मँगो वुईथ फ्रेश क्रिम अँड सॅफ्रन (मलई आणि केशरयुक्त आंबा)

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
23 Apr 2013 - 2:45 am

Mango-with-fresh-cream

साहित्यः

हापुस आंबे - ४
व्हिपिंग क्रिम - १ कप
साखर - चवीपुरती
केशर - चिमुटभर.
वेलची पुड - चिमुटभर

कृती :

केशर दुधात किंवा पाण्यात मिसळून ठेवा.

आंब्याचा रस काढा. आवडीनुसार साखर मिसळून, मिक्सरवर फिरवून मुलायम करून घ्या.
व्हिपिंग क्रिम फेटून घ्या. घट्ट झालं पाहिजे.
क्रिम, वेलचीपुड आणि केशर, साखर घातलेल्या रसात मिसळून एकजीव करून घ्या.

हे मिश्रण सुंदरशा बाऊलमध्ये काढा. मध्यभागी आंब्याची एखादी छोटीशी फोड ठेवून आजूबाजूला केशराचे दोरे टाकून सजवा आणि सादर करा.

शुभेच्छा...!

प्रतिक्रिया

काकाकाकू's picture

23 Apr 2013 - 2:55 am | काकाकाकू

आणि मिसळपाववर टाकून छळ करा सगळ्यांचा" हे लिहायचं राहिलं वाटतं !!

मुक्त विहारि's picture

23 Apr 2013 - 11:57 pm | मुक्त विहारि

पण हे सगळ्याच पा,क्रु.ना लागू होते..

आता ईथे हापूस कुठे शोधू?
चवीत बदल होईल पण केसर आंब्यावर हा प्रयोग लवकरच करण्यात येईल. :)

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2013 - 3:10 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम फोटो अन सुटसुटीत पाककृतीबद्दल अनेक दुआँ...

अर्धवटराव's picture

23 Apr 2013 - 3:10 am | अर्धवटराव

पण हा धागा बघुन "हेच का आमचे बल्लवाचार्य पेठकरकाका" असा नाराजीचा सुर उमटला मनात.
म्हणजे कसं, कि अर्जुनाने धनुष्य वगैरे फेकुन, लोड-गाद्या लावुन, मस्तपैकी गीता ऐकायला मांडी ठोकुन बसावं , आणि श्रीकृष्णाने एखाद्या भीकंभटाने रचलेलं चार ओळींच बौद्धीक प्रवचन वाचुन दाखवुन "आजचा क्लास संपला" असं जाहीर करावं, असं झालं.

अर्धवटराव

अर्धवटराव's picture

23 Apr 2013 - 3:11 am | अर्धवटराव

"पेठकर काकांच्या" नावाला साजेसा नाहि वाटला हा धागा.

अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

23 Apr 2013 - 3:15 am | प्रभाकर पेठकर

का रे बाबा?

करून पाहा. स्वर्गीय आनंद देणारी पाककृती आहे.

पक पक पक's picture

23 Apr 2013 - 6:06 pm | पक पक पक

लहान तोंडी मोठा घास..
आंब्याचा रस मिक्सर मधुन काढला कि मुळ चवीत फरक पड्तो..नुसत्या बारीक फोडी करुन क्रिम मधे मिक्स केला तर जस्त छान लागतो. करुन पाहिल आहे.. :)

अंहं! आंब्याचा रस मिक्सरमध्ये फिरवला की त्याची गोडी जाते.
गृहीणीच्या हाताने जो रस निघतो त्यातच बाकीचे सगळे मिसळुन मग करा हवे तर, पण तो मिक्सरला लावला की त्याची १०% तरी चव उतरते.
स्वानुभव.

जेनी...'s picture

23 Apr 2013 - 8:52 am | जेनी...

हो हे अगदी खरय ... माझी आई सुद्धा आंबे हाताने कुस्करत बसते ...
मिक्सर मद्ध्ये रसाची चव जाते म्हणते ...
पण आईच्या हातचा आमरस खुप मस्त लागतो :)
आयेम लविन इट :)

बाकि पेठकर काका पाक्रु चवदार ... रसाळ ... अगदी गुळमाट :)

कवितानागेश's picture

23 Apr 2013 - 9:16 am | कवितानागेश

अगं, सासूचं पण कौतुक करावं! ;)

सस्नेह's picture

23 Apr 2013 - 5:06 pm | सस्नेह

हाताने पिळलेल्या आंब्याचाच खरा स्वाद !
बाकी पाकृ आमरसाची 'फास्ट्फूड' आवृत्ती वाटतेय..a

जगू द्या की वं सुखाने. का अशा पाकृ टाकून छळता? :(

नगरीनिरंजन's picture

23 Apr 2013 - 8:57 am | नगरीनिरंजन

मार डालाऽऽ, अल्लाह, मार डालाऽऽ

कवितानागेश's picture

23 Apr 2013 - 9:18 am | कवितानागेश

आंब्याबरोबर दुसर्‍या कशाचीच चव खरं तर आवडत नाही. पण केशर ट्राय करुन बघेन. दिसायला तर खूपच सुंदर आहे डिश.

