बोलायचे आहे काही, सांगायचे आहे काही
भावनेस तिच्या कसे, शब्दांचे वावडे बाई
वेदना मुकेपणाची, सलत आत राही
निश:ब्दात गुज हे, गुंफीयले जात नाही
मनाचा सय्यम मोठा, परी उर फुटो पाही
पाणावल्या डोळ्यांनी, ती जळतच राही
आनंदते आक्रंदते परी, ओठांवर काही नाही
आंदोलने मनातली, जणू गोठून आत जाती
उपभोगले त्याने बाईपण, ती वेदनेत न्हाली
जीवन उरले फक्त .. जगणे जळून जाई
... रेशा
प्रतिक्रिया
5 Apr 2013 - 9:29 am | फिझा
छान आहे वेदना!!
5 Apr 2013 - 9:37 am | नानबा
उत्तम शब्दांकन. वेदना जाणवली.
5 Apr 2013 - 4:12 pm | भावना कल्लोळ
शब्दरचना सुंदर
5 Apr 2013 - 6:18 pm | स्पंदना
खुप हळव करुन गेली कविता.
7 Apr 2013 - 10:51 am | Bhagwanta Wayal
वेदना कळुन आली...
कविता ही छान झाली।
7 Apr 2013 - 12:39 pm | रेशा
धन्यवाद :)
7 Apr 2013 - 1:44 pm | अत्रुप्त आत्मा
वा,,,,,,,छान आहे रचना. :)
8 Apr 2013 - 10:07 am | रेशा
:)