पुरुष विभाग : सल्ला कम माहिती हवी आहे

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in काथ्याकूट
15 Apr 2013 - 3:19 pm
गाभा: 

राम राम मंडळी

एक थोडी माहिती हवी होती.

महाराष्ट्रातील अप्रसिद्ध पण पहाण्यालायक ठिकाणे जिथे पुण्याहून निघून आठ दिवसांच्या प्रवासात पाहून होतील अशी यादी हवी होती. आमचे काही मित्र (संख्या ६-७ सर्व पुरुष) गाडी करुन पुण्याहून निघून रमत गमत पहात मजा करत परत पुण्याला यायचे असा विचार करत आहेत. बरीचशी ठिकाणी तीर्थस्थाने, मंदीरे, वगैरे पाहून झाली आहेत. एखादे गाव आगळे वेगळे असेल तरी चालेल. पुण्याहून कसे जायचे, कोणत्या मार्गाने जायचे, निवार्‍याची ठिकाणे इत्यादी सांगितल तर बरे होईल.

आपला मित्र

नाना

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

15 Apr 2013 - 4:41 pm | नितिन थत्ते

तिथे महिला येत नाहीत अशी ठिकाणे हवी आहेत का?

नाना चेंगट's picture

15 Apr 2013 - 4:54 pm | नाना चेंगट

हो चालतील की.. द्या !

प्रभाकर पेठकर's picture

15 Apr 2013 - 4:48 pm | प्रभाकर पेठकर

वाटेतील, चांगल्या, मद्यालयांबद्द्लची माहिती ही प्रतिसादाची विशेष अर्हता मानली जाईल.

नाना चेंगट's picture

15 Apr 2013 - 4:54 pm | नाना चेंगट

अगदी अगदी

सहमत

छोटा डॉन's picture

15 Apr 2013 - 5:01 pm | छोटा डॉन

अजेंडा काय आहे ?
किती निधी मंजुर झाला आहे ?

- छोटा डॉन

प्रसाद गोडबोले's picture

15 Apr 2013 - 5:11 pm | प्रसाद गोडबोले

आत्ता उन्हाळ्याचं कुठं फिरणार राव ?? महाराष्ट्रात तर भर उन्हाळ्यात पाहता येईल असं एकही ठिकाण माहीत नाही मला .

हां , उत्तरांचल मधे जाऊ शकाल राफ्टिंग , ट्रेकिंग आणि हौस असेल तर गंगोत्री यमुनोत्री . मी राफ्टिंग केलय शिवपुरी ते हरिद्वार ! केवळ अप्रतिम अनुभव ! गंगोत्री ला जायची इछ्छा आहे ... बघुया कधी योग येतो ते !!

आणि हो जर काही त्रिलिंग अ‍ॅडव्हेन्चर करायचे असेल तर ... केदारनाथ ते बद्रीनाथ असा एक मार्ग होता म्हणे पुर्वी तो एक्क्ष्प्लोअर करायला मजा येईल !!

आणि पुरुष विभागात टाकलय म्हणुन खास सल्ला : ब्यॅकॉकला जाऊन येता येईल की ७-८ दिवस वेळ असेल तर ...मस्त बीचवर थायी मसाज वगैरे ;) बुम बुम ;)

>>>महाराष्ट्रातील अप्रसिद्ध पण पहाण्यालायक ठिकाणे

आम्चं शेजारचं तिसरीतलं पोरगं पन वाचतं नीट.
(काका हलके घ्याल ना?) ;)

प्रसाद गोडबोले's picture

15 Apr 2013 - 5:25 pm | प्रसाद गोडबोले

तिसरीतलं पोरगं भर दुपारी २ बीयर लावुन मिपावर टाईमपास करायला येत नसावं हो.

