राजस्थानी मावा कचोरी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
7 Aug 2013 - 3:49 am

साहित्यः

१ वाटी मैदा
१/४ वाटी ताजा खवा / मावा
२ टेस्पून साजूक तूप
३-४ टेस्पून काजू+बदाम+पिस्त्याची पावडर
१ वाटी साखर + २ टेस्पून खव्यात मिसळण्यासाठी (साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी - जास्त करणे)
१ टीपून बदामाचे काप
१ टीस्पून पिस्त्याचे काप
१/४ टीस्पून केशर
१/२ टीस्पून वेलचीपूड
चांदीचा वर्ख सजावटीसाठी (ऐच्छिक)

.

पाकृ:

मैद्यात तुपाचे मोहन घालून, थंड पाण्याने साधारण घट्ट पीठ भिजवावे.
पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे.
नॉन - स्टीक पॅनमध्ये खवा मंद आचेवर कोरडाच , बदामी रंगावर परतून घ्यावा.
गॅस बंद करून वेगळ्या भांड्यात काढावा व हलका कोमट असतानाच त्यात सुकामेव्याचीपूड मिक्स करुन घ्यावी.
खवा पूर्ण थंड झाला की त्यात २ टेस्पून साखर व वेलचीपूड घालून एकत्र करावे.
मैद्याच्या पीठाचे सारखे गोळे करुन घ्यावे. एक गोळा घेऊन, चपटा करुन त्याची पारी तयार करून घ्यावी.
त्यात चमच्याने खव्याचे सारण भरुन, कडा उचलून बंद करुन घ्याव्यात.
हलकेच तळहातावर चपटे करुन घ्यावे, लाटायचे नाही.

.

वनस्पती तूप गरम करुन घ्या व हल्क्या हाताने कचोर्‍या त्यात सोडून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
कचोर्‍या खुसखूशीत झाल्या पाहिजेत.
तळलेल्या कचोर्‍या पेपर टॉवेल वर काढून घ्याव्यात.
एक वाटी साखर + १/२ वाटी पाणी + केशर + वेलचीपूड एकत्र करुन २ तारी पाक तयार करुन घ्यावा.
पाक गरम असतानाच त्यात कचोर्‍या घोळवून घ्याव्यात.
तयार कचोर्‍यांवर चांदीचा वर्ख लावून, बदाम+पिस्त्याचे काप पेरावे.

.

राजस्थानी मावा कचोरी खाण्यासाठी तयार आहे.

.

.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

7 Aug 2013 - 4:02 am | स्पंदना

आई ग्ग!
मला एक सांग सानिका या कचोर्‍यांना ते लेअर्स कसे आणायचे? माझी ती कायस्थ मैत्रीण करते त्या कचोर्‍यांना सुरेख पडदे सुटलेले असतात.
शेवटचा फ्प्टो पाहुन ..बघ लिहीताही येइना....जीव कासाविस झाला.

कायस्थ आहे ना, मग ती नक्की मैद्याच्या लाट्यांना साजूक तूप आणि तांदळाच्या पिठीचं साटं लावत असणार असं वाटतंय. खुसखुशीत करायच्या असतील तर मैदा कमी मळा म्हणजे ग्लुटेन फॉर्म होत नाही. मैदा कमी मळलात तर पदार्थ अधिक खुसखुशीत होतात असा अनुभव आहे. बाकी अनुभवी लोक सांगतीलच.

स्पंदना's picture

11 Aug 2013 - 1:34 pm | स्पंदना

धँक्यु सुडस!

सस्नेह's picture

7 Aug 2013 - 4:22 am | सस्नेह

बर्‍याच दिवसांपासून शोधत होते ही पाकृ .

रमेश आठवले's picture

7 Aug 2013 - 7:35 am | रमेश आठवले

मी आत्तापर्यंत कचोरी हा नमकीन व चिंचेच्या किंवा फुदिन्याच्या चटणी बरोबर खायचा पदार्थ आहे असे समजत होतो. माव्याची गोड कचोरी हा माझ्यासाठी एकदम नवीन प्रकार आहे.
गजानन महाराजांचे शेगाव कचोरीसाठीही प्रसिद्ध झाले आहे. त्या कचोरीचे फोटो येथे पहा
https://www.google.co.in/search?q=shegaon+kachori&client=firefox-beta&hs...
शेगाव मधील तीर्थराम यांच्या कचोरीला नुकतेच iso cerificate मिळाले आहे व देशात आणि परदेशात तीचा खप आहे. या बद्दलचा तू नळी धागा खाली पहा.
http://www.youtube.com/watch?v=dcxiIHOEtkk

मुक्त विहारि's picture

7 Aug 2013 - 8:31 am | मुक्त विहारि

नि:शब्द...

