प्रसंग अगदि छोटासाच पण विचार करत बसलो. काल काहि कामाकरता सीटि मधे जाणं झालं. एकटा असलो कि मी मुद्दाम बसने जातो. तर्हेतर्हेची माणसं/त्यांच्या सवयी/लकबी पहायला मिळतात.....स्टॉप येईपर्यत छान वेळ जातो.
बस मधे तशी फारशी गर्दि नव्हती. तिकिट काढुन जागेवर बसलो. माझ्या पुढे एक २/४ सीट सोडुन एक माणुस बसलेला. सवयीने त्याच्या बाजुची सीट रीकामी असल्याने त्याचं खायचं सामान त्या जागेवर होतं (बहुतेक रोजा सोडायचं होतं). पण साहेब पाय पुढे करुन झोपा काढत होते त्यामुळे कोणाला त्याला क्रॉस करुन त्याच्या बाजुच्या सीट्वर जाता येत नव्हतं पण त्याचबरोबर बसायला मिळत नाहिये म्हणुन चुळबुळत होते. शेवटि एकाने त्याला उठवलच तर त्याने सांगीतलन कि बाजुच सामान त्याचं नाहिच आणि परत झोपी गेला. बरं सामान खाली ठेवुन बसावं तर हा पाय अडवुन झोपलेला विचारणारा माणुस 'विचित्र/तर्हेव्हाईक' दॄष्टि़क्षेप टाकित मागे आला. हेच बसमधे नविन चढणार्यांच्या बाबतीत होत होतं. शेवटपर्यत कोणालाहि बसु न देता यथावकाश त्या माणसाचा स्टॉप आल्यावर तो दोन तिकिट दाखवत उतरुन गेला.
तर बाजुच्या सीटचं तिकिट खरेदि करुन जागा रिझर्व करणं हे योग्य कि तिकिट घेतल्यामुळे त्या जागेवर आपलं सामान ठेवुन (काहि ठिकाणी तर जागा रीकामी ठेवतानाहि पाहिलय) ईतरांना उभं ठेवणं/ त्यांची अडवणुक करणं हे अयोग्य?
शेवटि योग्य/अयोग्यच्या व्याख्या ह्या आपण आपल्या सोईनुसार बदलतो/ठरवतो का?
प्रतिक्रिया
15 Jul 2013 - 1:35 pm | अक्षया
लोकांची अडवणुक करणे अयोग्यच आहे.
सामानासाठी बस मधे वेगळी जागा असतेच.
15 Jul 2013 - 1:36 pm | प्रसाद१९७१
अहो तुम्ही कुवेत मधला प्रसंग लिहिलेला दिसतोय. मला त्याभागाची काहीच कल्पना नाही त्यामुळे काही बोलता येणार नाही.
पण तुमच्या आणि आमच्या मातृभुमी मधल्या २ पायावर चालणार्या जनावरांचा खुप अनुभव आहे.
भारतात २ काय १ ति़किट नाही काढले तरी चालते. पुर्ण पणे फु़कट असा प्रवास कसणारे आणि आपल्याच बापाची बस, ट्रेन, रस्ता असल्या सारखे वागणारे लाखो, कोट्यावधी लोक आहेत.
तुमच्या कुवेत मधल्या माणसानी १ नाही तर २ ति़किटे काढलेली बघुन मला तर भरुन आले.
15 Jul 2013 - 1:37 pm | ऋषिकेश
योग्य अयोग्य हे शब्दच मुळाच स्थ्ळ-काळ्-व्यक्ती सापेक्ष आहेत.
एखादी गोष्ट कुणासाठी तरी, कोणत्यातरी परिस्थितीत, कोणत्याश्या प्रसंगात, कोणत्याच्या स्थळी - वेळी योग्य / अयोग्य असु शकते. त्याचे वेळी तशीच वागणूक याटील एकही पॅरॅमिटर बदलल्यास अयोग्य/योग्य होऊ शकते.
15 Jul 2013 - 4:12 pm | मनीषा
"हम करें वो कायदा .. " असे मानणार्या व्यक्तींसाठी त्यांना सोयीस्कर असेल ते योग्यं आणि ते ठरवतील ते अयोग्य असे असते.
बाकी सर्वसामान्य लोकांना योग्य की आयोग्य हे ठरविण्याचा अधिकारच नसतो.
15 Jul 2013 - 6:06 pm | पैसा
योग्य्/अयोग्य व्यक्तिसापेक्ष असते आणि प्रसंगानुरूप बदलू शकते. पण या प्रसंगात मला २ शंका आल्या.
१) बसचा कंडक्टर कुठे होता? त्याला विचारून खात्री करून घेता आली असतीच.
२) तिकिट काढले म्हणजे सीट रिझर्व्ह केली असं होत नाही. त्यासाठी वेगळा आकार असतो. तो त्याने भरला असेल तर त्याचे बरोबर आहे. पण सीट रिझर्व्ह केली नसेल आणि फक्त तिकिटच काढले असेल तर मात्र दुसर्या कोणालातरी तिथे बसायचा हक्क नक्कीच होता.
15 Jul 2013 - 6:41 pm | गणपा
तिथें कंडक्टर वायला नसतो. डरायवरच मास्तरचं कामबी कर्तो.
15 Jul 2013 - 6:39 pm | गणपा
आपल्याकडेही अशी सोय पाहिजे होती राव. म्हणजे बसमध्ये जेवढ्या शिटा असतील तेवढी तिकिटं काढली की फुल्ल बस रिझर्व्ह.
च्यामारीबिस्कुट कुवेतातली माणसं लैच साधी भोळी दिसत्यात. एका बी मर्दाची/आदिमायेची हिंमत झाली नै त्याला हुसकायची?
15 Jul 2013 - 7:15 pm | नितिन थत्ते
रत्नागिरी-पुणे घाटगेपाटील बस मध्ये महिला दोन तिकीटे काढून जात असत हे पाहिले आहे. दोन तिकीटे काढल्याने शेजारच्या सीटवर पुरुष येऊन बसण्याची शक्यता नाही.
15 Jul 2013 - 7:41 pm | उपास
पण सामान हे निर्जीव असल्याने आणि त्याची सोय बाजूला/ खाली होऊ शकत असेल असे गृहीत धरुन माणसांसाठी अग्रक्रम हवा सीटवर.
अवांतरः मुंबई पुणे लहान मुलाला (वय वर्षे २) प्रवास करायचॉ बरच रेल्वेने. डेक्कन क्विन, इंद्रायणी, प्रगती वगैरे बर्याच गाड्यांत ही गर्दी असायची. सुरुवातीला एक दोन वेळा मुलाला मांडीवर घेऊन प्रवास केला, पण मगे ते त्यालाही आणि आम्हालाही त्रासदायक/ कंटाळवाणे व्हायचे. त्यानंतर आम्ही त्याचे वेगळे तिकीट काढू लागलो जेणेकरुन त्याला स्वतंत्र आणि आम्हाला ऐसपैस बसता येईल. गंमतीची गोष्ट अशी की रिझर्व्हेशनच्या डब्यात, मुलाचं वेगळं तिकीट का काढता किंवा त्याला मांडीवर घेऊन बसा आणि आम्हाला बसूद्या जागेवर असं म्हटलेले किंवा सीटवर घुसलेले महाभाग (अगदी महिलाही) पाहिलेत. लोकसंख्या इतकी आहे की साधने अपुरी पडताहेत, तस्मात असे झगडे होणारच, चित्त शांत ठेवणे महत्त्वाचे ;)