नमस्कार मंडळी,
आपल्याकडे वारांना खुप महत्व आहे किंबहुना आपण प्रत्येक वार हा त्या त्या देवाचा म्हणुन मानतो. उदा. सोमवार शंकराचा, मंगळवार बाप्पाचा, गुरवार साईबाबांचा, शनिवार मारुतिचा ई. तर प्रत्येक देवांसठिचे हे वार कोणी ठरवले? त्याच्यामागे काहि शात्रिय कारण आहे का? तसं ह्या वारांची अडचण अशी नाहि (माझ्याबातीत) पण असं पाहिलय कि नॉनव्हेज खाणारे शक्यतो फक्त बुधवार आणि रविवारी खातात.
माझ्यापासुन सुरवात करायची झाल्यास मी काहि पट्टिचा नॉनव्हेज खाणारा नाहि. म्हणजे रोज ताटात मासळिचा तुकडा, चिकन किमानपक्षी ऑम्लेट्/उकडलेलं अंड हवचं असा काहि आग्रह नसतो. कधीतरी चेंज म्हणुन आम्हि आपलं नॉनव्हेज खातो. कदाचीत असं असल्यामुळे माझा मंगळवारचा उपास सोडला तर मी ईतर कोणत्याहि दिवशी नॉनव्हेज खाउ शकतो.
तर तुम्हि नॉनव्हेज खाताना हे वार पाळता/बघता का? आपल्या प्रतिक्रिया / व्हेजवाल्यांचीहि मत जाणुन घायला आवडेल.
प्रतिक्रिया
11 Jul 2013 - 11:53 am | बॅटमॅन
नॉनव्हेजवाले जे वार पाळतात त्यात बहुतेकदा सोमवार, मंगळवार, गुरुवार अन शनिवार पाळणारे पाहिलेत.
बाकी मी कुठलाही वार पाळत नाही. मूड असेल त्या दिवशी निवांत दाबतो. मग तो श्रावण असूदे नैतर कुठला सणाचा दिवस असूदे.
11 Jul 2013 - 1:04 pm | मालोजीराव
11 Jul 2013 - 8:12 pm | दिपक.कुवेत
चला म्हणजे माझ्याबरोबर पण कोणितरी आहे....खुप वर्षापुर्वी मी सुद्धा भर श्रावणी सोमवारी चिकन चापलेलं
11 Jul 2013 - 12:09 pm | गवि
हो. नॉनव्हेज खाताखाता कोणीतरी आज कोणता वार आहे रे? असं विचारलंच तर मोबाईलमधे किंवा भिंतीवर कॅलेंडर असल्यास त्यात वार बघतो आणि सांगतो.
पण असा योगायोग क्वचित घडतो.
11 Jul 2013 - 12:14 pm | स्पा
हा काथ्याकुट करून काय निष्पन्न होईल?
11 Jul 2013 - 12:21 pm | गवि
काय निष्पन्न होईल यापेक्षाही किती निष्पन्न होतील यावर बोली लाव.
१०० होतील माझ्यामते. आणि कोणाला काय वाटतं? ;)
11 Jul 2013 - 12:26 pm | स्पा
लोल
11 Jul 2013 - 5:35 pm | चिंतामणी
11 Jul 2013 - 8:13 pm | दिपक.कुवेत
साधे आहेत कि कॅरमलाईज्ड?
13 Jul 2013 - 6:07 pm | संदीप जगदाळे
पहा असं आहे कि शरीर शास्त्रानुसार पचनक्रियेला आठवड्यातून १ दिवस आराम द्यावा. . . . शास्त्रीय कारण देवभोळ्या लोकांना पटवून देण्यासाठी देवाचे नाव . . . इतकेच !
आणि वार पाळण्याचे म्हणाल तर कोणता वार कोणत्या देवासाठी हे देवाने ठरवले कि माणसांनी ?
या प्रश्नाच्या उत्तरात सर्व काही आहे.
