काश्मिरी फिरनी (फिरुन)

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
24 Apr 2013 - 5:57 am

काश्मिरी फिरनी वुईथ लिटल ट्विस्ट :)

.

साहित्यः

१ लिटर दूध
१/४ वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून २-३ तास भिजवणे
१/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१०-१२ भिजवलेले बदाम, सालं काढून
१ टीस्पून वेलचीपूड
पिस्त्याचे काप व केशर सजावटीसाठी
खायचा चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
रोझ एसेन्स किंवा रोझ वॉटर (गुलाबजल) असल्यास जरूर घाला, माझ्याकडे नव्हते म्हणून नाही घातले.

.

पाकृ:

भिजवलेले तांदूळ व बदाम एकत्र मिक्सरला लावून भरडसर वाटून घ्यावे.
दुध उकळायला ठेवावे, दुधाला उकळी आली की त्यात भरडसर वाटलेली तांदूळ-बदामाची पेस्ट घालावी.
मध्यम आचेवर तांदूळ शिजेपर्यंत सतत ढवळत रहावे.
दुध हळू-हळू दाट होऊ लागेल.
त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत ढवळावे.
दुध कस्टर्ड्सारखे दाट झाली की त्यात वेलचीपूड, पिस्ते व केशर घालून मिक्स करावे व गॅस बंद करावा.
तयार फिरनी वेगळ्या भांड्यात काढून ती रुम टेंपरेचरला थंड होऊ द्यावी.

.

पारंपारीक पद्धतीने सर्व्ह करायची असल्यास मातीच्या बाऊलमध्ये फिरनी घ्यावी,त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पेरावे, केशर घालावे व वरून चांदीचा वर्ख लावावा.
फिरनी थंडच सर्व्ह करावी.

.

पण मी इथे वेगळ्या पद्धतीने फिरनी सर्व्ह केली आहे. सर्व्हींग ग्लास मध्ये थोडी फिरनी घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवली. स्ट्रॉबेरी जेलीच्या पाकीटावर दिलेल्या सुचनेप्रमाणे जेली बनवून घेतली. ती हलकी कोमट असतानाच थंड फिरनीवर ओतली व पुन्हा फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवली. सेट झालेल्या जेलीवर व्हिप्ड क्रीम व पिस्त्याने सजावट करुन सर्व्ह केली.

आपण नेहमी फ्रुट कस्टर्ड बरोबर किंवा फ्रुट सॅलॅड वुईथ आयस्क्रीमबरोबर जेली सर्व्ह करतो, पण फिरनीबरोबर ही जेलीचे कॉम्बिनेशन सुरेख लागले :)

.

प्रतिक्रिया

सुरेख रेसिपी. क्यूटच दिसतीये फिरनी. स्ट्रॉबेरी जेलीमुळे आकर्षक आलेत फोटू. आता मात्र मी हा पदार्थ करणारच! अन्नपूर्णे, तुझे कौतुक करण्यासाठी नवे शब्द शोधायला हवेत!

स्पंदना's picture

24 Apr 2013 - 8:00 am | स्पंदना

हे घरात बनवलय? शक्यच नाही.
मी हे अस काही इतक आकर्षक घरात बनवल तर घरातले एका सुरात " हम कहाँ है?" असं विचारतील.

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2013 - 8:31 am | प्रभाकर पेठकर

फिरनी मस्तं दिसते आहे. पण, मला पारंपारिक पद्धतीने सादर केलेली, ती मातीच्या कटोरीतलीच आवडते. असो.

सानिकास्वप्निल's picture

24 Apr 2013 - 8:16 pm | सानिकास्वप्निल

फिरनी मस्तं दिसते आहे. पण, मला पारंपारिक पद्धतीने सादर केलेली, ती मातीच्या कटोरीतलीच आवडते. असो.

