सध्या माझ्या घराचे बांधकाम चालू आहे.मी बर्याच ठेकेदारा मार्फत काम करून घेतले.उदा. टाइल बसवणारे लोक UP मधून आलेले आहेत. त्यांचा ठेकेदार साधारण १७ वर्ष पुण्यात आहे. सुरवातीला बिगारी काम करून ३-४ वर्षातच ठेकेदारी करू लागला. शिवाय तिकडून येथे मजुरी काम करायला येणारे लोक बरेच असल्यामुळे त्यांना मजूर मिळवायला विशेष अडचण येत नाही. काही लोक जे इथे ३० -३५ वर्ष आहेत त्यंनी तर इतकी संपत्ती साठवून ठेवली आहे कि आपण सामान्य माणस फक्त कल्पनाच करू शकतो.
या वरून मला पडलेले काही प्रश्न.
सध्या अधिक पैसा कशात आहे ? नोकरी कि धंदा ?
शिवाय आज शिकून सुद्धा लोक इतके पैसे मिळवू शकत नाही जेवढे पैसे हे लोक थोडा जम बसल्यावर सहज मिळवू शकतात.
मग शिक्षणाचा फक्त Investment म्हणून विचार केला.तर आज शिक्षण माणसाला किती पैसा मिळवून देऊ शकते ?
आज माझे असे बरेच मित्र आहेत जे ५ वर्ष कष्ट करून देखील पुरेसा पैसा मिळवू शकत नाहीयेत जेणेकरून ते स्वतःच घर घेऊ शकतील. आणि शिक्षण नोकरी शिवाय दुसरा पर्याय देत नाहीये.
शिक्षण तुम्हाला काय देऊ शकते,जर प्रगती फक्त पैश्यातच मोजल्या जात असेल तर ?
प्रतिक्रिया
23 Sep 2013 - 9:01 am | संजय क्षीरसागर
अगर तुममें हिम्मत है तो दुनियासे बग़ावत कर लो
वर्ना मां-बाप जहां कहते है वहां शादी कर लो.
23 Sep 2013 - 8:27 pm | देवांग
ekach number
23 Sep 2013 - 9:27 am | आदूबाळ
नोकरी हा एकप्रकारचा धंदाच असतो. धंद्यात अनेक ग्राहक तुम्हाला पैसे देतात, नोकरीत तुमचा पैसे देणारा ग्राहक एकच असतो.
23 Sep 2013 - 10:15 am | पैसा
खूप मेहनत आणि काळज्या असतात. सतत चांगले काम करत राहणे आवश्यक असते तर तुम्ही स्पर्धेत टिकाल. नोकरी एकदा लागली मिळणारे पैसे निश्चित असतात. त्याहून जास्त मिळणार नाहीत. पण कामाची क्वालिटी टिकवून ठेवलीच पाहिजे असे नसते. त्यामुळे ताणतणाव कमी. अर्थात तुम्ही किती पैसे मिळवाल यालाही मर्यादा असतात. तुमच्या मनाची ठेवण जर जोखीम सहज घेण्याची असेल तर धंदा सुरू करावा. नाहीतर स्थैर्य हवे असेल तर नोकरी पकडावी.
पेठकर काकांनी नोकरी आणि धंदा दोन्ही गोष्टी यशस्वीपणे केल्यात. ते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील.
23 Sep 2013 - 7:27 pm | अत्रुप्त आत्मा
खूप मेहनत आणि काळज्या असतात. सतत चांगले काम करत राहणे आवश्यक असते तर तुम्ही स्पर्धेत टिकाल. >>> ++++++११११११११
23 Sep 2013 - 11:35 pm | चित्रगुप्त
अल मख्तूब … मख्तूब …
जे व्हायचे ते लिहिलेलेच असते…
त्यामुळे जे आहे त्याचा आनंद घ्या.
तरीही ज्यांना वाटत असेल की आपल्या ठरवण्या- न- ठरवण्याप्रमाणे घडते, त्यांनी त्यातल्या त्यात समाधान आणि आनंद देणारा पर्याय निवडावा आणि त्याचे जे फळ पदरी पडेल त्याचा आनंदाने स्वीकार करावा.
24 Sep 2013 - 12:16 am | कवितानागेश
जे व्हायचे ते लिहिलेलेच असते…>>>
पण लिहितावाचता येत नसेल तर?
नोकरी करावी कि धंदा? :P
24 Sep 2013 - 12:52 am | चित्रगुप्त
नोकरी करणार कि धंदा, हे लिहिलंय ज्याचं त्याचं …
वाचता येण्या- न- येण्यानं काय फरक पडणार जे लिहिलंय त्यात?
ते कुणी वाचावं, म्हणून थोडीच लिहिलेलंय.
24 Sep 2013 - 1:49 pm | अनिरुद्ध प
इथे कुणी च्या जागी कुणीही असे अभिप्रेत आहे का ?
24 Sep 2013 - 10:27 am | यसवायजी
नोकरी म्हणजे ८ तासांचा धंदा आणी धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी. ;)
24 Sep 2013 - 2:04 pm | अत्रुप्त आत्मा
ज्जे बात!
24 Sep 2013 - 2:08 pm | अग्निकोल्हा
काय उत्कृश्ट जमते त्यावर अवलंबुन. पण प्रांजळ उत्तर हवय तर भ्रष्टाचार.
कारण शिक्षण धंदा करायला शिकवतेच असे नाहि कि माणसाचे नशिब वा अनुकुलता/प्रतिकुलता ही बदलु शकत नाहि.
रग्गड. पण जर टॉप रेंकिग मधेच असाल तरच. उगा का आपल्या तान्हुल्यां/सोणुल्यांना इनफंटावस्थेतच रेसिंग साठि प्रिप्येर केल्ये जात्ये ? पन हाफ नॉलेज इस देंजरस उदाहरणार्थ अभिमन्यो.