Lonavla Bhimashankar Trek 25/26/27 January 2013 Day 1
२५ जानेवारी पहाटे ०५:१५ ला कल्याण स्थानकात इंदोर पुणे गाडी पकडली. आम्हा ६ घुम्क्क्डना बसायला जागा मिळाली. गाडीत १ तृतीय पंथी व्यक्ती कर्जत स्थानकात चढते. पैसे (भिक) मागण्याची वेगळीच पद्धत पाहायला मिळाली. स्पष्ट व शुद्ध मराठीत अधिकार वाणीने ५ रुपये द्या असे सांगत फिरते. जनरल डब्यात अस्ताव्यस्त झोपलेल्या pyasengarla नीट बसायला दरडावून सांगत इतरना जागा मिळवून देण्याचे काम हि व्यक्ती करते. कुणी जास्त पैसे दिले तर परत करते. कमी दिले तर नाकारते.
लोणावळा स्थानकात उतरलो तेव्हा हवेत सुखद गारवा होता. वळवण ला जाण्यासठी जीप घेऊन "अखिल" आमची वाट पाहत होता. ०९ च्या सुमारास वळवण गावात पोहोचलो.दोन स्थानिक रहिवासी कुसरे पठाराची वाट दाखवायला तयार झाले. ११ वाजता कोंडेश्वर मंदिरात पोहोचलो. पाणी पिउन बाटल्या पुन्हा भरून घेतल्या. थोड्याच वेळात डाव्या बाजूला ढाक व कळकराय सुळका दिसू लागले. "कुसरे पठाराची" वाट दाखवून दोन्ही गावकरी माघारी फिरले. आता फक्त नकाशा वाट दाखवणार होता. थोड्याच वेळात कळकराय सुळका अगदी स्पष्ट दिसू लागला. सुळक्यावर काही हालचाल दिसली . दुर्बिणीतून पहिले असता काही गिर्यारोहक आरोहण करताना दिसले. (बहुदा चक्रम हायकर्स चे असावेत) लांबूनच त्यांना शुभेच्या देऊन आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. वारा असल्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता पण आता पोटात कावळे ओरडू लागले होते. सावली दिसताच पोटपूजा उरकून घेतली.अजून बराच पल्ला गाठायचा असल्याने पुन्हा ११ नंबरची बस पकडली.कधी दाट जंगल तर कधी माळरान कधी इतरत्र फुटणार्या वाटा असा प्रवास सुरु होता. जवळचे पाणी संपत आले होते. इतक्यात बैलगाडीच्या चाकांच्या खुणा दिसू लागल्या. याचा अर्थ जवळ एखादे घर असणार या कल्पनेने आनंद झाला. ०२.३५ ला लांबवर १ बांधकाम दिसू लागले. जवळ येउन पाहतो तर "वाघोबाचे" देऊळ. पण जवळ पास पाणी नाही. इथे आम्ही वाट चुकलो आणि १ घरापर्यंत पोहोचलो. घरात आजी आजोबा आणि खूप लहान मुले होती. तरुण मंडळी बहुदा रानात गेली असावीत. आजीनी थंडगार पाण्याची घागर दिली आणि आमचा जीव घागरीत पडला. आजोबा वाट दाखवायला तयार झाले. मुलांच्या हातावर खाऊ ठेऊन आम्ही पुन्हा वाघ्देवाच्या मंदिराकडे निघालो. आता वाट मिळाली होती आणि पाणी हि, त्यामुळे आणीबाणी ची परिस्थिती नव्हती.मंदिरा पर्यंत वाट दाखवून आजोबा परत फिरले. ते पैसे घ्यायला तयार नव्हते तरी आग्रहाने घ्यायला लावले आणि पुन्हा आम्ही मार्गस्थ झालो. थोड्याच वेळात आणखी १ घर लागले. "आखाडे" कुटुंबाने आमचे प्रेमाने सागत केले. त्यांचा आग्रह होता कि आम्ही आज वस्ती करावी. एकदा मोह झाला कारण घर प्रशस्त होते आणि अगत्यही. पण मोह आवरून पुन्हा येण्याचे कबूल करून पुढची वाट धरली. आज सावळे गाव गाठलेच पाहिजे असे सांगून ११ नंबरची बस उतारावरून सुसाट निघाली. आखाडे नि सांगितले कि कुसर गावात १ दुकान आहे व दुकानदाराकडे गाडी आहे ०५.३० ला दुकानं पर्यंत पोहोचलो दुकानदाराने फोन करून गाडी मागवली आणि ०६.३० ला आम्ही NaikDE यांच्या घरी पोहोचलो. आखाडे, दुकानदार तुरडे, आणि नाइक्डे एकंदर DAY चागला होता. लक्षुमण नाइक्डे यांनी राहण्याची जेवण्याची सोय केली आणि दुसऱ्यादिवशी भीमाशंकर ची वाट दाखवायचे हि कबूल केले. सावळे गावात वीज आहे पाणीपुरवठा योजना आहे गावकरी माळकरी आहेत. भाजी भाकरी डाळ भात असे गरमागरम जेवण जेऊन पथारी पसरल्या. आज २०/२५ किमी. चाललो होतो उद्या २५/३० चालायचे आहे या विचारांनी गाढ झोप लागली.
