गाभा:
http://www.loksatta.com/pune-news/violate-traffic-rules-cause-of-acciden...
ह्या बातमीनुसार एका शिवनेरी व्हॉल्व्हो चालकाने गाडी बेजबाबदारपणे वेगाने हाकली त्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदर मयत माणूस हा त्याच्या घरातील एकमेव कमावता माणूस होता.
कोर्टाने शिक्षा व्हायलाच पाहिजे वगैरे ठणकावून सांगितले आहे पण एका कुटुंबाची वाताहत होण्यास कारणीभूत ह्या चालकाला फक्त एक महिना कैद इतकीच शिक्षा?
अशा किरकोळ शिक्षेने काय जरब बसणार आहे? वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे, चालकाच्या बेदरकारपणामुळे अपघात झाला आणि त्यात मृत्यू झाला तर निदान काही वर्षाची तरी शिक्षा असावी असे मला वाटते. ही बातमीच्या छपाईची चूक असेल अशी एक अंधुक आशा.
प्रतिक्रिया
23 Jun 2013 - 6:54 pm | चौकटराजा
सदर बातमीत मुद्रणदोष असावा. दुसरे असे की प्लान करून हत्या, रागाच्या भरात हत्या, मृत माणसानेच पूर्वी दिलेल्या त्रासामुले केलेली हत्या व वहान चालवताना केलेली हत्या यांच्या शिक्षेत परिणाम एकच असला तरी कारण वेगळे असल्याने शिक्षा ही वेगवेगळी मिळते. हे असे का या विषयी विवेचन न्या. धर्माधिकारी यानी टी व्ही वर केल्याचे आठवत आहे.
24 Jun 2013 - 2:49 am | अस्वस्थामा
मान्य हो.. अगदी मान्य की शिक्षेत फरक असू शकतो पण फार नसावा..
नुकत्याच एका सायकल अपघाताचा निकाल वाचनात आला. १० वर्षे शिक्षा आणि आजन्म वाहन चालवण्यास मनाई! अशी शिक्षा असेल तर थोडी तरी जपून चालवली जाईल एवढीच आशा..
25 Jun 2013 - 3:43 am | नेत्रेश
तुम्ही दिलेले उदाहरण संपुर्ण भीन्न आहे. त्यात पोलीसांचा पाठलाग चुकवताना / कायद्या पासुन पळतानां दुसरा निर्दोष माणुस मेला. असा गुन्हा हा बर्याचदा खुनापेक्षाही जास्त गंभीर समजला जातो. अमेरीकेसारख्या देशात अशां गुन्हेगारांनी मृत्युदंड सुद्धा होउ शकतो.
पण रस्त्यांवरच्या अपघातात चालकाचा निष्काळजीपणा वादातीत सिद्ध झाला तरच त्याला नियमानुसार तुरुंगवासाची शीक्षा होते.
24 Jun 2013 - 10:33 am | खबो जाप
२००८ मध्ये चेन्नई मध्ये असाच घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला होता.
A city court has awarded 92.86 lakh compensation to the family of a computer engineer who was killed in a road accident on Old Mahabalipuram Road in April 2008.
http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-04-02/chennai/38216823_...
24 Jun 2013 - 5:30 pm | चौकटराजा
भरपाई कोणालाव किती नुकसान झाले यावर अवलंबून असते तर शिक्षा किती सहेतुकपणे गुन्हा केला यावर अवलम्बून असते.
24 Jun 2013 - 10:06 pm | आनंदी गोपाळ
माझ्या माहिती व आकलनानुसार,
१. भारतात अत्यंत फालतू प्रकारे कोणतीही गाडी हाकण्याचे लायसन्स मिळते. (मोटारसायकलचे लायसन्स असणे, अन त्या चालकाचे हेल्मेट आदि वाहतुकीच्या नियमांचे पालन नियमांचे पालन ही हास्यास्पद गोष्ट असते.)
२. शिवनेरी व्होल्व्हो ही एस्टीची गाडी आहे.
३. एस्टी स्वतःच्या नोकरीतील ड्रायव्हर्स साठी वेगळी ट्रेनिंग व बर्यापैकी चांगली परिक्षा घेते.
४. आपल्याकडे, रस्त्यावर अपघात झाला, तर ज्याची गाडी मोठी, त्याची चूक असे समजून इन्स्टन्ट शिक्षा देणे असा प्रकार चालतो. थोडा Vigilante अश्या प्रकारचा.