पियुशा's picture

23 Apr 2013 - 9:38 am | पियुशा

वॉव !
कालच मस्त आमरस ओरपल्याने जळ्जळ कमी झाली ;)
आज हा प्रकार करुन बघते :)

नक्की करुन बघणार.

दिपक.कुवेत's picture

23 Apr 2013 - 10:59 am | दिपक.कुवेत

आंबा आणि व्हिप्ड क्रिमचं कॉम्बीनेशन छान लागतं पण रस हातानेच काढलेला हवा (निदान मला तरी तस्साच आवडतो). वर म्ह्टल्याप्रमाणे मिक्सर मधे फिरवला कि नक्किच चव बदलते आणि जास्त सोफॅस्टिकेटेड वाटतो. ह्या शिवाय हे नुसतं डेझर्ट म्हणुन खायचं कि पोळिबरोबर?

मुक्त विहारि's picture

23 Apr 2013 - 11:59 pm | मुक्त विहारि

आमरस भातावर घेवून खाणारी पण माणसे आहेत..

मी ऐकलय नागपूरात खातात. चुकले असल्यास आधीच माफी मागते नाहीतर कोणाची तरी अस्मिता चुकून दुखावली जायची :(

मला एका एमपी वाल्याने सांगितलं होतंन की गरमागरम भात, वाटीभर आमरस आणि चांगलं दोनेक चमचे साजूक तूप हे कॉम्बिनेशन ट्राय करुन बघ. धाडस करुन पाह्यलं, पण काही विशेष चव वाटली नाही. त्यापेक्षा आमरस पुरणपोळी हा बेस्ट ऑप्शन.

कोकणात आंब्याचे रसाळलेले बाठे आणि आमरसाला थोडी फोडणी (फोडणी + किंचीत मीठ + लालतिखट) देऊन त्याचे बाठे/सासव तयार करतात.
हा प्रकार भातावर, चपाती/पोळी किंवा नुसताच ओरपायलाही छान लागतो.

मी नागपूरकर नाहीये पण नागपूरात आमरस पोळीबरोबरच खाल्ला जातो याबाबत खात्री बाळगा.

मागे माझ्या दक्षिण कर्नाटकातील रूममेटने मी आवडीने आमरस बनवून पोळीबरोबर वाढल्यावर अशी काही प्राथमिक प्रतिक्रिया दिली की... जाउ द्या.. :-).

श्रीरंगपंत, आमरसाशी लावून खाण्याच्या पोळ्या वेगळ्या असतात हे आधी मला माहित नव्हते. नंतर गवसण्यांबद्दल समजले पण आणखी एक प्रकार काही वर्षंपूर्वी समजलाय. दोन फुलके करून एकमेकांवर नुसते कडा दाबून चिकटवल्यासारखे करायचे. नंतर लाटायचे नाही. आता तापलेल्या तव्यावर नेहमीसारखी पोळी भाजायची. ही नक्की फुगते. तव्यावरून काढल्यावर त्याच्या दोन पोळ्या सहज सुटून येतात. ती म्हणे आमरसाबरोबर खायची पोळी असते. छान लागते हेही आहेच. ;)

श्रीरंग_जोशी's picture

24 Apr 2013 - 9:34 pm | श्रीरंग_जोशी

अरे व्वाम हे तर नव्यानेच कळले.

रोचक वाटत आहे ही पद्धत.

पाकृ येऊद्या!!

शुचि's picture

24 Apr 2013 - 10:07 pm | शुचि

जबहरी!!

सुहास झेले's picture

23 Apr 2013 - 11:25 am | सुहास झेले

जबरी ...:) :)

प्रभाकर पेठकर's picture

23 Apr 2013 - 12:01 pm | प्रभाकर पेठकर

काकाकाकू, गणपा, श्रीरंग_जोशी, अर्धवटराव, aparna akshay, पूजा पवार., लीमाउजेट, पियुशा, अक्षया, दिपक्.कुवेत आणि सुहास झेले.... मनःपूर्वक धन्यवाद.

