(जयपूर घटनेच्या निमित्ताने) अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी काय करता येईल?

Pearl's picture
Pearl in काथ्याकूट
3 May 2013 - 8:31 pm
गाभा: 

जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
जयपूर अपघात

पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही अरेरे मदतीसाठी थांबत नाही.

अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं. अपघात नुसत्या पहाणार्‍या लोकांना कमीत कमी काय करता आलं असतं.
आपल्या देशात, माणसात, समाजात खरचं इतकी नकारात्मकता आली आहे का. की काहीही करायला माणूस घाबरतो आहे. का घाबरतो आहे आपण काही अ‍ॅक्शन घ्यायला, पोलिंसाची इतकी भीती आहे का जनमानसात की मदत करायला कोणीचं तयार नाही. पोलिस जे जनतेचे मित्र हवेत, त्यांची का अशी प्रतिमा झाली आहे.
या प्रसंगात जवळच्या हॉस्पिटलला पण कोणीच कळवलं नसेल का. असे प्रसंग आसपास घडले तर काय करता येइल याबद्दल काही उपाय सुचताहेत का.

मला सुचणारे उपायः
शॉर्ट टर्म उपायः
१) अ‍ॅट लिस्ट जवळच्या हॉस्पिटलला कळवायला हवं. पोलिसांना कळवायला हवं.
२) हा अपघात पाहून ज्या लोकांना मदत करावीशी वाटली, पण पोलिसांची भीती वाटते आहे, त्यांनी त्या माणसाजवळ थांबून बाकी बघणार्‍या लोकांना आवाहन करायचं की मला याला मदत करायची आहे, आणखी कोणाकोणाला मदत करायची आहे त्यांनी कृपया या. प्लीज लवकर या. मग असे ४-५ जण आले तरी सगळ्यांनी मिळून पटापटा स्टेप्स घेता येतील.
३) सर्वांनी प्रमुख पोलिस स्टेशन्सचे, ओळखीच्या पोलिसांचे, अ‍ॅम्ब्यूलन्सचे, अक्सिडेंट हॉस्पिटल्सचे नंबर जवळ बाळगावेत. म्हणजे ऐनवेळी कॉल करायला हे नंबर हाताशी असतील.

लाँग टर्म उपायः
पोलिसमित्र असा काहीतरी उपक्रम हवा असं वाटतं आहे, ज्यायोगे आपल्यासमोर अपघात घडला तर मला मदत करायची आहे अशा लोकांना विनासायास मदत करता आली पाहिजे. त्यासाठी एक प्रोसेस हवी. अशा लोकांनी आपल्या जवळच्या पोलिस चौकीमध्ये आपलं नाव रेजिस्टर करावं, त्यांना १ आय-डी कार्ड मिळावे लायसन्सच्या आकाराचे. अशा लोकांना थोडं फर्स्ट एडचं ट्रेनिंग मिळावं. या लोकांना आपण पोलिस मित्र म्हणू.
तर अशा लोकांकडे एक प्रिंटेड डायरी असावी ज्यामध्ये शहरातल्या काही प्रमुख पोलिस स्टेशनचे नंबर्स, हॉस्पिटल्सचे नंबर्स असावेत. या पोलिस मित्रांनी आपल्या ओळखीच्या १-२ अन्य पोलिस मित्रांचे नंबर जवळ बाळगावेत. अशी जर मदत करू इच्छिणार्‍या लोकांची चेन आपण बांधली तर अपघातग्रस्तांना मदत करायला लोकांना भय रहाणार नाही असं वाटतं. या प्रोसेससाठी इच्छूकांना माफक शुल्क आकारले जावे. उदा. ५० रू. इ.
यासंबंधी अजून काही प्रश्न ज्याची उत्तरे मला सुचत नाहियेत ते असे की,
१) या प्रोसेसचा पोलिसांवर जास्त भार येऊ नये म्हणून काय करावे.
२) ही प्रोसेस राबवण्यासाठी जो काही खर्च येइल, ट्र्निंगसाठी जो खर्च येइल त्याची अ‍ॅरेंजमेंट कशी असावी? त्या परिसरात काम करणार्‍या सामाजिक संस्थेने हा भार हलका करावा का. की स्थानिक नगरसेवकाने वॉर्ड निधी वगैरे असे काही असल्यास त्यातून हा खर्च करावा.
३) या लोकांची यादी मेंटेन करणे, अपडेट करणे हे कसं साधायचं, कोणाची जबाबदारी.
४) या पोलिस मित्रांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत मदत करायचे. पण त्यांच्यावर सक्ती असता कामा नये. नाहीतर मदत करणार्‍यांवर परत कायद्याचा बडगा नको.

