कोकण

वैशाली१'s picture
वैशाली१ in भटकंती
9 Apr 2013 - 4:33 pm

आंब्याच्या सिझन मध्ये कोंकणात जावेसे वाटत आहे . तसे मागच्या वर्षी २ वेळा दापोली ला गेले होते. या वर्षी ही दापोली आहेच पण अजून कोणाला चांगली फिरायची जागा माहित असल्यास जाणकारांनी माहिती द्यावी ( कोकणातली ).

ठिकाण मुंबई पासून ६-७ तासावर गाडीने जाण्या सारखे हवे आहे. घरगुती राहण्याची सोय अथवा रिसोर्ट माहिती असेल तर सांगावे .

प्रतिक्रिया

मागच्या वर्षी ग.वी. नी कोकण पर्यटनावर एक छान लेख लिहिला होता. त्याची लिंक मिळाली की देतो.
दापोली पासून रत्नागिरी आणि रत्नागिरी पासून सावंतवाडी अश्या २ टप्प्यात प्लान्निंग करावे.
http://www.facebook.com/groups/162481280519060/
मी नेहमी एका नव-उद्योजक तरुणी कडून दौरा प्लान करून घेतो. पर्यटनाबरोबर नवीन पिढीला उत्तेजन दिल्याचे भरपूर समाधान मिळते.
ख.व. मध्ये -संपर्क दिला आहे.

गवि's picture

9 Apr 2013 - 6:53 pm | गवि

http://www.prakrutiresorts.net/#page_19

महाग आहे पण पूर्ण मोबदला. ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि संध्याकाळी चहा स्नॅक्स इन्क्लुडेड. रूम्स अत्यंत खास. शिवाय हवंच असेल तर स्पा वगैरे आहेच. (स्पावड्या नव्हे..)

यापूर्वी गेला नसाल तर डोळे झाकून जा. शनिवारी गेलात तर लाईव्ह गझल्स असतात.

रिसॉर्टचा प्रायव्हेट बीच आहे. तिथे फक्त रिसॉर्टच्या पाहुण्यांना बैलगाडीतून घेऊन जातात.

अप्रतिम सुंदर आणि मेंटेन्ड रिसॉर्ट आहे.

काशिद बीच - मुंबईपासून चार ते पाच तास ड्राईव्ह (नाश्त्याचा ब्रेक धरुन). आणखी पर्यटन हवं असेल तर आसपास भरपूर ठिकाणं आहेत. जंजिरा किल्ला आणि आणखीही बरेच.

पण हा प्रचंड पसरलेला मस्त रिसॉर्ट सोडून बाहेर पडावं असंच वाटणार नाही. आतच फिरण्यात गुंतून राहाल. :)

आलिबाग जवळ आवास म्हणुन एक गाव आहे ,तेथे निशीत परब म्हणुन एक आहेत त्यांचे नेहा रिसॉर्ट छान आहे एक दोन दिवस रहायला.घरगुती जेवणाची छान सोय (मासे स्पेशल -मांदेली खुपच छान)
त्यांचा नम्बर-९९६०९८६००७. ,गेटवे इंडिया वरुन लाँच ने मांडव्याला येउन रिक्शाने आवासला जाउ शकाल्.फक्त दिड ते दोन तासात ...

आदूबाळ's picture

9 Apr 2013 - 11:40 pm | आदूबाळ

आवास खरोखरच मस्त आहे. पुण्याहून जाणं मात्र जरा कटकटीचं आहे...

