गाभा:
खालील समीकरणांमध्ये योग्य ती गणिती चिन्हे घालुन उत्तर ६ आणा.
गणिती समीकरणांचे सर्व नियम लागू.
त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये.
उदा. २ + २ + २ = ६
६ + ६ - ६ = ६
मी २ सोपी उदाहरणे सोडवुन दाखवली आहेत.आता उरलेली सोडवा.
१ १ १ = ६
२ २ २ = ६
३ ३ ३ = ६
४ ४ ४ = ६
५ ५ ५ = ६
६ ६ ६ = ६
७ ७ ७ = ६
८ ८ ८ = ६
९ ९ ९ = ६
प्रतिक्रिया
14 Jul 2008 - 6:52 pm | प्रियाली
बाकी सर्व सुटली. फक्त एकावर विचार सुरू आहे. ;)
14 Jul 2008 - 7:01 pm | आनंदयात्री
होत नाही :( .. विंचु भो सांगा तुम्हीच आता.
14 Jul 2008 - 7:24 pm | श्री
चार च दीवसा पुर्वी हेच मला ढकल पत्रा तुन आले आहे बघुन उत्तर सांगतो. परंतु गणिती चिन्ह कसे काय टंकावे (under root)?
14 Jul 2008 - 7:31 pm | प्रियाली
उदा.
वर्गमूळ(९) * वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६
इतके पुरेसे आहे.
या एकाने भंडावले आहे. :(
14 Jul 2008 - 7:35 pm | मनिष
१?१?१ = ६
(२*२)+२ = ६
(३*३)-३ = ६
४+४ - (square root of(४)) = ६
(५/५)+५ = ६
६*६/६ = ६
७-(७/७) = ६
(cube root of(८))+(cube root of(८))+(cube root of(८)) = ६
(९+९)/(square root of(९)) = ६
14 Jul 2008 - 7:38 pm | प्रियाली
२+२+२=६ हे वर दाखवले आहेच.
८-वर्गमूळ(वर्गमूळ(८+८))=६
14 Jul 2008 - 7:35 pm | मनिष
१ वैताग देतो अहे.
14 Jul 2008 - 7:39 pm | प्रमोद देव
(१+१)*(१+१+१)=६
(२*२)+२=६
(३*३)-३=६
(४*४)/(४+४)+४=६
(५/५)+५=६
(६*६)/(६)=६
(६+६)-(६)=६
७-(७/७)=६
८-(८+८)/(८)=६
९-(९+९)/(९)-(९/९)=६
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
14 Jul 2008 - 7:41 pm | मनिष
(१+१)*(१+१+१)=६
असे तर मग १+१+१+१+१+१ घेता येईलच की! :)
14 Jul 2008 - 7:47 pm | प्रियाली
हवे तितके आकडे घ्या असे गणित नाही. हवी तितकी चिन्हे घ्या मात्र चालेल.
14 Jul 2008 - 10:58 pm | सर्किट (not verified)
(१+१+१)! = ६
- (गणितज्ञ) सर्किट
14 Jul 2008 - 11:03 pm | प्रियाली
(१*१*१)!=१
:(
(ढ) प्रियाली
पण,
(१+१+१)! = ६
बरोब्बर!!! :)
14 Jul 2008 - 7:40 pm | मनिष
१+१+१ <= ६ ;)
15 Jul 2008 - 7:12 am | मुकेश
(१+१+१)! = ६
२+२+२ =६
३*३-३ =६
वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४)=६
५+(५/५) =६
६+६-६ =६
७- (७/७) =६
घनमूळ(८) + घनमूळ(८) + घनमूळ(८)=६
वर्गमूळ(९) *वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६
अवांतरः ! म्हणजे फॅक्टोरियल.
उदा: ३! = ३*२*१
४! = ४*३*२*१
15 Jul 2008 - 10:06 am | तात्या विंचू
उत्तर बरोबर आलेल्यांचे अभिनंदन......
मी काढलेली उत्तरे अशी आहेत......
(1 + 1 + 1)! = 6
2 + 2 + 2 = 6
3 * 3 - 3 = 6
4 + 4 - √4 = 6
5 / 5 + 5 = 6
6 + 6 - 6 = 6
7 - 7 / 7 = 6
8 - √(√(8+8)) = 6
(9 + 9) / √9 = 6
ज्यांनी घनमूळ वापरले आहे त्यांचे थोडे चुकले आहे...
त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये.
घनमूळ वापरताना आपल्याला ३ हा आकडा स्वतःहून टाकावा लागतो..
घनमूळासाठी गणितात वेगळे चिन्ह नाही...
अवांतरः
"√" टाकताना विंडोजमधील कॅरॅक्टर मॅप वापरावा
15 Jul 2008 - 10:16 am | डोमकावळा
(१+१+१)! = ६
हेच असलं पाहिजे...
17 Jul 2008 - 9:08 am | विसोबा खेचर
हे उत्तर समजलं नाही. यातल्या उद्गार चिन्हाचा अर्थ काय?
तात्या.
17 Jul 2008 - 11:11 am | बेसनलाडू
फॅक्टोरिअल क्रिया = त्या संख्येस ती संख्या धरून १ पर्यंत आधीच्या सर्व संख्यांनी गुणणे.
जसे - ३! = ३ * २ * १ = ६
४ ! = ४ * ३ * २ * १ = २४ ...
महत्त्वाचे - क्ष ! = क्ष * (क्ष -१) ! जसे ४ ! = ४ * ३ * २ * १ = ४ * (३ * २ * १) = ४ * ३!
(मास्तर)बेसनलाडू
15 Jul 2008 - 10:20 am | मनिष
अरे हो! फॅक्टोरियल विसरलोच! रिकर्सिव प्रोग्रमिंग लूप त्यावरच शिकलो ना!!! :(
15 Jul 2008 - 8:47 pm | मदनबाण
आता कळलं मला गणितात केटी का लागायची ते !!!!! :)
बाकी विंचूराव येऊद अजुन...
(गणितात अगदी १ नंबरचा ढ !)
मदनबाण.....
15 Jul 2008 - 11:32 pm | राधा
काय तात्या........... येडा समझ के रखा है क्या........ १० वीत वर्पास झाली मनुन काय्.........सोडवली मी कोडी.......
16 Jul 2008 - 2:46 pm | श्रीमंत दामोदर पंत
१+१+१=६ कसे आण णार?