तुम्हाला यावर उपाय सुचताहेत का, वरील योजनेसंबंधी प्रश्नांची काही उत्तरे मिळताहेत का? ही योजना कदाचित फिजिबल नसेलही, तर अजून दुसर्‍या काही योजना सुचताहेत का?

आणि सगळ्यात महत्त्वाचं,
ज्या लोकांनी अशी अपघातात सापडलेल्या लोकांची मदत केली आहे त्यांचे पॉसिटीव्ह, निगेटीव्ह अनुभव त्यांनी शेअर करा, त्यांनी अनुभवाच्या चार गोष्टी सांगा ज्या इतरांना उपयोगी ठरतील. जे स्वत: दुर्दैवाने अपघाताच्या अनुभवातून गेले आहेत, त्यांनी त्यांना त्यावेळी काय आधार/मदत हवा होता हे सांगा ज्याचा मदत करू इच्छिणार्‍या लोकांना फायदा होईल.

प्रतिक्रिया

पैसा's picture

3 May 2013 - 8:57 pm | पैसा

अपघातग्रस्ताला पोलीस येण्याची वाट न पाहता वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे असे स्पष्ट आदेश आहेत. यासाठी पुढील सरकारी पत्र गुगलवर शोधल्यावर सहज उपलब्ध झाले. गरज आहे ती लोकांपर्यंत ही माहिती पोचवण्याची. http://www.indiairf.com/Supreme%20Court%20Directive.pdf

अभ्या..'s picture

4 May 2013 - 9:18 pm | अभ्या..

पर्लतै तुमच्या संवेदनशीलतेला दाद द्यायलाच हवी.
नुकतीच खरडफळ्यावर ह्याच विषयावर आपल्या श्री. पेठकरकाकांनी ह्याच चर्चेचा विषय छान चालवला होता. दादा कोंडके, प्यारे, अशा बर्‍याच सदस्यांनी चांगली माहीती शेअर केली होती.
तुम्हाला वाटतेय ती आदर्श व्यवस्था आहे पण अशा व्यवस्था सुध्दा मोडीत काढायचे इतके प्रकार मी डोळ्याने पाहीले आहेत की अ‍ॅक्सीडेंट पाहताच चक्क निघूनच जावे वाटते.
हायवेवरच्या लहान सहान गावात सुध्दा आजकाल अ‍ॅक्सीडेंट म्हणजे लोकांना पर्वणी वाटते. पहिल्या अर्ध्या तासात काही स्वयंसेवक जखमीना बाहेर काढता काढता ढापण्यासारखे काही आहे का पाहात असतात. एका तासात गाडीतला टेप, वस्तू अगदी टायर्सुध्दा गायब होतात. त्यात परत दोन गाड्याची टक्कर असेल तर येणारे मांडवली बादशहा वेगळेच. गावचे टप्पोरी टाकून दिलेले लोक असल्या अपघातात मांडवली करतात. परराज्यातला ट्रक/वाहन असेल तर विचारायलाच नको. हे सगळे पार पडल्यावर पोलीस येतात. ते तरी काय करणार जास्त. त्यामुळे पोलीसमित्र या संकल्पनेच्या आधी असे लोक गावोगावी तयार झालेत. त्यांना काय करावे, कसे करावे याचे पूरेपूर ज्ञान असते फक्त मोह आडवा येतो.
अर्थात मी एका अपघातात सापडलो होतो त्यावेळी फक्त अ‍ॅम्ब्युलन्स वेळेवर मिळाल्या नाहीत. रस्त्यावरुन जाणार्‍या एका भल्या माणसाने मी बेशुध्द असताना ट्रीपलसीट १५ कीमी गावापर्यंत सोडले होते. माझ्या मोबाइलवरुन लास्ट डायल्ड कॉलना फोन करुन कळवले होते. इतर जखमींची पण प्रायव्हेट अ‍ॅम्ब्युलन्स्वाल्यांनी बरीच अडवणूक केली. :(

