भार्गव राघव द्वारकाधीशा .. (भाग १)

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in भटकंती
20 Apr 2013 - 10:19 am

कलादालन आणि प्रवासवर्णन इथे आमची हजेरी कायम वाचक म्हणूनच लागत आली आहे. ह्या ठिकाणी कधी लेखक म्हणून येऊ असे वाटलेच नाही. त्यामुळेम मग अशा लेखांवरती आपले ज्ञानकण उडवणे येवढेc आपले काम उरले होते. मात्र काल अचानक रामनवमीच्या मुहूर्तावर द्वारकेची वारी झाली आणि मन कसे प्रसन्न झाले. ह्यातलेच काही फटू झेपेल तेवढ्या वर्णनासह देत आहे. काही दिवसांपूर्वी असाच योग पोरबंदरचे सुदामा मंदीर बघण्याचा आला. त्याचे देखील काही फटू देत आहे.

ह्या सर्व प्रवासातले आमचे सहप्रवासी म्हणजे आमचे परम मित्र आणि मिपाचे मूकवाचक अमोल जाधव. खरेतर ह्या भूमीला आमचे पय लागण्याचा आणि ही पवित्र माती आमच्या कपाळाला लागण्याचा योग आमच्या अमोल जाधवांमुळेच शक्य झाला आहे. सध्या इथे त्याची कंपनी गुजरात ह्या दुसर्‍या कंपनीच्या सहाय्याने मस्त एकदम मख्खन असे रोड तयार करत आहे.
.

गुजरातमध्ये (खरेतर सौराष्ट्र) आल्यापासून प्रवास असा दोन टोकालाच होतो आहे. एका बाजूला पोरबंदरच्या दिशेने आणि एका बाजूला राजकोटच्या दिशेने. दोन्हीकडे जाताना येणारा समान अनुभव म्हणजे दुतर्फा दिसणारी जमीन आणि फक्त मोकळी जमीन. एक गिरनारचा डोंगर सोडला, तर इथे डोंगर नावाला देखील दिसणे मुष्कील. पोरबंदरला बघण्यासरखी ठिकाणे भरपूर, मात्र आमच्या पाहण्यात आलेली आणी अती आवडलेली ठिकाणे म्हणजे सुदामापुरी आणि Porbandar Bird Sanctuary.
.

.

इथे निवांत बसून 'पाखरे' टिपण्याची देखील सोय आहे. पक्षांची माहिती देण्यासाठी जाणकार माणूस देखील उपलब्ध आहे. इथे आजारी, अथवा जखमी पक्षांची देखभाल देखील करण्यात येते.

.

.

ह्या ठिकाणापासून जवळच आहे ती म्हणजे सुदामापुरी. कृष्णमित्र सुदाम्याचे जन्मस्थान.
.

सर्व ठिकाणी असते तशी इथे देखील फटू काढण्यास बंदी असल्याने, बाहेरच्या बाजूने जमेल तेवढा क्लिकक्लिकाट केला आहे.
.

.

ही सुप्रसिद्ध 'लक्ष चौराशी' परिक्रमा. जी खरेतर सुदाम्याने कृष्णभेटीसाठी केली, पण इथे चालून तुम्ही देखील तिचे पुण्य मिळवु शकता. इथे सुदाम्याच्या जुन्या घराचे अवशेष फार छान जपलेले आहेत. खास गोष्ट म्हणजे, इथे प्रसाद म्हणून पोह्याची पुरचुंडी दिली जाते. पोहे अक्षरशः अविट गोडीचे असतात.
.

इथून पुढे सुरु होतो तो कीर्तिमंदिर अर्थात महात्मा गांधीचे जन्मस्थान आणि द्वारकेच्या दिशेन. ह्या धाग्यातच फटूंचा भडिमार झाल्याने, पुढच्या धाग्यात हा प्रवास पूर्ण करतो. अर्थात धागा उद्याच्या आतच त्वरेने टाकला जाईल हे नक्की.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

ह्या धाग्यातच फटूंचा भडिमार झाल्याने,

खरय.