भावना कल्लोळ's picture

8 Aug 2013 - 5:31 pm | भावना कल्लोळ

मस्त

काय छान दिसताहेत कचोर्‍या !

पैसा's picture

7 Aug 2013 - 9:39 am | पैसा

ग्रेट!

मदनबाण's picture

7 Aug 2013 - 9:52 am | मदनबाण

आहाहा... आहाहा आणि आहाहा... ;)

खव्याची कचोरी पण बनते हे माहित नव्हते ! बाकी शेगावची कचोरी मागच्याच आव्ड्यात खायला मिळाली होती. :)

(मावा प्रेमी बोका) ;)

त्रिवेणी's picture

7 Aug 2013 - 10:27 am | त्रिवेणी

मस्त

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2013 - 10:32 am | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच सुंदर सादरीकरणासह पेश केलेली चवदार (माव्याची असल्याने असणारच) पाकृ !

---अतीमावाप्रेमी

निवेदिता-ताई's picture

5 May 2014 - 5:52 pm | निवेदिता-ताई

+१

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2013 - 10:33 am | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआ.....................! पर्वा ह्योच प्रकार रबडी टाकूनशान खाल्ला. अजून ती नशा मेंदूत हाय. :)

शेवटून दुसर्‍या फोटूला सल्लाम! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-408.gif

समांतर- मला त्या द्रोण/पाकळ्यां-मुळे रांगोळ्यातली एक नवी आयड्या आली. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-864.gif

वा... कचोरी एकदम भारी दिसतायत.. सहि..

वा... कचोरी एकदम भारी दिसतायत.. सहि..

त्रिवेणी's picture

7 Aug 2013 - 12:35 pm | त्रिवेणी

मी आज गटारी स्पेशल पाक्रुची वाट बघत होते कुणीतरी टाकेल म्हणुन.

त्रिवेणी's picture

7 Aug 2013 - 12:36 pm | त्रिवेणी

मी आज गटारी स्पेशल पाक्रुची वाट बघत होते कुणीतरी टाकेल म्हणुन.

प्रभाकर पेठकर's picture

7 Aug 2013 - 12:38 pm | प्रभाकर पेठकर

कचोर्‍या पाहूनच, आनंदाने, गतप्राण झालो आहे.

प्रभाकर पेठकर's picture

7 Aug 2013 - 12:39 pm | प्रभाकर पेठकर

कचोर्‍या पाहूनच, आनंदाने, गतप्राण झालो आहे.

तुषार काळभोर's picture

8 Aug 2013 - 5:04 pm | तुषार काळभोर

दोनदा ??
;-)

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2013 - 12:41 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसते आहे ग कचोरी..
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

7 Aug 2013 - 12:59 pm | प्रभाकर पेठकर

एकदाच टाकलेली प्रतिक्रिया दोनदा का बरे प्रकाशित होत आहे?

गणपा's picture

7 Aug 2013 - 1:07 pm | गणपा

.
रेस्टिंग ईन पीस.
प्लिज डु नॉट डिस्टर्ब अगेन अ‍ॅंड अगेन.

सुहास झेले's picture

7 Aug 2013 - 4:24 pm | सुहास झेले

भन्नाट :) :)

अनिरुद्ध प's picture

7 Aug 2013 - 1:35 pm | अनिरुद्ध प

बघुनच तोन्डाला पाणी सुटले आहे,आणि आत्माराम ने रबडीचा कहर केला.

सूड's picture

7 Aug 2013 - 2:40 pm | सूड

अत्याचार आहे हा!! ह्या सगळ्या अन्नपूर्णांच्या हातातल्या पळ्या श्रावणापुरत्या तरी बाजूला ठेवायला लावा रे कुणीतरी. ;)

प्रभाकर पेठकर's picture

7 Aug 2013 - 4:34 pm | प्रभाकर पेठकर

माव्याच्या कचोर्‍या श्रावणात (सुद्धा) चालतात. उगीच अन्नपूर्णांवर 'सूड' उगवू नका.