11 Jul 2013 - 12:14 pm | चंबु गबाळे
हो मी तरी पाळतो. लहानपणीपासून तेच पहात आलोय, आता कितीही वाटलं वार पाळू नयेत तरी मन धजावत नाही
11 Jul 2013 - 12:18 pm | कपिलमुनी
घरी सर्व वारी साधू ..
घराबाहेर सदैव संधीसाधू
11 Jul 2013 - 12:27 pm | अक्षया
माझा माहितीत खुप लोक सोमवार व शनिवार नॉनव्हेज खात नाहीत.
अम्ही सगळेच वार पाळतो. ;) शुद्ध शाकाहारी असल्याने.
11 Jul 2013 - 12:52 pm | garava
हो, आमच्याकडेही फक्त बुधवारी आणि रविवारी नॉन-व्हेज खातात.
(लहानपणीपासून तेच पहात आलोय, आता कितीही वाटलं वार पाळू नयेत तरी मन धजावत नाही..)+१
11 Jul 2013 - 1:17 pm | बाळ सप्रे
रोज जवळजवळ ४.७कोटी देव (३३कोटी ७ दिवसात समान विभागून) आपल्यावर पाळत ठेवत असल्यामुळे मन धजावत नाही.. त्यामुळे सगळे वार पाळतो.. म्हणून शाकाहारी आहे..
11 Jul 2013 - 1:18 pm | कवितानागेश
मी १५ वर्षांपूर्वी सोडलय.
त्यापूर्वी कधीच वार पाळले नाहीत.
11 Jul 2013 - 1:20 pm | सौंदाळा
घरी असताना पाळतो. (सोमवार, शनिवार).
ट्रिपला गेलो की इल्ला..
कालच दणकुन माकुळ खाल्लेला (सौंदाळा)
11 Jul 2013 - 1:24 pm | सुहास..
मध्यंतरी अपर्णा ला छळले होते यावरून ...मुळात कॅलेंडर बघताना शनीवार हा शनीवार नसुन सॅटरडे असतो ...कारण कॅलेण्डर ईन्ग्लीश ...मग पाळून काय उपयोग ...;)
असो ...मासे खाताना अजिबात वार बघु नयेत असे आमचे स्पष्ट मत आहे ;)
11 Jul 2013 - 1:46 pm | पैसा
आम्ही मांजर पाळतो.
11 Jul 2013 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर
नॉनव्हेज म्हणून खायला? बाप रे! काय काय खातात लोकं. मागे ऐकलं होतं सायप्रसची माणसे कुत्रे पाळतात आणि त्यांच्या एका वार्षिक महत्त्वाच्या दिवशी शिजवून खातात.
11 Jul 2013 - 1:57 pm | सुहास..
आम्ही मांजर पाळतो. >>
थॅन्क गॉड तुम्ही कुत्रे पाळत नाही ;)
11 Jul 2013 - 1:57 pm | पैसा
चीनमधे मांजरे खातात म्हणे. आता आमच्याकडे मांजरे आहेत ती वेळ पडल्यास मलाच खातील ही गोष्ट वेगळी. एरवीही त्यांनी मला पाळल्यासारखा त्यांचा आव असतो.
11 Jul 2013 - 1:58 pm | मालोजीराव
Man vs Wild ...वरून इन्सपायर्ड झाल्या असतील त्या :))
11 Jul 2013 - 2:15 pm | श्रीगुरुजी
आम्ही सोमवार, शनिवार, बुधवार, मंगळवार, रविवार, शुक्रवार व गुरूवार या वारी अभक्ष्य भक्षण करत नाही. इतर सर्व दिवशी करतो. %)
11 Jul 2013 - 2:30 pm | निवेदिता-ताई
छान छान
11 Jul 2013 - 2:35 pm | प्यारे१
खायचो तेव्हा पाळायचो नाही.
बुधवारी रात्री ११.४५ पर्यंत घड्याळात बघून बकाबका चिकन मटण खाणारे पाहिलेत.
जठरात पोचेस्तोवर गुरुवार उजाडणार च्यायला.
