मनुष्यप्राणी हा मुलतः शाकाहारीच

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
9 Jul 2008 - 9:09 pm
गाभा: 

मनुष्याच्या शरिराकडे नीट लक्ष देऊन पाहिल्यावर,एक गोष्ट निश्चीत लक्षात येईल की मांसाहारी होण्यास मनुष्य परिस्थितिनुसार उद्युक्त झाला असावा.कारण मनुष्य शाकाहारीच आहे.माझ्या पुढील चर्चेतून मला वाटतं, तसे मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे तुमच्या लक्षात येईल.तसंच माणसाला निसर्गाने (किंवा वाटल्यास देवाने म्हणा) अविरत बुद्धिचातुर्य दिल्याने,गरजेनुसार तो आपल्या खाण्याच्या संवयीत बदल करीत गेला असावा.
मनुष्याचे बुद्धिचातुर्य आणि त्याचा वापर हे "शाप की वरदान"ह्यावर चर्चा करायला निराळा विषय घेऊन लिहावं लागेल,पण तुर्तास एव्हडंच म्हणता येईल की ज्या ज्या वेळी माणसाने आपलं बुद्धिचातुर्य निसर्गाशी दोन हात करण्यासाठी वापरलं त्यावेळी कालांतराने त्याचे परिणाम त्याच्या अधोगतीच झाला आहे.ह्याची खूप उदाहरणं देता येतील.
मांसाहारी(मासेहारी नव्हे) होण्यास त्याने असाच निसर्गाशी आपल्या शरीराचा आणि त्याच्या क्षमतेचा विचार न करता घेतलेला निर्णय असावा असं मला वाटतं.मांस खाण्यास उद्युक्त होण्याची कारणे काही असोत तसे करण्याने पुढे होणारा अनर्थ काय असावा याचे ध्यान त्याला राहीलं नसावं नाहीपेक्षा कॅन्सर, विषेशतः कोलन कॅन्सर,आंतड्याचे रोग,ओबीसीटी,पोटाचे रोग आणि असले अन्य बरेच प्रकारचे रोग आज पाश्चिमात्य देशात उद्भभवत असल्याचे पाहून माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यावर गंभीर चर्चा जी होत आहे,त्यावरून असं दिसून येईल की आता बरेचसे so called expert सांगू लागले आहेत की "बाबानो,शाकाहार घ्या."
निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टी मधे वनसृष्टी आणि जीवसृष्टी असे दोन ठोबळ group दिसून येतील.वनसृष्टीलापण जीव असतो.तिचं बीज असतं,ते उगवतं,वाढतं,त्याला वाढताना ऊन,पाऊस,हवेची जरुरी लागते.झाड लहानाचं मोठं होतं.त्याला फळं लागतात,त्यातून परत बीजं तयार होतात, झाड वाढतं,म्हातारं होतं,सुकतं,रोगही होतात आणि मरतं पण.
अगदी असंच जीव सृष्टीचं होतं.फरक एव्हडाच की जीवसृष्टीत जीवाला(काही अपवाद सोडल्यास)आवाज काढता येतो.म्हणजेच त्या जीवाला वाचा असते.माणसाला तर बोलतापण येतं.आणि दुसरा फरक म्हणजे जीवाला (काही अपवाद सोडल्यास) चालतापण येतं.ह्याचे फायदे तोटे परी परीने आहेत.ह्यावर मी एक गमतीदार कवितापण लिहीली आहे.ती अशी.

ईश्वराचे कोडे

म्हणे "वनसृष्टी" ईश्वराला
केलास तूं दुजा भाव
देवूनी वाचा अन
चाल "जीवसृष्टीला"

हंसला ईश्वर मनांत अपुल्या
म्हणे तो "वनसृष्टीला"
पस्तावलो मी वाटते मला
देऊन ते "जीवसृष्टीला"

एका बिजा पोटी तरुं कोटी
जन्म घेती सुमनें फळें
परी
वाचाळ होवूनी
केली "मानवानें"
सदैव भांडणे
दूर जावूनी विसरला
हा "मानव" अपुली मुळे

आता मुख्य मुद्याकडे वळल्यावर असं दिसून येईल की,ह्या जीवसृष्टीतपण निसर्गाने
दोन group केले आहेत १) शाकाहारी आणि २) मांसाहारी (ह्या जीवसृष्टीतले सरपटते जीव,तसेच किटक,आणि मासे ह्याना वगळून) वरील दोन groups चा
विचार केल्यास असं दिसून येईल की,हे चारपायाचे (गाई,म्हशी,कुत्रे,कोल्हे,वाघ,सिंह,बकऱ्या,डुकरं आणि माणूस(?)) माणसापुढे प्रश्न चिन्ह एव्हड्यासाठीच केलं की,असं म्हणतात माणूस ही माकडांची "अवलाद" आहे.तो पुढ्चे दोन हात आणि मागचे दोन पाय याचा वापर करून जमीनवरच चालायचा.(माकडा सारखा), पुढे काही कारणास्तव ,झाडावर कोण चढून वरची फ्ळं काढणार? जमिनीवरूनच पुढचे दोन हात वर करून मागच्या दोन पायावर उभं राहून जी काही फळं हाताला लागतील ती काढून खावी, (आळशीपणा?) असं करता,करता कणा सरळ करून उभा राहू लागला तो मग उभाच राहू लागला. आणि उभा होऊन चालू पण लागला.गम्मतीचा भाग सोडल्यास सांगायचं म्हणजे बुद्धिचातुर्याने गरजेनुसार तो उभा राहू लागला.
तर दोन पायाच्या"माणसाचा" अपवाद सोडल्यास, दोन पायाचे सर्व जीव निसर्गाने "पक्षी " म्हणून तयार केले.पक्षांच्या मांसाला पाढरं मांस (white meat) म्हणून संभोदतात,आणि चार पायाच्या जीवांचे मांस लाल मांस (Red meat)
असं संभोदतात.
तर मुख्य सांगण्याचा मुद्दा असा की,शाकाहारी आणि मांसाहारी ह्या चार पायांच्या जीवांचा (माणूस धरून) विचार केल्यास आणि निरखून न्याहळल्यास लक्षात येईल
की,
१) शाकाहारी जीव आपल्या ओठाने पाणी पितात.(गाय,म्हैस,घोडे,बकरी,हरण,ऊंदीर,घूशी,हत्ती(सोंडेने म्हणजेच जीभेने नव्हे) आणि मा-णू-स -प-ण-पि-तो) आणि मांसाहारी जीव आपल्या जीभेने पाणी पितात.(वाघ,सिंह,कुत्रा,मांजर,कोल्हे,वगैरे,वगैरे)
२) शाकाहारी जीवांचं आंतडं बरंच लांबीने मोठं असतं.(माणसाचे लहान आंतडं जवळ जवळ ३२ फूट असतं) म्हशीला तर दोन पोटे असतात.
असे करण्यात निसर्गाचा उद्देश असा असावा,पालापाचोळा खाणारा शाकाहारी जीव
बराच वेळ ते अन्न आंतड्यात ठेवू शकावा,(आंतड्याच्या लांबीमुळे)आणि शरिराच्या बाहेर पडे पर्यंत त्यातून पुरंपुर ज्यूस काढून शरिराच्या पोषणाला वापरला जावा.पालापाचोळा मांसा एव्हडा कुजून घाण होत नाही.आंतड्या विषयीच्या अनेक कारणातील हे एक कारण असावं.
आणि गम्मत पहा, माणूस सोडून ईतर कोणत्याही शाकाहारी जीवाच्या समोर,मांसाहार ठेवला तर तो हूंगून मान दुसरीकडे करतो.कारण ते न खाण्याची बुद्धि त्याला निसर्गाने दिली आहे किंवा असं म्हणा ते खाण्याची बुद्धि निसर्गाने त्याला
दिली नाही.माणूस मात्र जे समोर दिसेल ते खातो.गाय ही देवता मानून गाईची पूजा करणारे लोक जेव्हा पाश्चात्य देशात येतात आणि शाकाहारी असोत किंवा मांसाहारी असोत (गाय,म्हैस,डुकराचे मांस) कसलाही विचार न करता,तावमारून
खातात.(काही अपवाद असतील ही)
३)या उलट मांसाहारी जीवांचं आंतडं फारसं लांब नसतं.जेमतेम चार पाच फूट असतं.मांस पोटात जास्त वेळ राहिल्यास त्याची कुजण्याची प्रतीक्रिया चालूं होऊन नंतर त्याचा शरीराला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून निसर्गाचा हा उद्देश मांसाहारी जीवाना मोठं आंतडं न देण्याचा असावा.हे पण अनेक कारणातील एक कारण असावं.इथं पण ह्या मांसाहारी जीवा समोर पालापाचोळा आणून ठेवला तर तोही मान फिरवून दुर्लक्ष करतो.कारण ते न खाण्याची बुद्धि त्याला निसर्गाने दिली आहे किंवा असं म्हणा ते खाण्याची बुद्धि निसर्गाने त्याला दिली नाही.
हा झाला आंतड्यातील फरक.
४)आता दांतांचा विचार केल्यास असं दिसून येईल,मांसाहारी आणि शाकाहारी जीवांच्या दांताची रचना,ठेवण,आणि प्रकार,हे मांस आणि पाला चावण्याच्या अनुशंगाने दातांची निर्मीती झाली असावी.मोठ्मोठाले सुळे,कटर्स,दाढा आणि त्यांची ठेवण आणि आकार,तसेच जबडयाचा आकार हे निरखून पाहिल्यास खूप विचार करून निसर्गाने दातांचे डिझाईन केलं आहे असं दिसून येईल.
या दृष्टीकोनातून माणसाचे दांत, आंतडे,जबडा आणि ओठाने पाणी पिण्याचं त्याचं हे कार्य पाहून तो शाकाहारी गटात (group मधे) असण्याच्या संभवाची चांगलीच साक्ष देतो.
तेव्हा थोडक्यात सांगायचे झाल्यास,
अ)लांब आंतड(वीस पंचवीस फुटाच्या वर)असलेले जीव
ब)ओठाने(ओठ पाण्यात बुडवून)पाणी पिणारे जीव
क)दातांची ठेवण,जबडा, उपयुक्तता, पालापाचोळा खाण्याच्या दातांची क्षमता असलेले हे दांत वापरणारे जीव हे शाकाहारीच असावेत.
आणि
ड)छोटंसच आंतड(जेमतेम चार पांच फूट) असलेले जीव
ई) जीभेने (जीभ बाहेर काढून) पाणी पिणारे जीव
फ) दातांची ठेवण,जबडा,उपयुक्तता, मांस खाण्याच्या दातांची क्षमता असलेले हे दांत वापरणारे जीव हे मांसाहारीच असावेत.

मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही सामर्थ्य असताना,त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?

तेव्हां हे माणसा! विचार कर.केवळ बुद्धि आहे म्हणून निसर्गाविरूद्ध वाटेल ते प्रयोग करू नकोस बाबा,पुढच्या पिढीसाठी आणि आत्ता जगताना संभाळून जग.

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 9:17 pm | बेसनलाडू

स्मोक्ड् सॅल्मन,बोंबलाचं कालवण,पापलेटचं भुजणं,सोलकढीभात नि तळलेली कोलंबी,तिसर्‍या,बांगडे,कर्ली नि चिंबोर्‍या अशांच्या नुसत्या आठवणीनेच टपाटपा लाळ गळायला लागली,की लेखातले जीवशास्त्रीय विवेचन तद्दन होपलेस् वाटायला लागते सामंत साहेब :(
(सामिषप्रेमी)बेसनलाडू
बाकी लेख माहितीबिहितीपूर्ण वाटला,हे मात्र खरे
(माहितीप्रेमी)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

9 Jul 2008 - 9:35 pm | पिवळा डांबिस

सामिषप्रेमी आणि माहितीप्रेमी याच्यात नेहमी कोण जिंकतं हो?
आमचा अंदाज आहे की सामिषप्रेमी!!
:)

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 10:12 pm | बेसनलाडू

(बिनचूक)बेसनलाडू

श्रीकृष्ण सामंत's picture

9 Jul 2008 - 9:41 pm | श्रीकृष्ण सामंत

बेसनलाडू,
मी मांसाहारी आहाराचे म्हणत आहे मासेहारीचे नव्हे.तसं मी लेखात म्हटलं आहे.
"स्मोक्ड् सॅल्मन,बोंबलाचं कालवण,पापलेटचं भुजणं,सोलकढीभात नि तळलेली कोलंबी,तिसर्‍या,बांगडे,कर्ली नि चिंबोर्‍या अशांच्या नुसत्या आठवणीनेच टपाटपा लाळ गळायला लागली"
हे सगळे मासे आहेत साहेब.
मी चार पायाच्या प्राण्याच्या -गाय,म्हैस,घोडे,बकरी,हरण,ऊंदीर,घूशी,हत्ती डुकराचे मांस-

ह्या बद्दल बोलत आहे.
खरं बरेच वेळा कटू असतं ना!
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 10:23 pm | बेसनलाडू

बीफ,पोर्क,बेकन,हॅम,चिकन-मटण इ. मांसाहारात समाविष्ट आणि मासे वगैरे नाही;असा भेदभाव का बरे? माझ्या माहितीनुसार मासेही यात समाविष्ट आहेतच.इतकेच काय पण मिलिपीड सूप पिणार्‍या आमच्या एका परिचिताचे ते मिलिपीड्स कीटक असूनसुद्धा मांसहारातच मोडणारे! (मानवी आहार वर्गीकरणादृष्ट्या)
(समसमान)बेसनलाडू

श्रीकृष्ण सामंत's picture

9 Jul 2008 - 10:35 pm | श्रीकृष्ण सामंत

बहुतांश मासे पायविरहीत असतात. मास्याना sea food म्हणतात.मास्यांच मांस म्हणत नाहीत.कोलंबी,खेकडे,चिंबोर्या हे चारापेक्शा जास्त पाय असलेले समुद्र प्राणी repeat समुद्र प्राणी आहेत. जमिनीवर राहणारे प्राणी नव्हेत.
माझे लेखन "चार पायाचेच प्राणी आणि त्यांच मांस" यावर केंद्रीत आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 10:44 pm | बेसनलाडू

लेखनाचा स्कोप असा डिफाइन्ड असेल,तर प्रश्नच मिटला;पण मांसाहार आणि मत्स्याहार मांसाहाराच्या डेफिनिशनवाइज तरी वेगळे नसावेत.
(कन्फ्यूज्ड)बेसनलाडू

श्रीकृष्ण सामंत's picture

9 Jul 2008 - 10:59 pm | श्रीकृष्ण सामंत

बेसनलाडू
तसं नाही.लेखनाचा स्कोप "मांस खाणार्‍या " संवयी बद्दल जास्त केंद्रीत आहे.मत्स्याहाराने कुणाला कॅनसर झालेला अजून तरी उघडकीस आलेले नाही,म्हणून मी लेखात म्हणतो,
"मांसाहारी(मासेहारी नव्हे) होण्यास त्याने असाच निसर्गाशी आपल्या शरीराचा आणि त्याच्या क्षमतेचा विचार न करता घेतलेला निर्णय असावा असं मला वाटतं.मांस खाण्यास उद्युक्त होण्याची कारणे काही असोत तसे करण्याने पुढे होणारा अनर्थ काय असावा याचे ध्यान त्याला राहीलं नसावं नाहीपेक्षा कॅन्सर, विषेशतः कोलन कॅन्सर,आंतड्याचे रोग,ओबीसीटी,पोटाचे रोग आणि असले अन्य बरेच प्रकारचे रोग आज पाश्चिमात्य देशात उद्भभवत असल्याचे पाहून माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यावर गंभीर चर्चा जी होत आहे"वगैरे
"www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 11:11 pm | बेसनलाडू

सामंतसाहेब,
तुमचा मुद्दा लक्षात आला माझ्या;माझा मुद्दा फक्त मांसाहारात काय समाविष्ट असावे/असते आणि काय नाही/मांसाहार कशाला म्हणावे नि कशाला नाही इतकाच होता.म्हणजे एखाद्याचे मांस खाणे (कोंबडी असो,कीटक असो,गाय-बैल असो किंवा मासे) हा मांसाहार की जे/ज्यांचे मांस खाऊन कॅन्सरसारखे दुष्परिणाम भोगायला लागतील,तो मांसाहार? मांसाहाराच्या व्याख्येत अशी अँबिग्विटी/असे डिस्टिंक्शन नको,इतकेच माझे म्हणणे.
बाकी माशांना विचारशक्ती असते/भावना असतात हे त्यांच्या मेंदूने विशिष्ट लहरींना दिलेल्या प्रतिसादातून सिद्ध झाले आहे.जगदीशचंद्र बोसांनी वनस्पतींच्या बाबतीत हे आधीच सिद्ध केले आहे.तसे असेल तर शाकाहार किंवा मत्स्याहार हे सुद्धा जीवहत्येच्या नावाखाली मांसाहार म्हणून का कन्सिडर करू नयेत,असे माझे (कैच्या कै छापाचे,टोकाचे) म्हणणे :)
(सुस्पष्ट)बेसनलाडू

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Jul 2008 - 12:04 am | श्रीकृष्ण सामंत

बेसनलाडूजी,
सुस्पष्ट स्पष्टीकरण होई तो पिच्छा सोडायचा नाही हा आपला गुण शिकण्यासारखा आहे.मला तो आवडला.
आता तुम्ही जे शेवटी म्हणता,
"तसे असेल तर शाकाहार किंवा मत्स्याहार हे सुद्धा जीवहत्येच्या नावाखाली मांसाहार म्हणून का कन्सिडर करू नयेत"
हा तुमचा मुद्दा नविन विषयाचा होईल.पण मी हे लेखात स्पष्ट केलं आहे की "जोवो जीवस्य जीवनम" हे निसर्गाचं तत्व आहे. म्हणूनच हिस्रप्राण्यांची उपजीवाका दुसर्‍या प्राण्याला खावूनच होते.तेव्हा शाकाहार हा काही जीवहत्या नाही म्हणून करावा असं माझं मुळीच म्हणणं नाही.किंबहूना हवेत सुद्धा जीवंत जंतू असतात म्हणून जीवहत्या होवू नये म्हणून श्वास न घेता कसं जगता येईल.? कडक धर्म पाळणारे जैन लोक तेही होवू नये म्हणून नाकातोंडावर कपड्याची पट्टी बांधतात हे सर्वश्रूत आहे.अर्थात तसं करणं हे स्वतःची फसवणूक होते त्याकडे त्यांचं लक्ष नसावं असं नाही.ती फक्त त्यांची मनाची समाधानी असते म्हणा.वनस्पतीत जीव असतो हे सर्वश्रूत आहे.तेव्हां"चार पायाच्या प्राण्याचं मांस माणसाने खाणं"ह्यावरच माझं लेखात लक्ष केंद्रित आहे.हे आपल्या लक्षात आलं आहे हे वाचून बरं वाटलं
आपण केलेली चर्चा खरोखरच अभ्यासू आणि विचार प्रवर्तक होती याद वाद नाही .मानलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्किट's picture

9 Jul 2008 - 11:10 pm | सर्किट (not verified)

मी चार पायाच्या प्राण्याच्या -गाय,म्हैस,घोडे,बकरी,हरण,ऊंदीर,घूशी,हत्ती डुकराचे मांस-

चला आमच्या कोंबडीला तुमचे काही आब्जेक्शन नाही तर.

