष्टी नाहीयेत - AVN सिस्टीम, मागे एसी व्हेंट्स, रिव्हर्स कॅमेरा इ.
पुढचे व्हर्जन (फक्त फेस लिफ्ट नव्हे - नवीन रचना, सोयी वगैरे) २०१६ अखेरीस / २०१७ मध्ये भारतात अपेक्षित आहे.
त्यामुळे आत्ताची गाडी ही पटकन जुनी होऊ शकते. नवीन मॉडेल मध्ये लक्षणीय सुधारणा असल्यास उगाच चिडचिड होईल.

टीम बीएचपी वरचे एकूण मत असे आहे की सर्वगुणसंपन्न कुठलीही सेडान नाही. ड्राईव्ह साठी युरोपियन गाड्या चांगल्या आहेत.

हॅचबॅक किंवा लहान एस यु व्ही पर्याय आणि मतः
१. पोलो - फोक्सवॅगन आणि व्हेंटोचे प्रॉब्लेम्स
२. स्विफ्ट - जुने डिझाईन
३. बॅलेनो - रिअर डिझाईन आवडले नाही. कमी वजन आणि मारुती
४. पुंटो / अव्हेंचुरा वगैरे - फियाट चे प्रॉब्लेम्स
५. आय १०, इऑन, लिव्हा - इतक्या लहान गाड्या विचारात नाहीत.
६. इटिऑस क्रॉस, पोलो क्रॉस - डिझाईन्स आवडले नाहीत
७. एस क्रॉस - महाग ! आणि पेट्रोल पर्याय नाही
८. क्रेटा - महाग
९. आय२० एलिट - उत्तम गाडी, आवडलेले डिझाईन पण १.२ लि चे लहान पेट्रोल इंजिन, १६७ मिमी ग्राऊंड क्लिअरन्स
१०. आय२० अ‍ॅक्टिव्ह - उत्तम गाडी, आवडलेले डिझाईन - सोयीची गोष्ट - १९० मिमी ग्राऊंड क्लिअरन्स, १.२ लि चे लहान पेट्रोल इंजिन, पण जवळजवळ १० लाख ऑन रोड किंमत ! विचित्र निळे इंटिरिअर - निळा डॅशबोर्ड, निळे सीट्स,
काळे सुंदर इंटिरिअर घेतले तर गाडीचा रंग ब्राउन, लाल किंवा काळा.
११. डस्टर / टेरानो - युरोपातील लेव्हल २/३ चा ब्रँड डॅशिया ची भारतातील rebadge
१३. इकोस्पोर्ट - महाग / फ्रंट डिझाईन आवडले नाही.

आत्ता व्हर्ना घ्यावी जी मॉडेल लाईफ सायकलच्या शेवटाला आहे की आय२० की अ‍ॅक्टिव्हच्या क्लिअरन्सचा उपयोग करुन घ्यावा पण रंग लाल / काळा.

(सर्व माहीती एकदम देण्याचे कारण - प्रत्येक मॉडेलचे प्रतिसाद येऊन ही माहीती वेगळी देण्यापेक्षा सोयीचे.
प्रत्यक्ष अनुभव / मत मतांतरे शेअर करा. )

कपिलमुनी's picture

23 Dec 2015 - 5:22 pm | कपिलमुनी

सिटी , वेंटो ईत्यादी रेंज असेल तर स्कोडा रॅपिड चा विचार करा

त्रिवेणी's picture

23 Dec 2015 - 4:15 pm | त्रिवेणी

आम्ही zest घेतली amt.
मस्तय एकदम.

आवडलेल्या गोष्टी
अ) ऑटो ट्रान्समिशन - गेअर टाकायचा त्रास नाही / गाडी उतारावर रिव्हर्स येत नाही.
ब) मायलेज - मुंबईत १५ ते १८ आणि हायवेला साधारणपणे २०-२२ kmpl मिळते.
क) देखभाल खर्च - अजुन नवी असल्याने काहीच नाही. (पुणे किस्सा वगळ्ता) - वर्ष होऊ घातले आहे.
ड) बुट स्पेस (डिक्की) पुरेशी आहे.
क) आंतरंग - आराम दायी आणि फिल गुड आहे
ड) ग्राउंड क्लिअरन्स - १६५ + अजिबात घासत नाही.
इ) स्पिड - जास्त जोरात पळवताना स्टेबल राहते. (मी १४० पर्यंत गेलो आहे) १०० तर लिलया

न आवडलेल्या गोष्टी :
अ) ओवरटे़कींग - गाडी स्वतःचा वेळ घेते कधी कधी दम लावावा लागतो.
ब) आवाज - काचा बंद असतील तर कमी पण एसीचा येतो
क) एसी - फार प्रभावी नाही पण पुरेसा आहे.

मुंबईत टायर बदललं पंक्चर जास्त (१५-२०) होती- चाक पहताच मालक म्हणाला पुण्याला गेला होत का ?
बर्याच जणाना हा अनुभव असेल....पुणे बायपास.

सेलेरीओ/ स्विफ्ट / आय१० / फिगो तपासुन -चालवुन - घासुन बघितल्या होत्या पण मुंबई ट्राफिक ला उतारा म्हणुन ऑटो ट्रान्समिशन सेलेरीओ (व्ही एक्स आय) घेतली.

सुनील's picture

24 Dec 2015 - 7:57 am | सुनील

चाक पहताच मालक म्हणाला पुण्याला गेला होत का ?