अर्थात जमत असेल तर पाळावा. किमान आठवड्यातले २-४ दिवस आवडींबाबत संयम पाळायला शिकतो माणूस.
एक बाश्शा ऑडिटर मला रोजच नॉन्व्हेज देत नाहीत म्हणून आमच्या अॅड्मिन वर कावला होता.
असं बघितलं की माणसानं अन्न खावं की अन्न माणसाला खातंय तेच कळत नाही.
11 Jul 2013 - 2:48 pm | पैसा
दूध आणि ब्रॉयलरची अंडी ही प्राणिज. पण प्राण्याला मारून मिळालेली नव्हेत. तशी शाकाहारी तर अजिबात नव्हेत. मग उपासाला दूध आणि तूप कसं चालतं?
आमच्या घरात किती प्रकार आहेत सांगू? मी स्वतः दूध आणि अंडी खाते. मासे/मांस नाही. अर्थात दूध आणि अंडी खाताना वार बघत नाहीच. सासूबाई आणि नवरा मासे खातात, सोमवार, गुरुवार आणि शनिवार सोडून इतर दिवशी. ते दोघे इतर मांस खात नाहीत. मुलं आणी सासरे मासे आणि चिकन सुद्धा खातात. मटण खात नाहीत. वार अर्थातच बघत नाहीत. दीर जाऊ आणि पुतण्या मासे, चिकन आणि बोकडाचं मटणसुद्धा खातात. पण डुक्कर्/बीफ खात नाहीत. ते पण सोमवार, गुरुवार, शनिवार, पंचमी वगैरे सगळे व्यवस्थित पाहून इतर वेळी हे सगळं खातात. एकाच घरात किती प्रकार बघा!
11 Jul 2013 - 8:15 pm | दिपक.कुवेत
एवढ्या सगळ्या व्यापात आणि माणसांत मांजर पाळायची......हे फक्त तुच करुन शकतेस पैसातै!
11 Jul 2013 - 3:12 pm | अभ्या..
रैवार खंडोबाचा म्हणून.
बाकी श्रावण ;)
11 Jul 2013 - 3:30 pm | नि३सोलपुरकर
हो,
दिपक भो, ह्या विदेचा वापर तुम्ही मिपावर तुमच्या रेशिपी टाकण्याकरिता वापरणार आहात का.
11 Jul 2013 - 3:36 pm | भाते
तुमच्या तो जिभेवर, डोळ्यांवर आणि पोटावर अत्याचार करणाऱ्या जिवघेण्या पाककृती शनिवार रविवार सोडुन इतर दिवशी न टाकल्यास बरे होईल. तुमच्या पाकृ वाचल्यावर हापिसात बसून काम करायला जमत नाही हो.
11 Jul 2013 - 3:31 pm | भाते
घरी मांसाहार वर्ज्य असल्याने घरी सगळेच वार पाळले जातात. त्यामुळे बाहेर खायला मिळते तेव्हा वार बघत नाही. सणवार असेल तर मुद्दामून बाहेर नॉनव्हेज खात नाही.
11 Jul 2013 - 3:43 pm | देवांग
मला बारा महिने २४ तास…नॉन वेज चालते …US मध्ये असलो कि Beaf ।पोर्क सोडत नाही … पूर्ण वर्ष्यात फक्त महाशिवरात्रीला नाही खात …एतर दिवशी खावो दबा के …करन अन्ना महाराज सांगून गेले आहेत We must love animals…because they are so tasty.. :P
11 Jul 2013 - 3:54 pm | सूड
खात होतो तेव्हा तसंही आमच्या घरात तीन चार महिन्यातनं एकदा नॉन-व्हेज असायचं. तेही नॉन्-व्हेजची सगळी भांडी वेगळी. ते खाल्ल्यानंतर घरातल्या रोजच्या वापरातल्या ग्लासातनं पाणी प्यायलं तर त्याला तोंड लावायचं नाही. चुकून लावलंच तर ते ताबडतोब घासायला टाकायचं. खात असताना काही हवं असेल तर आपण उठून घ्यायला स्वयंपाकघरात जायचं नाही. जे काही हवं पानापाशी मिळेल. असे सगळे सोपस्कार असायचे.