- सर्किट

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Jul 2008 - 12:13 am | श्रीकृष्ण सामंत

सर्किटजी,
दोन पायाचे फक्त पक्षीच असतात.ही पण निसर्गाची कल्पीत निर्मीती आहे.आणि पक्षाच्या मांसाला white meat म्हणजे पांढरं मांस म्हणतात.माझ्या लेखात मी red meat आणि ते सुद्धा चार पायाच्या प्राण्या विषयी लिहित आहे.त्यामुळे कोंबडी, कबूतर्,बदक वगैरे खाण्यात (अर्थात योग्य प्रमाणात) अपाय होतो हे अजून तरी माझ्या पहाण्यात आलं नाही
तेंव्हा कोंबडीची सागोती अवश्य एनजॉय करावी.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

टारझन's picture

10 Jul 2008 - 12:42 am | टारझन

आयला बर्र झालं आमची " कुंब्डी " या वादातुन सुटली... नायतर आताच दंडबैठ्का काडाय सुर्वात करनार हुतो..
आपण कुंब्डी या सजीवावर आजाबात दयामाया दाखवत नाय आ ? कुंब्डी आपल्याला कंच्या पण रुपात चालते. आन आपली चासी तर एक्दम मजबूत हाय...
बाकी एक शाकाहारी माळकरी पायला व्हता मी .. बिचारा खोकून खोकून मेला ..३-४ आजार हुते त्याला. त्यो पूर्ण शाकाहारीच व्हता बा.
आन् मी ईकड आफ्रिकेत आल्यापासून बगतोय.. ईथाल्ली लोकं रोज हे मोठ-मोठाल्लं खांडक(वर नमूद केलेल्या चारचाकी) हाणत्यात राव.. त्याना पाहून काय आजार व्हईल आसा आजाबात वाटत नाय..
लहाणपणी विज्ञानाच्या पूस्तकात वाचल्याचं आठवतयं, शाकाहार+मांसाहाराच योग्य संतूलन =आरोग्य...
माणसाला बुद्धी आहे म्हणूनच त्याने मांसाहाराचा फायदा ओळखला.. तो बाकीच्या जिभेने पाणी पिणार्‍यांसाअखा नाही म्हणून मांस आणि अन्न शिजवून खावू लागला..
आणि कोणत्याही गोष्टीचा ऊद्रेक केला ही त्रास हा होतोच. शाकाहार करा कि़ंवा मांसाहार (कोणताही)

आपल्या बुद्धीला पटेल ते खावे. प्रमाणात खावे. नायतर " धर डबडं पळ " होते.

विचार करा.. चिकन तंदूर चा तो लालसर रंग , त्यावर लावलेला मसाला, ती चटकदार चव... आहाहा ...
आता बाकीचे विचार करून ज्याने माळ घातली त्ये म्येलं तिच्या मायला....

कुंब्डीच्या जिवावर(ऊठून) बॉडी बनवलेला
कुबड्या खविस

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

कोलबेर's picture

10 Jul 2008 - 12:58 am | कोलबेर

कु.ख. ह्यांचा प्रतिसाद आवडला!

... तो बाकीच्या जिभेने पाणी पिणार्‍यांसाअखा नाही म्हणून मांस आणि अन्न शिजवून खावू लागला..

हे मस्त!

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Jul 2008 - 3:04 am | श्रीकृष्ण सामंत

कुबड्या खवीसजी,
"बाकी एक शाकाहारी माळकरी पायला व्हता मी .. बिचारा खोकून खोकून मेला ..३-४ आजार हुते त्याला. त्यो पूर्ण शाकाहारीच व्हता बा."
असा काय,शाकाहरी होतो म्हणून तेच्यावर दुषणा कित्याक लावतां? मेलो, शिगरेटी पण फुकत नसतोलो कशावरून शाकाहारी झालो म्हणान खोकूक लागणा नाय!

"त्याना पाहून काय आजार व्हईल आसा आजाबात वाटत नाय.."
पुढचा कोणाक माह्यत.कॅन्सरपण झालो तर तुम्ही बघूक जाताल्यात आफ्रिकेत परत.

"लहाणपणी विज्ञानाच्या पूस्तकात वाचल्याचं आठवतयं, शाकाहार+मांसाहाराच योग्य संतूलन =आरोग्य..."
मावसाहार म्हणान काय गाय म्हशी डुकराचा मांस हेंचात धरलाला नसताला.असलाच तर
कोंबडी, माशे असतेले.

"माणसाला बुद्धी आहे म्हणूनच त्याने मांसाहाराचा फायदा ओळखला.. "
फायदो कर्माचो.म्हातार पणी भोगूचा लागताला ह्याचा खाताना कोन इचार करणा नाय.

"आपल्या बुद्धीला पटेल ते खावे. प्रमाणात खावे. नायतर " धर डबडं पळ " होते.
ह्या मातर खरां अगदी कसां लाखातला लिवल्यात.

"विचार करा.. चिकन तंदूर चा तो लालसर रंग , त्यावर लावलेला मसाला, ती चटकदार चव... आहाहा ..."
ह्या असला खाणा हंय चलूचा नाय. हेंका मसाल्याचो फायदोच माहित नाय.असला खातीत तर
जरासा खाल्यावरच "" धर डबडं पळ ""करूचा लागताला

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

टारझन's picture

10 Jul 2008 - 3:30 am | टारझन

जल्ला .. आमी पूण्याचो... तुमची कोंकणी वरुन जाताव
मेलो, शिगरेटी पण फुकत नसतोलो कशावरून शाकाहारी झालो म्हणान खोकूक लागणा नाय!
न्हाय बा ... त्ये बिड्या बी वडत न्हवतं.. पक्का वारकरी माणूस... माझ्या १२वी च्या परिक्षा ,मी टेरेस वर अभ्यास करायचो..
भाऊसाहेब बर्रोब्बर १०:३० चा गजर लावायचे.. एकदा सूरु की सूरू..म्हणून माझ्या ते लक्षात आहे.

फायदो कर्माचो.म्हातार पणी भोगूचा लागताला ह्याचा खाताना कोन इचार करणा नाय.
म्हतारपणात कोणाचाचं काही नेम नाही हो. फक्त शाकाहारी म्हणून १०० वर्षे स्वता: च डबडं स्वतः घेऊन पळेलच असे नाही.

ह्या असला खाणा हंय चलूचा नाय. हेंका मसाल्याचो फायदोच माहित नाय.असला खातीत तर
जरासा खाल्यावरच "" धर डबडं पळ ""करूचा लागताला
आपण तर बुआ दिड कुंब्डी डब्बल मसाला लाऊन विज्जीली पचवतो... डबडा मात्र येळेलाच ....अवेळी एकदा पण नाय..

तसा माझा पण चिकन मासे सोडून मांस खाण्यास विरोध आहेच, पण तोही माझ्याच पूरता.. तेही त्या गोष्टीची किळस आहे म्हणून.. बाकी अफ्रिकेतली म्हतारी माणसं पण बघितलीतच की. रेड मीट पचवायला फारचं जड. मी एकदा हे लोक कसे काय खातात याची त्यांच्याकडेच चौकशी केली होती. त्यांची पाचनशक्ति आणि शारिरीक क्षमता आपल्या पेक्षा जास्त च आहे, का मग ते माहीत नाही.

strong>

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

कुबड्या खवीसजी,
"बाकी एक शाकाहारी माळकरी पायला व्हता मी .. बिचारा खोकून खोकून मेला ..३-४ आजार हुते त्याला. त्यो पूर्ण शाकाहारीच व्हता बा."

असा काय म्हणतात? मेलो शिगरेटी फुकून पण खंवाचलो असतलो.मांस खाल्ला म्हनान खोकूक होता असां नाय.वोगीच खयचां खयं लावू नका

"शाकाहार+मांसाहाराच योग्य संतूलन =आरोग्य..."

हेतूर मावसाहार म्हणजे गाय म्हशी डुकरांचा मांस नाय.
असलाच तर माशे,नायतर कोंबडी.

"आपल्या बुद्धीला पटेल ते खावे. प्रमाणात खावे. नायतर " धर डबडं पळ " होते."

ह्या मातर सामक्या कसा लाखातला बोलल्यात बघा.

"विचार करा.. चिकन तंदूर चा तो लालसर रंग , त्यावर लावलेला मसाला, ती चटकदार चव... आहाहा ..."

माका तुमका ह्या मसाल्याचा चलताला.त्येंका नाय मसाल्याची सर माहीत.ते नुसते मीठ आणि मिरी टाकून खातत.मसालेदार
खाल्यानी तर तुम्ही म्हणतात तशे "" धर डबडं पळ "करूंचा लागताल काय समजलात?

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

9 Jul 2008 - 9:34 pm | पिवळा डांबिस

या विषयावर मिपावर यापूर्वीच चर्चा (आणि हाणामारी!) झालेली आहे हो....
तुम्ही जरा उशीर केलांत बघा जॉईन व्हायला....
:)

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Jul 2008 - 12:20 am | श्रीकृष्ण सामंत

पिवळा डांबिसजी,
हे काही आपल्याला पटत नाही.अहो म्हणून काय झालं.आम्ही उशिरा जन्म घेतला हा आमचा काय दोष आमच्या आई वडिलांच नंतर लग्न झालं.आपण आमचे बुजूर्ग झाला.पण चर्चेला अंत नसावा.नव्याने होणार्‍या चर्चेत हाणामारी झाल्यास आम्ही ही एखादा फटका खाऊ की.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

10 Jul 2008 - 2:00 am | पिवळा डांबिस

हे काही आपल्याला पटत नाही.अहो म्हणून काय झालं.
असं म्हणता!

आम्ही उशिरा जन्म घेतला हा आमचा काय दोष आमच्या आई वडिलांच नंतर लग्न झालं.
:)
ते ही खरंच!!

आपण आमचे बुजूर्ग झाला.
ईऽऽऽश्य!! हे मात्र काहितरीच हं!!!!

पण चर्चेला अंत नसावा.नव्याने होणार्‍या चर्चेत हाणामारी झाल्यास आम्ही ही एखादा फटका खाऊ की.