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Apr 2013 - 5:29 pm | श्री गावसेना प्रमुख

बर झाल हा तुमचा डु.आयडी आहे अस कळल, नाहीतर केव्हढा गहजब झाला असता ह्या विधानावरुन

प्यारे१'s picture

15 Apr 2013 - 6:38 pm | प्यारे१

>>>भर दुपारी २ बीयर लावुन मिपावर टाईमपास करायला

चालू द्या! ;)

प्रभाकर पेठकर's picture

15 Apr 2013 - 5:14 pm | प्रभाकर पेठकर

मुंबईतून बाहेर पडल्यावर प्रवासात एक एक तास कुठे मुतारी नाहिए. आहेत त्याही स्वच्छ नाहीत. ज्यांना मधुमेह आहे अशा पुरुषांनी घरून निघतानाच लघुशंका निरसन करून निघावे.

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Apr 2013 - 5:16 pm | श्री गावसेना प्रमुख

कुठल्याही मारुतीच्या देवळात जा,घरापाशीच आसल .

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2013 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार

आमचे काही मित्र (संख्या ६-७ सर्व पुरुष) गाडी करुन पुण्याहून निघून रमत गमत पहात मजा करत परत पुण्याला यायचे असा विचार करत आहेत.

पुरुष पुरुष काय मजा करणार ?

मालोजीराव's picture

15 Apr 2013 - 5:21 pm | मालोजीराव

च्यामारी येकदम बेशिक प्रष्ण विचारून र्हायले तुमी :))

प्रभाकर पेठकर's picture

15 Apr 2013 - 5:28 pm | प्रभाकर पेठकर

पुरुष पुरुष काय मजा करणार ?

आजकाल पुरुषपुरुषांच्या मजेलाही कोर्टाने मान्यता दिली आहे.

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 7:35 pm | पिंपातला उंदीर

हा हा हा. खूपच काळीचा मुद्दा. २ बियर पिलेला पुरुषच अशी प्रतिक्रिया देऊ शकतो. बाकी आम्ही जळत आहोत हा भाग अलाहिदा : )

चिंतामणी's picture

18 Apr 2013 - 12:35 am | चिंतामणी

पुरुष पुरुष काय मजा करणार ?

तुझे अनुभव शेअर कर.

मालोजीराव's picture

15 Apr 2013 - 5:19 pm | मालोजीराव

बजेट कस काय ? धार्मिक स्थळे,थंड हवेची ठिकाणे, ऑफबीट देवस्थाने अथवा ठिकाणे यापैकी काय अपेक्षित आहे ? फक्त मौजेची ठिकाणे का सगळी भेळ असेल तरी चालेल ?

तर्री's picture

15 Apr 2013 - 5:44 pm | तर्री

एकदम अप्रसिद्ध आहे , मजा ही आहे . पुरुषांचे यथायोग्य स्वागत आहेच. ऐतिहासिक सुध्दा आहे.
महाराष्ट्र -एम्.पी. च्या सीमेवर आहे - चालत असेल तर पहा बॉ/

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2013 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार

गाडी काळ्या काचांची आहे काय?

मालोजीराव's picture

15 Apr 2013 - 6:34 pm | मालोजीराव

नाशिक- कोल्हापूर - गोवा - तळकोकण

माहितीगारांनी भर टाकावी

वणी (धार्मिक) - चांदवड (ऐतिहासिक) - सुला वायनरी (?) - त्र्यंबक (धार्मिक,निसर्ग ) - भंडारदरा (थंड हवेचे ठिकाण) - अमृतेश्वर मंदिर,रतनवाडी (अप्रतिम मंदिर अफाट निसर्ग सौंदर्य) - घाटघर (कोकणकडा आणि शेजारी कळसुबाई ते रतनगड पर्यंतची सह्याद्रीची सर्वातबेलाग डोंगररांग) - जुन्नर - कुकडेश्वर मंदिर -chateau indage वायनरी,नारायणगाव (सकाळी ११ च्या आसपास गेलात तर पूर्ण वायनरी ची आतून सफर करायला मिळेल) -नारायणगाव (सध्या शिजन चालू असल्याने म्हाराष्ट्रातील समदे तमाशा फड बघायला मिळतील) - पुणे - बनेश्वर (बर्याचदा गेले असाल पण रस्त्यात आहे म्हणून) - औंध चे भवानी वस्तू संग्रहालय (सातारा) - पाटेश्वर - शिखर शिंगणापूर - पाल चा खंडोबा - कराड - कोल्हापूर - गगनबावडा - दाजीपुर -दांडेली अभयारण्य - -गोवा -सावंतवाडी -मालवण- तारकर्ली -विजयदुर्ग - संगमेश्वर - मार्लेश्वर