खाणं बंद केलं त्यानंतर सगळंच बंद. अंडंच काय अंड्याचा केकही नाही. :D
11 Jul 2013 - 8:18 pm | दिपक.कुवेत
कठिण आहे! एक वेळ नॉनव्हेज न खाणं परवडत पण खाताना हि अशी पथ्य पाळायची म्हणजे दिव्यच!
11 Jul 2013 - 4:14 pm | पिंगू
नॉनव्हेज बंद केल्यामुळे वार पाहायची वेळ येत नाही..
11 Jul 2013 - 4:20 pm | किसन शिंदे
आम्हाला या काथ्याकुटाचा काही उपयोग नाही. ;)
11 Jul 2013 - 4:30 pm | आभि जित
एक्दा होटेलात जैन मित्रा सोबत गेलो होतो तेवा त्याच्या जैन ओर्डर बरोबर माझी अन्डाकरिपण जैन ( कान्दा - लसुण न टाकता) आणली , ( अन्ड जमिनिवर येत अस त्या वेटरच लोजिक)
11 Jul 2013 - 4:33 pm | बॅटमॅन
औघड आहे....जैन अंडं चालतं तर उद्या जैन चिकन आणाल लेको म्हणावं कांदा लसूण न घालता, काही भरवसा नाही लोकांचा.
11 Jul 2013 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर
हे म्हणजे साबुदाणे खाऊ घालून वाढवलेली कोंबडी उपासाला खायला हरकत नाही असे म्हणण्यासारखे आहे.
11 Jul 2013 - 5:13 pm | बॅटमॅन
अगदी अगदी =)) =))
11 Jul 2013 - 4:46 pm | अनन्न्या
माझे बाबा आजारी असताना चार दिवस रहायला आले होते, घरी गेल्यावर आईला म्हणाले, पोरीला वारही कळत नाहीसे झालेत रोज सकाळी कांदा- लसणीचे घमघमाट घरात! आमच्याकडे माहेरी कांदा लसूण ठराविक वारीच वापरला जायचा. कच्चा कांदा दिवसा नाही. नॉनव्हेज न खाण्याचे सगळे वार अजूनही पाळते, त्यात अंडेही येते!
11 Jul 2013 - 5:46 pm | लॉरी टांगटूंगकर
घराबाहेर असलो तर कधीपण खातो. सणावाराला गोड आवडतं त्यामुळे ऑपोऑप णॉण्व्हेज होत नाही
नेहमीच्या हाटीलवाल्याला विचारावे काय वारानुसार विक्री कमी जास्त होते का काही. वाईड रेंज कव्हर होईल.
11 Jul 2013 - 7:35 pm | नितिन थत्ते
मुळात आम्ही नॉन व्हेज खाणेच रूढी मान्य नाही. त्यामुळे एकदा रूढी मोडलीच की मग सोमवार काय आणि गुरुवार काय !!!! :D
11 Jul 2013 - 8:00 pm | jaypal
कोणताही भेदभाव पसंत नसल्याने सण / वार ई. अजिबात पाळत नाही. पण हो बार पाळतो ;-)
11 Jul 2013 - 8:13 pm | धमाल मुलगा
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार सोडून इतर दिवशी नॉनव्हेजला शिवतसुध्दा नाही. ;)
खरं सांगू का? मला तर असं वार पाळणं हा शुध्द वेडेपणा वाटतो. अरे, गुरुवार दत्तगुरुंचा वार म्हणून नॉनव्हेज नाही खायचं, अन आदल्या-दुसर्या दिवशी काय दत्तगुरु सुट्टीवर असतेत काय? देव काय दिवसांच्या हिशेबानं लक्ष द्यायला पर-अवर रेटवर काम करणारा कॉन्ट्रॅक्टिंग कन्सल्टंट है काय? खुळचटपणा नुसता!