ठीक आहे, मग चालू द्या तुमचं!!!
डांबिसकाकाने तुम्हाला केवळ स्नेहापोटी आधीच सावध केलं होतं हे मात्र लक्षात असू द्या....
:))

धनंजय's picture

9 Jul 2008 - 9:45 pm | धनंजय

लेख विचारप्रवर्तक आहे, पण त्यात काही अतिसुलभीकरणे आलेली आहेत. त्यामुळे निष्कर्ष वाटतो तितका तर्कशुद्ध नाही.

असं दिसून येईल की,ह्या जीवसृष्टीतपण निसर्गाने
दोन group केले आहेत १) शाकाहारी आणि २) मांसाहारी

हे बरोबर नाही. अनेक सस्तन प्राणी वनस्पती आणि मांस हे दोन्ही सोयीनुसार खातात. यांत आपले नेहमीचे प्राणी उंदीर, कुत्रा येतातच, डुकरा अस्वलासारखे वन्य प्राणी येतात. तसेच जीववंशशास्त्रामध्ये मनुष्यप्राण्याचे जवळचे प्राणी म्हणजे माकडे आणि वानरे, हेसुद्धा सोयीनुसार वनस्पती आणि मांस दोन्ही खातात. इथपासूनच सुरुवात केली तर बाकी सर्व मुद्दे तकलादू होत जातात.

मुख्यतः गवत/पाला खाऊ शकणार्‍या अनेक प्राण्यांना एक तर अनेक भाग असलेले जठर असते (गायी म्हशी) किंवा लांबलचक आंत्रपुच्छ (ऍपेंडिक्स) असते (घोडा, वगैरे). मुख्यतः मांस खाणार्‍या प्राण्यांना साधे (एक-कप्प्याचे) जठर असते, आणि आंत्रपुच्छ फार लहान असते (मांजर वगैरे). अशा प्रकारे अवयवांची गणना केली तर "निसर्गानुसार" मनुष्यप्राणी मांसाहारी आहे असा निष्कर्ष निघतो. तोसुद्धा तितकाच तकलादू मानावा.

मानव हा सोयीनुसार वनस्पती/मांस खाणारा प्राणी आहे, आणि दोन्ही प्रकारचे अन्न पचवू शकतो. अधिक प्रमाणात वनस्पती आणि कमी प्रमाणात मांस खाणे आरोग्यास बरे असावे, असे संशोधनावरून दिसते. मुबलक अन्न उपलब्ध असलेल्या ठिकाणचे आदिवासी जमातींतले अन्नही "पुष्कळ वनस्पती/थोडे मांस" असे मिश्र असते.

या प्रतिसादाचा असा अर्थ घेऊ नये की मी शाकाहाराचा विरोध करत आहे (व्यक्तिशः मी बहुतेक दिवस शाकाहारच जेवतो). फक्त "नैसर्गिक" वाद पटण्यासारखा नाही, असे येथे म्हणत आहे.

धनंजयजी,

"मुख्यतः गवत/पाला खाऊ शकणार्‍या अनेक प्राण्यांना एक तर अनेक भाग असलेले जठर असते (गायी म्हशी) किंवा लांबलचक आंत्रपुच्छ (ऍपेंडिक्स) असते (घोडा, वगैरे). मुख्यतः मांस खाणार्‍या प्राण्यांना साधे (एक-कप्प्याचे) जठर असते, आणि आंत्रपुच्छ फार लहान असते (मांजर वगैरे). अशा प्रकारे अवयवांची गणना केली तर "निसर्गानुसार" मनुष्यप्राणी मांसाहारी आहे असा निष्कर्ष निघतो. तोसुद्धा तितकाच तकलादू मानावा. "

कसल्या अवयवाची गणना केली वगैर हे सर्व जर आपण जरा विस्ताराने विशद केलं तर
मला समजायाला जरा सोपं पडेल.तरी कृपा करावी

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धनंजय's picture

10 Jul 2008 - 8:39 am | धनंजय

हे कॉर्नेल विद्यापीठाच्या जीवशास्त्राच्या एका कोर्सवरून साभार (आणि माझे व्याज)

*
मांजर
मनुष्य
उंदीर
घोडा
**

आंगलटीच्या मानाने आतडी
लहान
मध्यम
लांब
लांब
वनस्पतिजन्य पदार्थ पचण्यास अधिक वेळ लागतो, तो वेळ देण्यास आतडी लांब, नाहीतर लहान

पित्ताशय
आहे
आहे
नाही
नाही
"सॅच्युरेटेड" प्राणिजन्य मेद पचण्यास यकृताचा स्राव एकाच वेळी खूप लागतो, तो साठवण्यासाठी पित्ताशय उपयोगी असते

पुढचे दात
छोटे
मध्यम
मोठे
मोठे
या दातांची क्रिया घर्षणाने कापणारी (शिअरिंग) असते, वनस्पती/पाने कापण्यासाठी चांगली

सुळे
मोठे
मध्यम
छोटे
असतात/नसतात
या दातांची क्रिया अन्नात छेद करून फाडायची असते. मांसासाठी उपयोगी. गायी, घोडे, हरणे, यांना जबड्यात वरच्या बाजूला सुळे नसतात.

दाढा
धारदार
सपाट
सपाट
सपाट
दाढा सपाट असल्या तर एकमेकांवर जात्यासारख्या घासून अन्न "वाटता" येते, मांस तितके बारीक वाटायची गरज नसते.

मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला बाजू जाणारी पिशवी (सीकम) आणि आंत्रपुच्छ
फार लहान, बाकीच्या आतड्यापेक्षा पेशी वेगळ्या नाही
छोटी, आंत्रपुच्छात अन्न पोचत नाही
मोठी
भली मोठी - वेगळ्या पेशी, यात अन्न साठते
येथे वनस्पतीजन्य अन्न स्थिर राहते, येथील जीवाणू त्यावर प्रक्रिया करतात, आणि त्यांच्यातून निघणारा रस पेशी शोषून घेतात

त्यामुळे असे दिसते की मनुष्य याही टोकाला नाही आणि त्याही टोकाला नाही. मनुष्य मांस आणि वनस्पती दोन्ही पचवू शकतो.

फक्त काही अवयवांकडे लक्ष केंद्रित करून असे म्हणता येते की मनुष्य "निसर्गतः" शाकाहारी आहे, किंवा उरलेल्या अवयवांकडे लक्ष केंद्रित करून असे म्हणता येते की मनुष्य "निसर्गतः" मांसाहारी आहे. दोन्ही संपूर्ण चित्र बघत नाहीत.

(ओठ बुडवून पाणी पिण्याचा काय संबंध तो कळला नाही. मी पेल्यात ओठ बुडवून पाणी प्यायचा प्रयत्न केला, पण ते थोडे कठिण गेले - सवयीने जमू शकेल असे वाटते. पण त्याचा अन्नाशी काय संबंध. तसे बघता वनस्पती(च) खाणार्‍या बहुतेक प्राण्यांना खुरे, किंवा तसेच काही पाय असतात. मांस(ही) खाणार्‍या प्राण्यांना टोचणारी/अणकुचीदार नखे असतात - म्हणजे मनुष्य तिकडे गेला की... पण याही बाबतीत त्याचे आहाराशी काय देणेघेणे?)

सर्किट's picture

10 Jul 2008 - 12:19 pm | सर्किट (not verified)

प्रकाटाआ.

क्षमस्व.

- सर्किट

स्वत:हून प्रतिसाद काढून टाकलात ते बरेच झाले. नाहीतर आम्ही तो काढून टाकलाच असता. मिपाचे सन्माननीय सभासद धनंजय यांनी कष्ट घेऊन, प्रामाणिकपणे काही लेखन केले त्याची अशी उथळपणे खिल्ली उडवली गेली होती हे अत्यंत गैर आहे. मिपा प्रशासन धनंजयरावांची मनापासून क्षमा मागत आहे!

मिपा म्हणजे फक्त आणि फक्त उथळपणाच असा जर कुणाचा गैरसमज असेल तर त्यानी तो वेळीच दूर करावा. आणि मिपावर काही महत्वाचे लेखन होऊच शकत नाही, मिपाची ती लायकीच नाही, मिपा म्हणजे फक्त टवाळखोरगिरी करण्याचेच एक संस्थळ आहे असाही सर्किटरावांच्या येथील प्रतिसादाचा सूर होता. हा असला फालतूपणा आणि मिपाचा अपमान करणारे लेखन कदापि सहन केले जाणार नाही. सर्कीटरावांनी कृपया याची नोंद घ्यावी व मिपावर बर्‍याच ठिकाणी आचरटपणाचे आणि स्वत:च्या अतिशहाणपणाचे प्रदर्शन करणारे प्रतिसाद लिहिण्याची त्यांची जी सवय आहे तिला जरा आळा घालावा अशी विनंती!

सभासदांमधली माफक टवालखोरगिरी, थट्टामस्करी चेष्टा आणि कुणी काही चांगले, गंभीर लिहिले की त्याची योग्य ती दखल घेणे या दोहोंत मिपाने आजपर्यंत योग्य तो बॅलन्स साधला आहे तो कृपया कुणी बिघडवण्याचा प्रयत्न करू नये!

-- जनरल डायर.

हरणटोळ's picture

10 Jul 2008 - 2:04 pm | हरणटोळ

+१
एकंदरीच सर्किटाने नुक्कतेच येऊन धिन्गाणा घातला आहे त्याला आवर बसला तर बरेच होईल असे वाटते.

हटो.

सर्किट's picture

10 Jul 2008 - 10:40 pm | सर्किट (not verified)

आपण तो प्रतिसाद नीट वाचला असता, तर आपल्या लक्षात आले असते की त्यात धनंजय ह्यांची खिल्ली उडवलेली नव्हती.

ज्यांची खिल्ली उडवली होती, त्यांना ती कळली असेल, कदाचित.

आता आळाच घालायचे म्हणताहात, तर त्यासाठी आपण समर्थ आहात.

