आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?

nandan's picture
nandan in काथ्याकूट
7 May 2013 - 7:40 pm
गाभा: 

माझ्या मनात खूप दिवसापासून एक प्रश्न घोळत आहे

आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?

मला वाटते कि आपल्या ह्या गुळमुळ आणी अति सामान्य राष्ट्राप्रेमामुळे आपल्या भारतात काहीही होऊ शकते.

पहा हे असे होईल…

उद्या सानिया मिर्झाला मुलगा झाला आणि ही बाई २० वर्षानी तलाक देऊन इंडिया मध्ये आली आणि हिचा मुलगा लोकाल एलेक्शन मध्ये उभा राहिला … कालांतराने जर हा हैदराबाद मध्ये एमलअे म्हणून निवडून आला.
आणी कदाचित हाच पंतप्रधान म्हणून देखील निवडला जाऊ शकेल. जिथे एका राज्यापलीकडे कोणी ओळखत न्हव्ते त्या देवे गोडला पंतप्रधान केले ना वेळ आल्यावर ….

तर मग हा का नाही होऊ शकणार?

आणखी पुढे जाऊन

काय सांगावे आपले चालिशीचे कॉंग्रेस राजकुमार ह्यांना बेनझीर च्या मुलीवर प्रेम झाले आणी ती भारत की बहु म्हणून आली आणि तिच्या सासू बाई प्रमाणे ती देखील राजकीय नेता झाली आणी कदाचित हे वेडे काँग्रेसी तिला पंतप्रधान हि करतील …

आपल्याला काय वाटते ?

असे होईल का ? कायदेशीर असे शक्य आहे का ?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 7:45 pm | विसोबा खेचर

धागा अतिशय/विलक्षण आवडला..!

जियो...! :)

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 7:48 pm | विसोबा खेचर

खास करून धाग्यातली साधीसुधी आणि भाबडी भाषा, त्यात मांडलेल्या प्रॅक्टिकल शंका मनाला विलक्षण भावल्या..!

माझ्याशी सतत ८ दिवस निरनिराळ्या विषयावर पत्ररुपाने संवाद साधलात तर एक छान व्यक्तिचित्र लिहू शकेन..

असो, अवांतराबद्दल माफी असावी..

तात्या.

श्रीगुरुजी's picture

7 May 2013 - 7:48 pm | श्रीगुरुजी

भारताचे परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंबंधीचे कायदे व नियम अत्यंत सौम्य आहेत. कोणताही परदेशी नागरिक भारतात ६ महिने राहिला तर भारतीय नागरिक होण्यास तो पात्र ठरू शकतो व कोणताही भारतीय नागरिक पंतप्रधान/राष्ट्रपती या व कोणत्याही पदावर बसू शकतो. त्यामुळे तार्किकदृष्ट्या तुम्ही दिलेल्या उदाहरणातील व्यक्ती भारताचे पंतप्रधान बनू शकतील. तसे होण्यास घटनेची कोणतीही आडकाठी नाही.

>>> आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?

भारताचे माहिती नाही, पण पुढील ५-१० वर्षात आसामचा मुख्यमंत्री बांगलादेशी बेकायदेशीर घुसखोर असणार हे नक्की.

चेतनकुलकर्णी_85's picture

7 May 2013 - 7:51 pm | चेतनकुलकर्णी_85

काय सांगावे आपले चालिशीचे कॉंग्रेस राजकुमार ह्यांना बेनझीर च्या मुलीवर प्रेम झाले आणी ती भारत की बहु म्हणून आली आणि तिच्या सासू बाई प्रमाणे ती देखील राजकीय नेता झाली आणी कदाचित हे वेडे काँग्रेसी तिला पंतप्रधान हि करतील …

आयला झोप उडाली हे वचुन………

वेताळ's picture

7 May 2013 - 8:00 pm | वेताळ

पण काहीच्या मते आता पाकिस्तानी वंशाचे लोकच भारतावर राज्य करत आहेत

प्यारे१'s picture

7 May 2013 - 8:00 pm | प्यारे१

टेक्निकली होऊ शकतो.
प्रॅक्टीकली सध्या २५-३० वर्षात तरी नाही.
बाकी शतकी धाग्यासाठी आधीच शुभेच्छा!