रफ प्लान आहे
काही चुकलं असल्यास दुरुस्ती करावी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Apr 2013 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नारायणगावच्या 'शातू इंदाज' या वायनरीमधे दारू प्यायची असेल तर 'शिराज' घ्या. नवशिक्या दारू पिणार्‍यांसाठी 'मर्लो' आणि थोडी चढल्यावर 'मर्लो-शिराज' काँबिनेशन ठीक आहे. (सोकाजीने हा प्रतिसाद दोन ड्रिंकं पिऊन हिंमत वाढण्याआधी वाचू नये. मर्लो-शिराजचं काँबिनेशन मिळतं हे पाहून तो जागच्या जागी थिजेल. आधीच असा एक पुरुष बळी गेल्याचं मी पाहिलेलं आहे.) त्यांची कॅब्रने सुव्हीन्यू असते का निश्चित आठवत नाही; असल्यास ती ही चांगली असते.

तिथले महिलांसाठी राखीव असणारे संडास चांगले आहेत हे अनुभवांती निश्चित सांगू शकते. पुरुषांसाठी राखीव असणारे संडास मुद्दाम घाण ठेवण्याचं काही कारण नसावं; असल्यास अधिक गर्दी आणि सगळ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी आरोग्यदायी नसणं हे कारण असू शकेल.

त्यांच्या हॉटेलातल्या जेवणाची क्वालिटी घसरलेली आहे. पण तिथले मटन बोटी कबाब फार झकास होते असं श्रावण मोडक आणि चिंतातुर जंतू यांचं म्हणणं पडलं. मी खायच्या आत त्यांनी शेवटचाही गटकवला; त्यामुळे व्यक्तिगत अनुभव नाही. पनीरचे पदार्थ तसे चांगले होते.

---

पुरुष विशेष धाग्यामधे माझ्याकडे असलेली अल्प माहिती प्रसारित करण्याची संधी दिल्याबद्दल मी लेखक श्री. नाना चेंगट आणि इतर समस्त पुरुष आयडींचे आभार मानते.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2013 - 10:05 am | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद म्हणायचा का काय हा !

अशाच प्रतिसादांना घाबरुन वेगळे दालन उघडले असावे.

संपादित

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2013 - 3:40 pm | प्रसाद गोडबोले

:(
माझाही १ प्रतिसाद संपादीत झालाय एका दिवसात ...

मग आता "सत्यं ब्रुयात प्रियं ब्रुयात न ब्रुयात अप्रियन नृतम " वाचायाला घ्यावे लागणार असे दिसते =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2013 - 12:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सॉरी. तुमच्यासाठी खास हातभट्टीची माहिती मला त्या भागात काम करूनही माहिती नाही. बायकांनी कोणी अशी माहिती सहज (सहजराव नव्हेत) देत नाही रे. तुम्ही लोक पुरुष विभाग सुरू करून तिथून माहिती आणून मला द्या ना!

संपादित

आशु जोग's picture

17 Apr 2013 - 11:52 pm | आशु जोग

जुन्नर - कुकडेश्वर मंदिर

हे इतक्यात पाहीलय का, जुनं देऊळ सरकारने भग्न केलय

आशु जोग's picture

17 Apr 2013 - 11:58 pm | आशु जोग

सरळ वेरूळ अजिंठा गाठा

सारखं फिरायला कोकणात काय म्हणून जायचं !

नारयणगावला गेलात तर 'कढीवडा' खा