काकाकाकू :सध्या आंब्यांचा मौसम आहे. तो मौसमच एक मोठ्ठा छळवाद आहे. आंबा अत्तिशय आवडतो पण.. डॉक्टर मनसोक्त खाऊ देत नाही. निदान मित्र-मैत्रिणींना खाऊ घालून त्यावरच समाधान मानतो आहे.

अर्धवटरावः अरे! येणार होतास मस्कतला नं! त्याचं काय झालं?

गणपा: When you don't get what you like, you must like what you get. केसर आंबा कधी चाखला नाही. पण करून पाहा.

aparna akshay,पूजा पवार : असेही क्रिम मिसळले की गोडवा जरा कमी होतोच. म्हणूनच साखर मिसळायची. अर्थात, आईच्या हातच्या रसाची चव कशालाच नाही. ही एक क्रिमी पाककृती आहे. त्यामुळे रस मुलायम असणे गरजेचे होते आणि म्हणूनच मिक्सरची मदत.

दिपक्.कुवेत: ही पाककृती डेझर्ट वर्गात मोडते. ह्याच पाककृतीत क्रिम ऐवजी चक्का (टांगलेले दही) मिसळले की 'आम्रखंड' तयार होते. ते मात्र पुर्‍यांसोबतच छान लागते. (पोळी बरोबर नाही.)

पैसा's picture

23 Apr 2013 - 12:54 pm | पैसा

काय म्हणू समजत नाहीये! डोळ्यांनीच खाऊन घेते. सोपी आणि एकदम देखणी राजेशाही पाककृती!

अशक्य जळवणारी पाकृ. पण दोनेक दिवसांपूर्वी आमरस ओरपला असल्यामुळे जळजळ कमी झालीये जरा :)

धनुअमिता's picture

23 Apr 2013 - 1:07 pm | धनुअमिता

शब्दच अपुरे पडत आहेत ह्या पाककृतीचे वर्णन करायला.

चंबु गबाळे's picture

23 Apr 2013 - 2:11 pm | चंबु गबाळे

वाह वाह.. सुरेख..

दिपक.कुवेत's picture

23 Apr 2013 - 3:04 pm | दिपक.कुवेत

हेच मिश्रण जर फ्रिजर मधे घट्ट केलं तर एक स्मुथ/सील्कि मलई आणि केशरयुक्त आंब्याची कुल्फि बनेल का?

वा काका... मस्तच... पण आता इथे हापुस आंबे कुठुन शोधु???? मला पाठवुन द्या आता तुम्हीच.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2013 - 5:23 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gif

फोटू भारी आलाय व पाकृ अगदी सोप्पी!

मुक्त विहारि's picture

24 Apr 2013 - 12:01 am | मुक्त विहारि

आवडेश..

मुक्त विहारि's picture

24 Apr 2013 - 12:01 am | मुक्त विहारि

आवडेश..

अनिता ठाकूर's picture

24 Apr 2013 - 12:49 pm | अनिता ठाकूर

हापूस आंब्याच्या रसात आणखी काही भर घालायची इच्छा मला तरी होत नाही. असे केल्याने मूळ चव उणावते.अर्थात, 'पसन्त अपनी अपनी....'!!!

विसोबा खेचर's picture

24 Apr 2013 - 12:55 pm | विसोबा खेचर

शब्दच संपले अचानक..!

कच्ची कैरी's picture

24 Apr 2013 - 8:38 pm | कच्ची कैरी

आंबा आणि केसर आवडत कॉम्बिनेशन :)

जयवी's picture

28 Apr 2013 - 1:00 am | जयवी

अहाहा...... !!
फोटू बघूनच दिल खुश हो गया :)

प्रभाकर पेठकर's picture

29 Apr 2013 - 9:37 am | प्रभाकर पेठकर

पैसा, बॅटमॅन, धनुअमिता, चंबु गबाळे, दिपक्.कुवेत, Mrunalini, अत्रुप्त आत्मा, रेवती, मुक्त विहारि, अनिता ठाकूर, विसोबा खेचर आणि कच्ची कैरी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

दिपक्.कुवेत - प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. करून पाहा आणि एक नविन पदार्थ मिसळपाववर सादर करा.

अनिता ठाकूर - तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे. मात्र आमरस आणि ह्या पाककृतीची तुलना न करता एक नविन चव अशा दृष्टीने पाहिल्यास आवडायला हरकत नाही. शिवाय, येणार्‍या पाहुण्यांना एक साधी, सोपी आणि तरीही चविष्ट अशी 'स्वीट डिश' सादर करता येते. पाहुण्यांनाही आवडेल अशी खात्री आहे.