कलोअ,

सर्किट

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Jul 2008 - 8:13 pm | श्रीकृष्ण सामंत

धनंजयजी,
आपला ह्या बाबतचा अभ्यास गाढा आहे.आपण दिलेले चार्टस खूप माहिती प्रवर्तक आहेत.नव्हेतर ह्या चर्चेमुळे आपल्याकडून मला अधिक ज्ञान मिळाले.ते कदाचीत माझ्या वाचनातून मीस होत होते.बद्दल आभार.
आता आपण पाणी पिण्याच्या संवयीचा आणि शाकाहारी/मांसाहारी असण्याच्या प्रश्नाचा विचार करूया.
माझ्या लेखात मी बेसीक शाकाहारी आणि मांसाहारी असलेल्या प्राण्यांचे ऑबझरवेशन केल्यावर जे प्रकर्शाने दिसतं ते हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे.
ओठाने पाणी पिल्यामुळे तो शाकाहारी होतो किंवा जिभेने पाणी
पिल्यामुळे तो मांसाहारी होतो असे मला मुळीच म्हणायचे नाही.
जो ओठाने पाणी पितो तो शाकाहारी group मधे प्रकर्शाने दिसतो.
तसेच जो पाणी जिभेने पितो तो मांसाहारी goup मधे प्रकर्शाने दिसतो असा त्याचा ढोबळ अर्थ आहे.
सर्व साधारण जो दाढी वाढवून फेटा बांधतो तो सरदारजी goup मधे येतो हे ऑबझरवेशन होईल.
आपण कृपया मला दाखवून द्दा की ओठाने पाणी पिणारा प्राणी बेसीकली-मुलतः-मांसा हारी असतो.
किंवा
जिभेने पाणी पिणारा प्राणी बेसीकली-मुलतः- शाकाहारी असतो.
फक्त माणूस सोडून कारण तो वेळ पडल्यास आरग्युमेंटसाठी काहीही करून दाखवील.
आपण म्हणता,
"मी पेल्यात ओठ बुडवून पाणी प्यायचा प्रयत्न केला, पण ते थोडे कठिण गेले "
मला असं म्हणायचं नाही की माणूस ओठानेच पाणी पितो.माणूस तर आता स्ट्रॉ ने पण पाणी पितो.मात्र माणूस सर्वसाधारणपणे जीभेने पाणी पित नाही हे निश्चीत.पण एखादा वानगी दाखल जीभेने पाणी पिऊन सुद्धा दाखवील.कारण माणूस बुद्धिचातुर्यामुळे काहीही करून दाखवील.
जगात शाकाहारी मनुष्य जमात जास्त आहे.मांसाहारी नसण्याची काही कारणे असोत जशी-नैसर्गिक,आर्थिक,सामाजीक,धार्मिक वगैर वगैर.
म्हणून मी माझ्या लेखात म्हणतो,
"मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही सामर्थ्य असताना,त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय? "

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुनील's picture

10 Jul 2008 - 8:19 pm | सुनील

जगात शाकाहारी मनुष्य जमात जास्त आहे

ह्या विधानाच्या सत्यतेविषयी काही पुरावे देऊ शकाल?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Jul 2008 - 3:31 am | श्रीकृष्ण सामंत

सुनीलजी,
माझ्या ऐकिवात असलेल्या माहिती प्रमाणे भारतातच ७०% शाकाहरी- म्हणजे त्यात मासे,चिकन अंडी यांचा सामावेश करून आणि गाई म्हैस,डुकर,बकरे सोडून- आहे.म्हणजे ३०% गाई,म्हैस,डुक्कर,बकरे खाणारे आहेत. परंतु गुगल वा अन्य ठिकाणाहून आपल्याला प्रुफ देण्याचा प्रयत्न करीन.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुनील's picture

11 Jul 2008 - 9:14 am | सुनील

तुमच्या शाकाहाराच्या व्याख्येत मासे, कोंबडी आणि अंडी यांचा समावेश असला तरी सर्वसामान्यपणे शाकाहार या संकल्पनेत ते बसत नाहीत. तेव्हा तुम्ही "शाकाहार" असा दिशाभूल करणारा शब्द न वापरता, "मांस्-विरहीत" किंवा तत्सम शब्द वापरावा, ही विनंती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धनंजय's picture

11 Jul 2008 - 1:08 am | धनंजय

तुम्हाला येथे केवळ काही "कोरिलेशन" दाखवायचे होते, हे मला कळले होते, पण कारणाविना "कोरिलेशन" पुष्कळदा चुकीची असतात. म्हणूनच मी उलट्या कोरिलेशनचे खुरांचे/नखांचे उदाहरण दिले.

तुमच्या उदाहरणाचेच बघा ना.
> सर्व साधारण जो दाढी वाढवून फेटा बांधतो तो सरदारजी goup मधे येतो हे ऑबझरवेशन होईल.
"साधारण" शब्दाने तुम्ही जे म्हटले आहे, तेच पुन्हा विशद करतो.
गावचे मुल्लासाहेब दाढी वाढवून फेटा बाधतात तरी ते सरदारजी नाहीत.
त्याच प्रमाणे ट्रिब्यून वर्तमानपत्रातली ही वरसंशोधनासाठी जाहिरात बघावी (क्रमांक ३)
येथे जाहिरातीतला शिख युवक दाढी ठेवत नाही. (पण लग्न शीख म्हणूनच करायचे आहे - त्यामुळे शीख खासच!)

त्यामुळे तुमचे सुरुवातीचे (दाढी+पगडी<->सरदारजी) हे कोरिलेशन जरी ठीक असले, तरी त्याच्याविरुद्ध उदाहरणे सापडलीत तर ते अपवाद असामाजिक (किंवा ओठांच्या/खुरांच्या उदाहरणात "अनैसर्गिकः) होत नाहीत. केवळ कोरिलेशन ढोबळ आहे, सार्वत्रिक नाही, हेच सिद्ध होतेआहे. सकारण कोरिलेशनच्या बाबतीत सहसा असे घडत नाही. सुळे नसलेला प्राणी सहसा मांस खात नाही, हे कोरिलेशन सकारण आहे, त्यामुळे त्याच्याविरुद्ध अपवाद सापडत नाहीत.

तुम्ही म्हणता :
> आपण कृपया मला दाखवून द्या की ओठाने पाणी पिणारा प्राणी बेसीकली-मुलतः-मांसा हारी असतो.
> किंवा
> जिभेने पाणी पिणारा प्राणी बेसीकली-मुलतः- शाकाहारी असतो.
म्हणजे तुम्ही म्हणता की सस्तन प्राणिजगताचे दोनच भाग आहेत : मूलतः शाकाहारी आणि मूलतः मांसाहारी.
हे दुहेरी वर्गीकरण मला मान्य नाही. मूलतः उभयाहारी प्राण्यांची उदहरणे वरील (पहिल्या) प्रतिसादात बघावी.
उभयाहारी प्राण्यांत जिभेने पाणी पीणारे प्राणी दिसतात (कुत्रा) आणि ओठाने पाणी पीणारे प्राणी दिसतात (डुक्कर). आणि अर्थात माकडे आणि वानरे. (अहो पण हे सगळे मुद्दे माझ्या पहिल्या प्रतिसादात आलेच आहेत की!)

(अगदी कारण शोधायलाच जायचे तर "जिवणीची रुंदी" हे ओठा/जिभेने पाणी प्यायचे कारण असावे. अरुंद जिवणी असलेले प्राणी ओठांचा चंबू करून पाणी चोखू शकतात, रुंद जिवणी असलेले प्राणी ओठांचा चंबू करू शकत नाहीत, त्यामुळे लपलप जिभेने पाणी पीतात. मोठे सावज तोंडाने पकडणार्‍या प्राण्याला बहुधा रुंद जिवणी लागत असावी, इ.इ. नळाच्याच्या तोटीतून पाणी पीताना, आचळे लुचताना, सर्वच घरगुती प्राणी "ओठांनी" पीतात. हत्तीचे तुमचे उदाहरण पटले नाही. हत्ती ना ओठांनी पीतो, ना जिभेने. तो "नाकाच्या स्ट्रॉ"ने पाणी उचलतो आणि घशात ओततो. खरे म्हणजे अशा अकारण कोरिलेशनने गोंधळ जास्त होतो.)

> जगात शाकाहारी मनुष्य जमात जास्त आहे.
वरील प्रतिसादाप्रमाणेच मला तुमचे हे वाक्य निरीक्षणाने पटत नाही. भारतातल्या काही अल्पसंख्याक जमाती, आणि अन्य देशांतल्या काही अल्पसंख्याक जमाती, इतक्याच काही थोड्या शाकाहारी आहेत.

> "मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य
> दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानयुगे
> जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही सामर्थ्य
> असताना,त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने
> आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते त्यांचा केवळ चवीष्ट
> मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय? "
हे खरे असेल किंव नसेल. पण तुमचे मत म्हणून योग्यच आहे. यातल्या अनेक कल्पना नीतिशास्त्रातल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची कल्पना "अधिकार". (बाकी कल्पना "उपजत वैचारिक शक्ती", "बरे/वाईट","सामर्थ्य", "अंतर्ज्ञान", "केवळ") नीतिशास्त्राचे विचारवलय "नैसर्गिक"च्या विचारवलयापेक्षा वेगळे आहे. (वेगळे म्हणजे परस्परविरोधी नव्हे - वेगळे म्हणजे वेगळे) नीतिशास्त्रातील मुद्दे नीतिशास्त्राच्या अंगाने मांडणेच सयुक्तिक ठरेल.

एखादी गोष्ट नैसर्गिक असली नसली तरीही नीतिशास्त्राच्या विचाराअंती ती करावी/करू नये असा निष्कर्ष निघू शकतो. जीवशास्त्राच्या अंगाने जाणार्‍या मुद्द्यांबद्दलच मी वर मते मांडलेली आहेत. नीतिशास्त्राच्या दृष्टीने तुम्ही केवळ आपले तत्त्व बीजरूपाने सांगितले आहे. त्यात अनेक कल्पनांची गर्दी आहे, काही विसंवादी आहेत.