DAY 2 चा वृत्तांत पुढील भागात,
मागील भागावरून पुढे ...........
२६ जानेवारी २०१३.
सकाळी ०५.३० ला जाग आली.हवेत छान गारवा होता. पटापट आन्हिके उरकून सहाही घुम्क्कड तयार झालो. नाइक्डे ताईंनी आमची चहाची निकड ओळखून तो तयारच ठेवला होता. आज मोठा पल्ला गाठायचा होता. तेव्हा नाश्त्यासाठी वेगळा वेळ मिळणार नाही असे फर्मान आमचा नेता प्रशांत याने काढले. "आत्ताच काय ते खाऊन घ्या' असे सांगताच मी sack मधून तिखट मिठाच्या पुरी ची पाकिटे बाहेर काढली. (चला तेवढेच वजन कमी झाले) इतक्यात लक्ष्मण नाइक्डे आले, आज उशीर झाला तर "या इथे लक्ष्मणा बांध कुटी" असे म्हणावे लागेल असा विचार माझ्या मनी आला.नाइक्डे आणि मंडळींचा निरोप घेऊन ०७.०० ला निघालो. लक्ष्मणाचा वेग भलताच होता. ( खरा मावळा) पहिली ४० मिनिटे त्यांच्या बरोबर चाललो (धावलो) मग फोटो काढण्याचे निमित्त करून मागे मागे राहू लागलो. ०८.३५ ला कारवीचे गच्च रान लागले. मग पवनचक्क्या दिसू लागल्या. आता कोथळी गड दिसेल असे प्रशांत ने सांगितले. इतक्यात तो दिसलाच. या किल्ल्याशी YHAI अंबरनाथ युनिट चे वेगळेच नाते आहे, दर वर्षी न चुकता जून च्या २/३ रविवारी या किल्ल्याचा ट्रेक ठरलेलाच. त्यामुळे तो दिसताच अगदी जीवाभावाचे कोणी तरी भेटल्याचा आनद झाला. लक्ष्मणने सांगितले कि आता बराच वेळ तो आपल्याला दिसत राहील.०९.३० ला एका पान्व्ठ्या जवळ थांबलो. प्रशांत ने दुर्बीण काढली आणि पेठ ला न्याहाळू लागलो. कित्येक वेळा पेठ ला गेल्यावर राम काटदरे सांगायचा कि सनोर दिसते त्या वाटेने भीमाशंकर ला जाता येते, आज त्या वाटेवर असताना त्य्याची आठवण झाली. आज राम आणि त्याची "YUGA TEAM " DUKE NOSE ला rapling चे धडे ५० जणांना देत होती.त्यांना बेस्ट ऑफ लक मनातल्या मनात देत पुढची वाट धरली. आमचा १ भिडू डॉक्टर भरत याला काल पासूनच पायाला blister चा त्रास होत होता पण भिडू जिद्दी असा कि आपल्यामुळे कुणाला त्रास नको असे म्हणून हा आपला सर्वांच्या पुढे. मला आपली उगाच गुलाम अलीची गजल आठवली "जिनके होटोन्पे हसी पाव में chale होंगे हा वही लोग तेरे चाहने वाले होंगे" ( इथे तेरे = sahyadrdi ) वारा असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता पण वाट काही संपत नव्हती. ०९.३० ला जवळून दिसलेल्या पवन चक्क्या आता लांब दिसत होत्या. १२.४५ ला पुन्हा गर्द रान लागले. लक्ष्मण ला हा रस्ता अगदी पाठ आहे, त्याने सागितले कि आता दोन्ही बाजूला दगड रचलेली वाट लागेल पण आपल्याला थोड्या वेळाने ती सोडून उजवीकडे वळायचे आहे. प्रशांत ने हा ट्रेक पूर्वी केला होता तो सारखा म्हणत होता कि १ मंदिर दिसले पाहिजे पण लांबून ते काही दिसेना जवळ गेल्यावर समजले त्याचे छप्पर उडाले आहे. (कमलादेवीचे मंदिर) आता आम्ही वेळवेळि गावाच्या जंगलात आलो होतो हे जंगल भीमाशंकर अभयारण्यात असल्याचा १ बोर्ड दिसला तेव्हा जरा हायसे वाटले.