साहित्यः
भावनगरी मिरच्या १५० ग्रॅम (अंदाजे १० मिरच्या).
मिरचीत भरण्यासाठी:
तेल १.५ मोठा चमचा (टेबल स्पून).
मोहरी १/२ लहान चमचा. (टी स्पून).
मेथीचे दाणे १/२ लहान चमचा.
हिंग चिमुटभर.
चण्याचे पीठ ४ मोठे चमचे.
हळद १/२ लहान चमचा.
आमचुर पावडर २ लहान चमचे.
धण्याची पावडर १ लहान चमचा.
गरम मसाला पावडर १ लहान चमचा.
कालवणासाठी (ग्रेव्हीसाठी):
तीळ २ मोठे चमचे.
ओल्या नारळाचा चव ४ मोठे चमचे.
तेल २ मोठे चमचे,
हिंग १/४ लहान चमचा.
जीरं १/२ लहान चमचा.
मोहरी १/२ लहान चमचा.
लवंग ६ नग.
कढीलिंबाची पाने ५-६ नग.
गरम मसाला १/२ लहान चमचा.
मीठ चवीनुसार.
लाल तिखट १/२ लहान चमचा.
हळद १/२ लहान चमचा.
धण्याची पावडर १/२ लहान चमचा.
चिंचेचा कोळ चवीनुसार.
साखर १/२ लहान चमचा.
कृती:
मिरच्यांना एकाबाजूने चीर द्या.
तेल तापवून मेथी आणि मोहरी टाकून तडतडू द्या. आता हिंग घाला. मंद गॅस करून चण्याचे पीठ आणि मिरच्या भरण्यासाठी असणारी सारी सामग्री त्यात टाकून परता. खमंग वास सुटे पर्यंत परता. हा मसाला गॅसवरून उतरवून थंड करून मिरच्यांमध्ये भरा. ह्या भरलेल्या मिरच्या बाजूला ठेवून द्या.
तीळ आणि ओला नारळ परतून मिक्सर मधून मुलायम पेस्ट करा.
आता तेल तापवा जींरं आणि मोहरी टाकून तडतडवून घ्या. जीरं, मोहरी तडतडली की हिंग घाला. आता त्यावर लवंगा टाका. त्यावर भरलेल्या मिरच्या घालून परतून घ्या, तीळ आणि नारळाची पेस्ट घालून परता. कालवणासाठी असणारी सर्व सामग्री घालून त्यावर चिंचेचा कोळ आणि १ कप पाणी घालून मिरच्या शिजवा. गरज भासल्यास अजून पाणी घालण्यास हरकत नाही. शेवटी छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे कालवण झाले पाहिजे.
गॅसवरून उतरवून कोथिंबीरीने सजवा.
गरम गरम भाताबरोबर किंवा पोळ्यांबरोबर आस्वाद घ्या.
शुभेच्छा...!
प्रतिक्रिया
25 Jul 2013 - 3:57 am | सुहास झेले
भारीच...!!!
25 Jul 2013 - 5:11 am | आनन्दिता
मस्त!!
25 Jul 2013 - 5:46 am | रेवती
अगदी तजेलदार फोटू आणि छान पाकृ. चविष्ट असणार असं साहित्यावरून कळतय.
25 Jul 2013 - 8:53 am | अत्रुप्त आत्मा
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल.........!!!!!
25 Jul 2013 - 9:07 am | स्पंदना
अस्सा खमंग रंग आलाय ना? काय सांगु?
25 Jul 2013 - 9:55 am | रुमानी
मस्त....!
25 Jul 2013 - 10:35 am | दिपक.कुवेत
फोटोच सर्व काहि सांगुन जातोय. अजुन वेगळं काय म्हणणार?
25 Jul 2013 - 3:54 pm | मी_आहे_ना
असेच म्हणतो
25 Jul 2013 - 11:02 am | टक्कू
मस्त!
नक्की करून बघेन.
25 Jul 2013 - 11:22 am | स्वाती दिनेश
मस्त...
स्वाती
25 Jul 2013 - 11:24 am | आतिवास
मस्त दिसतेय.