तुमचा अभिषेक's picture

7 May 2013 - 8:30 pm | तुमचा अभिषेक

आपली सानिया पाकिस्तानाची कोणी होऊ शकत नाही का?

वासिम अक्रम आणि सुश्मिता सेनबद्दलही ऐकले होते, ते खरे निघाले तर त्या आघाडीवर देखील संधी आहे.

मुक्त विहारि's picture

7 May 2013 - 8:38 pm | मुक्त विहारि

ह्या देशात काय वाट्टेल ते होवू शकेल..

मिहिर's picture

7 May 2013 - 8:55 pm | मिहिर

नक्की काय विचारायचे आहे? आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो, की पाकिस्तानी आपल्या भारताचा पंतप्रधान होऊ शकतो?

पाकिस्तानी म्हणजे पाक चा नागरिक ….

बाकी असे भाषेचे टेक्निकल मुद्दे काढून मूळ गांभीर्य कमी नाही होत.
--

प्रामाणिक प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर धागाकर्त्याबद्दल चांगली भावनाही नाही होत.

lakhu risbud's picture

7 May 2013 - 9:13 pm | lakhu risbud

हा हा हा ! यावरून आठवल, एका मराठी कार्यक्रमात
म्हणी सारखी दुसरी म्हण तयार करायची होती
"धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का"

तिथे भाऊ कदम यांनी
"सानिया का बच्च ना भारत का ना पाक का"

अशी म्हण म्हंटली होती

lakhu risbud's picture

7 May 2013 - 9:15 pm | lakhu risbud

"सानिया का बच्चा ना भारत का ना पाक का" असे वाचावे

चिरोटा's picture

7 May 2013 - 9:18 pm | चिरोटा

कोणताही परदेशी नागरिक भारतात ६ महिने राहिला तर भारतीय नागरिक होण्यास तो पात्र ठरू शकतो

ऑ ?
भारतिय नागरिकत्व मिळवण्यासाठी खालील पात्रता आहे(Naturalized citizen होण्यासाठी)
I.He/she has either resided in India or been in the service of a Government in India or partly the one and partly the other, throughout the period of 12 months immediately preceding the date of the application.
II.During the fourteen years immediately preceding the said period of twelve months, he/ she has either resided in India or been in the service of a Government of India, or partly the one and partly the other, for periods amounting in the aggregate to not less than eleven years.
III.He/ She is of a good character.
IV.He/ She have an adequate knowledge of a language specified in the Eighth Schedule to the Constitution.

"http://indiancitizenshiponline.nic.in/Ic_App_documents.aspx?formcode = 08"

मराठे's picture

7 May 2013 - 10:05 pm | मराठे

कोणताही भारतीय नागरीक पंतप्रधान होऊ शकतो की फक्त जन्माने भारतीय नागरीकत्व मिळालेला नागरीकच पंतप्रधान होऊ शकतो?
(अमेरिकेतील कायद्याप्रमाणे जन्माने नागरिकत्व मिळालेली व्यक्तीच अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होऊ शकते .. म्हणून ओबामाच्या जन्मदाखल्यावरून काही लोकांनी रान उठवायचा प्रयत्न केला होता. पण गव्हर्नर पदासाठी ही अट नाही... म्हणून जन्माने ऑस्ट्रीयन असूनही ऑरनॉल्ड श्वाजनेगर कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर होऊ शकला.)