५. न्यायालये, शासन इ. व्यवस्था काम करतात यावर काही लोकांचा विश्वास नसतो, व इन्स्टन्ट, मनात येईल, तेच न्याय्य असे त्यांचे तुमच्यासारखेच मत असते. ("कायदा" अमुक म्हणतो, ते का? हा विचार करण्याशी माझा काय संबंध? असा विचार तुमच्या बर्याच लेखनातून दिसतो. संदर्भ मिसळपाववरील तुमचे अनेक धागे. याचा डायरेक्ट संबंध तुमच्या मूळ प्रस्तावाशी व विजिलान्ते जस्टिसशी आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे.)
६. न्यायालयाने शिक्षा दिली ती अनइन्टेण्डेड मॅनस्लॉटर कलमाखाली दिली असणार आहे. तिथे ३०२ कलम लागत नाही.
७. घरातला एकमेव कमवता प्राणी गेला, तर त्याचा विचार त्याच केसच्या सिव्हिल काऊंटरपार्टमधे केला जातो, जिथे त्या हिशोबाने कॉम्पेन्सेशन दिले जाते. या केसमधे एस्टीकडून किती कॉम्पेन्सेशन मिळाले त्याचा शोध उद्बोधक ठरेल.
८. शिक्षा जरूरीपेक्षा जास्त आहे असे माझे मत आहे. रस्त्यावर अपघात होतो. मुद्दाम कुणीच कुणाच्या अंगावर गाडी घालून त्याला मारत नाही. समोरचा मरू नये, याच प्रयत्नात मोठी गाडीवाला असतो, असे माझे मत आहे.
९. माझ्या अनुभवात तरी मोठ्या गाडीसमोर बिनडोकपणे मोटरसायकली, रिक्षा घुसवून, किंवा पायीच रस्त्यात येत, मेरी जान तेरे हाथ मे. मला धक्का लागला, तर पब्लिक तुला मारेल! या अविर्भावात रंग करणारे टीनपॉट लोक भारतात जास्त आहेत. यांना मोठ्या गाडीशी नडण्यात मजा येते. रस्त्यावर चालण्याचे बेसिक नियम समजत नाहीत.
१०. अशाच मनोवृत्तीतून अशा धाग्यांचा जन्म होत असतो.
25 Jun 2013 - 8:53 am | अत्रुप्त आत्मा
@रस्त्यावर चालण्याचे बेसिक नियम समजत नाहीत.>>> 111 यालाच वैतागून मी एका ट्रॅफिक पोलिसाला,"रस्त्यावर चालणाय्रांना कोणतेच नियम/शिक्षा नाहित का?"अंसं विचारलवतं.त्यानी-"रस्त्यावर चालण्याचा पहिला हक्क पाद चाय्रां चा!"असं मला ऐकवल.मग मी त्याला,"पहिला आणी शेवट'चाहि त्यांचाच का?"अस म्हटल्यावर ,मला "व्हा पुढे"असे पेढे वाटले!
22 Aug 2013 - 2:53 pm | मालोजीराव
पुण्याच्या रस्त्यांवरून विमान चालवणाऱ्या बेजबाबदार पुणेकर(शिन्व्हगडरोडकर) नागरिकांना कोणती शिक्षा द्यावी ?
26 Jun 2013 - 6:29 pm | बॅटमॅन
हा व्हिजिलांटे जस्टिस असतोच, पण बेदरकारपणे मोठी गाडी चालवणारेही काही कमी नस्तात. एस्टीच्या ड्रायव्हरने शक्यतोवर काळजी घेतलीच असेल, असे मलाही वाटते. पण तदुपरि मोठ्या गाड्या चालवणारे सगळेजण ठीक चालवतात असेही नाही. त्यांचाही कैकवेळेस त्रास होतो.
26 Jun 2013 - 7:16 pm | राही
विशेषतः काही खाजगी प्रवासी वोल्वो गाड्यांचे चालक अगदी नेमाने आणि आरामात वाहने बेदरकारपणे हाकीत असतात. द्रुतगती मार्गावर याचा त्रास फार होतो. ओवरटेकिंगची तिसरी मार्गिका सोडतच नाहीत. (बहुधा निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक) भाराने जड झालेली मालवाहने या लेनवर एक तर आरामात क्रूझ करीत अथवा आरामात भरधाव सुटलेली असतात. सेडान्सचेही तेच. परदेशात 'टेलिंग'साठीही दंड असतो. लेन-कटिंग आणि चुकीचे ओवरटेकिंग या बाबतीत तर बोलायलाच नको.