मत्स्यसृष्टीलाही, पक्षीसृष्टीलाही बाकी जनावरांसारखेच अंतर्ज्ञान/संवेदना आहेत. पण वरील काही प्रतिसादांत तुम्ही तुमच्या या विचाराने मत्स्याहार वर्ज्य नाही असे काही (वेगळ्या शब्दांत) सांगता. त्यामुळे हा नीतिशास्त्रातला मुद्दाही मला नेमका तुमच्या दृष्टीने समजला नाही.

असो. एक चांगला विचार करण्यासारखा लेख लिहिल्याबाबत धन्यवाद.

स्वगत : आता एक श्रीकृष्ण सामंत हे एक मला "जी" म्हणत आहेत. उद्या आणखी लोक म्हणायला लागलेत तर दाढी वाढवून फेटा बांधावा लागेल ;-)

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Jul 2008 - 3:41 am | श्रीकृष्ण सामंत

धनंजयजी,
आपले आभार.एकूण चर्चेतून मला पण शिकायला मिळालं.
तसं झाल्यास मी आपल्याला धनंजयजी ऐवजी "धनंजयसिंग " नक्कीच म्हणेन.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विजुभाऊ's picture

12 Jul 2008 - 4:18 pm | विजुभाऊ

जिभेने पाणी पिणारा प्राणी बेसीकली-मुलतः- शाकाहारी असतो.

कुत्रा जिभेनेच पाणी पितो आणि हा अपवाद नाही. गवत हे त्याचे मुख्य अन्न नाही.
तो मूलतः मांसाहारी आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 8:35 am | विसोबा खेचर

श्रीकृष्णराव,

तुम्ही काहीही म्हणालात तरी मला बोकडाचं मटण आवडतं आणि मी ते खाणारच!

च्यामारी, काय व्हायचं असेल ते होईल पण मी खाणार. मला मटणवडे, मटण-खिमा, खिम्याचे पॅटिस, मटणबिर्याणी, मटणातली नळी, पाया, मटणचॉप हे सर्व प्रकार अतिशय आवडतात. शिवाय तूर्तास मी मोहाला किंवा वासनेला जिंकण्याचा प्रयत्नही करत नाहीये त्यामुळे हे सर्व खाणं बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! :)

आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

--
"उद्या जर मला कुणी म्हटलं की तू रोज दूधभात अन् भेंडीची भाजी खा तर मी सांगेन ना त्याला की तू रोज मटण बिर्याणी खा!" :)
(इति काकाजी, नाटक - तुझे आहे तुजपाशी)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2008 - 9:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मटन, चिकन, गोड्या पाण्यातला राहु मरणापर्यंत खावू :)
चखण्याला अंडाभुर्जी, फिशफ्राय, यांना आयुष्यातून वगळले तर आपला जन्म काय मेथी, कोबी, पालक,शेपू साठी थोडी झालाय....!!!

जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

साती's picture

10 Jul 2008 - 1:45 pm | साती

आपला जन्म काय मेथी, कोबी, पालक,शेपू साठी थोडी झालाय....!!!

अगदी अगदी....
साती

रम्या's picture

10 Jul 2008 - 1:55 pm | रम्या

मटणवडे, मटण-खिमा, खिम्याचे पॅटिस, मटणबिर्याणी, मटणातली नळी, पाया, मटणचॉप

तात्या, जेवणवेळ झालीये. आजची डब्यातली (शाकाहारी) भाजी शंभर टक्के बेचव लागणार!! लिष्टं वाचून बादली भर लाळ गळली ना तात्या माझी !!

श्रीकॄष्ण रावांचे मुद्दे लईच वढून तानून आनल्यागत वाटत्यात.

बाकी धनंजय रावांनी श्रीकॄष्ण रावांच्या मुद्द्यांना भारीच लोळवलंय!

(कोंबडी, बकरी आणी माशांवर जिवापाड प्रेम करणारा) रम्या

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Jul 2008 - 5:16 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
जे काय आम्हाला सुचलं ते आम्ही लिहलं.शेवटी तुमचं तुम्हीच ठरवणार.काढाल कधी तरी आमची आठवण ह्या ना त्या कारणानं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

डॉ.प्रसाद दाढे's picture

10 Jul 2008 - 10:27 am | डॉ.प्रसाद दाढे

सर्किटसाहेबा॑च्या विधानामुळे शास्त्रीय चर्चा मिपावर कराव्या की नाही असा स॑भ्रम मनात निर्माण झाला आहे. मिपा म्हणजे 'पबमेड' कि॑वा 'नेचर' नाही हे ठाऊक आहे. पण सायन्सचे मिपाला अगदीच वावडे असू नये असेही वाटते.
चर्चा उत्तम चालली आहे. सगळेच सदस्य प्रतिक्रिया लिहित नाहीत त्याचा अर्थ असाही नाही की त्या॑ना लेखन आवडलेल॑ नाही. पुष्कळदा वेळ नसतो.. मला चर्चा आवडली. आणखी येऊ दे..

सर्किट's picture

10 Jul 2008 - 12:18 pm | सर्किट (not verified)

डॉ. साहेब,

अजाणतेपणे काहीबाही बरळलो, क्शमा करा.

- सर्किट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2008 - 10:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुबड्या खवीसजी,
>> "बाकी एक शाकाहारी माळकरी पायला व्हता मी .. बिचारा खोकून खोकून मेला ..३-४ आजार हुते त्याला. त्यो पूर्ण शाकाहारीच व्हता बा."
मला वाटतं की संख्याशास्त्रात (statistics) या विधानाला फार वजन नाही. एका माणसाची माहितीवरुन निष्कर्ष नाही काढता येणार!

आणि शाकाहारी असण्याचं आणखी एक नैसर्गिक समर्थन:
आपण (मुळात) खातो ते ऊर्जेसाठी (याचा अर्थ पीळदार स्नायू बनवणे असा घेऊ नये). आणि ऊर्जा मिळवण्याचा सर्वात साधा आणि छोटा मार्ग (efficient way) म्हणजे शाकाहार! सूर्याची ऊर्जा वनस्पतीच शोषून घेऊ शकतात. त्यामुळे जर वनस्पतीच खाल्ल्या (शाकाहार) तर कमीतकमी वेळात आणि कमीतकमी संसाधनं (resources) वापरून पोट भरतं. एक किलो कोंबडीसाठी ३ एकर जमीन लागते, एक किलो बैलासाठी ५ एकर जमीन लागते असं मधे वाचनात आलं होतं. १ किलो तांदूळ/गहू/कडधान्य/भाजीपाला यासाठी किती जमीन लागते त्याचा आकडा तिथे नव्हता, पण खूप कमी जमीन पुरते असं त्या लेखकाचं म्हणणं होतं. (बहुतेक बी.बी.सी.न्यूज वर मी हे वाचलं.)
या वेबसाईटच्या बुडाशी एक उपयुक्त तक्ता दिला आहे:
http://www.accessexcellence.org/AE/AEPC/WWC/1991/land.php

आजच्या, global warming चे तडाखे बसण्याच्या दिवसात, या मुद्द्याचा जरूर विचार व्हावा.

(मांसाहार न आवडणारी आणि पृथ्वीवर प्रेम करणारी)
खादाड संहिता

टारझन's picture

10 Jul 2008 - 11:25 am | टारझन

संहिता जी

मला वाटतं की संख्याशास्त्रात (statistics) या विधानाला फार वजन नाही. एका माणसाची माहितीवरुन निष्कर्ष नाही काढता येणार!
आम्ही कुठं म्हटलंय की बॉ निष्कर्ष काडांच ? मला बी म्हाईत हाय यका माणसाऊन काय बी प्रूव व्हत न्हाय. तुमी शिद्ध करून दावा की मांसाहार करणार्रा परतेक जन कुत्र्याची मौत मेलाय. पर म्या जे देखंल त्ये सांगलं. खरं तर कुणी काय खावं काय न्हाई हा ज्याचा त्याचा प्रेश्न हाय. अन आमी ब शाकाहार करतुच की ... आमच्या कुंब्डी बर्बर आमाला बाजरीची भाकर आन् कांदा लागतुया.. म्हंजे आमी बी शाकाहार करतू न्हव?
आणि तुमचे सुर्याच्या उर्जेचे समिकरण बाउंसर गेलं बघा. आम्हला एकंच माहीत, शरीर पिळदार आणि हेल्दी बनवण्यासाठी येणारे प्रोटिन्स आम्ही आमच्या आतिप्रिय कोंबडीपासून ईझीली मिळवू शकतो. आपल्या बुद्धीला पटेल ते खावं.
आपण तर बॉ कोंबडी शिवाय जगू नाही शकत, ब्रम्ह जरी आम्हास शाकाहाराचा सल्ला देण्यास आले तरी त्याना आम्ही हैदराबाद च्या पॅराडाईज मधे चिकन बिर्यानी खायला नेऊ. तेही आमच्याच गोटात सामिल होतील असा अस्मादिकांना विश्वास वाटतो

कोंबडी वर बिलकूल दयामाया न दाखवनारा ) कु. ख.

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

शिप्रा's picture

10 Jul 2008 - 11:10 am | शिप्रा

श्रीकृष्णराव, १ नं आहात.. आम्हि तुमच्याशी पुण्र सहमत आहोत. चालु दे चर्चा.
जिथे कमी तिथे आम्ही. :)

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Jul 2008 - 12:14 pm | श्रीकृष्ण सामंत

चिंटी,
आभार,
किती बरं वाटलं आपल्या ह्या सपोर्टने.नाहीतर असतात काही
"जिथे सरशी तिथे पारशी"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jul 2008 - 3:01 am | llपुण्याचे पेशवेll

सामंत साहेब तुमच्या चिकाटीची दाद द्यावी तेवढी कमीच आहे. :)
असो तरी या विषयावर चर्चायुध्द सुरू करणारे तुम्ही दुसरे आहात. पहिला तो 'मन' होता.
(स्वगतः त्या शाकाहाराच्या चर्चेनंतर गायबच झाला आहे 'मन' .. कुठे गेला का त्याला पण खाऊन संपवला मांसाहार वाल्यानी :) )

पुण्याचे पेशवे

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Jul 2008 - 10:16 am | श्रीकृष्ण सामंत

पेशवे सरकार,
आपल्या ह्या अशा लिहिण्याने आम्हाला पण हुरूप आला.आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

केशवसुमार's picture

10 Jul 2008 - 8:08 pm | केशवसुमार

जी गोष्ट आपल्या पुर्वीच्या स्वरुपात स्वत:हून हलचाल करीत नव्हत्या त्या सर्व गोष्टी शाकाहरी (whatever was not moving in it's previous state at it's own) बाकी सारी प्राण्यांची प्रेते.... :W
(प्राण्यांची प्रेते न खाणारा)केशवसुमार.