मुळात देवादिकांचा आणि मांसाहार न करण्याचा जो संबंध जोडला जातो तोच चुकीचा आहे. (हां, आता श्रध्दावंतांच्या भल्यासाठी केलेली ती योजना आहे हे मान्य आहेच. चयापचय क्रिया, पर्यावरणाची काळजी/समतोल सांभाळणं वगैरे मुद्दे दिवसागणिक बदलणार्या 'डाएट प्लॅन'ला तितकेसे लागू पडत नसावेत असा अंदाज!) होमहवनांच्या वेळी बळी देणं, मांसाहाराचं प्रसादरुपानं भक्षण करणं ह्यापासून ते "ईईईईई...आम्ही नॉनव्हेज खाणार्यांच्या घरी पाणीसुध्दा पित नाही" पर्यंतच्या ह्या विचारप्रक्रियेच्या संकोचप्रवासाची मला नेहमी मोठी मौज वाटत आली आहे. :)
11 Jul 2013 - 8:21 pm | दिपक.कुवेत
धम्या अगदि पटलं बाबा!
11 Jul 2013 - 8:14 pm | रेवती
शाकाहारी असल्याने वारांचा तसा प्रश्न नाही. अंडंही खात नव्हते पण महिन्या दोन महिन्यातून एकदा आजकाल खाते (म्हणजे डोळे बंद करून संपवते). अगदीच उपाशी मरायची वेळ यायला नको म्हणून ती सवय करतीये.
मुलासाठी शिजवते पण अनिच्छेनेच! त्यात वार वगैरे पळत नाही. ज्या दिवशी नवरा चिकनची स्किन काढून देईल त्या वारी करते.
11 Jul 2013 - 11:45 pm | प्यारे१
>>>अगदीच उपाशी मरायची वेळ यायला नको म्हणून ती सवय करतीये.
ऑऑऑऑ? नेमका काय संदर्भ म्हणे?
की सगळ्या भाज्या संपल्या तुमच्या पंचराज्यांतल्या (पंचक्रोशी स्टाईल)?
12 Jul 2013 - 7:43 am | रेवती
एकदा एका लांब अंतरावर र्हाणार्या फ्यामिलीनं जेवायला बोलावलं आणि कसं कोणास ठाऊक ते विसरले की आम्ही शाकाहारी आहोत. खरं तर ते तसे नाहीत पण चुकून झाले खरे! पर्याय- घरी येऊन, स्वयंपाक करून जेवणे, किंवा हाटेलात खाणे! त्यांनी गोड पदार्थ म्हणूनही अंड्याचा शिरा केला होता. मक्काय, पिझ्झा मागवला. त्यांना वाईट वाटत राहिलं आणि आम्हाला आश्चर्य (कसे विसरले म्हणून)! निदान अंडाकरी खात असते तर सोयीचे झाले असते असे वाटले म्हणून सवय करतीये. बाकी, पंचराज्यात भाज्यांचा सुकाळ आहेच!
12 Jul 2013 - 8:26 am | कवितानागेश
अगं, पुडिंग असेल ते.
शिरा कसा काय करता येइल?
अवांतरः मँगो अंडा शिरा कसा काय लगेल? ;)
12 Jul 2013 - 6:44 pm | रेवती
तिने एग हलवा नावाने समोर ठेवून निदान हे तरी चालेल का? असे विचारले. त्यावेळी तो पदार्थ खरेच शिर्यासारखा दिसला. त्यात आंबा घालून कशी चव येईल हा विचार तुझ्या मनात आला.......ग्रेट! ;)
12 Jul 2013 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर
अजिबात पटले नाही. दुसर्याच्या सोयीसाठी आपली तत्त्व, आहारपद्धती बदलू नये. हां एवढे करता येईल की ह्या अनुभवातून धडा घेऊन, पुन्हा कोणी अनोळखी व्यक्तीने जेवावयास बोलाविले की आपण 'शुद्ध शाकाहारी' आहोत हे ठासून सांगावे. शाकाहारी असण्याचा अभिमान बाळगावा. मांसाहार करीत नाही म्हणजे आपल्यात कांही कमी आहे, दोष आहे असा न्यूनगंड बाळगू नये.