8 Jul 2013 - 7:22 am | हुप्प्या
<<
शिक्षा जरूरीपेक्षा जास्त आहे असे माझे मत आहे. रस्त्यावर अपघात होतो. मुद्दाम कुणीच कुणाच्या अंगावर गाडी घालून त्याला मारत नाही. समोरचा मरू नये, याच प्रयत्नात मोठी गाडीवाला असतो, असे माझे मत आहे
<<
असे तुमचे मत असेल तर आनंद आहे. पण तुमचे मत आणि कोर्टाचे मत ह्यात मोठी तफावत आहे. कोर्टाने असे स्पष्ट म्हटले आहे की सदर वाहकाने बेदरकारपणे, वेगात वाहन हाकले आणि त्यामुळे सदर दुचाकीस्वाराने जीव गमावला. अशा अडनिड्या पहाटे दोन वाजता गाडीशी नडण्यात मजा येते, पब्लिक मोठ्या वाहनाच्या चालकाला मारेलच वगैरे विचार केला जाईल असे वाटत नाही.
चालक दोषी आहे असे कोर्टाने म्हटले असल्यामुळे ते पुन्हा नव्याने सिद्ध करायची गरज नसावी. पण ह्या पार्श्वभूमीवर निव्वळ एक महिन्याची शिक्शा म्हणजे अगदीच किरकोळ आहे असे मला वाटते.
हा इसम व्यवसायाने चालक आहे. हौशीमौजी चालक नाही त्यामुळे त्याच्यावरील जबाबदारी जास्त आहे. त्याच्या चुकीची त्याला जास्त किंमत मोजावीच लागली पाहिजे नाहीतर पुरेसा धाक बसणार नाही.
26 Jun 2013 - 8:01 pm | प्यारे१
शिक्षा पुरेशी नाही मात्र फक्त शिक्षा करुन बेदरकारपणा कमी होईल? ज्याप्रकारे परदेशांमध्ये परवाना पद्धत नि त्यावर गुन्हा घडल्यास डॉट पद्धत असते तशी काहीशी केली, वाहतुकीचे नियम कडक प्रकारे अंमलात आणले तर अशा अपघातांची वारंवारीता कमी होईल.
बाकी 'यष्टी'वाले शिवनेरी वर 'डायव्हर' म्हणून गेले की काय घोळ होतो त्याचा आंखो देखा हाल. :
एका लग्नासाठी मागच्या मे मध्ये पुण्याहून नासिक ला निघालेलो. रिझर्वेशन चालकाच्या बरोबर मागच्या सीटवर. मित्र नि मी. वोल्वो च्या आसनरचनेनुसार चालक बराचसा खाली नि आम्ही जवळपास त्याच्या खांद्यावर बसल्यासारखे असल्याने त्याचं सगळं 'कौशल्य' दिसत होतं.
खेडच्या घाटात एका सुमो च्या मागे फक्त २ फुटावर हा मागे मागे! थोडासा चान्स मिळाला की गाडी ला झोला देऊन बाहेर काढली. सुमोच्या चालकाने जाताना केलेला आंगिक अभिनय नि त्रासिक मुद्रा बघत तसेच पुढे निघालो.
पुढे एका दुचाकीस्वाराच्या मागे तशीच हूल. सिन्नरच्या अलिकडं एक बराच मोठा गतिरोधक आहे. तिथं गाडी हळू व्हायला नि दुचाकी वरचे कार्यकर्ते मागून येऊन गाडी आडवी घालायला एकच वेळ.
पुढची पंधरा मिनटं आमच्या कानात नुस्ते फुल्या फुल्या च ऐकू येत होते.
ड्रायव्हरला उड्या मारु मारु बुकलण्याचा प्रयत्न, आजूबाजूने आलेले पांढरे कपडेवाले सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते, एकाने वायपर उपसून चालकाला मारण्याचा प्रयत्न.
ह्या सगळ्यात वेळ होतोय म्हणून ड्रायव्हरच्या बाजूने आलेले गाडीतले प्रवासी नि त्यामुळे आतले नि बाहेरचे असं सुरु झालेलं वाग्युद्ध त्यामुळं सेफ झालेला ड्रायव्हर नि त्यानंच 'जाव्दे ना भाव, माझ्यासाठी ह्याना सोड' नि 'तो वायपर द्या हो, डेपोत जमा करायचाय' म्हणत 'काय झालाच नाय' चा आणलेला आव!
आहाहा! थोड्या वेळाने एक अनुनासिक काकू मागच्या शीट वर सुरु झाल्या, म्हणे हल्लीची लोकं कसे अरेरावी करतात, बिचारा ड्रायव्हर नि काय काय. काकूंना म्हटलं आम्ही होतो पुढं बघत होतो. राहा शांत. ड्रायव्हर हातीपायी धड आहे हे त्याचं नशीब!
ता त्प र्य : यष्टी वाले एम एच '१२' वाले असू शकतात.
26 Jun 2013 - 8:07 pm | मराठी_माणूस
"दुश्मन" ह्या चित्रपटात ह्याच समस्येवर एक वेगळाच पर्याय सुचवलेला आहे.