०२.४५ ला भीमा नदी दिसली आणि पाण्याला जीवन का म्हणतात ते समजले. पोट पूजा करून छानशी विश्रांती घेतली. थोड्याच वेळात आम्ही गुप्त भीमाशंकर ला पोहोचलो. गर्द जंगलातून चालताना बरे वाटत होते १ आडवा पडलेला अंजन वृक्ष दिसला त्याही अवस्थेत त्याचा खोडावर काही कळ्या दिसत होत्या कदाचित त्याचा हा शेवटचा बहर असावा. ०५/०५.३० चा सुमारास आम्ही राम मंदिराशी आलो.इथे मुंबई डबेवाले मंडळीची धर्मशाळेत १ खोली प्रशांत ने आधीच बुक केली होती. थंड पाण्याने मस्त सच्यॆल स्नान केले आणि सारा शिण पळून गेला. आज दर्शन होणे शक्यच नाही हे गर्दी बघून लगेच ठरवले. सुहास ने बाहेरून गोळा भजी आणली त्यावर ताव मारून जेवण होईपर्यंत फिरुया असे म्हणत बाहेर पडलो. ज्वारीची भाकरी आणि flowerbatata असा मस्त बेत होता. उद्याचा कार्यक्रम ऐकत ऐकत शांत झोपी गेलो.
तिसरा दिवस (२७ जानेवारी ) पुढील भागात,
२७ जानेवारी, लोणावळा भीमाशंकर ट्रेक दिवस ३ रा.
पहाट झाली आजची पहाट विशेष होती २५ ची ट्रेन मध्ये तर २६ ची सावळे गावात पण आजची मात्र सह्याद्री च्या कुशीत. देवदर्शन उरकून घेतले. भक्तीचा बाजार नुकताच सुरु झाला होता. शंकरावर दही दुधाचा अभिषेक 'चालू" होता. आमची पावले लगेचच नागफणी कडे वळली. पहाट वाऱ्यात सह्याद्रीत फिरायला काय मजा येते हे घुम्म्कडना मी काय सांगू?
मला मराठीतील "पहाटवारा' पेक्षा पुरवाई आणि त्याही पेक्षा "सबा" हा शब्द खूप भावतो.
याला हि कारण आपला सह्याद्रीच. उर्दू मध्ये सबा = पहाटवारा तर सबात = मजबुती, दृढता, strength ,firmness , stability .
तर आज मी सबा आणि सबात एकदमच अनुभवत होतो. पाठ पिशव्या खोलीवरच असल्याने २०/२५ मिनिटातच आम्ही मारुती मंदिर आणि कुंड ओलांडून नागफणी वर पोहोचलो. इथून पदर गड अगदी स्पष्ट दिसत होता पदर गडाची रचना म्हणजे जणू शिवलिंगा समोर नंदी. इतक्यात पुन्हा पेठ दिसला आणि अगदी निट बघितल्यावर पवनचक्क्या हि अस्पष्ट दिसू लागल्या. "बापरे आपण कुठून चालत आलो" अनघा उवाच. आता फोटो सेशन ला आणि वाऱ्याला अगदी उत आला. प्रशांत ने कडक बुंदीचे लाडू काढले. इतक्यात १ लाल तोंडे माकड टपकले. त्याला हि १ लाडू दिला तो कडक लाडू त्याला काही फुटेना त्यामुळे एका दाढेत लाडू असलेले ते ध्यान अजूनच छान दिसू लागले. डॉक्टर भरत खोलीवरच थांबला होतो blister ची देखभाल करत. त्याचा फोन आला २०/२५ मिनिटात नसता तयार होईल.