पुढच्या धाग्यात हा प्रवास पूर्ण करतो. अर्थात धागा उद्याच्या आतच त्वरेने टाकला जाईल हे नक्की.

कशाला?

बाकि चान चान

प्रीत-मोहर's picture

20 Apr 2013 - 10:27 am | प्रीत-मोहर

गुड टु सी यु हिअर.

बॅटमॅन's picture

20 Apr 2013 - 2:42 pm | बॅटमॅन

मस्त फोटो. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!

मूकवाचक's picture

21 Apr 2013 - 12:25 pm | मूकवाचक

+१

कवितानागेश's picture

20 Apr 2013 - 3:38 pm | कवितानागेश

शेवटच्या फोटूत नक्की काय आहे?

धमाल मुलगा's picture

21 Apr 2013 - 8:20 am | धमाल मुलगा

"(स्वस्तिक) श्री सुदामाजीकी लक्ष चौराशी परिक्रमा (स्वस्तिक)" हे आहे.

पर्‍या...लेका तुझ्यासारखा मनुक्ष भटकंतीमध्ये येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं रे. :D

नंदन's picture

21 Apr 2013 - 8:48 am | नंदन

गुजरातीत अभयारण्याचे अभ्यारण्य झालेले पाहून 'गंमट' वाटली :).
बाकी वास्तवातल्या असो वा अ-वास्तवी. सँक्च्युअरीज् एकंदरीतच 'रण्य' (ज्यांच्यावरून रण माजू शकते असे जे ते) क्याटॅगॅरीतल्या ;)

धमाल मुलगा's picture

21 Apr 2013 - 8:57 am | धमाल मुलगा

नंद्या...नंद्या....दे मेल्या..पाय कापून दे पाठवून...देव्हार्‍यात ठेवेन म्हणतो. =))

बॅटमॅन's picture

21 Apr 2013 - 4:27 pm | बॅटमॅन

अगागागागा =)) =)) =)) _/\_

प्यारे१'s picture

21 Apr 2013 - 4:54 pm | प्यारे१

हा हा हा हा!
परवाचा चेपुवरचा शिरा पण पराच्याच हातचा खरंतर!
येतील. आता पाकृ देखील येतील. ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Apr 2013 - 9:25 am | श्री गावसेना प्रमुख

फटु चान आलेत पराशेठ,

आतिवास's picture

21 Apr 2013 - 9:28 am | आतिवास

शीर्षक पाहून लेख वाचायला घेतला आणि अपेक्षाभंग झाला.

मुक्त विहारि's picture

21 Apr 2013 - 12:56 pm | मुक्त विहारि

पु.भा.प्र.

स्पंदना's picture

22 Apr 2013 - 6:46 am | स्पंदना

भेटला का? भेटला? देवमाणुस म्हनौन मंदिरात बसवलेला माणुस भेटला का?

बाकी जुन्या घराचे अवशेष म्हणजे कीती जुन झाल हो घर ते परासाहेब?

वा पोहे मिळतात किती स्थानोचित प्रसाद!!! कौतुक वाटलं.

सुमीत भातखंडे's picture

22 Apr 2013 - 1:23 pm | सुमीत भातखंडे

आवडले...जुन्या घराचे अवशेष म्हणजे काय हे बघायला आवडेल. असल्यास त्याचेही फोटो टाकावेत

मृत्युन्जय's picture

22 Apr 2013 - 4:50 pm | मृत्युन्जय

चला बर्‍याच दिवसांनी पराशेठ लिहिते झाले. तो पहिल्या फोटोतला रस्ता बघुन डोळे निवले हो.

विकास's picture

23 Apr 2013 - 6:53 pm | विकास

मस्त माहिती आणि फोटू!

अजून येउंदेत.

क्लिंटन's picture

23 Apr 2013 - 7:03 pm | क्लिंटन

छान. फोटु आवडले. पुढच्या भागाची (आणि सुदाम्याचे पोहे कधी खायला मिळणार याची) वाट बघत आहे. :)