अ‍ॅन्डरॉईड घेणार्‍यासांठी

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
1 Apr 2013 - 8:35 pm
गाभा: 

काहीतरी नवीन ओपरेटिंग सिस्टिम असलेला फोन घेण्याच्या विचारात असतांना "तुमच्या अ‍ॅन्डरॉईडसाठी"हा धागा दिसला .पण ही चर्चा वाचून हे काहितरी किचकट यंत्र तर नाही ना असे वाटू लागले . कारण पाच पासून पन्नास हजार रुपयांचे पर्याय आहेत आणि प्रत्येकाचा अमुक फोनपेक्षा तमुक कंपनीचा घेतला असता तर बरे झाले असते असा रिंगटोन वाजतो आहे . मला असे विचारायचे आहे १)अॅपस् ऑफलाईन चालतात का ? २) वेबपेज झटकन सेव करता येते का ? ३)2G समाधानकारक चालते का 3G च पाहिजे ४ )फक्त वाय फायवरच वापरायचे असल्यास गुगलचा नेक्सस ७ सर्वोत्तम आहे का ?५)कीपैडचे आणि या सिस्टिमचे काही वावडे आहे का ? ६)कोणत्या कंपनीचा घ्यावा ७)हैंडसेटमध्ये कोणती गोष्ट नसल्यास अथवा कमी प्रतिची असल्यास फार जाणवते ?इत्यादि चर्चा झाल्यास जुने फिचर फोन मधून तिकडे जाणाऱ्यांना उपयोग होईल .

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Apr 2013 - 8:58 pm | मुक्त विहारि

माहिती मिळाली तर उत्तम..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Apr 2013 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहिती मिळाली तर उत्तमच.

-दिलीप बिरुटे

धन्या's picture

1 Apr 2013 - 9:29 pm | धन्या

माहिती मिळाली तर खुपच उत्तम.

-धनाजीराव वाकडे

श्रीरंग_जोशी's picture

1 Apr 2013 - 9:41 pm | श्रीरंग_जोशी

काहीतरी नवीन ओपरेटिंग सिस्टिम असलेला फोन घेण्याच्या विचारात असतांना

नवीन ओपरेटिंग सिस्टिम असलेला फोन हवाय ना मग उपलब्ध पर्यायांपैकी सर्वात नवीन आहे ब्लॅकबेरी १०,
त्यानंतर विंडोज ८.

आगामी ऑपरेटिंग सिस्टम येत आहे ती फायरफॉक्स ओएस अन इतरही काही आहेतच.

अवांतर - २२ मार्चलाच ब्लॅकबेरी झेड १० घेतलाय. जोरदार फोन आहे.

लंबूटांग's picture

1 Apr 2013 - 11:49 pm | लंबूटांग

अ‍ॅन्ड्रॉईड ही एक open source प्रणाली असल्यामुळे प्रत्येक निर्माता त्या प्रणालीवर त्याच्या इच्छेनुसार बदल करून विकू शकतो. ह्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.

फायदे असे की प्रत्येकाला त्यांच्या जीवनशैलीला पूरक, परवडेल असा फोन घेता येतो. तुम्हाला हवे ते widgets, skins इत्यादी वापरून तुमचा फोन तुम्हाला हवा तसा बनवता येतो जे iOS अथवा windows phone मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तरी शक्य नाही.

तोटे असे की, हे निर्माते जे काही बदल करतात, ते फोन हळू करतात, अथवा battery भाराभार संपवतात. कधी कधी तुम्हाला नको असलेले बरेच program तुमच्या माथी मारतात. हे बरेचसे जेव्हा तुम्ही एखादा windows laptop HP कडून घेता तेव्हा ते hp wireless assistant वगैरे वगैरे गरज नसलेले program त्यात घालून देतात त्यातलाच प्रकार. ह्याला ब्लोटवेअर असे म्हटले जाते.

ह्यामुळे बरेचदा लोक अ‍ॅन्ड्रॉईड फोन कसे slow आहेत अथवा कसे भसाभस battery खातात, वगैरे वगैरे तक्रारी करतात. तो दोष अ‍ॅन्ड्रॉईडचा नसून ह्या सर्व handset निर्मात्यांचा आहे.

ह्या सर्व बदलांमुळेच जेव्हा अ‍ॅन्ड्रॉईड ची नवीन आवृत्ती google बाजारात आणते तेव्हा ती लगेच सर्व फोन वर उपलब्ध नसते कारण निर्मात्यांना हे सर्व ब्लोट वेअर त्याना नवीन आवृत्तीनुसार बदलावे लागते.

