नमस्कार मंडळी,
आज आवताण घेऊन आलोय. गावच्या जत्रेचं. सालाबादप्रमाणे याहि वर्षी वज्रेश्वरी (मौजे वडवली) यात्रा सुरु होतेय. यात्रा दोन दिवसांचि आहे. ९ मे ते १० मे. शनिवारी (११ मे) सकाळि बाजार ऊठायला लागतो. आम्हि त्याला फुटकी जत्रा म्हणतो. या फुटक्या जत्रेची एक न्यारीच बात आहे. कमी पैशात फिट्ट मजा म्हणजे फुटकी जत्रा. आदल्या दिवशी १०० रुपड्यांत मिळणारी गोष्ट अगदि ३०-४० रुपयांत. हां आता काल-परवा पर्यंत आमचे हिशेब (यात्रेचे बजेट) १०-२० रुपयांपुढे जात नव्हते म्हणा. तीन चार महिने खाऊचे पैसे टिनपाटाच्या गल्ल्यात साठऊन यात्रेदिवशी ऐटित फोडला जाई. (हो! आमच्या कडे self manufactured पावडरिच्या वा तत्सम डब्ब्यांचे गल्ले बनत असत ... काश पेटंट घेतले असते ... आणि हो गल्लेच बनत, पिगि बैंक नाहि.) मग जायदादीची मोजदाद होई. भावंडात त्यावरुन भांडणेहि होत. अर्रर्रर्र ... विषयांतर ... हे हे असं होतं बघा. गावचा विषय निघाला कि विषयांतर आलेच.
तर मी काय सांगत होतो, हां तर येत्या शुक्रवारी दि. १० मे रोजी रात्री बाराच्या ठोक्याला पालखी सोहळा सुरु होईल. दुसर्या दिवशी पहाटे पाचपर्यंत पालखी परत घरात जाईल. मग पुढिल दोन दिवस देविच्या विश्रांतीचे. दोन दिवस दर्शन बंद. मग काय म्हणताय मंडळि. येताय न? शक्य असल्यास देवी दर्शनाचा लाभ आणि यात्रेचा आनंद घ्यावा. आग्रहाचे निमंत्रण म्हणा हवे तर. बाकि रहाण्याची अन खाण्यापिण्याची सोय आमची.
अवांतरः लहान असतांना आज्जी तिच्या काळच्या यात्रेच्या गमति-जमति सांगायची. सांगतांना जोडिला यात्रेतील मिठाई असायचिच. मग हळुच तिच्या पानातला एखादा मिठाईचा तुकडा माझ्या पानात यायचा. ती सांगायचि कि तीला तो मिठाईतला रंगीत-मऊ पदार्थ आणि खाजा आवडत नाहि, म्हणुन तुला देतेय. मला काहि केल्या कळायचे नाहि कि मला जे-जे पदार्थ आवडायचे ते तिला का नाहि आवडायचे! असो ... तर आज्जीच्या म्हणण्याप्रमाणे यात्रेत तिन प्रकारचे लोक येतात, हौशे-गवशे-नवशे. आमच्यासाठि मात्र क़ोणत्याहि प्रकारचे लोक असुदेत, यात्रा मात्र असाविच. नव्हे दरवर्षीपेक्षाहि अधिक जोरकस अन मजेदार. त्या निमित्ताने चार दिवस थोडि करमणुक होई. गोडधोड खाऊ मिळे. पुर्वी यात्रेत तमाशे यायचे, जादुचे प्रयोग असायचे, अजुन कसले-कसले खेळ यायचे. जाम मज्जा यायचि. खुप सार्या बैलगाड्या भरुन माणसे यायचि. मग यात्रा पाच-सात दिवस सरायचिच नाहि. आता वाहाने खुप झालित आणि वेळ झालाय कमी. पब्लिक आलं कि चार-पाच तासांत परतण्याची भाषा चालु होते. पण तुम्हि रहायचा बेत आखुनच या. खरंच खुप मजा येईल.
माझा पत्ता: विकास, मु. अकलोली, पो. वज्रेश्वरी, ९२२२४१७२६९/०२५२२२६१२८२
(भटकंती सदरात असला लेख वजा आमंत्रण चालेल का? नसल्यास कोणत्या सदरात असावे?)
प्रतिक्रिया
7 May 2013 - 12:05 pm | मुक्त विहारि
डोंबिवली हून कसे यायचे?
7 May 2013 - 12:37 pm | वसईचे किल्लेदार
स्वतःचे वाहन असल्यास
डोंबिवली --> कल्याण --> भिवंडी --> अंबाडी --> वज्रेश्वरी
नाहितर डोंबिवली --> कल्याण (बसने) --> वज्रेश्वरी
8 May 2013 - 6:16 pm | मुक्त विहारि
म्हणजे.. गरम पाण्याची कुंडे असलेले...
7 May 2013 - 12:07 pm | यशोधरा
देवीला नमस्कार कळवा. जमल्यास इथे यात्रेचे फोटो टाका.
7 May 2013 - 12:11 pm | वेताळ
अश्या दोन जत्रा असतात.
7 May 2013 - 12:15 pm | नि३सोलपुरकर
आमचाही नमस्कार कळवा हो देवीला किल्लेदार साहेब्,यात्रेचे फोटो आणी वर्णन जरुर टाका मिपावर बरं का.
आवताणा बद्द्ल धन्यवाद.
8 May 2013 - 5:57 pm | स्पंदना
किती मनापासुन आवतन आहे किल्लेदार (वसईचे).
यायला नक्की आवडेल. आपल्या मिपासाठी साकड घाला हो देवाला. ग्रहण लागलय ते सुटु दे म्हणाव.
8 May 2013 - 6:10 pm | प्यारे१
>>>>आपल्या मिपासाठी साकड घाला हो देवाला. ग्रहण लागलय ते सुटु दे म्हणाव.
तुला काय सुपारी मिळालीय धागा शतकी करायची?
का मुख्यमंत्री बनायचंय महाराष्ट्राचं? ऑ?
ग्रहण? मिपाला? कसलं?
वसईकर, देवीला आमचा नमस्कार सांगा.
8 May 2013 - 6:21 pm | सूड
>>ग्रहण लागलय ते सुटु दे म्हणाव.
ग्रहणाचा वेधारंभ वैगरे सगळ्यांच्या लक्षात आला म्हणजे फार त्रास व्हायचा नाही. सगळ्यांच्या खात्यात आंतरजालीय तुळशीपत्रं टाकून ठेवा. ;)
8 May 2013 - 6:12 pm | पैसा
अगदी मनापासून दिलेलं आवतण पोचलं. एवढ्या लांब येता येणार नाही. पण जत्रा झाली की तिचा वृत्तांत आणि फोटो जरूर टाका इथे. आणि सगळ्या मिपाकरांच्या वतीने एक जादाचा नमस्कार देवीला घालाच! पुढच्या वृत्तांताची वाट बघते!
9 May 2013 - 4:24 am | ढालगज भवानी
डोळ्यात पाणी आले. :) आज्ज्या /आया या अशाच!!
10 May 2013 - 9:35 pm | रुस्तम
+१