12 Jul 2013 - 5:18 pm | कपिलमुनी
गर्व आहे मला , माझ्या शाकाहारी असण्याचा :)
12 Jul 2013 - 11:08 pm | श्रीगुरुजी
>>> शाकाहारी असण्याचा अभिमान बाळगावा. मांसाहार करीत नाही म्हणजे आपल्यात कांही कमी आहे, दोष आहे असा न्यूनगंड बाळगू नये.
आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत असा शाकाहार्यांना जाज्वल्य अभिमान असतो. तसाच अभिमान मांसाहार्यांनाही असतो व शाकाहार्यांबद्दल एकप्रकारची तुच्छता असते.
एक गंमत आठवली. मी विद्यापीठात शिकत असताना तिथल्या संगणक प्रयोगशाळेच्या खोलीच्या कुलुपाची किल्ली हरविल्यामुळे दुसरी बनवून घेतली होती. ती किल्ली वापरायला थोडीशी अवघड होती. एका विशिष्ट ठिकाणी दाब देउन फिरविल्यानंतरच ते कुलुप उघडत असे. तिथल्या शिपायाला ती नवीन किल्ली वापरण्याची सवय होती. एकदा मी व २-३ मित्र संगणकावर असाईनमेंट करण्यासाठी गेलो असताना सर्वांनी बरीच खटपट करूनसुद्धा कुलुप उघडत नव्हते. शेवटी त्या शिपायाला बोलविल्यावर त्याने सवयीने ते एका सेकंदात उघडून दिले. त्यावेळी तो आमच्याकडे तुच्छतेने बघत म्हणाला, "त्याच्याकरता मटण खायला लागतं.". %) आता मटण खाण्याचा आणि कुलुप उघडण्याचा काय संबंध होता?
त्यानंतर तो जेव्हा जेव्हा समोर येई तेव्हा तेव्हा आम्ही त्याची टिंगल उडवून म्हणत असू, "तुम्ही काय बाब्बा, मटण खाणारी माणसं"!
12 Jul 2013 - 11:15 pm | बॅटमॅन
शरीरबळाचा अन मटणाचा बादरायण-की मटनायण- संबंध कैकवेळेस उगीचच जोडल्या जातो. हे वरणभात खाऊन होत नाही इ.इ. डायलॉग नेहमीचेच असतात. पण वरणभातवाल्यांनी कधी कशात मात दाखवली की वरणभातमहात्म्य सांगावे-लै मजा येते =))
13 Jul 2013 - 3:33 pm | प्रभाकर पेठकर
एकदा एका रेल्वे गाडीने एक मद्रासी आपली पत्नी आणि ८-१० मुलांसमवेत प्रवास करीत असतो. डब्यात शिरल्यावर आपल्या आरक्षित जागेवर स्थिरस्थावर होण्यास किंचित वेळ लागतो तो पर्यंत गाडी सुटते. तो आपली मुले मोजतो तर एक मुलगा स्थानकावरच राहिल्याचे समजते. तो घाबरतो. गाडी तर सुटलेली असते. तो उठतो आणि गाडी थांबविण्याची साखळी ओढू लागतो पण त्याची ताकद कमी पडते गाडी काही केल्या थांबत नाही. समोर एक सरदारजी बसलेला असतो. तो उठून उभा राहतो आणि मद्राशाला बाजू करून नुसत्या डाव्या हाताने साखळी ओढतो. गाडी करकचवून ब्रेक लावत थांबते.
सरदारजी मद्राशाला म्हणतो, 'गोश्त (मटण) खाओ. ताकद आएगी।
मद्राशी आपल्या मुलाला घेऊन येतो. तो पर्यंत गार्ड येतो डब्यात आणि विचारतो, 'चेन किसने खिंचा?'
