अननसाचा मुरांबा

टक्कू's picture
टक्कू in पाककृती
6 Jul 2013 - 10:48 am

चिकू,संत्र,मोसंब,द्राक्ष या फळांपेक्षा हटके दिसणारं चवीला आंबट गोड पण मधूनच खाजर असं फळ; अननस! मला कायम या फळाविषयी वेगळंच आकर्षण वाटतं. मुळात शेतामधला त्याचा look खूप attractive असतो. अख्ख्या झुडपाच्या बरोबर मध्ये अननस उगवतो. बऱ्याच जणांना त्याच्या खाजऱ्या चवीमुळे तो आवडत नाही. लहानपणी अननस पाहून नाक मुरडलं तर तो खाण्याचा एक फायदा हमखास कानावर पडे. तो म्हणजे असा की अननस खाल्याने पोटात केस वगैरे गेला असेल तर तो विरघळून जातो.
दक्षिण अमेरिकेमध्ये जन्मलेलं हे फळ कित्तीतरी juices, mocktails मध्ये सर्रास वापरलं जातं. आपण सुद्धा अननसाचा रायता, हलवा किंवा cake, jam, मुरांबे असे विविध पदार्थ करतो. Pineapple raita म्हणजे तर माझ्या college group चा weak point होता. Party कुणाचीही असो हि dish order झालीच पाहिजे.

तर आज pineapple, म्हणजेच, अननसाचा मुरांबा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. झटपट होणारा असा हा गोड गोड अननसाचा मुरांबा :)

साहित्य:
१ वाटी अननसाचे काप
३/४ वाटी साखर
१ चिमूट citric acid

कृती:
१. प्रथम एका भांड्यामध्ये अननसाचे तुकडे घ्यावेत व cooker मध्ये एक शिट्टी काढून वाफवावेत.
२. एका पातेलीत साखर भिजेल इतके पाणी घ्यावे व त्याचा पक्का पाक करावा. साधारण मधाएवढा घट्ट झाला पाहिजे.
३. नंतर त्या पाकात citric acid घालावे. वाफवून घेतलेल्या फोडी घालून ढवळावे. फोडी घातल्यानंतर त्यातील पाण्याच्या अंशामुळे पाक थोडा पांतळ होईल. हे मिश्रण gas वर ठेवून परत घट्ट होईपर्यंत उकळवावे.

काही महत्वाचे:
१. मुरांबा गार झाल्यावर घट्ट होतो त्यामुळे उकळवताना त्यानुसार पांतळ ठेवावा.
२. हा मुरांबा जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे तो कमी प्रमाणात करावा. तसेच हा मुरांबा fridge मध्येच ठेवावा.
३ . याला पूर्णपणे pineaaple चा flavour ठेवण्यासाठी यात वेलची, केशर घातलेले नाही.

1
2
3
4
5
6
7

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

6 Jul 2013 - 11:01 am | प्रभाकर पेठकर

साखर त्याज्य असल्याने पास.
परंतु, साध्या, सोप्या पाककृतीतून निर्मिलेल्या आकर्षक अननस मुरंब्याला मानाचा मुजरा.

दिपक.कुवेत's picture

6 Jul 2013 - 11:40 am | दिपक.कुवेत

मस्त दिसतोय मुरांबा. करुन बघायला हवा.

त्रिवेणी's picture

6 Jul 2013 - 12:43 pm | त्रिवेणी

माझा आवड्ता.

पैसा's picture

6 Jul 2013 - 5:01 pm | पैसा

पाकृ आणि फोटो अतिशय सुंदर आलेत!

रेवती's picture

7 Jul 2013 - 8:17 am | रेवती

मुरांबा छानच झालाय .

मदनबाण's picture

7 Jul 2013 - 8:26 am | मदनबाण

मस्त ! :)

स्पंदना's picture

7 Jul 2013 - 1:49 pm | स्पंदना

मस्त!
मला अननसाची चव आवडते, करुन पाहुया.

सानिकास्वप्निल's picture

7 Jul 2013 - 11:53 pm | सानिकास्वप्निल

अननसाचा मुरांबा आवडला :)

शिल्पा ब's picture

8 Jul 2013 - 12:53 pm | शिल्पा ब

माझी आजी असे मुरांबे वेग्रे करायची. आम्हाल फटु कै दिसले नैत बॉ !
बाकी तुमचं नाव -टक्कु - हसवुन गेलं.

कवितानागेश's picture

8 Jul 2013 - 12:59 pm | कवितानागेश

अननस इतकं कूकरमध्ये वाफवायचे गरज वाटत नाही.पण साखर घालण्याआधी शिजणं आवश्यकच होतं. नाहीतर कडक होतात फोडी.
मी यात दालचिनी घालते फ्लेवरसाठी.

सविता००१'s picture

8 Jul 2013 - 3:28 pm | सविता००१

इतका म्हणजे इतका मस्त लागतो की काय सांगू.............. बेष्ट्म बेष्ट. :)

वेल्लाभट's picture

9 Jul 2013 - 10:44 pm | वेल्लाभट

गुड वन!

अनन्न्या's picture

10 Jul 2013 - 5:45 pm | अनन्न्या

सायट्रिक अ‍ॅसिड का घातलेय?

टक्कू's picture

10 Jul 2013 - 8:50 pm | टक्कू

अनन्न्या: citric acid दोन कारणांसाठी घातले आहे. थोडी आंबट चव येण्यासाठी व preservative म्हणून देखील!

- टक्कू
http://takkuuu.blogspot.com

टक्कू's picture

10 Jul 2013 - 8:45 pm | टक्कू

सर्व मिपाकरांचे मनापासून धन्यवाद :)
शिल्पा ब: तुम्ही फोटु या धाग्यावर बघा http://takkuuu.blogspot.com

- टक्कू

नक्शत्त्रा's picture

11 Jul 2013 - 11:46 am | नक्शत्त्रा

टक्कू ....एक नमबर..
करेन मि लवकरच.मस्त लागतो ना.....
grated pineapple वापरले तर चालेल का?

टक्कू's picture

11 Jul 2013 - 10:10 pm | टक्कू

किसलेला पण चालेल..कदाचित mouth filling वाटणार नाही पण चव मस्त च येईल :)

फार मस्त फोटो आलेत हो!!! कृती सोपी असली तरी फोटो मुळे पाहायला गम्मत आली

मदनबाण's picture

6 Apr 2015 - 11:19 am | मदनबाण

मस्त...
पण फोटू का बरं नाय दिसत मला ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }

सूड's picture

6 Apr 2015 - 8:30 pm | सूड

मला पण नाय दिसत

सुनील's picture

7 Apr 2015 - 8:51 am | सुनील

मुरांबा म्हणजे मुरलेला/मुरवलेला आंबा ना?

मग अननसाचा मुरांबा कसा असेल? त्याला मुराननस असे नाव द्यायला हवे!!