इन कालोंको ये बात पता नही है, मांगनेसे कुछ नही मिलता, सबकुछ छिनना पडता है. हमे देखो (म्हणजे अमेरिकेत स्थलांतरीत झालेले आयरिश लोक्स) हमे यहा (अमेरिकेत) काम मिलना मुश्किल था, और बिस साल बाद हमने अपना प्रेसिडेंट चुना. (Twenty years after an Irishman couldn't get a fucking job, we had the presidency. May he rest in peace. That's what the niggers don't realize. If I got one thing against the black chappies, it's this - no one gives it to you. You have to take it.)

म्हणजे या चित्रपटात थाप मारली आहे की राव :( ? कारण २० वर्षाचा आयरिश माणुस अमेरिकेचा प्रेसिडेंट कसा काय बनु शकेल ? ब्रॅड पिट कडुन यात लक्ष घातले जायला पाहिजे होते :(

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2013 - 11:57 pm | श्रीरंग_जोशी

कदाचित त्या संवादाचा संदर्भ अमेरिकेच्या प्रथम राष्ट्राध्यक्षांकडे असेल.

आयरिश मुळ असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची यादी इथे मिळाली.

चिरोटा's picture

8 May 2013 - 12:14 am | चिरोटा

बाबांनो, प्रत्येक धाग्यात अमेरिकेचा संदर्भ असलाच पाहिजे काय? एक धागा तरी सोडा भारतासाठी.!

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2013 - 12:21 am | श्रीरंग_जोशी

प्रत्येक चर्चेत अमेरिकेचा संदर्भ आवश्यक नाहीये.

पाकिस्तानातून काही कुटूंबे भारतात स्थलांतरित होत असतात (शरणागती मागून) त्यांच्याबरोबर आलेले मूल (जन्म पाकिस्तानात पण उर्वरीत संपूर्ण आयुष्य भारतात भारतीय नागरीक म्हणून) भविष्यात भारतीय पंतप्रधान होत असल्यास राजकीय विरोध होणार नाही असा अंदाज आहे.

सोनियांच्या विदेशी असण्यावरून भाजप व मित्रपक्षांनी आक्षेप घेतला असताना कुणीतरी लालकृष्ण आडवाणी यांच्या जन्मस्थळ सध्या पाकीस्तानात असल्याचे दाखवून प्रत्युत्तर दिले होते ;-).

तसे जन्मस्थळ सध्याच्या पाकीस्तानात असलेले इंदर कुमार गुजराल हेही एक पंतप्रधान पूर्वी झालेले आहेतच.

चिरोटा's picture

8 May 2013 - 12:30 am | चिरोटा

त्या बदल्यात परवेझ मुशी,झिया उल हक ह्यांचा जन्म भारतात झाला होता त्याबद्दल आनंद मानू.

आशु जोग's picture

7 May 2013 - 11:21 pm | आशु जोग

आत्ताच कळालेल्या माहितीनुसार
सी बी आय चे या धाग्यावर बारीक लक्ष आहे.

या धाग्यामुळे धागाकर्ता नंदन गोत्यात येऊ शकतात
कारण
आपले मनिमोहन हे जन्माने गाह, आत्ताच्या पाकिस्तानचेच आहेत.

सूड उगवायचा असला की हा माणूस सी बी आय चा हवा तसा वापर करून घेतो.
वरून संतपणाचा आव आणला तरी आतून पाकिस्तानी वृत्तीचा आहे.

मागे याच माणसाने बिहार, झारखंड आणि गोवा या राज्यातील विरोधकांची सरकारे
गवर्नरांच्या मदतीने पाडण्याचा प्रयत्न चालवला होता.
एक चांगला प्रशासक मनोहर पर्रीकर यांच्यासारख्याला याने खुर्चीवरून खाली उतरवले.

बोफोर्समधे डॉलर खाणार्‍या क्वाट्रोचीला सुटायला आणि त्याचे करोडो पाऊंडस ब्रिटिश बँकामधून घेऊ देण्यास
यांनीच मदत केली होती.

मनिमोहना बडे झूटे हे गाणे यामुळेच लिहिले गेले आहे.

