इष्टुर फाकडा

श्रीनिवास टिळक's picture
श्रीनिवास टिळक in काथ्याकूट
11 Jul 2013 - 8:16 pm
गाभा: 

Capt James Stewart नावाचा एक ब्रिटीश सैन्याधिकारी 1779 मध्ये वडगाव येथे मारला गेला. त्यानंतर झालेल्या लढाईत महादजी शिंदे यांनी ब्रिटीशांचा मोठा पराभव केला. हे यश नंतर झालेल्या तहात मराठयांनी घालविले हे आपल्याला माहित आहे. माझा प्रश्न आहे James Stewart हा पुढे ‘इष्टुर फाकडा’ या नावाने फार लोकप्रिय झाला. अजूनही वडगाव मावळ मध्ये त्याच्या नावाने दरवर्षी उत्सव किवा जत्रा भरते ती कशी काय? या बद्दल अधिक माहिती मिळाली तर आभारी होईन.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Jul 2013 - 9:34 pm | प्रचेतस

जत्रा इष्टुर फाकडा ची नसून ग्रामदैवत पोटोबाची असते. अर्थात लोक पूर्वी इष्टुर फाकडाला नवस बोलायचे. अजूनही बोलत असावेत. त्याच्या मृत्युदिनाला नैवेद्यकोंबडं वैगरे वाहायाचे ते त्याच्या भितिपोटी. त्याचे भूत रात्री अपरात्री येणार्या लोकांच्या पाठी लागायचे अशी समजूत होती. पण त्याची हद्द पोटोबाच्या मंदिरापर्यंतच. एकापरिने पोटोबा गावचा राखणदारच असे. आज मात्र इष्टुर फाकडाचा / इंग्रजांचा पराभव हां गावात विजयदिन म्हणून साजरा केला जातो.


आज मात्र इष्टुर फाकडाचा / इंग्रजांचा पराभव हां गावात विजयदिन म्हणून साजरा केला जातो.

आणि आजही कोरेगाव-भिमाला इग्रजांनी मराठी सैन्याला हरवल्याचे सेलिब्रेशन होते.

ते सेलिब्रेशन तसे का होते ते पाहण्यासारखे आहे. इंग्रज सैन्यात त्या लढाईत बह्वंशी महार समाजातील लोक होते आणि मराठी सैन्य म्हंजे पेशव्यांचे सबब ब्राह्मणांवर दलितांचा विजय असे त्या सेलिब्रेशनला रूप दिले गेलेय.

तुषार काळभोर's picture

12 Jul 2013 - 4:11 pm | तुषार काळभोर

आणि ते संकुचित मनोवॄत्ती दाखवते.
महारांनि ब्राह्मणांवर/मराठ्यांवर मिळवलेला विजय साजरा करायचा, की इग्रजांनि एत्तदेशीयांवर विजय मिळवला त्याचे दु:ख करायचे?

(छे छे छे!!!! उगाच मी शिवाजीमहाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले अन् डॉ. आंबेडकर या सर्वांविषयी आदर बाळगतो. आतापासून फक्त जय भवानी! जय शिवाजी!!)

बॅटमॅन's picture

12 Jul 2013 - 4:33 pm | बॅटमॅन

सहमत आहेच.

यावर एक रोचक लेख वाचला होता कधीकाळी, त्याची लिंक विसरलो. इतिहासाच्या चित्रविचित्र पुनर्लेखनामुळे तसे होते, इलाज नै त्याला.

श्रीनिवास टिळक's picture

12 Jul 2013 - 5:36 am | श्रीनिवास टिळक

वल्लीजी या माहितीबद्दल धन्यवाद. Capt James Stewart याच्या कारकीर्दीवर आधारित एक चित्रपट “Singularity” दिवाळीच्या सुमारास भारतात प्रसिध्द होणार असं वाचलं. भर म्हणून त्याचा एका मराठी युवतीबरोबर (भूमिका बिपाशा बसू) प्रणय आहे. दिग्दर्शक--Roland Joffé (City of Joy and Killing Fields fame), कथा--अजय झणकर. तू नळीवर trailer पाहायला मिळतो.

रोहन अजय संसारे's picture

12 Jul 2013 - 11:52 am | रोहन अजय संसारे

नमस्कार ,

Capt James Stewart - ‘इष्टुर फाकडा’ जर सविस्तर माहिते हवी असेल तर अजय झंनकर याची "दोहपर्व " हि कादंबरी वाचा.

तुमी मनत आहात ती फिल्म बहुतेक त्या वर च आहे वाटते

ब़जरबट्टू's picture

12 Jul 2013 - 3:18 pm | ब़जरबट्टू

हेच म्हणतो..

सौंदाळा's picture

12 Jul 2013 - 4:30 pm | सौंदाळा

मधे एकदा वाचले होते, पेशवेकालात ३ लोकांना त्यांच्या हुशारी, तडफ आणि हजरजबाबीपणामुळे 'फाकडा' म्हणायचे.
इष्टुर फाकडा एक, मानाजी फाकडा दुसरा.. हा राघोबादादांच्या पक्षाचा माणुस बारभाई कारस्थानाच्या वेळी नानांच्या पक्षाला मिळाला.
तिसरा फाकडा कोण माहीतेय का कोणाला>

तिसरा फाकडा हा वास्तविक पहिला फाकडा आहे. त्याचं नाव "कोन्हेर त्रिंबक एकबोटे". नानासाहेब पेशव्यांनी त्यांना "फाकडे" हा किताब दिला होता.

http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-41-48/6312-2013-01-30...

इष्टुर फाकडा's picture

12 Jul 2013 - 5:10 pm | इष्टुर फाकडा

अजेय झणकर यांनी त्या चित्रपटासाठी द्रोहपर्व च्या मुल संहितेमध्ये खूपच तडजोड केली आहे. सिङ्ग्युलरिटि मध्ये जादूटोणा इत्यादी प्रकार घुसडून त्याचा टुम्ब रेडर केलाय असा मला वाटतंय. वास्तविक मराठ्यांच्या इतिहासावर हॉलीवूड सिनेमा यावा या घटनेने भयानक उत्साहित होतो मी, पण ट्रेलर पूर्ण अपेक्षाभंग करणारा वाटला. शिवाय चित्रीकरण पूर्ण होऊन किती वर्ष झाली अजून मुहूर्त मिळेना या सिनेमाला.