॥ आरती दुष्कळाची ॥

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
21 Apr 2013 - 9:39 am

जय देव जय देव जय दुष्काळदादा,हो श्रीदुष्काळदादा ।
आमच्या गावाला येऊनको यंदा जय देव जय देव ॥धृ॥

मागील वर्षी अतिवृष्टी झाली ।
उभी पिके सर्व वाहूनिया गेली ।
चालु वर्षाला पाऊस गेला ।
सर्व पिकांचा सत्यानास झाला ।
मिळेना गारिबांना कुठे कामधंदा...॥१॥

ऊन्हाळ्यात मिळेना प्यायला पाणी ।
मुले बाळे कशी फिरती रानोरानी ।
पोटाला मिळेना पोटभर अन्न ।
अशा वेळी वाटते नको हे जीणं ।
डगमगतो तेंव्हा पुरुष ही खंदा...॥२॥

मंत्री महोदय येऊनिया जाती ।
मोठमोठाल्या सभा भरविती ।
हे करू ते करू अश्वासने देती ।
घरी गेल्यावर विसरुन जाती ।
भोळ्या जनतेचा घेतात फायदा...॥३॥

रोजगार हामीची कामे ही येती ।
ऊन्हा तान्हात कामे करताती ।
मर मर राबतात दिवस भर ।
पगार कधीना मिळे वेळेवर ।
खाण्या पिण्याचा होतोय वांद...॥४।

जीवनमान