पुढील पाच वर्षेदेखील भारतावर मीच राज्य करेन अशी धमकीही या जवानमर्दाने सर्व भारतीयांना दिली आहे.
यामुळे सारे भारतीय भयभीत झाले आहेत. दहशतवादाचा नवीन प्रकार भारतीयांना ज्ञात होत आहे.

ऋषिकेश's picture

8 May 2013 - 2:14 pm | ऋषिकेश

पाकिस्तानी म्हणजे? पाकिस्तानात जन्मलेला?

सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग (गाह) आणि बाशिंग बाघून बसलेले अडवाणी (कराची) या दोघांचाही जन्म पाकिस्तानातला आहे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2013 - 3:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

या दोघांचाही जन्म पाकिस्तानमध्ये झालेला नाही कारण त्यांच्या जन्माच्यावेळी पाकिस्तान नावाचे राष्ट्र आस्तित्वातच नव्हते.

या दोघांचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या आणि त्यांच्या जन्माच्यावेळी ब्रिटीश इंडियात असलेल्या शहर / गावात झाला हे म्हणणे जास्त संयुक्तीक आहे.

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 3:30 pm | बॅटमॅन

+१११११११११११११११११११.

हेच म्हणायचे होते.

ऋषिकेश's picture

8 May 2013 - 3:55 pm | ऋषिकेश

हे मान्य आहेच.. तेव्हा ते भारतीय झाले.
म्हणूनच विचारले पाकिस्तानी म्हणजे काय म्हणायचे आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2013 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

"ज्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे"

किवा

"जे पाकिस्तानात जन्मले / पाकिस्तानात राहतात + पाकिस्तानी पासपोर्ट मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व अटीस पात्र आहेत (हे एवढ्याकरताच की कोणत्याही देशाचे सर्वच नागरीक पासपोर्ट काढतातच असे नाही.) + इतर कुठ्ल्याही देशाचे नागरीक नाहीत"

असे सर्वजण पाकिस्तानी नागरीक आहेत.

अर्थात हेच नियम (काही अपवाद वगळून) इतर देशांनाही लागू होतील... कायद्याची भाषा थोडीफार बदलेल पण सूर तोच असेल.

ऋषिकेश's picture

9 May 2013 - 10:06 am | ऋषिकेश

ओक्के मग अश्या व्यक्ती भारताचे कोणतेही घटनात्मक पद भुषवू शकत नाहीत

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 12:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारताचा नागरीक असलेली कोणतीही व्यक्ती निवडणूकीचे वैधानीक नियम पाळून कोणतेही वैधानिक पद ग्रहण करू शकते... फक्त पंतप्रधान व राष्ट्रपतीपदासाठी वयाची अट वेगळी आहे ती अशी:

लोकसभासदस्याला पंतप्रधानपदासाठी : २५ वर्षे वा अधिक

राज्यसभासदस्याला पंतप्रधानपदासाठी : ३० वर्षे वा अधिक

राष्ट्रपतीपदासाठी : ३५ वर्षे वा अधिक.

ऋषिकेश's picture

9 May 2013 - 1:50 pm | ऋषिकेश

भारताची नागरीक असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे पाकिस्तानचा पासपोर्ट असु शकत नाही. तुम्ही वर दिलेल्या "पाकिस्तानी" च्या क्रायटेरीता कोणताही भारतीय नागरीक बसत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 2:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला वाटतेय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय... परत एकदा सलग खुलासा करतो...

१. मनमोहन सिंग आणि अडवाणी या दोघांचा जन्म १९४७ सालापूर्वी म्हणजे पाकिस्तानात झाला नाही तर ब्रिटीश ईंडीयात झाला. आजच्या त्यांच्या पदांवरून त्या दोघांकडे भारतीय पासपोर्ट आहे असे खात्रीने समजायला हरकत नाही. म्हणजे ते दोघे कधिही पाकिस्तानी नव्हते आणि आता नक्कीच भारतीय आहेत.