अभिज्ञ's picture

10 Jul 2008 - 8:51 pm | अभिज्ञ

अगग!!!!! काय हि चर्चा.थोडक्यात काय?
इथे चर्चा करुन करुन आमचे डोके खाणारे सर्वजण मासांहारीच म्हंटले पाहिजेत.
(ह.घ्या.)

अभिज्ञ.

(स्वगत: आमचे डोके म्हणजे लाल मांस कि पांढरे मांस बरे? :? )

सर्किट's picture

11 Jul 2008 - 1:50 am | सर्किट (not verified)

(स्वगत: आमचे डोके म्हणजे लाल मांस कि पांढरे मांस बरे? )

डिपेण्ड्स. तुम्हाला किती पाय आहेत ?

- सर्किट

अभिज्ञ's picture

11 Jul 2008 - 9:13 pm | अभिज्ञ

(स्वगत: आमचे डोके म्हणजे लाल मांस कि पांढरे मांस बरे? )

डिपेण्ड्स. तुम्हाला किती पाय आहेत ?
=)) =)) =))

सर्किटराव,
जबरी टाकलात..
सपशेल त्रिफळा उडाला आमचा. :(

(दोन पायावर चालणारा) अभिज्ञ.

सुचेल तसं's picture

10 Jul 2008 - 9:04 pm | सुचेल तसं

मला वाटतं की भौगोलिक परिस्थितीचा देखील विचार करावयास हवा. हिमाचल, दिल्ली, चंदिगड ह्या बाजुकडच्या लोकांचं शरीर तुलनेने आपल्यापेक्षा अधिक मजबुत असतं. ते मांस सहज पचवतात. त्यांचा आहार तसा तगडा असतो.

काही लोक असा युक्तीवाद करतात की, मांसाहार करणार्‍या लोकांची वृत्ती कालांतराने तामसी बनते. मला तरी हे विधान पटत नाही. पुर्ण शाकाहारी पण जमदग्नीचा अवतार असलेले लोक आपल्याला पहायला मिळतात.

शेवटी ज्याला जे पटतं आणि पचतं त्यानी तो आहार करावा हे उत्तम!!!

-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com

डॉ.प्रसाद दाढे's picture

11 Jul 2008 - 9:50 am | डॉ.प्रसाद दाढे

हिमाचल, दिल्ली, चंदिगड ह्या बाजुकडच्या लोकांचं शरीर तुलनेने आपल्यापेक्षा अधिक मजबुत असतं. ते मांस सहज पचवतात
सहमत.. ज्याला पटेल ते व पचेल ते खाव॑.. 'चराचर सृष्टी ही मुळात चरणारी सृष्टी आहे..(पुल॑चा हसवणूक मधला 'माझे खाद्यजीवन' हा लेख (लाळ गाळत)वाचावा :)
पुर्ण शाकाहारी पण जमदग्नीचा अवतार असलेले लोक आपल्याला पहायला मिळतात
क्रूरकर्मा हिटलर हे तामसी शाकाहारी माणसाचे उत्तम उदाहरण आहे! तो मद्यपानही करीत नसे.
भारतातील विशेषतः पुण्या- मु॑बईकडच्या शहरी माणसा॑नी शाकाहारावरच भर द्यावा असे माझे मत आहे. कारण शहरी जीवनमानात शरिराचे व्हावे तेव्हढेही चलन-वलन होत नाही, व्यायम करायला वेळ नसतो. बैठे काम करणार्‍या॑ची स॑ख्या जास्त आहे. त्यामुळे पचायला हलका आहार असावा. बद्धकोष्टतेमुळे अमेरिकन लोका॑मध्ये कोलॉन कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे हे सत्य आहे. शाकाहार स्वस्तही आहे व पूरकही आहे. तसेच बर्ड फ्ल्यू वगैरेची भितीही नाही. (फवारलेल्या कीटकनाशका॑ची मात्र आहे). शहरी लोका॑मध्ये 'य॑ग मायोकार्डियल इन्फार्क्ट' म्हणजेच तरूण वयात हृदयविकाराने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे ज्यास 'हरी, वरी, करी' म्हणजेच अतिमहत्वाका॑क्षा, चि॑ता व मसालेदार आहार कारणीभूत आहेत हे सिद्ध झाले आहे. मटण-चिकन म्हटले की भरपूर मसाला, तेल वगैरे आलेच. त्यामुळे ते कमी खावे. हा॑, आता खवैय्या॑नी महिन्यातून एकदा नळी ओरपायला हरकत नाही पण व्यायाम करून जिरवायचीसुद्धा तयारी हवी!
(रोस्ट कबाब चवीने खाणारा) प्रसाद

ध्रुव's picture

11 Jul 2008 - 12:23 pm | ध्रुव

जो जे पचेल तो ते खावो :)
--
ध्रुव

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Jul 2008 - 8:30 pm | श्रीकृष्ण सामंत

डॉ.प्रसादजी,
समतोल विचार ठेवून आपण लिहलं आहे.ते वाचून बरं वाटलं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

फास्टरफेणे's picture

11 Jul 2008 - 3:27 pm | फास्टरफेणे

आठवड्यातून एक/दोनदा मांसाहार करणार्‍याला मांसाहारी म्हणता येणार नाही...ज्याचा आत्मा दिवसातून किमान एकदा तरी "तंगडी" तोडल्याशिवाय तृप्त होत नाही तो खरा मांसाहारी...अमेरिकेतील मंडळी तिकडच्या खर्‍या मांसाहारी मंडळींच्या खाण्याविषयी जास्त सांगू शकतील...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2008 - 6:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपली इच्छा असल्यास ते समीकरण समजावून देण्याचा प्रयत्नतरी मी करु शकते. इच्छा नसली तर पुढचं स्पष्टीकरण वाचू नका.

सर्व जिवंत प्राणी, पक्षी, झाडं, अमीबा, इत्यादी, जगण्यासा लागणारी ऊर्जा सूर्यापासून मिळवतात. पण त्यातल्या काहिच सजीवंकडे ही ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे, उदा. झाडं. नुसतं उजेडात बसून प्राण्यांचं पोट भरत नाही. प्राण्यांना झाडं किंवा इतर प्राणी खावे लागतात (याला अपवाद असले तर मला कल्पना नाही). तर शाकाहारी माणसाला मांसाहारी माणसांपेक्षा (खवीस, मुंजे, हडळ पकडून सर्वांना) ऊर्जा लवकर मिळते. शाकाहारी झाडं खातात, जी झाडं सूर्याची ऊर्जा अन्नात रुपांतरीत करतात. मांसाहारी माणसांबाबतीत हा मार्ग थोडा लांबचा होतो. झाडं -> प्राणी --> माणूस असा होतो.
मी जी लिंक दिली होती त्यातील शेवटच्या कोष्टकावरून असं अनुमान काढता येईल की:
एका वर्षात, एका चौरस मीटरमधे शाकाहारातून मांसाहारापेक्षा जास्त ऊर्जा मिळेल. याचाच अर्थ, जमिनीचा एक तुकडा, एका ठराविक कालावधीमधे मांसाहारींच्या तुलनेत जास्त शाकाहारी लोकांची भूक भागवेल.

तर्कट (आणि अनाकलनीय?) संहिता.

टारझन's picture

11 Jul 2008 - 7:15 pm | टारझन

आपली इच्छा असल्यास ते समीकरण समजावून देण्याचा प्रयत्नतरी मी करु शकते. इच्छा नसली तर पुढचं स्पष्टीकरण वाचू नका.
आम्ही सगळ्या बाजूंनी विचार करतो. आणि ज्ञानग्रहणासाठी खविस लोक तरी सर्व ईंद्रीये ऊघडी ठेवतात(हाडळींच माहीत नाही).

तर शाकाहारी माणसाला मांसाहारी माणसांपेक्षा (खवीस, मुंजे, हडळ पकडून सर्वांना) ऊर्जा लवकर मिळते
मला वाट्ट ..तुम्ही अवांतर वाचन सॉरी लिखाण जास्त करता. इथे मांसाहार खाल्ल्याने होणार्‍या रोग यावर चर्चा चाल्लेली आहे. असो.
माझ्या माहीती नुसार मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांपेक्षा(अपवाद हत्ती) शक्तीशाली असतात. (खविस हाडळी द्या सोडून.. त्यांची ताकद ऊर्जेवर नका कमेंट करू .. झेपनार नाय...) ऊर्जा लवकर ऊशिरा मिळण्याचा तुमचा मूद्दा असेलही बरोबर . पण आमची बॅटरी शुद्ध शाकाहार्‍यांपेक्षा थोडी लेट चार्ज झाली तरी चालेल. (आम्ही पूर्ण मांसाहारी आहोत, व्हेज ला तोंड पण नाय लावत आसं वाट्ट्य का?)
नाही हो मी भारतात आठवड्यातून एकदा आणि ईकडे ४ वेळा मांसाहार (चिकन,मासे) करतो. देवानी काही आणि मेहनतीने काही अशी मूबलक ऊर्जा साठवून आहे. चार शूद्ध शाकाहार्‍यांची ऊर्जा संपवायची ऊर्जा आहे आमच्यात.