अगदी बरोबर पण काही वेळेला एखादा पदार्थ वेगळ्या पध्दतीने सादर्/सर्व्ह केला तर त्याचा स्वाद आणखीन छान खुलून येतो असे मला वाटते. लहान तोंडी मोठा घास घेतेय राग मानू नये....आता नेहमीच्या पध्दतीच्या आमरसात व्हिप्ड क्रिम घालून अगदी वेगळी, उत्कृष्ट पाककृती तुम्ही दिलीत ,नक्कीच त्याचा आस्वाद घेताना आनंद द्विगुणीत होईल ह्यात शंका अजिबातच नाही तसेच ह्या पदार्थाचे आहे साध्याशा दिसणार्‍या फिरनीला एक नवं रुप दिलय इतकेच. मला दोन्ही प्रकारे आवडते....शेवटी प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे बनवावी :)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

प्रभाकर पेठकर's picture

25 Apr 2013 - 7:48 pm | प्रभाकर पेठकर

साध्याशा दिसणार्‍या फिरनीला एक नवं रुप दिलय इतकेच.

सहमत आहे.

आमरसात व्हिप्ड क्रिम मिसळून सादर केलेल्या पाककृतीसही अनेक नापसंतीदर्शक प्रतिसाद आले आहेतच की. जसे, आमरस मिक्सर मधून फिरविणे किंवा आमरसात कांही मिसळणे अनेकांना पसंद नाही. चालायचेच. व्यक्ती तितक्या प्रकृती.

'लहान तोंडी मोठा घास' वगैरे काही नाही. मिपावर सर्व सारखे आहेत. उगीच अशा कांही विधानांनी मला संकोचवू नका आणि मखरातही बसवू नका.

जयंत कुलकर्णी's picture

24 Apr 2013 - 9:18 am | जयंत कुलकर्णी

सनिका तुम्ही या ज्या पाककृती करता त्या चांगल्या तर असतातत पण आपण पर्फेक्शनीस्ट आहात हेही यातून कळते. एकदा, एखाद्यावेळी असे करणे हा उत्साहाचा भाग असू शकतो पण कायम सातत्याने अशा पाककृती करणे व त्याचे एवढे चांगले सादरीकरण सातत्याने करणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Apr 2013 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

मालोजीराव's picture

24 Apr 2013 - 2:15 pm | मालोजीराव

.

हेच म्हणतो..

उगा काहितरीच's picture

25 Apr 2013 - 1:45 am | उगा काहितरीच

+1

रुस्तम's picture

25 Apr 2013 - 6:35 am | रुस्तम

+१

मैत्र's picture

25 Apr 2013 - 12:45 pm | मैत्र

जयंत काका, बहुतेक मिपाकरांच्या मनातलं तुम्ही एकदम नेमक्या शब्दांत लिहिलंत..
केवळ परफेक्शन.. आणि त्या पाककृतींइतकंच जीवघेणं छायाचित्रण.. दर वेळी.. शेवटचा फोटो मग तो गोड पदार्थ असो, स्नॅक आयटेम, मसालेदार सामिष आहार किंवा अगदी परंपरागत शेवटचा फोटो म्हणजे केवळ अप्रतिम!!
दंडवत सानिकातै --/\--

सुधीर's picture

25 Apr 2013 - 2:27 pm | सुधीर

अगदी खर आहे.

निवेदिता-ताई's picture

26 Apr 2013 - 1:42 pm | निवेदिता-ताई

खरचच अन्नपुर्णा आहेस तू...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

यशोधरा's picture

24 Apr 2013 - 9:21 am | यशोधरा

मस्त दिसते आहे फिरनी.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2013 - 9:56 am | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआ...........!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink022.gif

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Apr 2013 - 10:13 am | लॉरी टांगटूंगकर

फोटू काळजात घुसले !!! कमाल दिसतंय.

पैसा's picture

24 Apr 2013 - 10:14 am | पैसा

पण मी इतके बारीक नक्षीकाम करत बसण्यापेक्षा तू भारतात कधी येणारेस त्याची वाट बघीन.