दिपक.कुवेत's picture

7 Aug 2013 - 2:44 pm | दिपक.कुवेत

दोन्हि छान.

michmadhura's picture

7 Aug 2013 - 3:08 pm | michmadhura

भन्नाट रेसिपी. तों. पा. सू.

माणिकमोति's picture

7 Aug 2013 - 3:43 pm | माणिकमोति

खुपच मस्त.....! नक्की करुन बघणार...!!! तुम्हाला हे सगळे साहीत्य युके मधे मिळते कसे????

माणिकमोती खव्याबद्दल विचारत असाल तर खवा घरी मायक्रोवेव्ह (मावे) मध्ये बनवायचा. काही नाही थिकन्ड क्रिम मध्ये मिल्क पावडर मिसळायची जरा घट्ट्सर गोळा बनवायचा अन २-२ मिनीट असे करत मावेत गरम करायचा. जास्तीत जास्त ६-७ मिनीट लागतील.

निवेदिता-ताई's picture

7 Aug 2013 - 4:02 pm | निवेदिता-ताई

अप्रतिम......................:)

तिमा's picture

7 Aug 2013 - 4:12 pm | तिमा

कचोर्‍या चोराव्याशा वाटताहेत.

पिशी अबोली's picture

7 Aug 2013 - 4:32 pm | पिशी अबोली

फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आवरुन, आधी १२ सूर्यनमस्कार घालावेत असं वाटलं.. हे खाल्लं तर जरा जास्तच मानवेल बहुतेक. ;)

पियुशा's picture

7 Aug 2013 - 4:42 pm | पियुशा

वॉव !!!

मृगनयनी's picture

9 Aug 2013 - 7:52 pm | मृगनयनी

मस्त पा.कृ..... आवडली!... :)

खादाड's picture

8 Aug 2013 - 5:32 pm | खादाड

क्या बात है !! खल्ल्लास झाला माणुस !!

ही बाई आणि हिच्या पाककृती अल्टिमेट आहेत !!!

शेगाव च्या कचोरी बद्दल आश्चर्य वाटले.
दर वर्षी शेगावला जाऊन ही तिथली स्टेशनवर मी कचोरी खात नसे. मला नेहमी वाटायचे की ते तिथल्या toilet मधले पाणी वापरत असतील.
आता न चुकता खाइन.
ही कचोरी अमेरिकेत कुठे मिळते ?

रमेश आठवले's picture

10 Aug 2013 - 10:59 am | रमेश आठवले

गुगल वर शोधल्यावर कचोरीच्या तीर्थराम यांच्या दुकानाची खालील माही मिळाली. तुम्ही किंवा तुम्ही अमेरकेत असलात तर तुमच्या भारतातील नातेवाईकांनी फोन करून चौकशी केल्यास अमेरिकेत त्यांच्या कचोर्या कुठे मिळतील ते समजू शकेल. त्यांचा इ मेल पत्ता काही मला सापडला नाही.
T R Sharma Gagan`s Shegaon Kachori Centre, Opp Railway Station, Shegaon, Station Road, Shegaon, BULDHANA - 444203 | View Map

9423445920, 9561614342

वेताळ's picture

10 Aug 2013 - 7:14 pm | वेताळ

वाईट आहे.अजिबात आवडला नाही.

स्वाती शिंदे's picture

10 Aug 2013 - 9:49 pm | स्वाती शिंदे

मस्त आहे पाककृती. फोटोही छान आले आहेत.

केल्या होत्या तुझ्यासारख्या. आवडल्या मुलांना.

अभ्या..'s picture

11 Aug 2013 - 9:46 pm | अभ्या..

मस्त. :)

रेवती's picture

11 Aug 2013 - 10:08 pm | रेवती

Great!

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Jun 2014 - 8:23 pm | माम्लेदारचा पन्खा

कचोरी चविष्ट असणारच…सुगरणीचे करदर्शनही झाले. हातावर योग आहेत हो संजीव कपूरला कोम्प्लेक्स द्यायचे !!!