२. केवळ जन्मस्थानाच्या आधारावर पाकिस्तानी नागरिकत्व ठरवायचे झाल्यास, १४ ऑगस्ट १९४७ ह्या तारखेनंतर पाकिस्तानी भूमीवर जन्मलेली व्यक्ती (जर त्या व्यक्तीचा पिता पाकिस्तानचा शत्रू म्हणून घोषित झाला नसेल तरच) पाकिस्तानी नागरिकत्वासाठी पात्र असते. या नियमानेही ते दोघेही पाकिस्तानी होऊ शकत नाहीत.

अजून थोडे, धाग्याच्या संदर्भाने...

३. भारतीय नागरिकाशी विवाह केलेली आणि भारतात ७ किंवा जास्त वर्षे वास्तव्य असलेली व्यक्ती भारतीय नागरिकत्वास अर्ज करण्यस पात्र ठरू शकते. यासाठी त्या व्यक्तिचा पूर्वीचा नागरिकत्वाचा देश कोणता असावा यावर कोणतेही बंधन नाही. हा मार्ग पकडून एखादी पाकिस्तानी असलेली व्यक्ती भारतीय नागरीक बनून नंतर भारतातील वैधानिक पद ग्रहण करू शकते... कारण भारतीय वैधानिक पदांच्या (निदान पंतप्रधान व राष्ट्रपती पदांबाबतच्या) नियमांत जन्मस्थळाचा संदर्भ गृहित धरलेला नाही.

मी वैधानीक बाबतीत तज्ञ नाही. माझ्या सर्वसामान्य ज्ञानाप्रमाणे इतकेच. याबाबतीतले तज्ञ अजून भर टाकतीलच.

बरोबरच आहे. यात अधिकची भर अशी की भारताचे नागरिकत्त्व घेताना त्याला दुसर्‍या देशाचे नागरिकत्त्व सोडावे लागते.
तेव्हा तिसर्‍या शक्यतेतील व्यक्ती भारतीय झाली की ती पाकिस्तानी रहात नाही.. तस्मात पाकिस्तानी व्यकी भारताची पंतप्रधानच काय कोणत्याही घटनात्मक पदावर बसु शकत नाही.

राहता राहिला प्रश्न अश्या (तिसर्‍या प्रकारातील) 'भारतीय' व्यक्तीने पंतप्रधान बनण्याचा. तो निर्णय भारतीय जनता घेते. प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष निवडणूकीत ती व्यक्ती निवडून येऊन खासदार झाली तर होईलही पंतप्रधान. कुणी सांगावे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

तेव्हा तिसर्‍या शक्यतेतील व्यक्ती भारतीय झाली की ती पाकिस्तानी रहात नाही.. तस्मात पाकिस्तानी व्यकी भारताची पंतप्रधानच काय कोणत्याही घटनात्मक पदावर बसु शकत नाही.

या सर्व चर्चेत हा वरचा मुद्दा खरंतर "मुख्य गृहित" आहे. त्यामुळेच आतापर्यंत त्याचा उल्लेख करण्याचे श्रम कोणी घेतलेले दिसत नाहीत. तसे नसते तर हा धागा "विनोद" अथवा "विडंबन" या सदरात गणला जाईल. मात्र मूळ लेखकाचा रोख "क्रोध" आणि "उपरोध" असा आहे असा माझा समज आहे.

ऋषिकेश's picture

13 May 2013 - 2:53 pm | ऋषिकेश

हा धागा "विनोद" अथवा "विडंबन" या सदरात गणला जाईल

शंका आहे? ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 3:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझे नि:शंक मत माझ्या वरच्या प्रतिसादाच्या शेवटच्या वाक्यात स्पष्ट आहे. तरीसुद्धा हा प्रश्न तुमच्या मनात आला ?!

