श्यायडी...! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
8 May 2013 - 4:36 pm

आमच्या लालबाग-परळचे चाकरमानी C I D ला नेहमीच 'श्यायडी' असं म्हणतात..त्यामुळे तेच शीर्षक योग्य वाटलं..

तर ही C I D नामक एक अत्यंत टंपड परंतु तशी टाईमपास मालिका गेली १५ वर्ष सोनीटीव्ही वर सुरू आहे..

मराठी रंगभूमीवरचा मूळचा अत्यंत गुणी आणि संवेदनशील रंगकर्मी शिवाजी साटम, नानाविध गुन्हेगारांवर वसावसा ओरडण्यापलिकडे फारसं काही करताना गेल्या १५ वर्षात तरी दिसला नाही...

ज्युरिस्डिक्शन नावाचा प्रकार नाही. लोकल पोलिस स्टेशन नावाचा प्रकार नाही. कळवा, डोंबिवली, नालासोपारा, चिंचपोकळी, पालघर, जळगाव, झुमरीतलैय्या, उज्जैन, मथुरा, गणपतीपुळे....अगदी कुठे म्हणता कुठेही गुन्हा घडला तरी C I D हीच एकमेव तपासयंत्रणा..!

बरं, शेंबड्या पोरापासून ते नव्वदीच्या म्हाता-यापर्यंत, झाडूवाल्यापासून ते रतन टाटा पर्यंत अगदी सगळ्यांना श्यायडीचा नंबर तोंडपाठ..! बरं हा १०० नंबर नसावा. कारण तो नंबर पोलिस कन्ट्रोलरुमचा असतो.. श्यायडीचा नक्की कुठला नंबर आम जनतेच्या लक्षात असतो देव जाणे..! कारण कुठेही काही अनुचित प्रकार घडला की सोबत हजर असलेला इसम..'C I D को फोन करता हू..उनको बुलाना पडेगा' असं म्हणून लगेच शिवाजी साटम आणि मंडळींना फोन लावतो..

तपासकथा तर काही विचारू नका.. जराही म्हणजे जराही काही रहस्य नाही, काही सेन्सेशन नाही..साटम आणि मंडळींना गुन्ह्याची उकल करणं अगदी सोपं जाईल अशाच कथा बेतलेल्या असतात..

एक मात्र आहे, १५ वर्षांच्या सवयीमुळे अभिजित, दया वगैरे अगदी घरचे वाटतात..साला, दयाच्या तगड्या आणि कमावलेल्या बॉडीवर तर आपण खूश आहोत. दयाने इमानदारीत एखाद्याच्या कानाखाली मारणं अगदी बघण्यासारखं असतं..

"कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है..तोड दो दरवाजा.." असं नुसतं साटम साहेबांनी सांगायचा अवकाश..की दयाची दारावर बसलीच सणसणीत लाथ म्हणून समजा.. मजा येते ते दरवाजा तोडणं बघायला..!

एका पुणेकराने तर म्हणे आपल्या दारावर खालील पाटीच लिहिली आहे..

"आदरणीय सी आय डी टीम, तुम्ही जर काही कारणाने आमच्या घरी आलात आणि आम्ही जर घरात नसलो तर कृपया शेजारी चावी ठेवलेली आहे ती घेऊन दरवाजा उघडा..दयाला थाडकन लाथ मारायला सांगू नका.."

फ्रेड्रिक्स नावाचा इसम, बिचारा जमेल तशी कॉमेडी करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो..

डोळ्यात अंमळ जादू असलेली आपल्या डॉक्टर साळुंखेची अशिश्टंट तारिका.. तिचं आणि अभिजितचं आता जमावं असं मात्र आता मनापासून वाटतं..

मला सर्वात आवडतो तो डोक्याला नेहमी टोप लावणारा डॉ साळुंखे..मस्त मनुष्य आहे एकदम.. नानविध रंगीत पाणी भरलेल्या, वाफा वगैरे येत असलेली काचेची रासायनिक पात्रं असलेल्या लॅबमध्ये सतत काय करत असतो देव जाणे..! पण वास्तविक, बर्‍याचशा गुन्ह्यांचा तपास आजतागायत केवळ ह्या डॉ साळुंखेमुळेच लागला आहे, पण हा साटम मात्र बघावं तेव्हा त्या साळुंखेवरदेखील वसावसा ओरडत असतो..

बाकी काय पण म्हणा, श्यायडीतल्या महिला अधिकारी मात्र एकदम टकाटक असतात. पूर्वी मुस्कान (अलका वर्मा) आणि ताशा (वैष्णवी धनराज) होत्या.. सध्या मात्र जी महिला अधिकारी आहे ती बाकी क्लासच दिसते. विलक्षण जीव आहे माझा तिच्यावर. तिचं नाव पूर्वी (अनशा सईद)

cid

तर अशी ही श्यायडी, पंधराच काय, पुढची दीडशे वर्ष देखील अव्याहत सुरू रहावी, ही शुभेच्छा..!

आणि ती तशीच सुरू राहिल आणि प्रत्येक भागाच्या शेवटी साटम साहेब म्हणतील,

"दो दो खून किये है तुमने, तुम्हे तो शायद फासी ही होगी..!"

-- डीसीपी तात्या.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

8 May 2013 - 4:45 pm | प्यारे१

"कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है.."

आप्पा's picture

9 May 2013 - 11:29 am | आप्पा

वही तो. कुछ तो गडबड है. दया तोड दो दरवाजा.

शिवाजी साटमचा विनोदी अभिनयामुळे श्याअडी आजुन फार्मात राहिल.

मस्तच

सुरेख उतरलंय मुक्तक

आजानुकर्ण's picture

8 May 2013 - 5:32 pm | आजानुकर्ण

!

आदूबाळ's picture

8 May 2013 - 6:28 pm | आदूबाळ
  • एसीपी प्रद्युमन यांची हात हलवत बोलण्याची लकब आहे. त्यावरून एक विनोद: एसीपींचं हातावर पोट आहे!
  • मध्ये तीनचार वर्षं श्यायडीच्या कथा चेतन जोशी नावाचा उमदा मराठी लेखक लिहायचा.
  • एकेकाळी श्यायडीमध्ये आशुतोष गोवारीकर सुद्धा होता.
चौकटराजा's picture

8 May 2013 - 7:48 pm | चौकटराजा

निद्रिस्त तात्याला एवढा धाग्यांचा गुंडा कोठे सापडला ?? दया...कुछ तो गडबड है.... व्हॅन निकालो... थाना चलते है...

प्यारे१'s picture

8 May 2013 - 7:58 pm | प्यारे१

>>>थाना चलते है...
तुम्हाला 'ठाणे' शहर म्हणायचंय का ठाणं?

सुहास झेले's picture

9 May 2013 - 12:46 am | सुहास झेले

लवकरच डॉक्टर साळुंखेला कन्सल्ट करावे लागणार.... ;-)

शिल्पा ब's picture

9 May 2013 - 1:45 am | शिल्पा ब

दिसामाजी काहीतरी ते लिहित जावे

प्रभाकर पेठकर's picture

9 May 2013 - 2:42 am | प्रभाकर पेठकर

कपाशीत एक लांब धाग्याचा कापूस असतो तर एक आखुड धाग्याचा.

अमोल केळकर's picture

9 May 2013 - 11:07 am | अमोल केळकर

हा हा हा मस्तच :)

अमोल केळकर

लेखनाचे श्यायडी झाले आहे असे म्हणण्याची एक नविन प्रथा चालू होणार तात्या !!!