मनोसक्त वारं आणि थोडे पाणी पिउन आमची पावले माघारी वळली. पायऱ्या उतरताना १ का ठिकाणी थोडी गर्दी दिसली म्हणून बघितले तर १ शेकरू आंब्याच्या झाडावर घरटे बांधण्यात गर्क होती. वर ती फांद्या तोडत होती आणि खाली बघे अकलेचे तारे! त्याला Monkey है, इथपासून त्याच्या शेपटीत सोने असते इथपर्यंत. शेकरू मात्र आपल्या उद्योगात गर्क. इतक्या गर्दीत घर बांधते आहे म्हणजे बहुदा पहिलट्करिण असावी असा १ विचार आपला माझ्या मनी आला. तिला बेस्ट ऑफ लक देऊन आम्ही पुढे सटकलो.
कांदे पोहे आणि चहा ढोसून baga भरल्या. आज शिडीच्या वाटेने खांडस गाठायचे होते. डबेवाले मंडळींच्या व्यवस्थापकांचे आभार मानून, भिमाशांकाराला पुन्हा एकदा दंडवत करून परतीच्या वाटेला लागलो. शेकरू चा घरबांधणी उद्योग अजून चालूच होता भरत ला आम्ही आधीच कल्पना दिली असल्याने तो कॅमेरा चेउन तयार होता त्याने काही छान फोटो काढले. सुहास आणि पराग चे बहुदा पहिलेच शेकरू दर्शन असावे असे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
बाकी वर्णन पुढील भागात .....................
१०.३० ला शिडीच्या वाटेने उतरावयास सुरुवात केली. वाटेत १का झाडाच्या आडव्या पसरलेल्या खोडावर चढून फोटू काढले.आता पदर गड सारखा समोर दिसत होता.१२ च्या सुमारास एक झोपडी हॉटेल लागले. प्रशांत म्हणाला होता कि तेथे १ हॉटेल आहे. तेथे १ आजीबाई आणि १ लहान मुलगा व सुषमा नावाची १ मुलगी यांनी स्वागत केले. आजींची तब्येत बरी नव्हती, त्यांना काही गोळ्या दिल्या. सुषमा ने थंडगार लिंबू सरबत दिले. तिच्या शुद्ध बोलण्या वरून शिकलेली असावी असे वाटले ती १२वि पास आहे. वाडीत शिकलेली हि एकटीच. वडील पुढे शिकू देत नाहीत हि खंत तिच्या बोलण्यात दिसली. गावात वीज नाही पण किर्लोस्कर कंपनीने सोलर दिवे आणि सोलर energy वर चालणारी पिठाची गिरण दिली आहे असे सुषमा ने सांगितले.
शीड्यांचे सपोर्ट तुटले आहेत पण जायला हरकत नाही आम्ही हि त्याच वाटेने जातो असेही सांगितले.०१.१५ ला शिड्यांच्या आधी जो रॉक patch लागतो तेथे पोहोचलो. दगडाला वळसा मारण्यासाठी लावलेला लोखंडी सपोर्ट मजबूत आहे त्याला धरून तो patch उतरलो. पुढील रॉक patch पर्यंत पोहोचलो तो समोरून १ ग्रुप वर येताना दिसला. १६ मुले आणि ३ मोठी. यातील १ जण अनुभवी दिसत होता. पण तो सर्वात आधी वर येउन बसला. पराग भरत आणि प्रशांत ने मदत करून सर्वाना नीटवर आणले. या सर्व प्रकारात आमची ४०/५० मिनिटे गेली. एकंदर safety ची बोंब होती. हे लोक गिर्यारोहणाच्या सर्वांगसुंदर छंदाला बदनाम करतात.ना एखादा रोप ना पुरेसे पाणी.२ च्या सुमारास शिडी उतरायला सुरुवात केली. सह्याद्रीत अनेक ठिकाणी अशा शिड्या लावलेल्या आढळतात. त्यांची मोजणी आणि देखभाल करण्याचा कालबद्ध कार्यक्रम सर्व गिरीमित्रांनी हाती घ्यायला हवा असा १ विचार मनात आला . आज भूक लागत नव्हती. ०२.४५ ला एका ओढ्याजवळ थांबलो. वेडा राघू , धोबी असे काही पक्षी भरत ने कॅमेर्यात टिपले. पराग कडे अजूनही खाण्याचे जिन्नस शिल्लक होते. हा आमच्यातला सर्वात तरुण आणि उत्हाही भिडू. खाणे आटपून पुन्हा मार्गस्थ झालो. आता गाडी रस्ता दिसू लागला. मागे वळून पाहिले, पदर गड आता लांब राहिला होता, कधीतरी याला भेट द्यायची असे ठरवून रस्त्याला लागलो लगेच १ वाहन मिळाले त्याने कशेळे पर्यंत आलो पुढे वडाप ने कर्जत. आता मात्र घरची ओढ आणि भूक यांची एकदम जाणीव झाली. ०४.५४/०५.२० दोन्ही गेल्याच होत्या आता ०६.२० शिवाय गाडी नाही हे समजताच" मराठी बाणा आणि मिसळ हाणा" असे म्हणत हॉटेलात शिरलो. बाहेर पडलो तर २५ तारखेला पहाटे भेटलेली तृतीय पंथी व्यक्ती कर्जत मध्ये मार्केटिंग करत होती.