त्यामुळेच सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची जेली बीन (४.२) ही आवृत्ती google ने बाजारात आणून जवळपास वर्ष होत आले तरीही बरेच फोन अजून ice cream sandwich (४.१) अथवा त्याहूनही जुनी आवृत्ती असलेले आहेत.

दुसरा बरेचदा चर्चिला जाणारा विषय म्हणजे फोनची quality. अ‍ॅन्ड्रॉईड वर आधारीत फोन कोणीही बनवू शकत असल्याने बरेच स्वस्त फोन हे तकलादू असतात. सर्वसाधारणपणे अ‍ॅन्ड्रॉईड मध्ये what you pay is what you get. जितका फोन महाग तितकी बिल्ड quality उत्तम.

महागड्या फोनचा display सर्वसाधारण पाने जास्ती चांगला असतो.

आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे.

१)अॅपस् ऑफलाईन चालतात का ?
त्या त्या app वर अवलंबून आहे. games वगैरे नक्कीच चालतात.
२) वेबपेज झटकन सेव करता येते का ?
वर म्हटल्याप्रमाणे अ‍ॅन्ड्रॉईड चा फायदा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजे तशी customize करता येते. फोन मध्ये असलेला browser आवडला नाही तर google च्या play store मध्ये कैक इतर browsers आहेत. त्यामुळे तुम्हाला हवा तो browser download करा आणि वापरा.
३)2G समाधानकारक चालते का 3G च पाहिजे
माझ्या मते ह्याचा अ‍ॅन्ड्रॉईड शी काही संबंध नाही.
४ )फक्त वाय फायवरच वापरायचे असल्यास गुगलचा नेक्सस ७ सर्वोत्तम आहे का ?
nexus ७ हा फोन नाही तर tablet आहे. nexus ४ हा फोन आहे.
nexus series google ने स्वत: बनवल्यामुळे त्यात कोणतेही ब्लोट वेअर नसते. ह्यालाच अ‍ॅन्ड्रॉईड vanilaa फ्लेवर म्हटले जाते. त्यामुळे तुम्हाला google ने अ‍ॅन्ड्रॉईड ची नवीन आवृत्ती बाजारात आणल्या आणल्या वापरता येते.
५)कीपैडचे आणि या सिस्टिमचे काही वावडे आहे का ?
नाही. परत customization :). तुमच्या आवडीचा की बोर्ड download करा आणि वापरा.
६)कोणत्या कंपनीचा घ्यावा
वर म्हटल्या प्रमाणे जितका महाग फोन तितक्या चांगल्या प्रतीचे material वापरून बनवलेला. samsung चे galaxy series मधील अ‍ॅन्ड्रॉईड फोन्स छान आहेत.
७)हैंडसेटमध्ये कोणती गोष्ट नसल्यास अथवा कमी प्रतिची असल्यास फार जाणवते.
सर्वच फोन हल्ली कमी अधिक फरकाने सारखेच features देतात. फरक असतो तो build quality, आणि display मध्ये.

वर customizations बद्दल बरेचदा लिहीले आहे. इथे बघा किती वेगवेगळ्या प्रकारे अ‍ॅन्ड्रॉईड फोन्स customize करता येतात.

पुढे मागे वेळ मिळालाच तर एक अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल लेख लिहायचा विचार आहे.

नानबा's picture

1 Apr 2013 - 11:59 pm | नानबा

लेख येउद्यातच. आणि अगदी सविस्तरपणे येउद्यात म्हणजे कंजूसना झालेले कन्फ्युजन बाकीच्यांना व्हायला नको, आणि कंजूसरावांनासुद्धा फोन निवडण्यास मदत होईल.

सोत्रि's picture

1 Apr 2013 - 11:54 pm | सोत्रि

१)अॅपस् ऑफलाईन चालतात का ?
हे कुठल्याही फोन कंपनीवर कींवा ओएस अवलंबून नसते. ते त्या अ‍ॅप वर अवलंबून असते.

२) वेबपेज झटकन सेव करता येते का ?
नेमके काय अपेक्षीत आहे? म्हणजे वेब पेजेस सेव्ह करून ऑफलाइन बघायची आहेत का? तसे असल्यास पुन्हा ते अ‍ॅप वर अवलंबून आहे, फोन कंपनीवर कींवा ओएस वर नाही.

३)2G समाधानकारक चालते का 3G च पाहिजे
3G च पाहिजे असे काही नाही. 2G व्यवस्थित चालते पण परत ते तुमच्या सर्व्हिस प्रोवायडरच्या सर्व्हिस वर अवलंबून आहे.