सरदारजी म्हणतो, ' मैने खिंचा। इसका बच्चा रह गया था प्लॅटफॉर्म पर।
गार्ड म्हणतो 'ठीक है।' आणि जातो.
सरदारजीच्या, आपल्या अंगी कमी ताकद असल्याच्या, उच्चाराने मद्राशी दुखावलेला असतो.
गाडीने जरा वेग पकडल्यावर मद्राशी परत तिरीमिरीत उठतो आणि साखळी ओढायचा प्रयत्न करतो. अर्थात, त्याला जमत नाही.
सरदारजी उठतो आणि पुन्हा डाव्या हाताने साखळी ओढतो. गाडी करकचून ब्रेक लावत थांबते.
गार्ड येतो.
'चेन किसने खिंचा?' विचारतो.
'मैने खिंचा जी।'
'क्यूं' गार्ड विचारतो.
सरदार गडबडतो. मद्राशाकडे पाहतो. मद्राशी खिडकीतून बाहेर पाहात बसतो. काही बोलत नाही.
गार्ड सरदारजीला रु. २५०/- दंड ठोठावतो आणि जातो.
गार्ड गेल्यावर गाडी सुरु होते.
सरदारजीला मद्राशी म्हणतो, 'सांभार खाओ। अकल आएगी।'
13 Jul 2013 - 10:04 pm | दिपक.कुवेत
काका मजा आली वाचुन....सरदारी परत एकदा सीद्ध झाली तर!
13 Jul 2013 - 11:58 pm | बॅटमॅन
हाहाहा मजा आहे :D
12 Jul 2013 - 11:32 pm | रेवती
हॅ हॅ हॅ..
कै च्या कै संबंध जोडलाय! मटण न खाणारे काय करतात बुवा मग?
11 Jul 2013 - 11:19 pm | अत्रन्गि पाउस
२००४ साली महाशिवरात्रीला रात्री फ्रांस मधील एका खेड्यात जेवायच्या वेळेला दुकान/हॉटेलातला इसम कोलंबी/कोंबडी/पोर्क/बीफ ह्यापैकी काय हवे असे विचारात होता...मी आणि माझा बॉस हतबलतेने चिकन घेऊन जठराग्नी शांत करत होतो...अत्यंत अपराधी मानाने परमेश्वराची क्षमा मागून आयुष्यातले सगळे उपास/तापास खाण्यापिण्याची कोणतीही बंधने नं पाळण्याचे ठरवले ते आजतागायत...
11 Jul 2013 - 11:36 pm | जॅक डनियल्स
माणूस सोडून सगळे मी व्हेज मानतो आणि ते व्हेज खायला मी काळ-वेळ काहीच पाळत नाही. सरपटणाऱ्या प्राण्याकडून एक गोष्ट शिकलो की "समोर आले की गिळा, ते काय आहे, कसे लागते याचा विचार नंतर करा, पोटातली आम्ले ते खाणे कसे पचवायचे ते बघून घेतील" ;)
12 Jul 2013 - 2:01 am | अर्धवटराव
गुरुवार आणि इतर काहि सणांचे दिवस पाळतो (अगदी दारुच्या थेंबाला स्पर्ष करत नाहि हो :( ). कारण एकच... अच्छा लगता है :)
अर्धवटराव
12 Jul 2013 - 2:06 am | प्रसाद गोडबोले
सध्या मी सगळेच वार पाळत आहे ... एक दिवससुध्दा चुकुनही व्हेज खात न्हाय ;)
12 Jul 2013 - 10:41 am | आदूबाळ
मी "वार" ऐवजी चुकून "वर" वाचलं पहिल्यांदा... :)
12 Jul 2013 - 12:55 pm | दिपक.कुवेत
चुकून वाचलस तरी "वर" बघतो पर्यत ठिक आहे......पण "वर" पाळतो? (ह.घे हो)
12 Jul 2013 - 1:43 pm | आदूबाळ
वर पाळण्याची प्रथा कुठल्यातरी "आर्ष"* समाजात असेलच! गुराढोरांच्यात नक्कीच आहे.