अप्रतिम सादरीकरण...सानिकाताई...तुमच्या पाककृती मी नेहमीच लक्ष देऊन वाचते..थोड्या हटके असतात..पण जबराट असतात...असह्य अश्या उन्हाळ्यात ही फिरनी म्हणजे काश्मीर दर्शनच...सुरेख

सुहास झेले's picture

24 Apr 2013 - 12:05 pm | सुहास झेले

आई आई गं..... फिरनी ही लागली जीवा ;-)

जबरदस्त पाककृती आणि सादरीकरणाबद्दल आता बोलायला शब्द नाहीत ... :) :)

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2013 - 12:10 pm | पिलीयन रायडर

रोझ एसेन्स किंवा रोझ वॉटर (गुलाबजल) असल्यास जरूर घाला, माझ्याकडे नव्हते म्हणून नाही घातले.

हे शक्य नाही.. तुमच्या कडे नाही?? असं कसं होईल गुरुमाते..!!
(आज पासुन तुम्हाला गुरुमाते च म्हणणार..!! आपला फोटो पाठवुन द्यावा.. देवघरात अन्नपुर्णेच्या बाजुला ठेवण्यात येईल..)

Mrunalini's picture

24 Apr 2013 - 12:28 pm | Mrunalini

अ प्र ति म.... :)

गणपा's picture

24 Apr 2013 - 12:58 pm | गणपा

पुन्हा तेच, तुमचं कवतीक करायला माझी शब्दसंपदा थिटी पडते.
शेवटचा फोटो अप्रतिम आहे.
पण तरीही कुल्हडमधली थंडगार फिरनी बेस्ट.

दिपक.कुवेत's picture

24 Apr 2013 - 1:12 pm | दिपक.कुवेत

मला फिरनी दिसलीच नाहि, फोटो पाहिलेच नाहि आणि जळजळ तर त्याहुन झाली नाहि. पन हाय हात फिरुन फिरुन माउस कडे वळतोच आणि पहिलाच फोटो पाहुन जीव कासावीस होतो. मी हे नक्कि बनवणार.....

मातीच्या कटोर्‍यातली उजवी वाटली.

बाळ सप्रे's picture

24 Apr 2013 - 1:54 pm | बाळ सप्रे

***** शेफ !!

स्मिता.'s picture

24 Apr 2013 - 2:00 pm | स्मिता.

फिरनी फारशी आवडत नाही मात्र सादरीकरणाला ५ तारे!!

इशा१२३'s picture

24 Apr 2013 - 2:24 pm | इशा१२३

रंगसंगती सुरेखच!

धनुअमिता's picture

24 Apr 2013 - 3:43 pm | धनुअमिता

अप्रतिम..... सुरेख........मस्त शब्द संपले.............

प्यारे१'s picture

24 Apr 2013 - 5:17 pm | प्यारे१

काय काकू बाईसारखं किचन एके किचन?
स्त्रीपुरुष समानतेच्या या युगात एक शिकलेली मुलगी अशी स्वैपाक घरात अडकून पडते?????????
छ्या!
तुला बंड नाही करावंसं वाटत?????????
एक काम कर.
तू दोन शिफ्ट मध्ये नोकरी कर.
स्वैपाकघरात (मराठीत किचनमध्ये) जाण्याची अज्जिबात एनर्जी राहिली नाय पायजे! बाहेरुन मागवायचं सगळं. काय??????????

- इनो संपलेला प्यारे

वाह अप्रतिम फोटो आणि रेसीपी. नेहमीप्रमाणेच :)

कच्ची कैरी's picture

24 Apr 2013 - 8:35 pm | कच्ची कैरी

अप्रतिम !!!! दुसरा शब्दच नाहीयेमाझ्याकद्डे . ट्विस्ट फारच आवडला :)

अर्धवटराव's picture

24 Apr 2013 - 8:41 pm | अर्धवटराव

कसली भारी दिसतेय रेसीपी. जेलीचं अस्तर तर लाजवाब आयडीया.