४)फक्त वाय फायवरच वापरायचे असल्यास गुगलचा नेक्सस ७ सर्वोत्तम आहे का ?
फक्त वाय फायवरच वापरायचे असल्यास कुठल्याही कंपनीचा फोन चालेल. वाय फायवर बॅटरी किती खातो ह्यावरून चांगला किंवा वाईट ठरवावे लागेल. मी आत्तापर्यंत सॅमसंग गॅलेक्सी एस २, सोनी एक्स्पीरिया आणि आयफोन (४ जी एस) वापरले आहेत, त्यात सॅमसंग उजवा वाटला. आयफोन ३जी वर बॅटरी लाइफ मध्ये मार खातो.

५)कीपैडचे आणि या सिस्टिमचे काही वावडे आहे का ?
अजिबात नाही. मराठी की - बोर्डची अ‍ॅप्स ढिगाने उपलब्ध आहेत.

६)कोणत्या कंपनीचा घ्यावा
हे सुचविणे तुमची नेमकी रिक्वायरमेंट काय कळल्याशिवाय सांगणे तसे कठिण आहे आणि ते खूप अ‍ॅबस्ट्रॅक्ट असेल.

७)हैंडसेटमध्ये कोणती गोष्ट नसल्यास अथवा कमी प्रतिची असल्यास फार जाणवते?
हे व्यक्तिसापेक्ष आणि नेमकी रिक्वायरमेंट काय ह्यावर अवलंबून आहे. एखाद्याला फोन ज्या गोष्टीसाठी महत्वाचा असेल त्याचसाठी तो दुसर्‍याला असेल असे नाही.

- (तांत्रिक) सोकाजी

@कंजूस - तुमच्या एकेका शंकेचे (माझ्या कुवतीप्रमाणे) निरसन करतो.

१)अॅपस् ऑफलाईन चालतात का ?

हो चालतात. ज्या अ‍ॅप्सना नेटचा वापर करावा लागत नाही (उदा. अ‍ॅडोब रीडर, एम इंडिकेटर इ.) असे अ‍ॅप्स सहज ऑफलाईन सुद्धा चालतात.

२) वेबपेज झटकन सेव करता येते का ?

होय. त्यासाठी एखादा चांगला ब्राऊजर (उदा. ओपेरा, क्रोम इ.) वापरा. त्यात चटकन वेबपेज सेव्ह होते.

३)2G समाधानकारक चालते का 3G च पाहिजे?

तुमची गरज २जी वर भागत असल्यास ते पुरेसे आहे. मी स्वतः २जी वर व्यवस्थित काम करतो. तुम्हाला हायस्पीड डाऊनलोडिंग, व्हिडियो कॉलिंग, स्काईप कॉलिंग अशी फीचर्स वापरायची असतील तर मात्र ३जी ला पर्याय नाही.

४ )फक्त वाय फायवरच वापरायचे असल्यास गुगलचा नेक्सस ७ सर्वोत्तम आहे का ?

गूगल नेक्सस असाही खूप छान फोन आहे. पण त्यात सॅमसंग नेक्सस, एच.टी.सी. नेक्सस असे काही कंपन्यांसोबत गुगलने काढलेले फोन्स आहेत.

५)कीपैडचे आणि या सिस्टिमचे काही वावडे आहे का ?

वावडे किंवा वाकडे नाही. पण अँड्रॉईडचा आत्मामुळात टचस्क्रीन हा आहे, आणि कीपॅड दिलं की आपोआपच स्क्रीनचा आकार लहान होतो, आणि मग वापरावर निर्बंध येतात, म्हणून शक्यतो या फोन्सना किपॅड नाही. (अवांतर- माझ्या स्वतःकडे असलेल्या सॅमसंग गॅलिक्सी वाय प्रो ला ब्लॅकबेरीप्रमाणे संपूर्ण क्वेर्टी किबोर्ड आहे, पण त्यामुळे स्क्रिन खूप लहान पडतो, आणि ऑप्शन्स नीट सिलेक्ट होत नाहीत.)

६)कोणत्या कंपनीचा घ्यावा?

या प्रश्नावर प्रत्येक ब्रँड वापरणार्‍याचं उत्तर वेगवेगळं असेल. प्रत्येक कंपनीची स्वतःची खासियत आहे. उदा. सॅमसंग वापणार्‍यांना त्यांचा टचविझ हा युजर इंटरफेस आवडतो, तर एच.टी.सी. वापरणारे त्याच्या सेन्स या युजर इंटरफेसचे गोडवे गातात. दोन्ही इंटरफेस मस्त आहेत, पण पसंद अपनी अपनी. सोनीच्या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे तगडे कॅमेरे आणि स्क्रीन रिझॉल्युशन. सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार्‍या कॅनव्हास हा मायक्रोमॅक्सचा फोनसुद्धा तगडा आहे.