पण आता इतके सारे साहित्य(इनग्रेडियंट्स)जमवायला वेळ लागेल :-)
25 Jul 2013 - 11:55 am | सौंदाळा
मिरचीत भरण्यासाठी तुम्ही दिलेल्या सारणा व्यतिरीक्त सुकं खोबरं पण घालतो आम्ही (आमचुरऐवजी लिंबु पिळतो). आणि शॅलो फ्राय करुन तोंडीलावणं म्हणुन खातो.
हेच सारण भरुन ढब्बु मिरची पण छान लागते, अर्धी कापुन सारण भरायचे.
पण याची खरी चव (मला वाटते ती) कच्च्या टॉमॅटो बरोबरच, मस्तच लागतात एकदम.
ग्रेव्ही मात्र करुन बघायला पाहीजे.
25 Jul 2013 - 12:07 pm | आदूबाळ
जबरदस्त! करून बघणार!
25 Jul 2013 - 1:11 pm | गणपा
फोटो पण एकदम खंग्री आलाय.
आजच करावे म्हणतो.
25 Jul 2013 - 1:31 pm | कपिलमुनी
काका ,
सुंदर हो !!
श्रावण सुरु झाला की करून बघणार !!
सध्या आखाडा - आखाडी सुरू आहे ..
25 Jul 2013 - 2:11 pm | सानिकास्वप्निल
भरवाँ मिर्च भारी दिसतेय :)
रंग ही सुंदर आलाय एकदम +११११
25 Jul 2013 - 2:36 pm | जागु
मस्तच.
25 Jul 2013 - 3:15 pm | त्रिवेणी
मस्त मस्त.
मी करुन बघेन तेव्हा डाळीच्या पिठाबरोबर थोडे थालीपीठाची भाजणी टाकुन बघते.
25 Jul 2013 - 4:39 pm | कवितानागेश
सुंदर दिसतेय मिरची.
आईला दाखवते पाक्रु. ;)
25 Jul 2013 - 7:48 pm | अनन्न्या
बय्राच दिवसात वेगळी पाकृ केलीच नाही. आता कामाला लागते. वाचनखूण साठवली आहे.
26 Jul 2013 - 2:28 am | अभ्या..
एकदम मस्त आहे ही पाकृ
श्री. पेठकर काका धन्यवाद.
शिमला मिर्चचे ऑप्शन देणार्याला पण धन्यवाद.
26 Jul 2013 - 9:43 am | मी_देव
मस्तच दिसतेय ग्रेव्ही.. नक्कीच करणार
27 Jul 2013 - 9:41 am | मुक्त विहारि
झक्कास..
27 Jul 2013 - 9:54 am | मदनबाण
मस्त ! (फ्लिकरवर टाकलेले फोटो हापिसातुन पाहता येत नसल्याने आत्ता परत धागा उघडुन समाधान करुन घेतले.)
28 Jul 2013 - 12:14 am | चिंतामणी
या मिरच्या तीखट नसतील.
28 Jul 2013 - 1:45 am | प्रभाकर पेठकर
सुहास झेले, आनन्दिता, रेवती, अत्रुप्त आत्मा, aparna akshay, श्रुती कुलकर्णी, दिपक्.कुवेत, मी_आहे_ना, टक्कू, स्वाती दिनेश, आतिवास, सौंदाळा, आदूबाळ , गणपा, कपिलमुनी, सानिकास्वप्निल, जागु , त्रिवेनि, लीमाउजेट, अनन्न्या, अभ्या.. मी_देव, मुक्त विहारि, मदनबाण, चिंतामणी....... सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
@चिंतामणी - नाही. ही मिरची तिखट नसते. भोपळी मिरची सारखीच असते फक्त आकार वेगळा.
28 Jul 2013 - 11:40 am | jaypal
2 Aug 2013 - 9:02 pm | पैसा
पाकृ आणि फोटो एकदम कातिल आहे!
3 Aug 2013 - 1:59 am | प्रभाकर पेठकर
जयपाल आणि पैसा....धन्यवाद.