आपण जे मुल्यवान(वाटत नसलं तरी) ज्ञान दिलंत त्या बद्दल आयूष्यभर आभारी राहील हा खवीस.

(स्वगतः आजचा दिवसंच वाईट , झालय काय कुबड्या? कोणी तुझा कुबड कलम करतोय , कोणी नको ते मुद्दे ऊठवतोय , कोणी आमची ऊर्जा जाळतोय ? बर्र तात्यांचा त्रिनेत्र ऊघडला नाहीए)

तुर्कट (आणि बिनडोक? ) कु.ख.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

फास्टरफेणे's picture

11 Jul 2008 - 7:30 pm | फास्टरफेणे

माझ्या माहीती नुसार मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांपेक्षा(अपवाद हत्ती) शक्तीशाली असतात.
असहमत...
मांसाहारी प्राणी तो ज्याच्यावर उपजिवीका करतो त्याच्यापेक्षा शक्तीशाली असतो (बहुतेक वेळा). उदा. चित्ता हरणापे़क्षा शक्तिशाली असेल पण तो झेब्रा/गवा यांच्यापेक्षा शक्तिशाली आहे असे आपल्याला वाटते का? एका गव्याची शिकार करणे हे एका सिंहाचे काम नाही...म्हणजेच सिंह गव्यापेक्षा शक्तिशाली नाहीत...

टारझन's picture

11 Jul 2008 - 7:56 pm | टारझन

१ टू १ कंप्यारिझन करता काहो? मग सांगा मांसाहारी डायनॉसोर पेक्षा शक्तीशाली कोण ? आणी ते तुमचा गवा एकदम छडमाड आसतंय बगा . तुमाला पण घाबरल. रानरेडा म्हणायचं असेल तुम्हाला. ऊद्या म्हणाल मांजर (मांसाहारी) काय तुमच्या गव्यापेक्षा(शाकाहारी) शक्तिशाली का ?
जरा क्लास ठेवा हो . एका साईड ला सगळे मांसाहारी आणि एका साईड ला सगळे शाकाहारी ठेऊन विचार करा ...

म्हणजेच सिंह गव्यापेक्षा शक्तिशाली नाहीत...
मास्तर दिसताय ... त्याच्या शिवाय ईतकी चूकीची माहीती एवढ्या आत्मविश्वासाने दिलीत. असो. मी अफ्रिकेत असतो. ईथे वन्यजिवनाशी चांगला संबंध आला म्हणून सांगतो. तो गवा अतिशय भित्रा प्राणी आहे आणि एक स्वस्त गिर्‍हाईक असत ते मांसाहार्‍यांच. ईव्हन रेडा आणि हती,गेंडा देखील सिंहाला पाहून त्याच्या नादी न लागणे पसंत करतात. हे मी डोळ्याने पाहीलेले आहे.

राजू गाईड) कु.ख.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

फास्टरफेणे's picture

12 Jul 2008 - 12:53 am | फास्टरफेणे

टीका व्यक्तिगत पातळीवर करताय याचा अर्थ तुम्हाला मुद्यांवर चर्चा करायची नाहिये...मुद्दे नसले कि अशी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. विषय काय आणि चर्चा कशाची! मांसाहारी असण्याचा आणि शक्तिशाली असण्याचा काय संबंध?

फक्त माहितीसाठी-
१)सगळे डायनॉसोर मांसाहारी होते का हो? एकदा इथे डोकवा - http://www.livescience.com/animals/060301_big_carnivores.html
२)गव्याची शिकार हे एकट्या सिंहाचे काम नाही...म्हणूनच ३-४ सिंह (खरंतर सिंहीणी) मिळून शिकार करतात.

माझा आक्षेप फक्त "मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांपेक्षा(अपवाद हत्ती) शक्तीशाली असता" या तुमच्या विधानाला होता. चुकीची माहिती पसरवू नका. बाकी कोण काय खातं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...

टारझन's picture

12 Jul 2008 - 6:11 am | टारझन

सर्वप्रथम एक सांगू ईछीतो की टीका कोणावर वैयक्तिक रीत्या केलेली नाही. आंगावर ओढून घ्यायचं असेल तर खुशाल घ्या.
आणि कशावरून चिडचिड हो? विषयांतर कोणी कुठे कसे सूरू केलंय ते पून्हा एकदा तपासा.. क्रियेला प्रतिक्रिया झाली एवढंच.
आम्ही कोणतीही चूकीची माहीती पसरवंत नाहीये. कोणाच्या जिवावर ऊठणारी अफवा ऊठवल्याचे भासवू नका ऊगाच. राहीला प्रश्न डायनॉसोर चा .. मी चक्क म्हंटलय की "मांसाहारी डायनॉसोर" आणि ते त्या वेळचे सर्वात शक्तिशाली प्राणी होते. "शाकाहारी डायनॉसोर" पेक्षा सूद्धा. आणि मला आता असल्या कुचकट ....ना प्रतिक्रीया द्यायची ईच्छाच ऊरलेली नाहीये. ईथे खरच विषयांतर होतंय आणि तुम्हीही त्याला हवा दिलीच की हो? तुम्ही कुठले धुतलेले तांदूळ.
काही चूक झाली असेल तर मिपाकरांची माफि मागतोय. एक गाढव झालं तर दुसर्‍याने होऊ नये.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2008 - 9:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला ऊर्जा म्हणायचं होतं, शक्ती नाही! ऊर्जेला विंग्रजीत energy म्हणतात आणि शक्तीला power! आता माझ्यासारखे शाकाहारी पामर शक्तिशाली मांसाहारींशी दोन हात काय करणार? पण कळफल़क बडवण्याएवढी ऊर्जा आमच्या पालापाचोळ्यातून मिळते म्हणून एवढी हिम्मत केली.

तो मुद्दा सोडून आणखी एका मुद्द्यावर कोणी स्पष्टीकरण देऊ शकेल काय? तो मुद्दा असा की, प्राणी जर नीट शिजवले (किंवा नाही) तर त्यांच्यातील जंतू जास्त हानीकारक ठरतात का? तसंच सर्व प्राण्यांच्या शरीरातील सर्व अमिनो ऍसिड्स माणसांसाठी चांगली असतात का? मी कुठेतरी ऐकलं होतं की सापाचं विष म्हणजे प्रथिनंच असतात, पण आपण त्यांचं आपल्यासाठी योग्य अशा अमिनो ऍसिड्स मधे रुपांतर करु शकत नाही, म्हणून ते विष ठरतं. तर जे प्राणी आपण खात नाही, किंवा प्राण्यांचे जे भाग आपण (मांसाहारी माणसं, आणि भूतं-खेतंही) खात नाही, त्यामधे असा काही विचार आहे का?

विचारी आणि बिचारी संहिता

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2008 - 9:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझं नाव संहिता "जी" नसून संहिता "जे" (जोशी) आहे. गेलाबाजार त्याचं पांढय्रा लोकांनी सह्निता, सॉन्या (आपल्यासाठी सोनिया), सोन्जा असं केलं होतं. पण एवढं "जी" वगैरे भारदस्त संबोधन माझ्यासारख्या फाटक्या लोकांना नाही शोभत!

टारझन's picture

11 Jul 2008 - 10:51 pm | टारझन

तुम्हाला एक खरड केलिये संहीता जी ... प्लिज वाचा...

शैलेन्द्र's picture

11 Jul 2008 - 10:42 pm | शैलेन्द्र

"मी कुठेतरी ऐकलं होतं की सापाचं विष म्हणजे प्रथिनंच असतात, पण आपण त्यांचं आपल्यासाठी योग्य अशा अमिनो ऍसिड्स मधे रुपांतर करु शकत नाही, म्हणून ते विष ठरतं""

नाही, जर आपण ते पोटात घेतल, आनि रक्तात मिसळू न देता त्याच पचन केल, तर ते प्रोटिन म्हणुनच काम करत, पन जर ते रक्तात न पचता तसच मिसळल(सर्पदंश) तर ते अपाय करते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jul 2008 - 3:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या माहितीत भर घालण्याबद्दल धन्यवाद.
माणूस चावल्याने साप मेला असंही मी गेल्या ५-६ महिन्यांत म.टा.मधे वाचल्याचं आठवतंय. सापालाही आपली लाळ विषारी ठरली असेल का?

सामान्य माहिती कमी असणारी संहिता.

सामंत साहेब ....
सुंदर विषय काढ्लात.
मी डॉ. अभय बंग यांचे "माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग" हे पुस्तक गीते समान मानतो. त्यात ही हेच दिले आहे.
सुंदर लिखाणा बद्द्ल आभार. अजुन येवू द्या.

--- आपला.. बबलु-अमेरिकन

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Jul 2008 - 5:45 am | श्रीकृष्ण सामंत

बबलुजी,
आपण केलेल्या प्रशंसे बद्दल आभार.

"मी डॉ. अभय बंग यांचे "माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग" हे पुस्तक गीते समान मानतो. त्यात ही हेच दिले आहे."
हे आपले वाक्य वाचून मला पण थोडा धीर आला. आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

किर्ति's picture

13 Jul 2008 - 12:47 am | किर्ति

:H मी शाकाहरि आहे
मला तुमचा लेख खुप आवड्ला आहे

किर्ति's picture

13 Jul 2008 - 12:50 am | किर्ति

खुप आवडला

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Jul 2008 - 5:10 am | श्रीकृष्ण सामंत

किर्तिजी,
आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं .
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

कैलासराजा's picture

13 Jul 2008 - 3:08 pm | कैलासराजा

" जीवो जीवस्य जीवनम "

ज्याला जे रूचेल आणि --पचेल--त्याने ते ते खावे.......

संदीप डांगे's picture

7 Jun 2015 - 6:37 pm | संदीप डांगे

धागालेखकाचे धमाल विनोदी विचार वाचून मी पण हा कु-प्रसिद्ध डॉयलोक मारून घेतो.

"काहीही हं श्री....!"