नमस्कार. माझं नाव विनायक प्रभू. एज्युकेशन काउंसिलींग हा माझा छंद. गेली सतत तीस वर्ष हा छंद जोपासला आहे. एक पुण्यकर्म म्हणून.
पण हा केवळ छंद नाही. माझ्या पोटात एक आग आहे. शिक्षकी वृत्तीची. त्यामुळे बरेच दिवस माझ्या आवडत्या विषयावर लेखन करून सुजाण लोकांपर्यंत ते लिखाण पोहचवण्याची इच्छा होती. माझे स्नेही रामदास यांनी मिपाची वाट मला दाखवली आणि मला वाटलं की माझा योग्य व्यासपिठाचा शोध संपला आहे.धन्यवाद.
-----------------------------------------------------------------------------------------
अभिनंदन .अभिनंदन . अभिनंदन्.त्रिवार अभिनंदन.
आपआपल्या आवडत्या कॉलेजमध्ये पहिल्या मेरीट लिस्टमध्ये नाव झळकलेल्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनपूर्वक अभिनंदन.
दोन दिवसांच्या टेंशन नंतर दुसर्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनपूर्वक अभिनंदन.
भारताला जिम्नास्टीक्स मध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर जेवढा आंनद होईल त्या शंभर कोटी भारतीयांच्या आनंदापेक्षा हा आनंद मोठा.
दोन याद्यांमधली मंडळी आता मॉलमध्ये खरेदीत मशगूल तर राहिलेल्या तिसर्या यादीत नाव लागण्याची वाट बघणार्यांची काळ्जीने बत्ती गूल.
वर्षानुवर्षे तोच तोच खेळ.
दहावीनंतर दैदिप्यमान करीयरची स्वप्ने बाळ्गणे आणि त्याची सांगड अमुकएक कॉलेजशी घातली जाणे हा काय हट्ट आहे हे मला कळत नाही.दहावीच्या मार्कांचा अकरावीच्या रा़क्षसानी पाडलेला फडशा हा नेहमी चा पायंडा.अकरावीचा राक्षस हा माझा कल्पनाविलास नसून एक अत्यंत कडवट सत्य आहे.एक बेस्टसेलर पुस्तक लिहूनही न संपणारा विषय आहे.
दहावीचे मार्क आणि पुढच्या करीयरची स्वप्ने हा तर प्रबंधाचा विषय आहे.दहावी पास , साधारण ८० टक्के मार्क मिळवलेल्या मुलाला विचारा पुढे काय? लगेच एरॉनॉटीकल इंजीनियरींग कार्डीऑलॉजीस्ट, आय. आय. टी चे उत्तर येते.एरॉनॉटीकल चे स्पेलींगसुद्धा लिहीता येत नाही हा भाग अलाहिदा.
किंबहुना असं उत्तर नाही दिलं तर आपण काहीतरी गुन्हा करत आहोत ही भावना.
बारावीच्या सीइटी नंतर ठरवीन हे ऊत्तर शंभरातून एखादाच विद्यार्थी देतो.
स्वप्ने बघणे हा गुन्हा नाही ती उघड्या डोळ्यांनी बघावी.
अकरावीचा अत्यंत दुर्गम टप्पा पार करण्याआधीच गळ्यात आय. टी. इलेक्त्ट्रॉनीक्स, न्युरोलॉजीस्ट असे पट्टे बांधून घेणे अत्यंत घातक.
बर्याच घरात उसाची(यु.एस.ए.)स्वप्नरंजने आधीच सुरु झाली आहेत. आणि अकरावीचा चरक या उसाची चिपाडे करतो.
ह्या चरकात न सापडणारा बारावीत घवघवीत यश मिळवतो.
ज्यांना व्होकेशनल मिळालं नाही त्यांनी अश्रूपात करण्याची काही गरज नाही. व्होकेशनल हा पण एक गहन चर्चेचा विषय . त्याबद्दल बरेच गैरसमज दिसून येतात.
अकरावीला गुण उधळणार नसाल तर दहावीच्या गुणांना अर्थ.अकरावीला गुण उधळणं हा तर निसर्ग नियम आहे.आणि या नियमाला अपवाद ठरण्याची जिद्द बाळगली तर उत्तम करीयरची ठाम सुरुवात झाली असं समजायला नक्कीच हरकत नाही.
रामदास यांचे परत एकदा आभार मानून आज इथेच थांबतो.
अर्थात या विषयात आणखी जाणून घेण्यासाठी मला व्य. नी. पाठवायला काहीच हरकत नाही.
हा उंबरा ओलांडताना.
गाभा:
प्रतिक्रिया
12 Jul 2008 - 4:48 am | बबलु
बरोबर बोल्लात.
मन १५ वर्षे मागे गेलं. तीचं लिस्ट, लिस्टमधिल नाव पाहुन झालेला आनंद.
११ वी , १२ वी चं टेंशन वाईट्च.
पण तुमचं हे म्हणणं काही पटलं नाहि बॉ..
स्वप्ने बघणे हा गुन्हा नाही ती उघड्या डोळ्यांनी बघावी.
माझ्या मते वेडी स्वप्ने बघणाराच पुढे काहितरि भव्य करु शकतो.....
पहा:-- जमशेटजि टाटा, ज्याक वेल्च, एडिसन, मित्तल, गेट्स, ई.
गांधी, मंडेला, लिंकन, चर्चील, माओ, ई.
गॅलीलिओ, न्युटन, क्युरी, आईन्स्ताईन, ई.
12 Jul 2008 - 2:59 pm | रामदास
सुरुवात.आणखी लेखनाची वाट पाहतो आहे.
12 Jul 2008 - 3:09 pm | विनायक प्रभू
वेडी स्वप्ने बघणारी वरील माणसे नियमाला अपवाद. देव करो आधुनीक विश्वामित्र असेच अपवाद ठरोत.