श्रावण मोडक

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
30 May 2013 - 4:08 pm

कळवण्यास अत्यंत दु:ख होते आहे की मराठी संकेतस्थळांवरील जुने आणि लोकप्रिय लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रावण मोडक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील अनेक सदस्यांसाठी ते एखाद्या कुटुंबियाप्रमाणे होते. त्यांना श्रद्धांजली.

हे ठिकाणबातमी

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

31 May 2013 - 6:52 pm | मी-सौरभ

श्रद्धांजली

विकास's picture

30 May 2013 - 7:25 pm | विकास

श्रामोंना कधी व्यक्तीगत भेटलो नसलो तरी मिपा आणि चेपूवरून अनेकदा संवाद साधला गेला होता. अत्यंत प्रगल्भ व्यक्तीमत्व असे अचानक सोडून गेल्यामुळे खूप वाईट वाटत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली....

सुबोध खरे's picture

30 May 2013 - 7:25 pm | सुबोध खरे

मनःपूर्वक श्रद्धांजली..!

तिमा's picture

30 May 2013 - 7:30 pm | तिमा

काय झाले हे ? काही दिग्गज हे मिपावर गृहीतच धरले होते. ते आता नाहीत ही कल्पनाच करु शकत नाही.
फार वाईट वाटतंय!

कोमल's picture

30 May 2013 - 7:31 pm | कोमल

श्रद्धांजली
:(

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

जोशी 'ले''s picture

30 May 2013 - 7:41 pm | जोशी 'ले'

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आपला अभिजित's picture

30 May 2013 - 7:44 pm | आपला अभिजित

साहेब, नमस्कार. कुठाय पत्ता. खरंतर मीसुद्धा गायबच आहे मिपामधून बरेच दिवस. बरेच उद्योग चाललेत. तुमच्याकडे काय विशेष?

श्रावण मोडक 7/15/12 मिटवा Block
रामराम देवा. मी आहे पुण्यातच. फिरतीचा अपवाद. फिरती फक्त व्यवसायासाठी. एरवी पुण्यातच.
मिपावर वगैरे असतो. पण लेखन नाही काहीही सध्या तरी.
तुमची लेखनकामाठी काय म्हणतेय?

You 7/16/12 मिटवा
भेटू एकदा निवांत. मी कदाचित मंगळवार-बुधवारी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर पुण्यातच आहे. तुझं वेळापत्रक कळव. मग ठरवू.

श्रावण मोडक 7/16/12 मिटवा Block
कळवतो.
...............................

काही कामे वेळच्या वेळी केलेलीच बरी असतात..नाही?

खेडूत's picture

30 May 2013 - 8:04 pm | खेडूत

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

पुढे शब्द सुचत नाही आहेत काही बातमी वाचल्यावर. मन बधिर झाले माझे.

ताल भास्कर's picture

30 May 2013 - 8:14 pm | ताल भास्कर

भावपूर्ण श्रद्धांजली..

क्लिंटन's picture

30 May 2013 - 8:16 pm | क्लिंटन

आज दुपारी ऑफिसात एक कंटाळवाणी मिटिंग चालू होती.कोणाचे लक्ष नाही हे बघून फोनवर जीमेल चेक केले.जीमेल ऑन करताच मराठमोळ्याचा जीटॉकवर मेसेज आला--Shravan Modak passed away.मिटिंगमध्ये जीटॉकचा आवाज झाल्यामुळे ताबडतोब लॉग आऊट करावे लागले.पण अर्थातच त्यानंतर मिटिंग कधी एकदा संपते असे झाले होते.मग मिसळपाववर लॉगिन करून ही बातमी दुर्दैवाने खरी आहे हे समजले.

श्रामोंची आणि माझी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही.काही चर्चांमध्ये मी आणि त्यांनीही भाग घेतला होता.अण्णा हजारेंचे उपोषण जोरात चालू असताना माझा एक प्रतिसाद वाचून पुण्यात कधी येणे झाले तर जरूर भेटू अशा स्वरूपाची त्यांची खरड आली होती.पुढे एका चर्चेत माझी त्यांची कटुता आली.असे नक्की का झाले असावे हे कोडे मला शेवटपर्यंत उलगडले नाही.अनेकदा वाटे की त्यांना कधीतरी खरड करावी, कधी फोन करावा, जमल्यास प्रत्यक्ष भेटावे आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा करावा.पण ते कधी झालेच नाही.एक तर माझी pride मला तसे करण्यापासून परावृत्त करत होती आणि दुसरे म्हणजे "इतकी वर्षे पडली आहेत मग आताच कशाला"--कधीतरी कुठेतरी कट्ट्यावर किंवा इतरत्र भेटू तेव्हा बोलू अशा स्वरूपाची धारणा!! पण आज जाणवले की आता मात्र शाश्वत चुकामुक झाली :(

श्रामोंना श्रध्दांजली. Rest in peace.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2013 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

पिंपातला उंदीर's picture

30 May 2013 - 9:24 pm | पिंपातला उंदीर

काय बोलाव? अशी लोक लवकर का जातात? वैचारिक एकटे पण? वेगळ्या विचारान मुळे आलेल सामाजिक एकांत? का? का? वेगळ असण्याची एवढी मोठी किंमत? भीती वाटत आहे वेगळ असण्याची.