Pearl's picture

6 May 2013 - 3:46 pm | Pearl

@पैसा,
लिंकबद्दल धन्यवाद.

@अभ्या..
>>हायवेवरच्या लहान सहान गावात सुध्दा आजकाल अ‍ॅक्सीडेंट म्हणजे लोकांना पर्वणी वाटते. पहिल्या अर्ध्या तासात काही स्वयंसेवक जखमीना बाहेर काढता काढता ढापण्यासारखे काही आहे का पाहात असतात.>>
:-(

>>रस्त्यावरुन जाणार्‍या एका भल्या माणसाने मी बेशुध्द असताना ट्रीपलसीट १५ कीमी गावापर्यंत सोडले होते.>>
बरं झालं. बरेचदा लोक मदत करतात. नाही असं नाही.

पण तरी (जयपूर घटनेत) भर गर्दीच्या ठिकाणी एखाद्याला मदत मिळत नाही हे पाहून वाईट वाटलं होतं.

ब़जरबट्टू's picture

8 May 2013 - 11:06 am | ब़जरबट्टू

अगदी असाच घडलेला प्रसन्ग आठवला. मागल्या आठवड्यात एका गाडीचा अन्दाज न आल्यामुळे एक बाईकस्वार घसरुन पडला. डोळ्याजवळ जखम होउन वरेच रक्त जात होते. लागलीच आटो थाम्बवला लोकान्नी.. तर पुणेकर आटोकाका चा डायरेक्ट प्रश्न आला "तुम्ही लोक त्याला मदत करताय ते ठिक आहे, पण सोबत कोण येतेय ते पहिले सान्गा ".. कुणाचा आवाजच येईना..असे वाटले सगळी मदत षनभन्गुर आहे.... साहेब अडुन बसले.. त्याची चुक म्हणता येईल का ? खरेच आपली कमाई बुडवुन त्याला हि समाजसेवा परवडली असती का ? वरून कदाचित दवाखान्यातील त्रास त्याच्या मनात असावा....
स्वता मदत करावी म्हणुन एकाला सोबत घेउन कार मध्ये घेतला, तर येड बेशुध्दीमध्ये फक्त आम्हाला "म, ब" ची बाराखडी वाचत होते.. लागलीच अन्दाज आला, कुठले शेन्डेफळ आहे ते.... असो.. भरती केला.. कसलाही त्रास झाला नाही दवाखान्यात.... कदाचित कार्ट्याच्या गळ्यात झुलत असलेले नामवन्त कम्पनीचे कार्ड बरेच काही सान्गुन गेले असावे.....