बरेच दिवस मनात असलेला ट्रेक सुरक्षित पूर्ण झाला होता.
प्रतिक्रिया
18 Aug 2013 - 9:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्रेकींग म्हटलं की फोटू.... बाकी, वर्णन सवडीने वाचतो. तो पर्यंत ही केवळ पोच.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
18 Aug 2013 - 11:06 am | पक पक पक
फॉटु.... ? :crazy:
18 Aug 2013 - 12:40 pm | भ ट क्या खे ड वा ला
https://www.facebook.com/media/set/?set=a.4845126259430.171590.163511341...
18 Aug 2013 - 12:44 pm | भ ट क्या खे ड वा ला
https://www.facebook.com/media/set/?set=a.4845126259430.171590.163511341...
18 Aug 2013 - 12:44 pm | भ ट क्या खे ड वा ला
https://www.facebook.com/media/set/?set=a.4845126259430.171590.163511341...
18 Aug 2013 - 1:00 pm | आदूबाळ
मस्तच लेख! कर्जत ते भीमाशंकर बद्दल वाचलं होतं, पण उलट्या बाजूने केलेल्या ट्रेकचं पहिलंच वर्णन. भिवपुरी पॉवर स्टेशन ते कर्जत रेल्वे स्टेशन हा तुकडा अगदी जपून जपून ठेवावा असा आहे.
18 Aug 2013 - 9:38 pm | जॅक डनियल्स
आदुबाळ, उलटा नाही तो सरळच ट्रेक आहे, त्यांनी लिहिल्याप्रमाणे धाक-बहिरीला जाताना एक भीमाशंकरचा फाटा फुटतो. तो फाटा फाट्यावर मारला तर रस्ता चुकतो...;)
18 Aug 2013 - 9:56 pm | आदूबाळ
मला असं म्हणायचं होतं की कर्जत - कडाव - भिवपुरी - शिडी - जंगल - भीमाशंकर असा प्रवास (चढणीचा) जनरली करतात. यांनी दुसर्या बाजूने केला.
अवांतरः ढाकचा भैरी :))
19 Aug 2013 - 1:16 am | प्रभाकर पेठकर
छायाचित्रांची वानवा, इंग्रजी शब्दांचा नको तितका वापर आणि धावतपळत केलेल्या वर्णनात 'उरकल्याची' भावना जाणवत होती. सगळेच वाच ट्रेक करणारे नसतात. सर्वसामान्यांना आनंद लुटता येईल असे वर्णन यायला हवे होते. असो.
19 Aug 2013 - 11:41 am | दत्ता काळे
ट्रेकींगच्या अगदी उमेदीच्या काळात मी जे काही ट्रेक्स केले त्यात काही अतिशय आवडून गेले. त्यातला एक म्हणजे लोणावळा ते भिमाशंकर हा ट्रेक. ह्या ट्रेकची वैशिष्टे म्हणजे :
पाण्याची वानवा. काही वेळा तर आम्ही अक्षरशः बाटलीतले पाणी आवश्यक तेव्हाच आणि बाटलीच्या झाकणात मावेल एवढेच घसा ओला करण्यापुरता प्यायलो होतो. ट्रेकमध्ल्या एक दिवशी जंगलात हाळाच्या (जनावरे पाणी पितात तिथे) पाण्याने तयार केलेला उपमा आणि निखार्यावर भाजलेले बटाटे एवढेच खाल्ले होते.
वांद्रे खिंडीतून आम्ही चालंत असता, भरदिवसा दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास बाहेर कडक उन्ह असताना, खिंडीत उन्हाचा एकसुध्दा कवडसा वाटेवर नव्हता इतकी दाट झाडी अन् वेली. जाताना दूरवर हरीणे दिसली. बिबट्याच्या पावलांचे ठसे खूप ठिकाणी दिसले.