७)हैंडसेटमध्ये कोणती गोष्ट नसल्यास अथवा कमी प्रतिची असल्यास फार जाणवते ?

याबद्दल माझं उत्तर- मुख्य बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे १)रॅम २)प्रोसेसर ३)इंटर्नल मेमरी आणि माझ्या लेखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ४) स्क्रीनचा PPI म्हणजे Particles Per Inches.
नवीनच फोन घेत असलात आणि बजेट साधारणपणे १० च्या वर असेल, तर १ जीबी रॅम असणारे फोन्स आहेत. आजकाल जवळपास सगळ्याच फोन्सचा प्रोसेसर कमीत कमी १ गिगाहर्ट्स चा असतो. (अपवाद- सॅमसंग गॅलिक्सी नोट २ सारखे टॉप एंड फोन्स ज्यात १.७ गिगाहर्ट्स चा ड्युअल कोअर प्रोसेसर आहे.) इंटर्नल मेमरी साधारणपणे २ जीबी पेक्षा जास्त असेल असा फोन बघा. कारण आपण इन्स्टॉल करणारे अ‍ॅप्स या मेमरीत असतात, आणि मेमरी कमी असेल तर फोन खूप हळू होतो किंवा वरचे वर हँग होतो.
आता सगळ्यात मुख्य मुद्द्याबद्दल, म्हणजेच स्क्रीनच्या PPI बद्दल थोडं सविस्तर सांगतो. वर म्हटल्याप्रमाणे PPI म्हणजे Particles Per Inches. स्क्रीनचा PPI जितका जास्त, तितका तो जास्त ब्राईट आणि शार्प असतो. त्यामुळे PPI जास्त असलेला केव्हाही चांगला.
आता PPI किती आहे कसं ओळखायचं ते बघू. उदाहरणासाठी मायक्रोमॅक्स कॅनव्हास २ चा PPI कसा काढायचा ते सांगतो. कोणत्याही मोबाईलच्या डिस्प्लेचे पिक्सेल्स किती आहेत हे तुम्हांला नेटवर कळेल. आता कॅनव्हासच्या डिस्प्लेचे पिक्सेल्स आहेत ४८० x ८५४. हे दोन आकडे म्हणजे स्क्रीनच्या अनुक्रमे रूंदी आणि लांबीत असणारे पिक्सेल्सची संख्या असते. जसं या फोनमध्ये रूंदीत ४८० तर लांबीत ८५४ पिक्सेल्स आहेत.
या दोन्ही आकड्यांचा वर्ग काढून त्याची बेरीज करा.
(४८० x ४८०) + (८५४ x ८५४ )
आणि येणार्‍या संख्येचं वर्गमूळ काढा.
(४८० x ४८०) = २३०,४००
(८५४ x ८५४) = ७२९,३१६
(२३०,४००) + (७२९,३१६) = ९५९,७१६
९५९,७१६ चं वर्गमूळ येतं ९७९.६५ म्हणजे जवळपास ९८०.
आता या वर्गमूळाच्या संख्येला मोबाईलच्या स्क्रीन साईझच्या संख्येने भागा. जसं कॅनव्हास चा स्क्रीन आहे ५ इंच, म्हणून , ९८०/५ = १९६.
१९६ हा या फोनचा PPI आहे. PPI जितका जास्त तितका चांगला. उदा. नुकत्याच बाजारात आलेल्या सोनी एक्स्पेरिया Z चा PPI आहे ४४१, आणि सॅमसंग नोट २ चा PPI आहे २६७.
PPI काढण्याचे इतके कष्ट घ्यायचे नसले तर www.geekaphone.com या संकेतस्थळाला भेट द्या. फोन घेण्या अगोदर या साईटला अक्षरशः पिंजून काढा, आणि मगच निर्णय घ्या.
काही माहिती लागल्यास विचारा, नवीन फोनसाठी शुभेच्छा. :)

सोत्रि's picture

2 Apr 2013 - 12:03 am | सोत्रि

सातव्या प्रश्नाचे उत्तर 'प्रोब्लेम' समजायच्या आधिच दिलेले 'सोल्युशन' वाटते आहे.

- (तांत्रिक) सोकाजी

असेलही कदाचित. पण मी स्वतः कमी PPI स्क्रीनचा फोन घेतल्यानंतर फार पस्तावलो होतो राव. मग हे सोल्युशन माझ्यासाठी बैल गेला आणि झोपा केल्यातला प्रकार झाला होता. तसं नवीन फोन घेणार्‍यांच्या बाबतीत होऊ नये हीच इच्छा.