अपघातास कारणीभुत चालकावर त्या अनाथ कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी घेण्याची शिक्षा कोर्ट सुनावते. पुढील भाग जरी तद्दन फिल्मी असला तरी त्यानी ह्या विषयाला तोंड फोडले होते.
27 Jun 2013 - 3:55 pm | चौकटराजा
आज आर टी ओ हपिसाला जाण्याची वेळ आली. इथे वेळ काढताना एक नियम दिसला. त्यानुसार आपला दोष ( काहीही) नसतानाही अपघात झाला तरी "नो फॉल्ट लायबिलीटी ही असतेच ती मृत्यू साठी कमीतकमी रू. ५०००० व अपंगपणा साठी रू २५००० इतकी द्यावीच लागते. खेरीज दावा केल्यास सुप्रिम कोर्टाने एक तक्ता केला आहे त्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागते.
थोड्क्यात पैशासाठी विमा आहे. निष्काळजी पणा साठी कोठडी !!!
21 Aug 2013 - 12:26 pm | म्हैस
अपघात झाला कि त्यात चूक ४ चाकी गाडीवाल्याचीच असते हा मोठा गैरसमज आहे. रस्त्याने चालणारे आणि २ व्हीलर वाल्यांची सुधा चूक असते.
21 Aug 2013 - 12:53 pm | गवि
या संदर्भात काल वाचलेली बातमी आठवून वाईट वाटलं. बिहारमधे ३५हून जास्त जणांचा ट्रेनखाली सापडून मृत्यू झाल्यानंतर त्या ट्रेनच्या मोटरमनला चिडलेल्या लोकांनी ठार केलं.
त्याची काय चूक होती? त्याला ग्रीन सिग्नल होता. सदर स्टेशनावर त्या गाडीचा थांबाही नव्हता. तरीही रुळावर लोक आहेत हे दृष्टिपथात आल्यावर त्याने ब्रेक लावण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण गाडी तितक्यात थांबणं शक्यच नव्हतं.
संतप्त लोकांनी दोनतीन गाड्या जाळल्या त्या जाळल्याच आणि मोटरमनलाही मारहाण करुन ठार केलं. टीव्हीवर मुलाखतींमधेही रडणारे लोक म्हणत होते की "कोई सीटी नही बजायी और सबके ऊपरसे चली गयी.."
सीटी बजायी नही हे सुद्धा खात्रीपूर्वक सांगता येत नाही, कारण तिथे लोकांच्या भजन / वाद्ये यांचा असा गजर होता की ती शिट्टी ऐकू जाणं अवघडच होतं. तरीही ऐकू आली असती तरी इतकी तुडुंब गर्दी असताना सर्व लोक बाजूला होऊ शकले असते का?
ट्रेन येताना कोणालाच दिसली नाही का?
मुळात असा ट्रॅक ओलांडण्यात काहीच चूक नाही का? त्यातून इलाजच नसला तर अशा वेळी लाल सिग्नल लावून सर्व गाड्या थांबवून क्रॉसिंग पूर्ण झाल्यावर हिरवा सिग्नल देण्याची जबाबदारी सिग्नलमन्सवर असते ना? मोटरमनचा बळी हा त्या तीसचाळीस बळींपेक्षाही जास्त हळहळवून गेला.
21 Aug 2013 - 2:07 pm | प्रभाकर पेठकर
तिथे स्थानकावर पादचार्यांसाठी पुल नाही का? सर्वांवर लोहमार्ग ओलांडण्याचा प्रसंग का यावा? पुल असूनही लोहमार्ग ओलांडण्याचा 'सोपा मार्ग' निवडणार्यांची ती घोडचूक म्हणावी लागेल. चालकाची नाही.
जर पुल नसेल तर स्थानक मुख्याधिकार्याने, लोकांना गाडी येत असल्याची योग्य ती सूचना देण्याची व्यवस्था केली पाहीजे. विशेष प्रसंगी लाल दिवा दाखवून किंवा कायम स्वरूपी (असे प्रकार वरचेवर घडत असतील तर) किंवा तात्पुरते (फक्त देवी दर्शनाच्या काळात) १० ते २० कि.मी. वेगमर्यादेचे फलक लावून येणार्या गाड्यांच्या चालकांना गाडीचा वेगावर नियंत्रण मिळविणे कर्मप्राप्त केले पाहिजे.
ही चालकाची नसून स्थानक मुख्याधिकाराची चूक दिसते आहे.
21 Aug 2013 - 8:44 pm | आशु जोग
आपण स्वतः आपल्या स्पीडवर लिमिट ठेवूया.
22 Aug 2013 - 3:10 pm | दादा कोंडके
सहमत.
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ;)