आमचा ट्रेकच्या शेवटच्या रात्रीचा मुक्काम अतिशय मोठ्या आणि जनावरांनी भरलेल्या धनगर वाड्यात झाला.
20 Aug 2013 - 9:20 pm | भ ट क्या खे ड वा ला
फोटो टाकायचा प्रयत्न करतोय.
20 Aug 2013 - 9:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्रे लेखनाच्या चौकटीतच व स्पष्ट दिसावित म्हणून खालीलप्रमाणे प्रयत्न करून पहा:
१. Image URL: येथे चित्राची लिंक पेस्ट करा.
२. Alternative text: येथे फक्त एक स्पेस (स्पेसबार वापरून) टाका.
३. Width x Height:
अ) प्रथम चित्रांच्या लांबी-रुंदीचे आकडे न टाकता OK वर क्लिक करून पूर्वपरिक्षण करून पहा. जर चित्रे लेखनाच्या चौकटीत असतील तर अजून काहीही करायची गरज नाही... प्रकाशित करा. अश्या चित्रांचा आकार (लांबीचा अथवा रूंदीचा मोठा आकडा टाकून) वाढविल्यास त्यांची स्पष्टता कमी होते.
ब) चित्रे लेखनाच्या चौकटीबाहेर जात असल्यास (वरचा पर्याय योग्य असल्यास हा पर्याय बाद समजा) :
......प) मिपाच्या माहितीचा उजवा कॉलम असेपर्यंत (Powered by gamabhana पर्यंत) : रुंदी ६८० ठेवा
......फ) Powered by gamabhana च्या खाली : रुंदी जास्तीत जास्त ८६० ठेवा
उंचीची जागा नेहमीच रिकामी ठेवा, मिपा आपोआप योग्य मापाची उंची वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.
20 Aug 2013 - 9:48 pm | भ ट क्या खे ड वा ला
धन्यवाद
पुढील लेखात आपल्या सूचना नक्की वापरेन.
22 Aug 2013 - 6:52 am | कंजूस
चांगली सणसणीत झाली आहे भटकंती .वळवण ते कुसरे पठार ,सावळा ,गुप्त भिमाशंकर हा मार्ग नीटसा सांगाल का ? मधल्या टप्यांत किती वेळ लागतो ?
22 Aug 2013 - 8:01 pm | भ ट क्या खे ड वा ला
व्ळ्वन ते कुसरे पठार दिवस भराची वाटचाल आहे अंदाजे २२ ते २५ किलोमीटर कुसरे पठारावर वाट चुकण्याची शक्यता असते. सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकातील नकाशा उपयोगी आहे. काहीठिकाणी दगडांवर ओइल पेंट च्या खुणा आहेत पण त्या वेगवेगळ्या (लाल पिवळ्या ) रंगांच्या आहेत दोन अथवा अधिक ग्रुप नि केलेल्या असाव्यात. वाघोबाचे मंदिर लागल्यावर एक टॉवर दिसतो तो आखाडे यांच्या घराजवळ आहे कसूर गावात जाण्याची वाट ते सांगतात कसूर ते सावळे प्रवास आम्ही जीप ने केला होता डांबरी रस्ता असल्याने वाहने मिळतात सावळे गावात राहण्याची सोय होते (छोट्या ग्रुप ला ) मोठा ग्रुप असेल तर आधी सांगून ठेवणे उत्तम, सावळे गावातून भीमा शंकर ला जाण्यासाठी गाईड घेणे उत्तम हे अंतर सुद्धा २०/२५ कि मी आहे पुरेसे पाणी जवळ बाळगणे आवश्यक (योग्य काळ नोव्हेंबर ते जानेवारी )
तिन्ही दिवस, दिवस भर चाल आहे पण चढ उतार फारसे नसल्यामुळे थकवा येत नाही
अधिक माहिती हवी असेल तर ९९६००९६४३५ विनायक वैद्य , ८८०६७७०९३० प्रशांत खानविलकर यांना फोन करणे प्रशांत यांनी हा ट्रेक दोन वेळा केला आहे
कधी जायचे असेल तर कळवा
23 Aug 2013 - 11:40 am | कंजूस
धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल .एकट्याने होण्यातला नाही .तुकड्या तुकड्यात करेन .मागे कर्जत सांडशी कोँडेश्वर कामशेत केला आहे .
24 Aug 2013 - 11:11 pm | पैसा
थोडे धावत पळत केलेले वाटले तरी लिखाण आवडले. डिटेल्स व्यवस्थित लिहिले आहेत.