सोत्रि's picture

1 Apr 2013 - 11:59 pm | सोत्रि

पण अँड्रॉईडचा आत्मामुळात टचस्क्रीन हा आहे

अँड्रॉईडचा आत्मा लिनक्स कर्नल आहे. टच स्कीन हे तंत्र आहे. हे अँड्रॉईड ओएस सपोर्ट करते.

- (तांत्रिक) सोकाजी

चूक सुधारणेबद्दल धन्यवाद सोत्रि.

मालोजीराव's picture

2 Apr 2013 - 11:15 am | मालोजीराव

१)अॅपस् ऑफलाईन चालतात का ?

९०% ऑफलाईन चालतात, पण ट्विटर ,फेसबुक, न्यूज संबंधित,यु -ट्यूब महत्वाचं म्हणजे प्ले-स्टोर यांना चालवायला नेट ची गरज आहेच.

२) वेबपेज झटकन सेव करता येते का ?
क्रोम,फायरफॉक्स,ओपेरा यामध्ये हि सोय आहे

३)2G समाधानकारक चालते का 3G च पाहिजे?

2g समाधानकारक चालत नाही हा वैयक्तिक अनुभव आहे,काही हेवी अ‍ॅप्स नीट चालत नाहीत जसे व्हायबर,फेसबुक (निम्म्या वेळा नेटवर्क एरर येते) , मेसेंजर

५)कीपैडचे आणि या सिस्टिमचे काही वावडे आहे का ?

अनेक कि-बोर्ड अ‍ॅप्स उपलब्ध आहेत… एकदा सवय झाली स्पीड वाढतो. स्लायडर कि-पॅड असलेल्या फोन चा हि विचार करू शकता. पण त्यामुळे मोबाईल हेवी होतो.

६)कोणत्या कंपनीचा घ्यावा?

फलाश करणे,रूट करणे इ. उद्योग करणार नसाल तर चांगल्या ब्रान्ड चा घ्या,नाहीतर मायक्रोमाक्स,कार्बन सारखे चांगले पर्याय आहेत. कोणताही फोन घेताना त्याचे ऑनलाईन रीव्हूस वाचायला विसरू नका,मगच निर्णय घ्या.

७)हैंडसेटमध्ये कोणती गोष्ट नसल्यास अथवा कमी प्रतिची असल्यास फार जाणवते ?

स्क्रीन कमी प्रतीची असेल तर प्रचंड मनस्ताप होतो, बाकी प्रोसेसर,बिल्ड क्वालिटी ,कॅमेरा याही गोष्टी महत्वाच्या.

हे सर्व अ‍ॅन्ड्रॉईड टॅबसाठी पण लागू होतं का? टॅब घेताना काय पाहून घ्यावा? वर फडणीससाहेबांनी दिलेल्या वेबसाईटसारखी टॅबसाठी वेबसाईट आहे का?

@आदूबाळ, होय. यातल्या जवळपास सगळ्या गोष्टी टॅब्सनादेखील लागू होतात. अर्थात टॅब आकाराने मोठे असल्यामुळे त्यांचा स्क्रीन PPI मोबाईल्स इतका जास्त नसतो इतकंच. टॅब घेताना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या -
१. बॅटरी क्षमता - जितकी जास्त तितकं उत्तम.
२. प्रोसेसर आणि रॅम - प्रोसेसर जितका मोठा तितका प्रोसेसिंगचा वेग जास्त, पर्यायाने वेगवान ऑपरेशन्स. रॅम जितकी जास्त तितका मल्टिटास्किंग करण्यास उपयोगी.
३. वायफाय - असणं कधीही चांगलं.
४. फ्रंट (सेकंडरी) कॅमेरा - टॅब्लेट ३जी असेल तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला असणार फ्रंट कॅमेरा असणं उत्तम. स्काईप किंवा व्हिडियो कॉलिंगला वापरता येतो.
५. USB कनेक्टिविटी - आजकालच्या बहुतांश टॅब्सना मिनी USB पोर्ट आहेत. त्यांना पेन ड्राईव्ह किंवा डाँगल लावण्यासाठी मिनी USB टु रेग्युलर USB कन्वर्टर कॉर्ड वापरावी लागते. पण काही टॅब्सना आपले नेहमीचे USB पोर्ट आहेत.

geekaphone प्रमाणे टॅब्लेट्स साठी www.tablets.techcrunch.com ही साईट आहे. शिवाय http://tablets-review.toptenreviews.com/ ही साईटसुद्धा खूप उपयोगी आहे.