सूड's picture

9 Apr 2013 - 11:45 pm | सूड

तारकर्ली आणि आजूबाजूच्या पर्यटन स्थळांबद्दल काही माहिती असल्यास कळविणे.

ganu's picture

10 Apr 2013 - 2:28 pm | ganu

तारकर्ली आणि आजूबाजूच्या पर्यटन स्थळांबद्दल माहिती:देवबाग,मालवण किल्ला,गणपति मंदिर (साळगावकरांचे ),सुनामी बीच.
तुम्हि तेथे स्कुबा डायवीगपण करु शकता.बनाना बोटीत फेरफटकापण मारु शकता.त्यादिवशी स्वच्छ स्नान करुन गेलात तर dolphin पण
बघु शकता.शेवटी थकवा आल्यानंतर अतीथि बांबु येथे भरपेट पोटपुजा करु शकता. (स्वस्त आणि मस्त)

सूड's picture

10 Apr 2013 - 9:50 pm | सूड

ओक्के. पण मुंबैहून जाताना याचा क्रम कसा लावावा, तीनेक दिवसांची सहल प्लान केल्यास?

नि३सोलपुरकर's picture

10 Apr 2013 - 3:12 pm | नि३सोलपुरकर

"तुम्हि तेथे स्कुबा डायवीगपण करु शकता.बनाना बोटीत फेरफटकापण मारु शकता.त्यादिवशी स्वच्छ स्नान करुन गेलात तर dolphin पण
बघु शकता".......हे काही समजले नाही

डॉल्फिनं पारोशांच्या वार्‍याला उभी रहात नसावीत :))

मालोजीराव's picture

25 Feb 2015 - 5:15 pm | मालोजीराव

त्यादिवशी स्वच्छ स्नान करुन गेलात तर dolphin पण बघु शकता

आंघोळीसाठी साबण कोणता वापरावा ?

टवाळ कार्टा's picture

25 Feb 2015 - 5:17 pm | टवाळ कार्टा

स्वतःच्या घरचा किंवा नवीन विकत घेतलेला :)

सुनिल पाटकर's picture

14 Apr 2013 - 10:13 pm | सुनिल पाटकर

गुहागर,वेळणेश्वर ,हेदवी अप्रतिम ..दापोलीला जात आहात तर दाभोळहून बोटीतून पलिकडे गुहागरला जाता येईल...सुन्दर बीच.मंदिरे...घरगुती सोय उपलब्ध आहे

पैसा's picture

14 Apr 2013 - 10:29 pm | पैसा

दापोली-गुहागर कडे जाणार असाल तर आंजर्ले हे दापोलीजवळ समुद्र किनारी गाव आहे. तिथून पुढे राई भातगाव पुलावरून गणपतीपुळे /जयगड गाठू शकता. किंवा जयगडवरून सरळ आरे वारे पुलावरून बसणीमार्गे रत्नागिरी. रत्नागिरीजवळ भाट्ये सुरुबनात एक रिसॉर्ट आहे. तसेच पुढे आडिवरे राजापूर मार्गे सागरी महामार्गाने विजयदुर्ग /देवगड कुणकेश्वर रहायला चांगले आहेत. नंतर सागरी महामार्गाने किंवा एन एच १७ वरून कुडाळ. तिथून मालवण - तारकर्ली - देवबाग. मला तारकर्लीपेक्षा ३ बाजूंना समुद्राचे पाणी असणारे देवबाग जास्त आवडले. जवळपासच्या ठिकाणांमधे रेडीचा गणपती, तेरेखोल किल्ला इ ठिकाणे आहेत.

दिपस्तंभ's picture

15 Apr 2013 - 9:48 pm | दिपस्तंभ

निवती बीच पण खूप सुन्दर आहे... इंटरनेट वर अधिक माहिती घ्याल...

कोमल's picture

19 Apr 2013 - 10:29 pm | कोमल

रेवदंडा आणि कोरलइ पण छान आहे..३ दिवस आहेत तर पुढे मुरुड जंजिरा पण साधता येइल नक्कीच.
सौ.अलका देवधर यांच्या कडे राहाण्याची सोय आहे.
Mrs. Alka Ashok Deodhar
“AASHIS”
Maruti Ali, ( near primary School )
At / Post : Revdanda, Tal : Alibag, Dist. : Raigad
Tel. : 02141 240443 / 9869749028 / 9403069844
E-mail : ; ashokdeodhar11@gmail.com