किलमाऊस्की's picture

30 May 2013 - 9:25 pm | किलमाऊस्की

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अर्धवटराव's picture

30 May 2013 - 10:50 pm | अर्धवटराव

प्रत्यक्ष भेट नाहि झाली कधी मोडकसाहेबांशी... जी काहि ओळख झाली ति मिपावरच.
एक मिपा जेम हरवला :(

अर्धवटराव

उपास's picture

30 May 2013 - 11:23 pm | उपास

चटका लावून गेले श्रामो!

नीलकांत's picture

31 May 2013 - 12:33 am | नीलकांत

श्रामोंची पहिली भेट पॅराडाईजला झाली. आपल्या खास शैलीत त्यांनी ताबडतोब आपलं करून घेतलं होतं. पुढे आंतरजालावरची ओळख मागे पडून प्रत्यक्ष संबंध जास्त आला. पॅरेडाईज, डेक्कन वरील पुनम, सारसबागेजवळील कल्पना किंवा विश्व ही भेटायची ठिकाणं. अनेकदा श्रामोंशी चर्चा व्हायची. केवळ मिपाच नाही तर प्रत्यक्ष जीवनातील अडचणीसुध्दा त्यांच्या सोबत शेअर केल्या आहेत.

माझा मित्र नाही तर मार्गदर्शकच आज हरवलाय. अतिशय वाईट वेळी श्रामो सोडून गेलेत. अतिशय वाईट वेगात निघून गेले आहेत. अतिशय वाईट झालं. श्रामो तुम्ही कायम आठवणीत राहाल. मिपा तर्फे आणि मी व्यक्तिगत सुध्दा तुम्हाला श्रध्दांजली देतोय.

- नीलकांत

पाषाणभेद's picture

31 May 2013 - 12:59 am | पाषाणभेद

श्रावण मोडक यांना आदरांजली.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2013 - 2:16 am | बिपिन कार्यकर्ते

.

चित्रा's picture

31 May 2013 - 2:18 am | चित्रा

सुन्न करून टाकणारी बातमी.

गूगलमध्ये चॅटवर काही वेळा संभाषण झाले होते. भेटायचे मात्र राहून गेले..

काय बोलावे, समजत नाही.
मनापासून आदरांजली.

मयुरपिंपळे's picture

31 May 2013 - 6:24 am | मयुरपिंपळे

सरांबरोबर दिड वर्ष काम केले. खुपच जवळुन त्याना काम करताना बगीतले आहे, माझा पहीली नोकरी असल्यामुळे सरानी मला एक खुपच मदत केली. त्याची विचार करव्याची पध्दत खुपच विलशण होती. मिपा च्या गमती जमती खुप वेळा सांगीतले आहेत. संगीताची पण खुप आवड होती त्याना. "कसबा बोलला" असे नेहमी मला म्हण्यायचे कारण मी कसबा पेठ मधे राहतो. ८ ८ तास त्याचा शेजारी बसुन काम केले आहे.

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
modak

मुक्त विहारि's picture

31 May 2013 - 7:30 am | मुक्त विहारि

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

श्री गावसेना प्रमुख's picture

31 May 2013 - 8:25 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रभूचरणी प्रार्थना!
श्रावण मोडक या दिलदार मित्राला त्यांच्या सहकारयाने वाहिलेली श्रद्धांजली
http://berkyanarad.blogspot.in/2013/05/blog-post_30.html?spref=fb

तर्री's picture

31 May 2013 - 9:01 am | तर्री

लोकसत्तेने श्रामो यांच्या निधनाची शोककारक बातमी दिली आहे.

दिपक's picture

31 May 2013 - 9:23 am | दिपक

दु़खःद धक्कादायक बातमी.

समीरसूर's picture

31 May 2013 - 9:43 am | समीरसूर

आज मटामध्ये बातमी वाचली आणि धक्काच बसला. एक बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले.

शांती लाभो.

५० फक्त's picture

31 May 2013 - 10:13 am | ५० फक्त

नम्र श्रद्धांजली..

ज्ञानेश...'s picture

31 May 2013 - 10:16 am | ज्ञानेश...

वाईट वाटले.

श्रामोंना मनःपूर्वक श्रद्धांजली.

सर्वसाक्षी's picture

31 May 2013 - 10:21 am | सर्वसाक्षी

फक्त एकदाच भेटायची योग आला होता, पुन्हा येणार नव्हता. श्रामोंना श्रद्धांजली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 May 2013 - 10:30 am | ज्ञानोबाचे पैजार

श्रा मो ना भावपुर्ण अदरांजली.