फडणीससाहेब, धन्यवाद! तुम्ही दिलेल्या साईट्स पालथ्या घालतो...

छान प्रतिसाद ! @लंबुटांग ,@सोत्री आणि @प्रथम फडणीस आपल्याला धन्यवाद .मुद्देसुद उत्तरामुळे हा धागा अवास्तव लांब आणि गुंता न होता त्याचा छानसा गुंडा झाला .माहितीचा उपयोग सर्वांना होईल ........................ ........................वेब पेज सेव होण्यामुळे आपले आवडते लेख नंतर प्रवासात नेट नसलेतरी ऑफलाईन वाचता येतात . PPI छान समजले . ........................ ........................डिसेंबर २०११ ला ' बोल्ट ' ब्राउजर बंद झाल्यावर फारच फजिती झाली .गुगलचे पिकासा ,ब्लॉगर माझ्या मोबाईलमध्ये वापरता येईना .त्यामुळे पूर्ण ओ. एस असलेला फोन घेण्याची गरज भासतेय . एच टिएम एल ५ सपोर्ट करणारा घ्या अशी सूचना मिळाली .म्हणजे अॅडोब नसले तरी चालते .सिंबिअनच्या बेले मध्येच ते होते पण नोकिआवाले याला सोडून विंडोजशी घरोबा करणार होते . विंडोज सिस्टिम दुसरा ब्राउजर टाकायला आडकाठी करतात ( याबद्दल मायक्रोसॉफ्टला दंडही झाला असे परवा वाचले ).२०१२ मध्ये अॅन्डरॉईडचे बरेच अपडेटस् झाले ......................... ................................................ ........................पुन: एकदा सर्वांचे आभार .

मदनबाण's picture

2 Apr 2013 - 12:03 pm | मदनबाण

चांगला धागा...
सध्या मार्केट मधे अ‍ॅन्ड्रॉइड प्रणाली असलेल्या फोनचे वर्चस्व आहे,आणि सगळ्या स्मार्ट फोन मधे याचा बोलबाला आहे. ;)
काही दिवसात अ‍ॅन्ड्रॉइड प्रणाली असलेली वॉशिंग मशिन,फ्रिज इं वस्तु देखील येतील.
सध्या जालावर जबरदस्त चर्चा ज्या फोन बद्धल चालु आहे तो फोन म्हणजे Micromax canvas HD A116
याची तुलना चक्क सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड बरोबर करुन दाखवली जात आहे.(हे शक्य नाही कारण सॅमसंगच्या कॉलिटी आणि त्यांची स्टेबल ओएस यांची तुलना मायक्रोमॅक्स बरोबर शक्य नाही.)
तरी सुद्धा या फोनला प्रचंड मागणी आहे, इतकी की फक्त २४ तासात ८ हजार फोन विकले गेल्याची बातमी आहे !
हा खालचा व्हिडीयो पाहुन मलाही उगाच कॅन्हासधारी व्हावे असे वाटायला लागले.

बाकी मालोजीराव कॅन्व्हसधारी आहे,तरी त्यांनी Micromax canvas चा त्यांचा अनुभव सांगितल्यास या ब्रँड बद्धल अजुन माहिती मिळेल.
आता खरी मजा जेव्हा बाजारात फायरफॉक्स ओएसवाले फोन येतील तेव्हा येईल आणि अ‍ॅन्ड्रॉइड खरी स्पर्धा निर्माण होईल. ;)

मालोजीराव's picture

2 Apr 2013 - 4:08 pm | मालोजीराव

कॅनव्हास HD आणि सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड ची तुलना योग्य नाही.
कॅनव्हास २ आणि सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड हे स्पेक्स च्या बाबतीत भाऊ भाऊ आहेत.
या उलट कॅनव्हास HD चे बेंचमार्क ग्रँड पेक्षा चांगले आहेत. स्क्रीन (पी पी आय -ग्रँड - 187 तर कॅनव्हास HD - 294 ) , प्रोसेसर कॅनव्हास HD - क्वाड कोर तर ग्रँड - डूअल कोर असे मोठे फरक आहेत. किमतीमध्ये 7000 चा फरक आहेच. मायक्रोमॅक्स चे मार्केटिंगवाले एकदम १२ चे अस वैयक्तिक मत… कारण मोठ्या कंपन्या च्या चायना मधील OEM कडून हे लोक लॉट मध्ये मोबाईल उचलतात असं ऐकून आहे,त्यामुळे क्वालिटी बर्यापैकी असते

बाकी माझा कॅनव्हास २ उत्तम स्थितीत आहे अजून तरी, क्यामेरा भिकार आहे एव्हडीच खंत. सगळ्या हेवी गेम्स,HD विडीओज स्मूथ चालतात.6-7 दिवसातून एकदा गंडतो, कंपनीकडून नवीन अपडेट्स ची अपेक्षा न ठेवता कस्टम रॉम वापरून मोबाईल अपडेट ठेवला तर 10000 रुपयात हि उत्कृष्ठ डील आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Apr 2013 - 3:41 pm | प्रकाश घाटपांडे

हे सगळे असे धागे वाचले कि आपण फारच बथ्थड व मागासलेले आहोत असे वाटायला लागते ब्वॉ!

