चिकन रोगनजोश
सामग्री:
१/२ किलो चिकन
१ छोटा चमचा लसूण पेस्ट
३ मोठे चमचे दही
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
२ मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पूड
मीठ चवीनुसार
मसाला:
१ कांदा
८ लसूण पाकळ्या
१ सुकी लाल मिरची
(कांदा, लसुन आणि मिरची ची पेस्ट करून घ्यावी)
१ मोठा चमचा तेल
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
१ छोटा चमचा बडीशेप पूड
१ छोटा चमचा गरम मसाला पावडर
१ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पूड
अख्खा मसाला -
१ छोटा चमचा जिरे
१ छोटा चमचा काळी मिरी
१ छोटा चमचा लवंग
१ इंच दालचिनी चा तुकडा
३ हिरवी वेलची
१ तेज पत्ता
कृती:
- चिकन ला दही, लसुन पेस्ट, धने जिरे पूड, मिरची पावडर आणि मीठ चांगले चोळून, अर्धा तास फ्रीज मध्ये मुरत थेववे.
- एका भांड्यात तेल गरम करून त्यात चिकन लालसर होई पर्यंत परतून घ्यावे. चिकन दुसऱ्या भांड्यात काढून ठेवून, उरलेल्या तेलात अक्खा (खडा ) मसाला थोडा परतून घ्यावा. मग त्यात कांदा लसुन पेस्ट परतावी आणि त्यावर बाकी मसाले पूड घालावे.
- सर्व मसाल्याला तेल सुटलं कि मग त्यात चिकन आणि १ वाटी पाणी घालून, झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवावे. गरज वाटल्यास थोडं अजून पाणी घालावे.
- तुमच्या आवडीनुसार, रस्सा दाट किंवा पातळ ठेवू शक्ता.
- गरम गरम नान, फुलके किंवा पूलाव सोबत फस्त करावे!
प्रतिक्रिया
8 May 2013 - 2:12 pm | विसोबा खेचर
वा...!
8 May 2013 - 2:18 pm | सुहास झेले
जबऱ्या... करून बघता येईल. सोप्पी दिसतेय पाककृती :) :)
8 May 2013 - 2:49 pm | मुक्त विहारि
झक्कास..
8 May 2013 - 3:16 pm | दिपक.कुवेत
आणि छान पाकॄ
8 May 2013 - 3:46 pm | प्रभाकर पेठकर
मुळात 'रोगनजोश' म्हंटल्यावर पदार्थावर 'रोगन' (तर्री) अपेक्षित आहे. 'रोगन' विरहीत 'रोगनजोश' होऊ शकत नाही. मुळात 'मटण रोगनजोश' ही एक काश्मिरी पाककृती आहे. त्याला आपल्या आवडीनुसार चिकन रोगनजोश बनविण्यास काहीच हरकत नाही. पण, 'रोगन' महत्त्वाचे. ह्या पाककृतीचा तो प्राणच म्हणावयास हरकत नाही.
पाककृती चवीला चांगली असणार ह्यात वाद नाही. करून पाहिली जाईलच. पण एखादे दुसरे नांव शोधावे लागेल.
8 May 2013 - 6:45 pm | बॅटमॅन
रोगन म्हंजे तर्री होय? तरी म्हटलं असं रोगट नाव का आहे या पाकृचं. आज कळ्ळं काय भानगड आहे ते, बहुत धन्यवाद पेठकरकाका :)
8 May 2013 - 7:00 pm | साऊ
मलाही रोगनचा अर्थ माहित नव्हता. आज कळला.
फोटो खुप छान.
9 May 2013 - 12:13 am | कपिलमुनी
काका,
तुमच्या हाताचा फर्मास मटण रोगनजोश येउ द्या
9 May 2013 - 2:36 am | प्रभाकर पेठकर
रिक्वेष्ट विचाराधीन आहे.
8 May 2013 - 3:59 pm | सूड
कोपर्यातून डोकावणार्या पोळ्या/ फुलके अधिक छान दिसतायेत.
14 May 2013 - 8:07 pm | प्यारे१
>>>कोपर्यातून डोकावणार्या पोळ्या/ फुलके अधिक छान दिसतायेत.
खरंय रे बाबा!
- आता इकडे पोळ्या करणारी शोधणं आलं. ;)
8 May 2013 - 4:00 pm | गवि
वा छान..आलोच..
8 May 2013 - 4:01 pm | रेवती
पाकृ छान दिसतीये.
8 May 2013 - 6:38 pm | jaypal
पेठकर काकांशी सहमत
अवांतर >>>१ सुकी लाल मिरची (कांदा, लसुन आणि मिरची ची पेस्ट करून घ्यावी)
कांदा कच्चाच घ्यावा की परतुन्/भाजुन घ्यावा?
8 May 2013 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
गरम गरम नान, फुलके किंवा पूलाव सोबत फस्त करावे!
फोटो पाहून तुमचा आदेश पाळण्याची अतीव इच्छा झाली आहे... फक्त ते कुठे ठेवलय ते सांगा. बाकी आम्ही बघून घेउ.
9 May 2013 - 2:41 am | अभ्या..
=)) =)) =))
बघत राहाणार फक्त?
9 May 2013 - 11:04 am | तुमचा अभिषेक
छान दिसतेय.. एकच फोटो, पण नेमका..
9 May 2013 - 11:17 am | गवि
स्टेप बाय स्टेप, किमान महत्वाच्या स्टेप्सचे फोटो पाकृमधे नेहमी असावेत असं मला वाटतं. त्यामुळे पाककृती प्रत्यक्ष करताना वेळोवेळी आपण योग्य ट्रॅकवर आहोत ना याची खात्री करता येते. (रंग, कन्सिस्टन्सी, क्वांटिटी वगैरे अनेक बाबतीत.)
14 May 2013 - 7:57 pm | साती
आत्तापर्यंत पाहिलेल्या रोगनजोशपेक्ष वेगळीच दिसतेय. पण यम्मी दिसतेय.
मी एका ऑथेंटिक रेसिपीत रोगनजोशमध्ये चक्क कोकम घातलेले पाहिलेय. कोंकणातलं कोकम कश्मिरी वाझवानमध्ये पाहून विस्मय वाटले होते.