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

निशिगंध's picture

31 May 2013 - 5:10 pm | निशिगंध

श्रामो ना भावपुर्ण श्रध्दाजंली.....

पैसा's picture

31 May 2013 - 5:33 pm | पैसा

अतिशय वाईट बातमी. श्रामोंना श्रद्धांजलि.

श्रामो,
तुम्हारी सोच, तुम्हारी लगन , तुम्हारा जज्बा ...
लम्हा ,लम्हा तुम मिल रहे हों हमें.. तुम्हारे पुराने आर्टिकल्स के जरिए ..
शायद एक बार रुबरु भी मिल जातें.
लेकीन वक्तको यह मंजुर न था
इसलिए शायद इस तरह मिल रहे हो ...
जिस तरह सुखे हुए फुल किताबों मे मिलें :-(

प्रभाकर पेठकर's picture

31 May 2013 - 8:27 pm | प्रभाकर पेठकर

माशाल्ला.. माशाल्ला.. क्या बात कही है।

चौकटराजा's picture

31 May 2013 - 5:46 pm | चौकटराजा

श्रा मो डाव्या विचारांचे असतील तर परिचय नसतानाही माझे फार नुकसान झालेय म्हणायचे.अतः परिचय नसतानाही त्यांच्या स्मृतीला अभिवादन !

अशोक पतिल's picture

31 May 2013 - 6:53 pm | अशोक पतिल

ईश्वर त्यांच्या म्रुतात्म्यास सद्गती देवो.

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

खादाड_बोका's picture

31 May 2013 - 8:18 pm | खादाड_बोका

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली....

पप्पु अंकल's picture

31 May 2013 - 8:42 pm | पप्पु अंकल

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

त्रिवेणी's picture

31 May 2013 - 9:39 pm | त्रिवेणी

श्रावण दा याना भावपूर्ण श्रध्दाजली

दिपाली पाटिल's picture

31 May 2013 - 10:25 pm | दिपाली पाटिल

श्रामो यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
खरे वाटत नाहीये की ते आपल्यात नाहीये.

सखी's picture

31 May 2013 - 11:41 pm | सखी

अजुनही खरचं वाटत नाही. एक अभ्यासी व्यक्तिमत्व हरवले याची हळहळ वाटते...

कुळाचा_दीप's picture

1 Jun 2013 - 7:50 am | कुळाचा_दीप

अत्यंत धक्कादायक आणि दु:खद... श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

चित्रगुप्त's picture

1 Jun 2013 - 9:20 am | चित्रगुप्त

प्रत्यक्ष परिचय नसूनही जवळचे वाटणारे होते श्रामो,
त्यांना श्रद्धांजली.

सन्दीप's picture

1 Jun 2013 - 12:10 pm | सन्दीप

धक्कादायक व दुःखद बातमी.
इश्वर श्र.मो.च्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना

स्मिता चावरे's picture

1 Jun 2013 - 12:19 pm | स्मिता चावरे

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आनंदी गोपाळ's picture

1 Jun 2013 - 12:32 pm | आनंदी गोपाळ

फारच वाईट बातमी...

श्रावण मोडक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली

शशिकांत ओक's picture

1 Jun 2013 - 1:12 pm | शशिकांत ओक

श्रामोंची एक व्यक्ती व पत्रकार म्हणून मिपा वर ओळख असल्यामुळे आणखी चुटपुट लागली. श्रा मोंचा कौटुंबिक परिवार काय होता यावर प्रकाश टाकता आला तर आवडेल. त्यांना सांत्वना पत्र पाठवायला सोपे जाईल.

मयुरपिंपळे's picture

1 Jun 2013 - 8:29 pm | मयुरपिंपळे

अभिजीत पोहणकराचा अल्बम ( tranqlity ) फार आवडीने ते रोज लावत असे.

समंजस's picture

1 Jun 2013 - 11:32 pm | समंजस

भावपुर्ण श्रद्धांजली!!
काहि दिवसांनी मिपावर आलो आणि ही दु:खद बातमी मिळाली :(
व्यक्तिशः श्रामोंशी परिचय नाही पण मिपासदस्य आणि वाचक म्हणून अतिशय घनिष्ठ संबंध. मिपाच्या जुन्या आणि सुरवातीच्या काळापासूनचे एक अग्रणी आणि सतत लिहीत असणारे सदस्य म्हणून त्यांना ओळखतो.

[अवांतर : हे काय चालंलय ? जेमतेम काही काळ जात नाहीय तर मिपावरील एक आणखी पत्रकार/ले़खक कायमचं गमन करतोय? मिपावर राग की आमच्यासारख्या वाचन मात्र असणार्‍या सदस्यांवर हा राग ? ]