*शब्दश्रेय - वि. का. राजवाडे
12 Jul 2013 - 6:28 pm | अनिरुद्ध प
आम्ही बारा महिने तेरा काळ गवत खाणार्या वर्गात मोडतो,म्हणुन आम्हाला सर्व दिवस वार सारखेच.
12 Jul 2013 - 8:25 pm | अत्रुप्त आत्मा
सर्व प्रति-साद पहाता चर्चा अगदीच नॉन व्हेज नाहि झालेली...!!! ;)
अजुनही असलेला ---- आत्मू... ;)
14 Jul 2013 - 12:41 am | वेल्लाभट
हं. शक्यतोवर पाळतो. माझा मित्र म्हणतो मला; एकदा खायला सुरुवात केल्यावर मग उगाच वार बिर पाळायची नाटकं नाही करायची. पटतं. पण तरीही पाळतो शक्यतोवर.
14 Jul 2013 - 3:28 am | सुहास झेले
वार?? अजिबात नाही.....जेव्हा जे मिळेल ते हाणतो :) :)
17 Jul 2013 - 5:53 pm | विक्रान्त कुलकर्णी
ल्हानपणी एकदा घरी आई नसताना, कार्तिकी एकादशीला वडीलानी स्वतःचे पाक कौशल्य पणाला लावून अन्डा करी, ऑम्लेट, फ्रेन्च टोस्ट असे नानाविध प्रकार बनवून मला व माझ्या भावाला खाउ घातल्याचे चान्गले आठवते. घरी माउली आल्यावर वडिलान्च्या पाक कौशल्याने प्रभवित होउन समग्र वर्णन केले. पुढे काय झाले असेल ते आपण सूज्ञ जाणताच. पण आज इतक्या वर्षानि एक कोडे उलगडले नाहि, ते हे की जिकडे पन्ढरपुरच्या माउलिने निषेधाचा एक शब्दही उचचारला नाही तिकडे आमच्या घरच्या माउलिने एवढा थयथयाट का करावा ???
17 Jul 2013 - 11:59 pm | मराठे
आजवर कुठलाच उपास / वार वगैरे पाळला नाही. खाताना वेज्/नॉन-वेज असा विचारच मनात येत नाही त्यामुळे वार / तिथी वगैरे पाळण्याचा प्रश्नच नाही. पोटाला झेपेल एवढेच खायचे एवढा संयम ठेवला की झाले.
18 Jul 2013 - 1:21 am | रसिया बालम
तब्बल एक तप हॉस्टेल-लाइफ आणि दुर्गभ्रमण enjoy(!?) केल्यावर असा भेदभाव कधीच विसर्जित केलाय.
अनेक गुरूवारी बायकोचा फलाहार आणि माझे समिष भोजन (बुधवार special) सोबत करतो !!
18 Jul 2013 - 10:32 am | नानबा
घरात खाताना तारीख वार वेळ मुहुर्त तिथी सगळं बघून खावं लागतं. कारण अभक्ष भक्षण करणारा मी एकटाच.
बाहेर मात्र काही नाही. चापून चोपून ओरपायला हमेशा तैय्यार. कामानिमित्त इंदूरला असताना रोज रात्री जेवणात चिकन मसाला खायचो. अगदी श्रावणात सुद्धा ३० दिवस रोज खाल्ला.
आमचा देव आमच्या पोटात. त्याला आवडता प्रसाद दिला की तो आमच्यावर प्रसन्न.. :))
18 Jul 2013 - 12:30 pm | तुमचा अभिषेक
मुळात नास्तिक असल्याने, देवालाच मानत नसल्याने ना वार पाळत ना सण पाळत.. जे आवडेल ते खातो.. मात्र घरच्यांच्या मते मी सोमवार पाळतो.. त्यामुळे सोमवारी घरी तरी खायला मिळत नाही.. बाहेर खातो संधी मिळाली तर, पण घरी सांगत नाही..