कवितानागेश's picture

2 Apr 2013 - 4:28 pm | कवितानागेश

मस्त प्रतिसाद.
चांगली माहिती मिळाली. :)

मयुरपिंपळे's picture

2 Apr 2013 - 8:21 pm | मयुरपिंपळे

हा फोन मी घेतला. ह्या फोन मधे android icecrem आहे. सर्वच बाबी मधे मस्त आहे.

सुमीत भातखंडे's picture

3 Apr 2013 - 4:23 pm | सुमीत भातखंडे

बॅटरी क्षमता ही फार महत्वाची. ती वर नमुद केलेल्या साईट्स वरून रिव्ह्युज वाचून चेक करून घ्या. कारण मल्टीमिडिया वापर भरपूर असेल तर बॅटरी लवकर ड्रेन होते.
डिसप्लेचं म्हणाल तर अ‍ॅमोलेड्/सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेज सगळ्यात बेष्ट. उत्तम रंग, उत्तम कॉन्ट्रास्ट, उत्तम व्ह्युईंग अँगल्स. सॅमसंगच्या वरच्या श्रेणीतल्या फोनमधे हा डिस्प्ले मिळेल. अर्थात ह्या फोन्सची किंमतही भरमसाठ असते.
आपली गरज आणि आपलं बजेट या दोघांचा मेळ सधून योग्य ते मॉडेल निवडायचा प्रयत्न करावा.

सुमीत भातखंडे's picture

3 Apr 2013 - 4:46 pm | सुमीत भातखंडे

मी नुकताच गॅलक्सी टॅब २ पी ३१०० हा टॅब्लेट घेतला. कंपनी डिस्काऊंट वर बाजारभावापेक्षा थोड्या कमी किंमतीत मिळाला.
बॅटरी परफॉरमन्स निराशाजनक वाटला. डिस्प्ले पी.पी.आय पण खूप कमी आहे. पण तरी मला वाटलेले काही प्रोज खालीलप्रमाणे:

१. ७" स्क्रीन
२. ४.१ जेलीबीन आउट ऑफ बॉक्स
३. मोठा स्क्रीन असल्यामुळे वेब सर्फींगसाठी उत्तम
४. चित्रपट बघण्यासाठीही चांगला. सगळे फॉरमॅट चालतात आणि सगळी रेझोल्युशन्स सुद्धा...अगदी १०८०पी पर्यन्त.
५. १६ जी.बी. इंटरनल मेमरी (मायक्रो एस.डी. घालून वाढवू शकतो)
६. जी.एस.एम./३जी/वाय-फाय सपोर्ट. फोन म्हणूनही वापरू शकतो पण हेड्सेट मस्ट आहे (वजन ३५० ग्रॅमच्या आसपास)
७. सिम कार्ड आणि मेमरी कार्ड हॉट स्वॅपेबल (बॅटरी मात्र बदलू शकत नाही :(.)
८. सॅमसंग च्या मानाने किंमत बरीच कमी ....सध्या बाजारात ह्याची किंमत १५९०० च्या आस-पास आहे

सुहास झेले's picture

3 Apr 2013 - 5:03 pm | सुहास झेले

गॅलक्सी एस २ ..... निव्वळ अप्रतिम फोन मी वापरतोय. उत्तम बॅटरी आणि वापरायला ही सोप्पा.

http://crave.cnet.co.uk/mobiles/samsung-galaxy-s-phone-evolution-explored-in-video-50010728/

आजानुकर्ण's picture

3 Apr 2013 - 10:54 pm | आजानुकर्ण

(रूट न केलेल्या) जेली बीन किंवा आईसक्रीम सँडविचवाल्या अँड्रॉईड फोनवर देवनागरी मराठी फाँट दिसतो का? (उदा. मिसळपाव)

माझ्याकडे kindle fire hd आहे जो अँड्रॉईडवर आधारित आहे असे दिसते. त्यात मराठी फाँट दिसत नाही.

http://www.google.com/nexus/4

ह्या फोनची चर्चा बरेच ठिकाणी वाचली. ह्या फोनबाबत कोणाचे काही बरेवाईट अनुभव असल्यास वाचायला आवडतील. एकंदरीत सॅमसंग गॅलॅक्सीपेक्षा फोन छान वाटत आहे. शुद्ध अँड्रॉईड असल्याने सँमसंग किंवा मोटोरोलाची स्वतःची गंडलेली सॉफ्टवेअरे नसल्याने हाताळायला स्मूथ असावा असे वाटते.