नगरीनिरंजन's picture

9 May 2013 - 8:33 am | नगरीनिरंजन

विचार करताना जे वाटलं ते लिहीतोय. अवांतर वाटल्यास उडवले जावे.
अपघात झाल्यावर चटकन शे-पन्नास माणसं जमतात पण मदत करायला फारच क्वचित कोणीतरी पुढे येतं. माणसांना भीती वाटते. पोलिसांची, खर्च होण्याची, लुटले जाण्याची, वेळ जाण्याची, गैरसोय होण्याची, नको त्या झेंगटात अडकण्याची. सुखवस्तु माणसालाही ही सगळी भीती असते आणि वर भीती असते की आपले अंगवळणी पडलेले रोजचे रुटीन बदलण्याची, त्यातून काहीतरी विचित्र घडून अगदी जीव नाही तर सुखवस्तुपणा गमावण्याची.
जितके उत्पन्न जास्त तितकी भीती जास्त. अशा बघ्यांच्या गर्दीत आलिशान गाड्यांतले लोक कधी थांबलेले दिसणार नाहीत.
गर्दीतल्या प्रत्येकाला माहित असतं की ही वेळ आपल्यावरही येऊ शकते, कधीही येऊ शकते. पण सगळे नाईलाज असल्यासारखे रोज त्याच रस्त्याने धावत असतात. आपली जीवनपद्धती टिकवण्यासाठी, आपले रोजचे कंझम्प्शन टिकवण्यासाठी. मीही भयभीत आहे. पिरॅमिड बांधणार्‍या, रांगेत दगड वाहून नेणार्‍या मजुरासारखा. परवानगीशिवाय काम सोडून थोडावेळ इकडे तिकडे भटकलो तर चाबकाचे फटके पडतील असे वाटणारा. आपल्याला सुखवस्तुपणा देणार्‍या व्यवस्थेचा गुलाम झाल्यासारखा. आय हॅव टू मच टू लूज बाय नॉट ओबेईंग द सीस्टिम.
मोस्लोच्या उतरंडीवर स्वायत्तता सगळ्यात शेवटी येते पण आपल्या व्यवस्थेत कितीही संपन्नता मिळवली तरी स्वायत्तता हे एक मृगजळच राहते. व्यवस्थेत असलेले माझे स्थान टिकवण्यासाठी वाढत्या लोकसंख्येशी स्पर्धा करणे आणि वरचे स्थान मिळवण्यासाठी घर, गाडी, मुले-बाळे हे सुखाचे ठरलेले टप्पे गाठून त्याच स्पर्धेत आणखी तेल ओतणे हे अविरत केल्याशिवाय धडगत नाही असा ठाम विश्वास असलेला. स्वायत्ततेचा विचार तर मनातही येत नाही. मी आधुनिक गरिबीचा बळी आहे आणि भीतीने माझं हृदय बर्फासारखं थंड झालं आहे.
रस्त्यावर अपघात होतो, लोक थांबतात, बघतात, कोणीतरी जखमींना/मृतांना उचलून नेतो, लोक पुढे चालू लागतात. तेवढ्या वेळात तिथे नसलेले शेकडो लोक शोरूम मधून नव्या गाड्या घेऊन आनंदाने बाहेर पडतात.
दगड वाहून नेताना एखादा कोसळतो, रांग थोडावेळ विस्कळीत होते, रखवालदारीचे काम करणारे वेठबिगार त्याला उचलून नेतात आणि रांग पुढे चालू लागते. मी थांबून नुसता बघतो, कारण त्याला उचलणे माझे काम नाही. माझे काम आहे दगड वाहून नेणे आणि पिरॅमिड बांधणे.

यशोधन वाळिंबे's picture

12 May 2013 - 10:31 pm | यशोधन वाळिंबे

सर्वांनी प्रमुख पोलिस स्टेशन्सचे, ओळखीच्या पोलिसांचे, अ‍ॅम्ब्यूलन्सचे, अक्सिडेंट हॉस्पिटल्सचे नंबर जवळ बाळगावेत. म्हणजे ऐनवेळी कॉल करायला हे नंबर हाताशी असतील.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमणध्वनी मध्ये महत्वाचे नंबर जतन करताना कोणत्याही महत्वाच्या नंबरच्या नावामागे 'आय.सी.ई' असा कोड वापरला जातो. याचा अर्थ असा आहे कि 'इन केस ऑफ इमर्जन्सी'

उदा -
ICE Police - १००
ICE Home - १२३४
ICE Fire briged - १२३४
ICE Blood Bank - १२३४

दुर्दैवाने जर एखाद्या वेळी अपघात झाला तर इतरांनी जर भ्रमणध्वनी पहिला तर असे नंबर एकाच ठिकाणी सापडतात.