अर्धवटराव

नको रे मना मोह हा लाळगाळी! :)

बॅटमॅन's picture

25 Apr 2013 - 2:23 am | बॅटमॅन

+११११११११११११११११११११.

नेमके हेच म्हणतो!!!!!

मोदक's picture

24 Apr 2013 - 9:01 pm | मोदक

__/\__

सस्नेह's picture

24 Apr 2013 - 9:14 pm | सस्नेह

बघायला दोन्हीहि आवडल्या. पण खायला मातीच्या भांड्यातलीच आवडेल !

मुक्त विहारि's picture

25 Apr 2013 - 1:17 am | मुक्त विहारि

मी हे बघून न बघितल्या सारखे करत होतो...

पण शेवटी धागा उघडलाच..

धाग्याने निराशा नाही केली...

आता तुम्ही एकच काम करा..

जरा एक ४/५ दिवस कुठलीही पा.क्रु. टाकू नका.. नाही त्याचे काय आहे की सध्या मी घरापासून फार दूर राहतो.. हे असे काही बघीतले तर जीव फार कासावीस होतो... थोडी आमची पण काळजी घ्या..

सुमीत भातखंडे's picture

25 Apr 2013 - 11:41 am | सुमीत भातखंडे

अशक्य फोटू आहेत...लाजवाब

हे फिरनी प्रकरण अपेक्षेपेक्षा सोवे (वाचून तरी) वाटते आहे.
नक्की करून बघेन

गौरीबाई गोवेकर's picture

25 Apr 2013 - 2:11 pm | गौरीबाई गोवेकर

भिजवलेले तांदूळ व बदाम एकत्र मिक्सरला लावून भरडसर वाटून घ्यावे.

भरडसर म्हणजे किती भरड वाटायचे? रवा असतो तेवढे की अजून बारीक/जाड ?

सानिकास्वप्निल's picture

26 Apr 2013 - 4:08 pm | सानिकास्वप्निल

साधारण तांदळाच्या खीरीसाठी वाटतो तसे किंवा तांदळाच्या रव्याइतके बारीक :)

अनन्न्या's picture

26 Apr 2013 - 11:23 am | अनन्न्या

सानिका कशा काय सुचतात या कल्पना तुला? झकास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!

जयवी's picture

28 Apr 2013 - 1:06 am | जयवी

जियो जानेमन...... :)
जबरी !!

प्यारे१'s picture

28 Apr 2013 - 1:10 am | प्यारे१

जयवीतै ला अशा प्रकारे अभिव्यक्त (हळहळलो एकदम ;)) व्हायला (मुळात प्रतिसाद दिला हे काय कमी असं कोण म्हणतोय रे तो?) भाग पाडणार्‍या मिपा गृहिणी सौ. सानिकातै स्वप्निलराव ह्यांना आमच्या मंडळातर्फे खण नारळ. :)

शिल्पा ब's picture

28 Apr 2013 - 9:40 am | शिल्पा ब

माझ्या लेकीने आताच फोटो पाहीला अन "मला पण पैजे" सुरु झालं. उदयाच करेन.

स्नेधा's picture

14 Jun 2013 - 10:47 pm | स्नेधा

सानिका ताई, तुमच्या रेसिपीज तर झकासच असतात पण शेवटचे फोटो म्हणजे आहा... :)
मी आजच मिपा वर आले पण मिपा आधी पासून वाचत होते आणि तुमच्या रेसिपीज सुद्धा रेफर करत होते [आईला बनवायला सांगण्यासाठी);-)].
आणि फोटो बद्दल काय बोलायच,
आमच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात होते पण डोळ्यांचं पोट मात्र एकदम खुश होऊन जातं.
तुमच्या सगळ्या रेसिपीज साठी धन्यवाद :)