आम्हि येत्या १५ ऑगस्टला परुले येथील आदिनारायण मंदिर येथे जायचे ठरवत आहोत. तर तेथे आजुबाजुला बघन्या सारखं अजुन काय आहे? किति अंतारावर आहे, आमच्याकडे ३ दिवस आहेत, तर विजयदुर्ग हि पाहुन होउ शकतो का? राहन्यासाठी काय सोय असेल, घरातील मंड्ळी सोबत अस्तील तर काही जास्तीची काळजी घेऊ?
मु़ख्य म्हणजे जेवायची विषेशःता शाकाहारी काय सोय असेल? आधि कुणी जावुन आलेल्यांनी जर इथे काही लिह्ले असेल तर ते कसे शोधावे. मदत हवी आहे.
जाताना चे आरक्शण झालेले आहे पण येताना कुडाळ वरुन फक्त सकाळ्च्या वेळेस च बस दिसतात एस टी च्या वेब साइट वर , तर येताना रात्री काही गाड्या आहेत का? रेल्वे ची सोय कशी आहे? कुणी तिथलं माहेत्गार आहेत का?
प्रथमच इत्क्या दुर जाण्याची वेळ आसल्याने इथे लिहीत आहे, माहेती मिळावी ही आशा
सुचेता
प्रतिक्रिया
10 Aug 2013 - 1:49 pm | पैसा
http://www.oocities.org/vengurlaonline/PARULE/Vetoba.htm
ही लिंक बघा. बरीच माहिती आहे. परुळे इथे रहायची सोय काय आहे माहिती नाही. पण वेंगुर्ले किंवा कुडाळ कुठेही राहू शकता. वेंगुर्ला, शिरोडा, सिंधुदुर्ग, मालवण, तारकर्ली-देवबाग, देवगड-विजयदुर्ग सगळंच सहज पाहून होण्यासारखं आहे. सगळीकडे पर्यटनाविषयी जागरुकता आहे त्यामुळे शाकाहारी जेवणाची सोय कुठेही आरामात होईल.
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे किल्ले आणि समुद्रकिनारे आवर्जून बघण्यासारखे आहेत. मात्र जोडून सुट्या सल्यामुळे सगळीकडे प्रचंड गर्दी असेल.
तुम्ही कुठून प्रवासाला सुरुवात करणार आहात? मुंबईकडे जायचे असेल तर बर्याच रेल्वेगाड्याना कुडाळ स्टेशन आहे. खाजगी बसेस संध्याकाळी निघतात. redbus.com वर अशा खाजगी बसेसची माहिती मिळू शकेल.
http://www.redbus.in/indexNew6.aspx?utm_expid=2728620-32.4n-pC6_rR3KXq3M...
पण सध्या प्रचंड गर्दी असणार हे नक्की. तेव्हा सोबत लहान मुले/ज्येष्ठ नागरिक असतील तर बस किंवा रेल्वेची तिकिटे हातात असली पाहिजेत असं मला वाटतं.
13 Aug 2013 - 3:10 pm | सुचेता
पैसाताई,
हि लींक खरेच छान आहे, खुप माहिती मिळाली, पुन्हा एकवार धन्यवाद.
सुचेता