मात्र तुमचा हा प्रतिसाद "आउट ऑफ काँटेक्स्ट रेफरन्स" चे (परत एक) उत्तम उदाहरण आहे. सध्या भारतीय राजकारणात या प्रकाराला प्रचंड चलती आहे... उत्तम संधी आहे !

मला वाटते की माझे सगळे मुद्दे पुरेसे स्पष्ट झालेले आहेत... तेव्हा आता वाद वितंडवादाकडे जाण्याअगोदर माझ्याकडून तरी पुरे :)

तांत्रिक दृष्टया जरी भारताचे मंत्रिमंडळ भारतीय असले तरी त्यांच्या करतुती बघुन ते मनानी नक्कीच शत्रुराष्टाचे असणार ह्यात शंका नाही.
पाकीस्तानी लोक काय भारताचे नुकसान करतील अशी ही मंडळी ( सर्व पक्षाची ) करत आहेत

आशु जोग's picture

8 May 2013 - 9:39 pm | आशु जोग

च्यामारी काय लावलय रे !

अरे पण या भारतीय माणसाने पाकिस्तानने करावे एवढे नुकसान केले आहे ना भारताचे.?

आणखी २६ - ११
आणखी जर्मन बेकरी बाँबस्फोट, हैद्राबाद स्फोट, चीनी आक्रमण,२ जी, रेल्वे, कोळसा असे घोटाळे व्हायला हवेत का ?

मग द्या पुढच्या वेळीसुद्धा या जवानमर्दाला निवडून ...

मंदार कात्रे's picture

9 May 2013 - 2:30 pm | मंदार कात्रे

काय सांगावे आपले चालिशीचे कॉंग्रेस राजकुमार ह्यांना बेनझीर च्या मुलीवर प्रेम झाले आणी ती भारत की बहु म्हणून आली

बेनजीर ची मुलगी कशाला? हिना रब्बानी बहुतेकांना (!) पसंत आहेच.... तिलाच घ्या म्हणावं !!!

;)

हिना रब्बानीचा आवाज ऐकला तर दहा मैल पळून जातील राजकुमार ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

9 May 2013 - 2:34 pm | श्री गावसेना प्रमुख

तिलाच घ्या म्हणावं

काय म्हणता!

प्रदीप's picture

13 May 2013 - 2:45 pm | प्रदीप

हिंदू धर्माची ही शिकवण आहे काय?

थोडक्यात काय, सनातन हिंदू धर्माचे झेंडे फडकावणारे, आध्यात्मिक व फिलॉसॉफिकल व्याख्याने झोडणारे स्त्रियांविषयी बोलतांना/ लिहीतांना झटकन आपली पातळी दाखवतात.

आजानुकर्ण's picture

14 May 2013 - 2:07 am | आजानुकर्ण

सहमत

असेच सुरू राहिले तर काही वर्षांनंतर घटना दुरुस्तीसुद्धा करतील: पंतप्रधान होण्याकरितां माता किंवा पिता इतर देशाचा नागरीक असणे आवश्यक आहे. हिंदू नसल्यास "सोनेपे सुहागा".....

सुनील's picture

14 May 2013 - 3:28 pm | सुनील

उद्या सानिया मिर्झाला मुलगा झाला आणि ही बाई २० वर्षानी तलाक देऊन इंडिया मध्ये आली आणि हिचा मुलगा लोकाल एलेक्शन मध्ये उभा राहिला … कालांतराने जर हा हैदराबाद मध्ये एमलअे म्हणून निवडून आला.

माझ्या माहितीनुसार, सानिया मिर्झा ही अद्यापही भारतीय नागरीक असून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचेच प्रतिनिधित्व करते.

... कदाचित हे वेडे काँग्रेसी तिला पंतप्रधान हि करतील

म्हणजे काँग्रेसच सत्तेत येईल असे तुम्हालाही ठामपणे वाटते तर ;)

बाकी धागा आणि काही प्रतिसाद हे टैमपास म्हणून अधून-मधून चघळण्यासाठी राखीव ठेवले आहेत!