चिगो's picture

4 Apr 2013 - 6:55 pm | चिगो

(रूट न केलेल्या) जेली बीन किंवा आईसक्रीम सँडविचवाल्या अँड्रॉईड फोनवर देवनागरी मराठी फाँट दिसतो का?

होय.. माझ्याकडे सॅमसंग P6800 (7.7) हा टॅब आहे, आणि मी तो रुट करण्याच्या भानगडीत न वर्षापासून गपगुमान मजेत वापरतोय.. हा टॅब मार्केट मधून का काढला ह्याचे कारण मला ठाऊक नाही. (कदाचित अ‍ॅपल वालं लफडं असावं), पण झकास चीज आहे.. ७.७ इंची स्क्रीन, सुपर अ‍ॅमोलेड+ डिस्प्ले ( माझ्या माहितीत टॅब्समध्ये फक्त ह्याच टॅबमध्ये आहे), कंपनी अपग्रेडेड ICS.. मी बरेचदा मिपा,लोकसत्ता टॅबवर वाचतो. पन त्यासाठी सपोर्टिंग ब्राऊजर लागतं. (UC Browser मस्त होतं, पन त्यांचं अपडेटेड व्हर्जन गंडलेलं वाटलं मलातरी)

आजानुकर्ण's picture

4 Apr 2013 - 10:18 pm | आजानुकर्ण

माहितीबद्दल धन्यवाद. कालच अँड्ॉईडवाला गूगल नेक्सस-४ हा फोन विकत घेतला. आजपर्यंत तीन इंची फोन वापराची सवय असल्याने जवळपास पाच इंचाचा फोन बाळगताना शाळेचे कंपासबॉक्स घेऊन फिरल्यासारखे वाटत आहे. एकंदर दर्जा आयफोनपेक्षा छान वाटला. शिवाय आयफोनच्या निम्म्या किमतीत आहे. गॅलॅक्झी एस-३ पेक्षा कॅमेरा कमी दर्जाचा आहे असे वाचले आहे. मात्र मी कॅमेरा फारसा वापरत नसल्याने फारसा फरक पडू नये. या फोनला मायक्रो सीम कार्ड लागत असल्याने नवे सीमकार्ड येईपर्यंत तो वापरता येणार नाही असे दिसते. मराठी अक्षरे छान सुबक दिसत आहेत. जेलीबीन सोबत येणारे गूगल नाऊ हे ऍप्लिकेशन भीतीदायक वाटावे इतका आपला ट्रॅक ठेवते आहे असे दिसते.

माझीही शॅम्पेन's picture

5 Apr 2013 - 10:17 am | माझीही शॅम्पेन

गेले सहा महिन्या पासून सॅमसॅंग गॅलक्सी एस3 वापरतोय , सर्वार्थाने परिपूर्ण असा फोन असल्याने माझा शोध संपला , जेली बिनस तर मस्त आहेत

अॅन्डरॉइड च्या सर्वच श्रेणी एच टि एम एल ५ साठी तयार आहेत का ? अथवा २.३च्या पुढच्याच ? कोणितरी फोन ब्राउजरचा धागा काढयला हवा .

काळा पहाड's picture

5 Apr 2013 - 12:11 am | काळा पहाड

मला एक गोष्ट कळत नाही. अपग्रेडेबल टू एक्स एक्स व्हर्जन हा काय प्रकार आहे? तुम्ही मला फोन विकताय. मी त्या वर कुठलेही व्हर्जन टाकेन पुढील कितिही वर्षे असे का होत नाही?

तुषार काळभोर's picture

5 Apr 2013 - 9:43 am | तुषार काळभोर

वापरतोय ३+ वर्षांपासून.
मागच्या शनिवारी थेऊरवरून येताना गाडी चालवत बोलत होतो. माज नडला.
मोबाईल पडला अन् स्क्रीन फुटली. पुढच्या साठी कॅन्व्हास(एचडी) फायनल केलाय.
पण फुल्ल क्वेर्टी विथ स्लायडर मस्स्त वाटतं. फुल्ल टचवर टायपायला विचित्र वाटणार.