गाभा:
सामान्य माणूस वकिलाची मदत न घेता कोर्टात जनहित याचिका कशी दाखल करतो ,
गुगल वर सर्च केले असता साधे पोस्ट कार्ड सुद्धा पेटीशिअन म्हणून ग्राह्य धरले जाते ,
पुण्यात कुणी माहितीगार मिळू शकेल काय ,एक सरकारी भष्ट्याचार प्रकरण उघड करायावाचे आहे .
बहुतेक जणाकडे मदत मागीतली पण सर्वांनी असमर्थता दाखवली .
प्रतिक्रिया
2 Aug 2013 - 9:25 pm | आदूबाळ
आय एल एस लॉ कॉलेजचा एक "लीगल एड" उपक्रम आहे. (बहुदा त्याचं "दीपगृह" आहे असं अंधुक अंधुक आठवतंय.) लॉ कॉलेजमध्ये चौकशी केल्यास समजेल. ते व्यवस्थित सल्ला देतील.
गरज पडल्यास लॉ कॉलेजच्या डीन डॉ. वैजयंती जोशी यांना भेटा. जरा करारी व्यक्तिमत्त्व आहे, पण तुमच्या मुद्द्यात त्यांना तथ्य वाटलं तर नक्की मदत करतील.
3 Aug 2013 - 11:08 am | दादा कोंडके
आपणास काही माहिती मिळाली तर इथं आवश्य लिहा.
7 Aug 2013 - 1:21 am | सईसखी
तुम्ही म्हणतायत ते खरे आहे कि
पण त्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक:
१. जनहित याचिका दाखल करुन घ्यायची कि नाही हे कोर्टाच्या अखत्यारीत येते.
२. जनहित याचिका फक्त हाय कोर्ट वा सुप्रीम कोर्टामध्येच दाखल करता येते.
३. जनहित याचिका वकिलाशिवायही दाखल करता येते परंतू त्यासाठी असणार्या अटी, निर्देश व संयुक्तिक बाबी माहित असणे आवश्यक आहे. ज्या साधारणपणे कायद्याचा अभ्यास नसलेल्या व्यक्तिला माहित असण्याची शक्यता कमी असते.
४. याचिका दाखल करतांना कोर्टासमोर याचिकादारास हे प्रथम सिद्ध करुन द्यावे लागते कि त्याचे स्वतःचे यात काही खाजगी हितसंबंध गुंतलेले नसून सर्वसामान्य जनतेच्या हिताकरिता दाखल करण्यात येत आहे.
५. याचिका दाखल करण्याकरता याचिकादार आधिकारी(लोकसस्टँडी) आहे कि नाही हे ही सिद्ध करावे लागते. (बर्याच वेळा हे करणे अत्यंत कठिण जाते, आणि कित्येक याचिका इथुनच बाद होतात.)
म्हणून माझ्यामते, हे काम वकिलातर्फे केलेले केव्हाही चांगले.
7 Aug 2013 - 4:39 pm | विटेकर
दर सोमवारी वक्तृत्वोत्तेजक सभा येथे संध्याकाळी ६ ते ७ श्री विजय सगर यांना भेटावे. ( विश्व होटेल च्या समोर , सारस बागेजवळ )
आपला अनुभव येतेह जरुर लिहावा.
ता. क. आपण पुण्यात रहात असाल असे गृहित धरले आहे.